प्रकाशचित्रांचा झब्बू २- घड्याळे

Submitted by संयोजक on 11 August, 2025 - 04:35

मायबोली गणेशोत्सव २०२५ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू
आजचा विषय आहे घड्याळे.

लहानपणापासून आपले एका गोष्टीशी अटळ नाते कशाशी असेल तर ते म्हणजे वेळेशी. वेळ कोणासाठी थांबत नाही. हीच वेळ दाखवणारे साधन म्हणजे घड्याळ. घड्याळांचा शोध पंधराव्या कि सोळाव्या शतकात लागला म्हणे. तेव्हापासून कालानुसार अनेक प्रकारांच्या घड्याळ्यांचा शोध लागला व ती वापरात आली. घड्याळांमधे वैविध्य तरी किती, आकार, प्रकार, किंमती एक ना अनेक.
तुमच्या कडे असणार्‍या, तुम्हाला तुमच्या दिनचर्येत दिसणार्‍या मनगटी, भिंतीवरील, शहरातील टॉवर वरील घड्याळांचे फोटो या धाग्यावर येऊ द्या.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

१. ही स्पर्धा नसून हा खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आवडते Garmin. हे हातात घालून बऱ्याच रेसेस केल्या आहेत. थोडा वेळ चाललो नाही नुसते बसून राहिलो की move म्हणून ओरडायला लागते Lol

IMG-20250828-WA0042.jpg

watch.jpg

हे माझ्या मोठ्या ताईने मला मी २००८ मधे BE झाले तेव्हा दिलेलं बक्षीस. मी अजूनही हेच वापरते. थोडं फिकं पडलंय, नवीन असताना एकदम झळाळून दिसायचं. पट्टे बदलले अनेकदा. मेटल बेल्ट लावून मिळाला असता, पण एक मेटल बेल्टचं घड्याळ गाडीवरून पडलं आणि हरवलं तेव्हापासून मी मेटल बेल्ट वापरणं बंद केलं.

Screenshot_20250829_192611_Gallery.jpg

आमच्या मालवणजवळील घरातले नेहमीच्या वापरातले घड्याळ. पुणे विद्यापीठाजवळील भीमथडीच्या जत्रेत २०१० साली घेतलेले.20250830_152113.jpg

IMG_20170114_204841.jpg

मुंबई सीएसटी इमारत
मुंबईत रहात असताना ह्या इमारतीकडे आवर्जून थांबून बघितलं असं कधीच झालं नाही.
मॅरॅथॉन करता जातो त्यावेळी तिकड्च्या सगळ्या इमारतींकडे टुरिस्टासारखे बघीतले जाते.

एखाद्या अलार्मच्या घड्याळाशिवाय अशा भिंतीवरच्या पसाऱ्याला शोभा नाही Happy

IMG-20250830-WA0038.jpg

घड्याळे आवडली आहेत. माझा संबंध घड्याळाच्या मागच्या बाजूला आला होता काही वर्षं. दुरुस्ती करत होतो तेव्हा. बॅटरी सेलची घड्याळे आली आणि यांत्रिक घड्याळे मागे पडली. भिंतीवरील टोले देणारी घड्याळे आणि आतील रचना मात्र खासच असते.

IMG-20250831-WA0001.jpg

मैत्रिणीने नवे बुटिक सुरू केल्यावर तिला दिलेले हॅण्डमेड घड्याळ ( दुसऱ्या मैत्रिणीने बनवून दिले आहे गिफ्ट. मी फक्त फोटो काढला होता)

माझ्याकडील घड्याळे...
तरी यात नुकत्याच (गेल्या २-३ वर्षात)घेतलेली स्टॉप वॉचेस, स्मार्ट वॉचेस यांचा समावेश केलेला नाहीये.

20171020_223135.jpg20141015_115251.jpg20141021_110042.jpg20171020_223135.jpg20180222_215117_Richtone(HDR).jpg20180222_215237_Richtone(HDR).jpg20180222_215853.jpg20180222_215957.jpgIMG-20170112-WA0001.jpgIMG-20141015-WA0003.jpgIMG_20250831_093016_0.jpg

सारीच घड्याळे सुंदर.
ऋन्मेषः: घड्याळ छानच. अवांतरः गजराच्या घड्याळाची घराच्या आकाराची आधारचौकटही आवडली. त्यातला कपडे घातलेला मिकी माऊसही आवडला.
विकु: पहिले घड्याळ आणि डिझेल जास्त आवडली.
राजः हवामानविषयक घड्याळ आवडले.

नवीन घड्याळं ही छान आहेत.
Vt च्या घड्याळाचा फोटो आवडला हर्पेन...
सुधीर ह्यांना ही +११

हे आहे ग्रीनिच इथलं घड्याळ. ह्याच वैशिष्ट्य म्हणजे आपली घड्याळ बारा ताशी असतात त्यामुळे घड्याळ बघून सकाळचे सात वाजलेत की संध्याकाळचे हे कळत नाही. हे घड्याळ मात्र चोवीस ताशी आहे . इथे मिनिट काटा दर दोन आकड्यांनी पाच मिनिट झालीत हे दर्शवतो कारण डायल वर चोवीस आकडे आहेत. मध्यरात्री बारा पासून सुरवात होते त्याची. आपल्या सहाच्या पोझिशन ला इथे वाजतात दुपारचे बारा.
त्यामुळे पटकन पाहिले तर सात वाजून वीस मिनिटं झाल्यासारखं वाटतंय पण प्रत्यक्षात वाजलेत दुपारचे एक वाजून वीसेक मिनिट.

नीट बघा म्हणजे तुम्हाला ही मजा येईल. मी फोटो काढला तेव्हा जस्ट एक फोटो म्हणून काढला घरी येऊन बघितलं तर वेगळं वाटल म्हणून खोलात गेले तर वरची माहिती मिळाली.

IMG-20250829-WA0019.jpg

ग्रीनिच इथलं घड्याळ कमालीचे इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा लूक सुद्धा तितकाच मस्त आहे. बॅकग्राऊंड सुद्धा आवडले.

हे माझं casio चं घड्याळ, ज्यात अल्टीमीटर आहे, म्हणजे ज्यात समुद्रसपाटीपासूनची उंची दिसते. हा फोटो बंगळूरजवळच्या 'शिवगंगे' नावाच्या ठिकाणी काढलाय!IMG-20231105-WA0082.jpg

इंडियाना युनिव्हर्सिटीमधील हे एक चारही बाजूने वेळ दाखवणारे पुरातन घड्याळ..


हेच घड्याळ थोड्या वेगळ्या कोनातून...


2024 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन यशस्वी रीत्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांना हे घड्याळ भेट मिळाले आहे -- PXL_20250902_054430873.MP~2.jpg

Pages