- पर्याय 1: घर खरेदी
घर किंमत: ₹1 कोटी
डाउन पेमेंट: ₹50 लाख
कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI
EMI: ~₹43,400/महिना
एकूण व्याज: ~₹54 लाख
एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज)
अतिरिक्त खर्च:
प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख
सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख
एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख
- म्हणजे 20 वर्षांत एकूण खर्च = ₹1.04 कोटी + ₹21.6 लाख ≈ ₹1.26 कोटी
20 वर्षांनी घराची किंमत (6% वाढ धरली तर) = ~₹3.21 कोटी
पर्याय 2: भाड्याने राहणे + गुंतवणूक
प्रारंभिक गुंतवणूक: ₹50 लाख
SIP: ₹40k/महिना + 10% वार्षिक टॉप-अप, 20 वर्षे
CAGR: 12%
परिणाम:
एकरकमी ₹50L → ~₹4.83 कोटी
SIP → ~₹5.2 कोटी
एकूण गुंतवणूक मूल्य: ~₹10.03 कोटी
भाडे खर्च:
सुरुवातीला ₹25k/महिना, दरवर्षी 10% वाढ
20 वर्षांत एकूण भाडे = ~₹1.9 कोटी
20 वर्षांनंतर निव्वळ संपत्ती = ₹10.03 – ₹1.9 = ~₹8.13 कोटी
-अंतिम तुलना
घटक घर खरेदी भाडे + MF
एकूण खर्च (20 वर्षांत) ₹1.26 कोटी ₹1.9 कोटी
20 वर्षांनी मालमत्ता ~₹3.21 कोटी ~₹8.13 कोटी
तरलता (Liquidity) कमी खूप जास्त
स्थैर्य जास्त (स्वतःचं घर) कमी (भाडे वाढतं, स्थिरता कमी)
जोखीम प्रॉपर्टी मार्केट इक्विटी मार्केट
निष्कर्ष
फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी).
पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.
आमच्या इथे एकाने धानोरीत
आमच्या इथे एकाने धानोरीत बारा हजार कि पंधरा हजार गुंठा या भावाने पाच गुंठे जागा घेतली होती. बहुतेक २०१० साली. आता तिथे २८ लाख रूपये किंमत आहे. काही काही भागात वाढणारा दर खूप जास्त असतो, काही ठिकाणी स्टॅग्नन्ट असतो. आमच्या किवळे आणि आजूबाजूच्या भागात लोक इन्वेस्टमेन्ट म्हणून फ्लॅट घेत सुटलेत. ज्या भागात इन्फ्रा खूप येईल तिथे भाव खूप वाढतात. आता किवळे ते मावळ रस्त्यावर वीस किमी अंतरावरच्या गुंतवणुकी रिटर्न्स देतील असे म्हणतात.
पण पाण्याचा प्रश्न आहे. पाणी निर्माण करता येत नाही. त्यामुळं जी सध्या घरं आहेत त्यांचे दर १५ वर्षानंतर आजच्या पेक्षा जास्त अॅक्सिलरेट होत जाणार. शाळा , कॉलेज, नोकरीच्या जागा, मेट्रो या भागातले दर इतर भागापेक्षा खूप जास्त वाढत राहणार.
सोशल मिडियावर उदात्त विचार
सोशल मिडियावर उदात्त विचार आणि मते मिळतात.
घ्या नाहीतर नका घेऊ पण एक
घ्या नाहीतर नका घेऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वस्तात कुठे मिळत असेल तर घेऊ नका. पछाडलेल्या वास्तू असतात.
घर घेताना शेजार पण बघावा
घर घेताना शेजार पण बघावा लागतो.
https://www.youtube.com/watch?v=4mQLB4GNq3E
हो ना बरोबर आहे, नाही तर
हो ना बरोबर आहे, नाही तर पायात फाटक्या चपला, अंगात बिन इस्त्रीचा शर्ट, हातात कळकी पिशवी आणि निघाले कोटी ची एफ डी रिन्यू करायला बँकेत असं व्हायचं. >>>>>
ह्याबद्दल सहमत! पण २० वर्षांच्या emi च्या विळख्यात अडकून अनेक लोकांनी उपव्होग घेणे टाळले आहे हे पाहिलेय.
आज जे घर एक कोटी रूपयांना मिळते ते १५ वर्षानंतर १५ कोटी रूपयांना मिळत असेल तर ? >>>>
हे कॅलक्युलेशन मी केले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील घरांची अगदी पॉश एरियातलीही किंमत दर साल दर शेकडा (cagr) ८ टक्केच्या वर नाही. मुंबईची गोष्ट वेगळी आहे कारण मुंबईत बरेच वेगळे फॅक्टर आहेत. म्हणजे आजचे १ कोटीचे घर १५ वर्षांनी ८ टक्के जरी केजीआर धरला तटीही २.५- ३ कोटीच्या वर नाही.
३० वर्षांपूर्वी पार्ल्यात २५ लाखात २ बेडरूम चांगल्या सोसायटीत, चांगल्या शाळेजवळ, भरपूर पार्किंग इ. इ. घर मिळत होतं. त्याची ६ टक्के ३० वर्षात वाढून १.५ कोटी किंमत होते.
तो फ्लॅट आज ४ कोटीच्या खाली मिळणे अशक्य आहे. >>>>>
ह्याचा cagr ९.७ टक्के आहे म्हणजे शेअर मार्केटच्या इन्वेस्टमेंट पेक्षा कमीच. तेच २५ लाख ३० वर्षाआधी गुंतवले असते तर १२ टक्के cagr ने आज ७.५ कोटी झाले असते. आणि मार्किट ह्या काळात तितके वाढले आहे.
According to a report by
According to a report by CRISIL, the average house price in India has increased by approximately 6% per year over the past 20 years. >>>>
क्रिसिलचा रिपोर्ट माहित नाही पण मी जे घर २००० साली ७.५६ लाखात घेतले त्याला आज लोक १.२५ करोड द्यायला तयार आहेत, मार्केट रेट १.७० करोडपर्यंत आहे. (ह्याचे एक कारण अजुन १०-१५ वर्षात रिडेवलपमेंट होऊन सध्या आहे त्यापेक्षा जास्त जागा फुकटात मिळण्याची शक्यता हे असावे)
आणि ह्याच भागात ह्याच साईजचे नवेकोरे घर घ्यायला गेलो तर ३ ते ४ करोडच्या खाली मिळणार नाही. नवी बांधकामे इतकी जोरात सुरु आहेत की पुढच्या वेळेस नमुत गेल्यावर माझी कॉलनी कुठे आहे हे मला शोधावे लागेल.
सध्या कॉलनीच्या अगदी बाजुलाच हाय राईज टॉवर येतोय.
२०२४ नंतर विकत घेतलेल्या घरांना इन्डेक्सेशनचा फायदा मिळणार नाही, सरसकट १२.५०% कर भरावा लागणार. त्याआधी घेतलेल्या घरांच्या फायद्यावर इन्डेक्सेशन वापरले तर २०% कर व नाही वापरले तर १२.५० % कर भरावा लागेल असे हल्लीच वाचले. विक्रीतलस फायदा नव्या घरासाठी वापरला किंवा अमुक एका बँकेत ठेवला तर कर भरावा लागणार नाही असे आधी एक कलम होते ते काढुन टाकले की काय माहित नाही.
घर म्हणजे भावनिक गुंतवणुक. भाड्याचे घर म्हणजे टांगती तलवार हे खरे असले तरी मुंबईत घराच्या किंमती आता २ करोडपासुन सुरवात होताहेत, इएमआय लाखाच्या घरात जातो आणि ह्या दोन करोडच्या घरासाठी चार करोडचे पेमेंट विस वर्षे लागुन करावे लागते. घरही सोबत जुने होत जाते, २० वर्षांनी त्याची मार्केट वाल्यु नव्या घराच्या तुलनेत कमी भरते. ईएमआयमुळे नवराबायको दोघांनाही नोकरी करत राहणे अनिवार्य होते, कितीही ताण आला, मानसिक व शारिरीक त्रास होत असला, घरात कितीही प्रश्न उभे राहिले तरी नोकरी सोडता येत नाही. याचा परिणाम क्वालिटी ऑफ लाईफवर होतो, नंतर ही क्वालिटी सुधारता येत नाही.
म्हणुन भाड्याकडे वळावे तर आता भाडीही खुप वाढलीत, पार्ल्यासारख्या ठिकाणी दोन बेडरुमच्या घराचे भाडे सहज एक लाखापर्यंत आहे. भाग जितका प्राईम तितके भाडे जास्त. ईएमआय व भाडे सारखेच पडत असेल तर ईएमआय भरलेला बरा. निदान शेवटी घरतरी आपल्या नावावर असेल.
मुळ धाग्यातले २५k भाड्याचे घर मिळवायला खुप लांबवरच्या उपनगरात जावे लागणार आणि ते घर स्टेशनपासुन दुरही असणार. त्यामुळे रोज वाहतुकीचा खर्च वाढणार. मुलांसाठी शाळा कॉलेज वगैरे प्रश्न उपस्थित होणार.
मुंबईबद्दल सगळेच गणित बदलते,
मुंबईबद्दल सगळेच गणित बदलते, कारण मुंबईला वाढायला लिमिट आहे, पुणे आठ दिशानी वाढतेय, आणी नववी दिशा म्हणजे वर आकाशाच्या दिशेनेही.
माझ्या सारखा माणूस मन मारून
माझ्या सारखा माणूस मन मारून का होईना हफ्ते भरेल पण समजा EMI नसेल तर तेवढेच पैसे SIP किंवा इतर ठिकाणी गुंतवणे शक्यच होणार नाही. हजार वाटा फुटतील.
किराये के घर में ख़ुशीया भी किरायेकीं होती है. असं कुठंतरी ऐकलं आणि पाठलंही आहे. त्यामुळे जिथं दीर्घकाळ राहणार तिथं स्वतः च घर पाहिजेच. वाटलं तर एक कोटीची ऐपत असेल तर पन्नास लाखाचं घ्या आणि उरलेले पैसे SIP, LIC वगैरेत गुंतवा.
अमितव आणि ममोताई +786
अमितव आणि ममोताई +786
जो पैसे सेविंग आणि गुंतवणुकीचा विचार आज केला जातो तो आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर अचानक कुठे गायब होणार..
तेव्हाही पैसे गुंतवले साठवले वाचवले जाण्याची शक्यता राहणार आणि तसे झाल्यास त्याचा उपभोग पुढची पिढी घेणार..
भाड्याच्या घरात बालपण गेलेल्या मुलानी कदाचित स्वतःचे घर घेतले असेल आणि आपल्याकडे पैसे असून त्यांच्या घरात राहावे लागेल. प्रेम असूनही आश्रितासारखे..
किंवा म्हातारपणी दोघांना गरजच काय मोठ्या घराची म्हणून पैसे असूनही छोटासा फ्लॅट विकत घेऊन राहावे लागेल. म्हणजे आयुष्यभर मोठ्या भाड्याच्या घरात राहिल्यावर शेवटी आपल्या हक्काच्या पण छोट्या घरात राहायचे. तेही अशा ज्या सोबत आपल्या कुठल्याही आठवणी जोडल्या गेलेल्या नाहीत. म्हणजे एक प्रकारे विकत घेतलेले वृद्धाश्रम झाले ते..
अजून एक म्हणजे मुले आज आपल्याला लाडाची आणि प्रेमाची असतात, पण पुढे त्यांचीही नजर आपल्या पैशावर पडू शकते. तशी ती घरावर सुद्धा पडू शकते पण ते आपण जिवंत असेपर्यंत कोणी विका म्हणत नाही.
अर्थात बरेच शक्यता आहेत आणि यातले काही होईलच असे नाही. पण जो प्लान आपण आज कॉम्प्रमाईज करून आखत आहो तो फुलप्रूफ नाही एवढे मात्र खरे.
साधना चांगला मुद्दा फक्त...
साधना चांगला मुद्दा फक्त...
२०२४ नंतर विकत घेतलेल्या घरांना इन्डेक्सेशनचा फायदा मिळणार नाही, सरसकट १२.५०% कर भरावा लागणार. >. एक बदल, जुलै २०२५ नंतर विकणार्या घराना इन्डेक्सेशनचा फायदा मिळणार नाही, सरसकट १२.५०% कर भरावा लागणार. बाकी सगळ्या कायद्यात (जसे दुसरे घर घेतल्यावर कर माफ, बॉड मध्ये गुंतवणुक) बदल नाही.
तरुण मुले भाड्याने राहातात कारण त्यामुळे त्याना नोकरी बदलताना भारतात कुठेही राहु शकतात. समजा जर पुण्यात घर घेतले आणि बेंगलोरला चांगली संधी आली की मर्यादा येतात. एकदा मुल शाळे जायला लागली की घर घेतात.
धन्यवाद साहिल शहा.
धन्यवाद साहिल शहा.
घर विकत घेऊन रहायचे की
घर विकत घेऊन रहायचे की भाड्याने राहून ते पैसे गुंतवावे, हा न संपणारा वाद आहे.
कारण दोन्ही बाजूंचा एकाच गोष्टी कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
एक financial assetची दुसऱ्या ॲसेट सोबत तुलना करणे सोपे आहे.
पण त्यात हक्काचे घर, त्या अनुषंगाने वाटणारी सुरक्षितता, भाड्याने राहताना येणाऱ्या अडचणी, तडजोड, वगैरे अनेक भावनिक मुद्दे येतात आणि ते व्यक्तीसापेक्ष आहेत.
दोन्ही गट वेगवेगळे मुद्दे मांडतात.
They are talking about two separate things.
या गोष्टीचा निष्कर्ष कसा निघणार?
मी लोकांना स्वतःचे घर या
मी लोकांना स्वतःचे घर या हट्टापायी मुलांची हौसमौज मारतानाही बघितले आहे आणि सुरवातीला भाड्याचा छोटा फ्लॅट आणि हळूहळु अपग्रेड करत स्वतःची मोठी जागा असे आनंदात जगतानाही बघितले आहे. अमुकच नेबरहूडमधे अमुक प्रकारचेच घर हवे या खोट्या प्रतिष्ठेपायी आर्थिक तणाव झेलताना/कॅश पुअर होताना जसे बघितले आहे आणि तसेच काही काळापुरते चक्क ठरवून स्वतःचे घर विकून दुसरीकडे रेंटने रहाताना आणि आर्थिक संकट परतवल्यावर पुन्हा घर खरेदी करतानाही बघितले आहे.
घर स्वतःचे की भाड्याचे, वयाच्या कुठल्या टप्प्यावर काय योग्य हे प्रत्येक कुटुंबासाठी वेगळे असणार. कालानुसार आणि देश-प्रांतानुसारही हे गणित बदलणार. मात्र प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी सारासार विचार करुन योग्य तो निर्णय घेतल्यास जो काही निवारा निवडला आहे तो त्या त्या टप्प्यावर आनंदाचा नक्कीच ठरु शकतो.
इथे काही गृहीतकं दिसतात.
इथे काही गृहीतकं दिसतात. एकदा घर विकत घेतलं की ते कायमचं. पहिलंच घर घेएकदाच अगदी हव्वं तस्संच घ्यायचं.
इथे एक रिअल इस्टेट एजंट आहेत
इथे एक रिअल इस्टेट एजंट आहेत. त्यांचं म्हणणं आहे कि अजूनही शहराच्या जवळ दहा ते बारा लाख रूपये गुंठा जमीन मिळते. तीन गुंठा जमीन घेतली आणि पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम केलं तर जागेची गुंतवणूक ३६ लाख रूपये + २३ ते २५ लाख बांधकाम खर्च येईल. म्हणजे साधारण साठ लाखांच्या आसपास दुमजली चार बेडरूमचं घर बांधून होईल. यात एक रिस्क आहे. गुंठेवारी होईपर्यंत ते बेकायदेशीर समजले जाईल. पण गेल्या कित्येक वर्षात अशी घरं नियमितच होत असतात. लोकांना कायदेशीर गुंतवणूक हवी असल्याने बिल्डर्सचा फायदा होतो.
एन ए प्लॉट ५० ते ६० लाखाच्या आसपास जाईल पण खडकवासला, तळेगाव,कामशेत किंवा अशा ठिकाणी मिळेल. ५० लाख डाऊनपेमेंट करण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे. एन ए प्लॉटसची स्कीम असेल तर सगळ्या फॅसिलिटीज मिळतातच. मामुर्डीत स्टेडीयममुळे अचानक भाव वाढले. गोदरेज स्कीम मधे एक कोटी रूपये गुंठा इतका भाव झाला आहे. सुरूवातीला घेतला असता तर फायदा झाला असता.
१ कोटी गुंठा??? जमिनींचे व
१ कोटी गुंठा??? जमिनींचे व त्यावरील घरांचे भाव काहीही ह्या सदराखाली वाढताहेत.
गोदरेज ब्रँड मुळे भाव आहे.
गोदरेज ब्रँड मुळे भाव आहे. आजूबाजूला अजून आठ लाख रूपये गुंठ्याने मिळते जमीन. अकरा गुंठे घेतलेली परवडेल. ते ही पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर. नांदेड सिटी मधे पावणे दोन कोटी रूपये गुंठा जमीन आहे. पण इथे जो एन प्लॉटला एफ एस आय मिळतो तेव्हढा ते देत नाहीत. यातला काही एफएसआय यांनी त्यांच्या स्कीममधे वापरला आहे.
गुंठेवारी कायदा लवकरच होतोय.
गुंठेवारी कायदा लवकरच होतोय.
गॅझेट येणं बाकी आहे बहुतेक.
मात्र भूखंड घेण्यापूर्वी Zonal Remarks घेणं अत्यावश्यक आहे.
किराये के घर में ख़ुशीया भी
किराये के घर में ख़ुशीया भी किरायेकीं होती है. असं कुठंतरी ऐकलं आणि पाठलंही आहे.>>>>
ह्या सर्व मार्केटिंग स्ट्रॅटेजीस आहेत असे मला वाटते.
बाकी व रबर्याच लोकांनी म्हटले आहे की स्वतच्या घरासोबत आठवणी असतात! मेज़ म्हणणे हेच आहे की त्या बदल्यात तुम्हाला ५ कोटी कुणी देत असेल तर? ५ कोटी आकडा डोळ्यापुढे ठेवा!
त्या बदल्यात तुम्हाला ५ कोटी
त्या बदल्यात तुम्हाला ५ कोटी कुणी देत असेल तर? ५ कोटी आकडा डोळ्यापुढे ठेवा!
>>>>>>
ठीक आहे मी तयार आहे. द्या मला पाच कोटी
ठीक आहे मी तयार आहे. द्या मला
ठीक आहे मी तयार आहे. द्या मला पाच कोटी >>
वरचे आकडे बघा! त्या कॅलक्युलेशन नुसार तुम्हाला ५ कोट मिळतील!
एक्झॅक्टली हाच मुद्दा होता.
एक्झॅक्टली हाच मुद्दा होता.
कुठलेतरी कॅल्क्युलेशन जे फिट बसेल की नाही प्रत्यक्षात तसेच घडेल की नाही त्या भरवशावर पाच कोटी मिळणार आहेत..
जेवढे तुम्ही आपल्या पोस्टमध्ये सहज लिहिले आहे की पाच कोटीच्या बदल्यात विचार करा तितके सहज ते नाहीये. हे सुद्धा मार्केटिंगमध्ये प्रलोभन दाखवण्यासारखे झाले
They are talking about two
They are talking about two separate things.
या गोष्टीचा निष्कर्ष कसा निघणार?
>>>>>>
पण निष्कर्ष काढायचाच कशाला
म्हणजे माझ्यापुरते म्हटले तर मी निष्कर्ष काढावे म्हणून इथे पोस्ट लिहीत नाहीये. तर जो माझा विचार, माझा दृष्टिकोन आहे तो मांडत आहे. असे प्रत्येकाने आपापले दृष्टिकोन मांडावे. ज्यामुळे दृष्टिकोनांची देवाणघेवान होते. प्रत्येकाला काही नवीन, फायदे नवीन धोके समजतात.
आर्थिक क्षेत्रात त्यातही
आर्थिक क्षेत्रात त्यातही शक्यतो शेअर मार्केट आणि रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात सख्ख्या भावाबहीणींनाही न मागता सल्ला देऊ नये असे म्हटले जाते.
रिअल इस्टेटच्या वाढीचा सरासरी दर हा सगळीकडेच लागू होत नाही. काही ठिकाणी तो खूप जास्त तर काही ठिकाणि न्यूनतम असू शकतो.
याच प्रमाणे शेअर मार्केट मधल्या गुंतवणुकीचा अनुभव व्यक्तीसापेक्ष आणि रोखेसापेक्ष आहे. काही वर्षांनी काय होईल हे दोन्ही क्षेत्रात ठामपणे सांगता येत नाही.
भारतात सत्तांतर झाले तर आज ज्या कंपन्यांना स्वस्तातल्या तेलखरेदीचा फायदा होतोय तो होणार नाही. सरकारी कंपन्यांना कमी नफ्यावर तेल विकायला सांगितले तर मोठ्या दोन खासगी कंपन्यांचे शेअर्स खाली येतील.
मग ह्याच हिशेबाने घराची किंमत
मग ह्याच हिशेबाने घराची किंमत ही वाढेलच हे ही फिक्स नाही. आपण २० वर्षे emi भरायचा नी त्या पटीत घराची किंमत वाढली नाही तर? पास्ट रेकॉर्ड पाहिले तर शेअर मार्किट १२ टक्के द. सा. द. शे. ने वाढले आहे पण मेट्रो सिटीत ही घर ८ टक्के द. सा. द. शे. ने वाढले आहे.
आपण २० वर्षे emi भरायचा नी
आपण २० वर्षे emi भरायचा नी त्या पटीत घराची किंमत वाढली नाही तर?
>>>
आपण गाडी घेतो त्या गाडीची किंमत किती वाढते विकताना?
वस्तूचा वापर केला जातो ते सुद्धा बघावे. दिवसातले बारा तास ज्या घरात कुटुंबासह राहतो यापेक्षा मोठा वापर कुठल्या वस्तूचा नसावा.
आपण गाडी घेतो त्या गाडीची
आपण गाडी घेतो त्या गाडीची किंमत किती वाढते विकताना?
वस्तूचा वापर केला जातो ते सुद्धा बघावे. दिवसातले बारा तास ज्या घरात कुटुंबासह राहतो यापेक्षा मोठा वापर कुठल्या वस्तूचा नसावा. >>>>गाडी आणि घराची तुलना होऊ शकत नाही. पण रेंटने घर परवडते आहे चिकट घेण्यापेक्षा मुद्दा हा आहे.
अमरेंद्र बाहुबली, जिथे
अमरेंद्र बाहुबली, जिथे राहायचं ते घर तुम्ही विकण्यासाठी घेत नाही.
Net worth मोजताना त्यात राहत्या घराची किंमत मोजत नाहीत. कारण तुम्ही ते विकणार नाही, असं धरलं जातं.
ज्या भागात घरांची किंमत
ज्या भागात घरांची किंमत साधारण १८ ते ३० लाख रू होती त्या भागात आज दहा हजार भाडं चालू आहे. ईएमआय २० वर्षे भरला जातो. तो भाड्यापेक्षा जास्त असतो. पण भाडं आयुष्यभर भरावं लागतं. जर ईएमआय आणि भाडं यात तफावत जास्त नसेल तर विकतच घ्यावं.
असे प्रश्न कोष्टक बनवूनच मांडलेले बरे.
काही काही भागात घर महागडं असतं पण भाडं खूप स्वस्त असतं. उदा सांगवडे गावच्या पुढे लाईफ रिपब्लिक स्कीम आहे. किंमती जास्त आहेत पण भाडं एव्हढं मिळण्याची शक्यता नाही. कारण या पंचक्रोशीत सहा हजारापासून भाडं चालू आहे. लोकांनी पूर्वी बारा लाख किंमत असताना फ्लॅट घेतले होते त्यांना सहा ते दहा हजार भाडं मिळतं. त्यांचा ई एम आय सुद्धा पंधरा ते वीस हजार आहे. आता जे नवीन घर घेतील त्यांना यापेक्षा जास्त भाडं मिळणे शक्य नाही.
म्हणुन कुठल्या भागासाठी ही केस लागू आहे हा महत्वाचा प्रश्न ठरतो. पुणे कँप भागातलं भाडं हे शिरवळ भागात लागू होत नाही.
तसंच एकदा घर घेतलं कि ते नंतर पुढच्या पिढ्यांनाही वापरता येतं. नूतनीकरणाचा किंवा पुनर्विकासाचा खर्च काय येईल तो. पण प्रत्येक पिढीने भाडं भरण्यापेक्षा ही वन टाईम गुंतवणूक अनेकांना योग्य वाटते. राहत्या घराची किंमत शून्य यासाठीच धरली जाते.
अमरेंद्र मी घर आणि गाडीची
अमरेंद्र मी घर आणि गाडीची नाही तर वस्तूच्या वापराची तुलना करत आहे. वस्तू वापराचा मुद्दा क्लिअर करायला ते उदाहरण दिले आहे.
एखादी गोष्ट तुम्ही वापरता, तुम्ही त्याचा उपभोग घेता त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते ती तुम्ही हिशोबात धरत नाही आहात.
भाड्याच्या घरात जो उपभोग घेतला जातो आणि आपल्या मालकीच्या घरात जो उपभोग घेतला जातो, या दोन्हीत जे समाधान आणि आनंद मिळतो त्यात फरक असतो आणि बहुतांश लोकांसाठी तो आनंद आपल्या हक्काच्या घरात जास्त असतो.
Pages