स्वतःचे घर की भाड्याचे घर?

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 16 August, 2025 - 03:00

- पर्याय 1: घर खरेदी
घर किंमत: ₹1 कोटी
डाउन पेमेंट: ₹50 लाख
कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI
EMI: ~₹43,400/महिना
एकूण व्याज: ~₹54 लाख
एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज)
अतिरिक्त खर्च:
प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख
सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख
एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख
- म्हणजे 20 वर्षांत एकूण खर्च = ₹1.04 कोटी + ₹21.6 लाख ≈ ₹1.26 कोटी
20 वर्षांनी घराची किंमत (6% वाढ धरली तर) = ~₹3.21 कोटी

पर्याय 2: भाड्याने राहणे + गुंतवणूक
प्रारंभिक गुंतवणूक: ₹50 लाख
SIP: ₹40k/महिना + 10% वार्षिक टॉप-अप, 20 वर्षे
CAGR: 12%
परिणाम:
एकरकमी ₹50L → ~₹4.83 कोटी
SIP → ~₹5.2 कोटी
एकूण गुंतवणूक मूल्य: ~₹10.03 कोटी
भाडे खर्च:
सुरुवातीला ₹25k/महिना, दरवर्षी 10% वाढ
20 वर्षांत एकूण भाडे = ~₹1.9 कोटी
20 वर्षांनंतर निव्वळ संपत्ती = ₹10.03 – ₹1.9 = ~₹8.13 कोटी

-अंतिम तुलना
घटक घर खरेदी भाडे + MF
एकूण खर्च (20 वर्षांत) ₹1.26 कोटी ₹1.9 कोटी
20 वर्षांनी मालमत्ता ~₹3.21 कोटी ~₹8.13 कोटी
तरलता (Liquidity) कमी खूप जास्त
स्थैर्य जास्त (स्वतःचं घर) कमी (भाडे वाढतं, स्थिरता कमी)
जोखीम प्रॉपर्टी मार्केट इक्विटी मार्केट

निष्कर्ष
फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी).
पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.

Group content visibility: 
Use group defaults

छान चर्चा सुरु आहे.

>>दिले तर दोन चार पायऱ्या कमी चढाव्या लागतील असे वाटते का?>>
जनरेशनल वेल्थ ही केवळ घर, गुंतवणूक एवढीच मर्यादित नाही. त्यामुळे इतर संचित देण्यात कमी पडलो तर मला नाही वाटत लाँग टर्म फार फरक पडतो, उलट बरेचदा काही पायर्‍या खाली येणे होते. त्या उलट मुलांना मोठे होताना इतर संचित, अमितने लिहीले आहे तसे पोर्टेबल स्किल्स दिले, जोडीला वृद्धापकाळाला सामोरे जाण्यासाठी पालकांनी शक्य तितकी तयारी केली तर मुले समर्थपणे पायर्‍याही चढतील आणि जोडीला त्यांचे मध्यम वयात कमी प्रमाणात सँडविच होईल.
रानभूली,
तुम्ही गुजराथी लोकांचे उदाहरण दिले आहे तर माझ्या वर्गातली गुजराथी मुले ही १३-१४ वर्षापासून शाळा संभाळून घरच्या व्यवसायात पडेल ते काम करत असत. सुट्टीच्या दिवशी-सणावाराला आम्ही मजा करत असू तेव्हा त्यांना जास्तीचे काम असे. यातली काही पुढे सीए, वकिलही झाली, काही घरच्या व्यवसायात आली, काहींनी पुढे बदलता काळ ओळखून घरच्या व्यवसायाच्या जोडीला अजून वेगळा व्यवसाय सुरु केला. या सर्वांनाच लहान वयात लागलेली शिस्त, कस्टमर सर्विसचे बाळकडू, इतर खाचाखोचा, लहान पणापासून गोळा केलेला जनसंपर्क याचा फायदा झाला. पालकांनी रिअल इस्टेट घेवून ठेवली होती हे खरे पण ती रिअल इस्टेट मुळची मराठी माणसांची होती. आधीच्या पिढीने कमावलेले, ऐतखाऊ मुले गरज लागेल तसे या लोकांना विकत किंवा कर्जापोटी गमावत. तेच गुजराथी कुटुंबात ऐतखाऊंना चक्क बेदखल केलेलेही बघितले आहे.

सध्या माझ्या बघण्यात अनेक मराठी तरुण मुले आहेत ज्यांना रहाण्यासाठी आजी आजोबांचा + आईवडीलांचा असे दोन दोन फ्लॅट आहेत. मात्र पालकांची काळजी संपायचे नाव नाही. दोन फ्लॅट आहेत पण ते पुण्यात आहेत, मुंबईत नाहीत म्हणून कुरकुरणारी मंडळी बघण्यात आहेत. आईवडीलांचे छप्पर आहे तर यांना हातखर्चासाठी पैसेही पुरवा असा प्रकार. हाय रिस्क क्षेत्रात मुशाफिरी करायची तर तुमच्याकडे कला कौशल्य हवे आणि त्या सोबत 'स्वतःचे' असे बरेच काही हवे. आईबाबांचे हक्काचे छप्पर असले तरी ते त्यांचा म्हातारपणीचा आधार, अपयश आलेच तर पुन्हा उभे रहाण्यासाठी तो तात्पुरता निवारा इतपतच त्याकडे बघावे ते तुमच्या अपयशावर कायमचे सोल्यूशन नाही. आजच्या काळातही पालक नको म्हणतात कारण बरेचदा आपले लेकरु खरे किती वकुबाचे आहे ते त्यांना पक्के माहित असते.

स्वाती २
प्रतिसाद वाचला. छान लिहीले आहे.
बर्‍याच गोष्टींची गल्लत या धाग्यावर होतेय असं वाटतं.
१. सगळ्ञांचीच मुलं विदेशात जातात.
२. सगळीच मुलं सुस्थितीत असतात.
३. सगळेच सहज घर घेऊ शकतात
४. सर्वांना जोखमीच्या बाजारात लीलया गुंतवणूक करता येते
५. घर एका पिढीपुरतंच असतं.
६. मोठ्या पगाराच्या नोकर्‍या सहज उपलब्ध आहेत, त्या सर्वांना मिळतात.
असा समज झाला आहे का कुणाचा ?

घराकडे पाहण्याचा वेगवेगळ्या थरातल्या लोकांचा दृष्टीकोण वेगवेगळा असतो इतकंच सांगायचंय. आपण ज्या स्थितीत आहोत तिथून पाहून ती फुटपट्टी सर्वांना लावता येत नाही. आपलं म्हणणं आपल्यासाठी १००% बरोबर असतं. पण दुसर्‍याला ते कंफर्टेबल वाटू शकतंच असं अजिबात नाही. कंफर्टची व्याख्याही बदलत राहते.

मुलांना द्यायचे स्किल्स आणि एखाद्या शहरात राहण्याची सोय या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाड्याचं घर घेऊन जर पैसे वाचत असतील तर पुढच्या पिढीला आयतेच घर दिले तर त्याचे जास्त पैसे नाहीत का वाचणार ? मुलांना घर घेऊन दिलं किंवा पैसे दिले कि ती वायाच जातात हे गृहीतक किती टक्के बरोबर आहे ? ही शक्यता सगळ्या सिनॅरियो मधे असणारच. पण घरासाठी तडजोड करावी लागत नाही हे पण आहे. घरच्या जबाबदार्‍या आल्याने शिक्षण सोडावं लागणे, मुलगा असेल तर लग्न न करता येणे, किंवा मुलीच्या बाबतीत लवकर लग्न करून ताण कमी करणे अशी उदाहरणे बघण्यात आहेत.

तसेच आधीच्या पिढीने घर घेतलं त्यात ही एक व्हॅल्यू अ‍ॅड केली तर दोन ते तीन पिढ्यात वापरली जाणारी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

मराठवाड्यातून आलेली कुटुंबं आहेत. आजोबांच्या वेळी येऊन चाळीत राहिली. घरंनावावार झली. दुसरी पिढीही तिथेच राहिली आता तिसर्‍या पिढीला नवीन घर घेताना ते घर विकता आलं. म्हणजे दोन पायर्‍या तरी वाचल्याच.

सुदैवाने मला अनेक प्रकारच्या लोकांमधे वावरता आले. यातल गुजराती एक उदाहरण दिलं.

रास्तापेठ, भवानीपेठ या भागात तेलगू विणकर समाज राहतो. हे लोक कदाचित पाच सहा पिढ्या आधी आलेत. तेव्हांपासून ते तिथेच राहतात. त्यांचा घरावरचा खर्च कमी होतो. यांच्यात कुणाला चांगली नोकरी मिळाली, धंदा जोरात चालू झाला तर मग ते दुसरं घर घेतात, पण ज्याची स्थिती डाऊन आहे त्याला घर मिळतं.

कष्टकरी लोकांच्यात खूप वावरता आलं. एक तर पुण्यात रिक्षा चालवून जागा घेत राहिला. त्या वेळी अर्थात स्वस्त होत्या. तेव्हां त्याने घर बांधलं. त्याची आता तिसरी पिढी आहे त्या घरात. त्यांना मुलं झाली आहेत. काही बिल्डींग कॉण्ट्रॅक्टर आहेत, काही आणखी काही.

मुलांचं करीयर हा वेगळा इश्यू आहे. त्यांच्या करीयर साठी सुद्धा हल्ली भरपूर लोक घ्यावं लागतं त्यासाठी गहाण ठेवायला घर लागतंच.
अन्य शहरात गेलं तरी हे घर भाड्याने देता येतं, विकून त्याचे पैसे करता येतात. वाया जात नाही ते.

गावाशी संबंध खूप कमी आहे. पण मातीच्या घरातून दगडी घरं, वाड्यात आल्याला आता पन्नास साठ वर्षे झालीत सर्वांनाच. तेव्हांपासून ती घरं वापरात आहेत. फार तर रानात घरं बांधली जातात. घरावर पुढच्या पिढ्यांना खर्च करावा लागत नाही. शिक्षणावर भरपूर खर्च करतात. बाकी कशावर खर्च केला जात नाही. कुणाचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे, कुणी शहरात द्दूध घालतक, कुणी कॉण्ट्रॅक्ट घेतात. असे चांगले चालले आहे. त्यांना गाव सोडायची गरज वाटत नाही. असे लोक कमी असतील का ?

या पोस्टमधली उदाहरणे सर्वांसाठी लागू नाहीत. ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्या चष्म्यातून ती त्यांना कंफर्टेबल आहेत.
रजा घेते.

मुळात परवडत असेल तरच घर विकत घ्यायचा विचार करावा. नाहीतर भाड्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही>>> हा रुल ऑफ थंब होऊ शकतो...अन्यथा जरी घेतलेले घर ॲज ॲन ॲसेट म्हणून ( मुलं अथवा स्वतः कुठे दुसरीकडे कामानिमित्त रहायला गेल्याने) वाया जात नसले तरी परवडत नसतांना केवळ स्थैर्य अथवा आपलं हक्काचं घर म्हणून ते विकत घेतांना काढलेल्या खस्ता, इतर ऐहीक गोष्टींत मारलेलं मन, ईएमआयसाठी जॉब्स टिकवण्याच्या रॅटरेसमधे सोसलेली दशकांची ओढाताण हे सर्व एका तागडीत टाकलं असता याची एकूण बेरीज ही नंतर मिळणाऱ्या केवळ भाड्याच्या रकमेत अथवा विकून‌ मिळणाऱ्या नफ्यात तोलण्याच्या लायकीची नसते हे ही तितकचं खरं.

रानभुली,

या विषयासाठी वेगळा धागा काढता का? तिकडे चर्चा करू.

हा धागा भरकटायला नको.

सगळे प्रतिसाद वाचले .. आम्ही नवीन घर घेतलं आहे त्यामुळे ही चर्चा आता तशी उपयोगी नाही पण अमिताव,, स्वाती२ , ऋणमेश यांचे प्रतिसाद आवडले.
घर घेताना वरील प्रतिसादरखाच विचार केला आणि घर विकत घेतलं.

भरत यांनी लिहिलेला मध्यम मार्ग वाचायला आवडेल . त्याने एक वेगळी दिशा मिळू शकते

Submitted by अतरंगी on 19 August, 2025 - 21:22 >>> धागा माझ्या पोस्टमुळे भरकटत असेल तर दु:ख वाटेल.
पण तो कसा काय भरकटला हे समजले नाही. कृपा करून सांगाल का ? जेणेकरून पुढे काळजी घेता येईल. Happy
( फुटकळ कारणासाठी विनाकारण धागे काढायला जमत नाही. )

अच्छा. पण स्वाती २ यांच्या पोस्टमधे आलेले मुद्दे आधी वाचले. त्यावर खूप विचार करून पोस्ट लिहीली आहे.
त्यामुळे धागा भरकटला हे काही समजले नाही. शिवाय या पोस्टनंतर काही लिहायचे बाकी नसल्याने रजा घेईन असेही म्हटले होते.
तुम्ही या विषयावर धागा काढू शकता.

माझ्या पोस्टमधे जो विषय आहे तो आणि धाग्याचा विषय वेगळा कसा आहे हे अद्याप समजलेले नाही. अनेक प्रतिसादात आलेले मुद्देच तर आहेत त्यात.

गुजरात , राजस्थानातून आलेली बरीच कुटुंबे प्रथम धंद्याची जागा ( भाड्याची )घेतात. पुढे दुकान आणि मागे दाटीवाटीने राहतात. आणलेले पैसे, दागिने मोडून घेतलेले पैसे धंद्यासाठी वापरले जातात. पुढे कधीतरी राहाण्याची जागा ( भाड्याचीच) जवळच कुठेतरी घेतात. जाण्यायेण्याच्या खर्च वाचतो, दुकान बारा तास उघडे ठेवायला अडचण नसते. जे लोक कुठल्या धंद्यात उडी घेऊन फसले, बुडले तरी घरावर टाच येत नाही. मालमत्ता त्यांच्या नावावर भाडेपावतीने असते.

जाई, इथे बव्हंशी दोन टोकांचे मतप्रवाह आले आहेत. एक - कर्ज काढून घर घेतलं की बाकी काही करता येत नाही. त्यापेक्षा भाड्याच्या घरात राहा. पैसे वाचवा. गुंतवा . श्रीमंत व्हा.
दुसरा - भाड्याच्या घरात राहणे वाईट. काही करून स्वतःचं घर घ्या.

आता स्वतःचं घर घ्यायचं की ते अगदी आपल्या स्वप्नातलंच हवं. असं लिहिताना तरी लिहितात. आणि एकदा घर घेतलं ते कायमचं..

त्यापेक्षा आपल्या त्या त्या वेळाच्या परिस्थिती , गरजा यांचा ताळमेळ घालून घर घ्यावे. गरजा वाढल्या, क्षमता वाढली की मोठे, अधिक सोयीचे घर घ्यावे. माझा विचार इथपर्यंतच होता. अमितने पुढचेही लिहिले आहे. गरजा कमी झाल्या की लहान घरात जावे.
-
दुसरं - घर घेतलं की बाकी सगळ्या आर्थिक गरजा मागे पडतात. गुंतवणूक करता येत नाही असंही इथे लिहिलं गेलं. माझ्या पाहण्यात काही लोक आहे जे कर्ज काढून घर घेतल्यावरही इतर गोष्टींसाठी प्लानिंग आणि गुंतवणूक करतात. फायनान्शल प्लानर्स तर सगळ्या गोल्ससाठी टारगेट ठरवायला मदत करतात.
---
रानभुली यांनी लिहिलं तसं बर्‍याच भिन्न परिस्थिती असतात , गरजा, उद्दिष्टे , विचार करायची पद्धत वेगळी असते. आपल्याला जे योग्य वाटतं ते दुसर्‍याला वाटेलच असं नाही, आणि त्याने निवडलेला पर्याय त्याच्या जागी योग्य असेलही.
शिवाय लेखक पुण्यातल्या घराबद्दल लिहितोय. त्याला मुंबईतली परिस्थिती विचारात घेऊन सांगणं हेही पटलं नाही.
---
अतरंगी , तुम्ही म्हणताय ते मी केलं आहे. ठरवून नाही. परिस्थितीवश झालं. अर्थात मला पर्याय होता. त्यातला हा पर्याय मी निवडला. काही गोष्टी झाल्या.
तोवर FIRE वगैरे संज्ञा ऐकल्याही नव्हता. तेव्हा प्रचलित होत्या का माहीत नाही. यापेक्षा जास्त लिहायचं तर पब्लिक फोरमवर वैयक्तिक तपशील द्यावे लागतील, जे प्रशस्त वाटत नाही. मायबोली गणेशोत्सवाच्या एका उपक्रमात थोडं लिहिलं आहे.

Financial freedom ची माझी व्याख्या आयुष्यात कधीही काम करायला न लागणे ही आहे.>>> माझी पण. म्हणजे साधारण ५० नंतर. गुंतवलेले पैसे रीटर्न्स देत राहतील आणि मला काही अमुक मासिक हफ्ता मिळत राहील. असे स्वप्न आहे. फार हाय फ्लाय नाही. शांत पणे जगायचेय.

पैसे साठवले तर पुढच्या पिढीला दोन चार पायर्‍या कमी चढाव्या लागतील>>> राभु. मला वाटत> आपल्या आई बाबा, सासरे ह्यांची पिढी ह्या विचारात राहिली, ना स्वत: काही मन आवडी जपल्या ना काही फार ट्रीप्स केल्या. मुलांना संस्कार शिक्षण देणे हे मी कर्तव्य मानते आई बाबांचे, त्यांच्या साठी डबोलं जमवणे माझा उद्देश्य नाही.मुलांन्ना त्यांचं उडु द्यावं Happy

त्या पिढीतल्या विचारांचे आईवडील आजही असतात बरेच. सगळ्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर सारखा नसतो.

मुळात परवडत असेल तरच घर विकत घ्यायचा विचार करावा. नाहीतर भाड्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही >> बरोबर आहे, पण हे obvious नाही का? परवडत नसेल तर घर घेणार कसं? इथे मी परवडणे म्हणजे कर्जाचे हफ्ते भरणे परवडते असं गृहीत धरतो आहे. ते परवडत नसेल तर बँकेची जप्ती नाही का येणार?

फायर वाले लोक अजून कसे आले नाहीत या धाग्यावर असे वाटले होते इतक्यात ते आलेच.

हे एक नवीन खूळ लोकांच्या डोक्यात घालून ठेवले आहे. कुणी तर जोखमीच्या ठिकाणी गुंतणूक करण्यात ज्या लोकांचा प्रचंड फायदा आहे अशा लोकांनी. म्हणजे म्यूचूअल फंड सही है अशी कॅम्पेन चालवणाऱ्या लोकांनी.

खरी परिस्थिती पाहता या फायर वाल्या लोकांचे खायचे आणि दायखावयचे दात पूर्णपणे वेगळे असतात हे लगेच लक्षात येते. यांची टोटल फायनान्शियल हिस्ट्री एक टोटल फेल्युअर असते. परंतु दिल को बेहलाने के लिए अच्छा है असे त्यांचे विष्फुल थिंकिंग ते त्यांची खरी हिस्टरी म्हणून लोकांच्या माथी मारत असतात. आणि प्रत्यक्षात काय असते? तर गेल्या काही वर्षात जगभर इक्विटीचे जे प्रचंड ओवर वॅल्युएशन झाले आहे त्यात यांचा लकीली फायदा झालेला असतो. त्याला ते स्वतःची अक्कल हुशारी वगैरे समजत असतात आणि लोकांना घरे घेऊ नका वगैरे सल्ले देत फिरतात.

FIRE हा शब्द ऐकताच एक स्टीरिओटिपिकल जसा MLM पंथातला 'सर' असतो तसा कुणीतरी एक NRI नजरेसमोर येतो. जो एरव्ही स्वतःस प्रचंड शहाणा समजत असतो.

दोन वेळच्या रोजी रोटी साठी प्रचंड झगडणाऱ्या लोकांत हे FIRE कोंबडे तोऱ्यात मिरवत असतात. सामान्य माणसाला घर ही एक खूप मोठी सुरक्षितत्ता वाटत असते कारण सिस्टम त्याच्यासाठी एक प्रचंड मोठी दमनकारी गोष्ट असते हे या फायर लोकांना लक्षात येत नाही. त्यांची वेगळीच दुनिया असते.

भिन्न परिस्थिती असतात , गरजा, उद्दिष्टे , विचार करायची पद्धत वेगळी असते. आपल्याला जे योग्य वाटतं ते दुसर्‍याला वाटेलच असं नाही, आणि त्याने निवडलेला पर्याय त्याच्या जागी योग्य असेलही.>>> यावरून एक गोष्ट आठवली, जेंव्हा ९/११ नंतर ओसामाच्या ठावठिकाणाची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने २५ मिलियन डॉलर्सचं बक्षीस लावलं होतं, तेंव्हा काबुल मधल्या एका फुगे विक्रेत्याला विचारले असता विक्रेत्याने जर त्याला २५मिलियन डॉलर्सचं बक्षीस मिळालं तर त्याचे होलसेल दरात फुगे विकत घेईन असं म्हटलेलं.... प्रत्येक जण एकसारखा किंवा एक ठरावीक साचेबद्ध विचार करत नाही हे तर वादातीतच.

इथे मी परवडणे म्हणजे कर्जाचे हफ्ते भरणे परवडते असं गृहीत धरतो आहे. ते परवडत नसेल तर बँकेची जप्ती नाही का येणार?>>>> माझ्या मते परवडणे म्हणजे हफ्ते भरून अगदी हाता-तोंडाशी गाठ पडेल इतकी मोठी उडी मारू नये.

त्यापेक्षा आपल्या त्या त्या वेळाच्या परिस्थिती , गरजा यांचा ताळमेळ घालून घर घ्यावे. गरजा वाढल्या, क्षमता वाढली की मोठे, अधिक सोयीचे घर घ्यावे. माझा विचार इथपर्यंतच होता. अमितने पुढचेही लिहिले आहे. गरजा कमी झाल्या की लहान घरात जावे.>>> हे अगदीच पटले. इनफॅक्ट घर घेताना आम्ही हाच विचार केला आणि १ बीएचके घेतले कारण घर तर हवे होते पण आवाक्यात असणारे हवे होते . EMI तर भरणार होतोच पण बाकीची हौस पुर्वता यावी हे ही पाहिले म्हणून सध्या छोट्या घरापासून सुरुवात केली आहे

म्हणून सध्या छोट्या घरापासून सुरुवात केली आहे
>>>
हो, योग्य केले. घर विकत घेतले म्हणजे आयुष्यभर तेच असे गरजेचे नसते. दहाबारा वर्षे राहून ते विकून गरजेनुसार छोटे किंवा मोठे घेता येतेच.
फक्त खरेदीत फसू नये जेणेकरून मोठा फटका बसेल.
याच कारणास्तव, मी नवी मुंबईत काही कल्पना नसताना थेट घर घ्यायला नको म्हणून आधी भाड्याने दोन वर्षे राहूया म्हटले. दोन वर्षाने शोधायला सुरुवात केली आणि मनासारखे मिळाले नाही म्हणून आपले भाड्याचे घरच बरे म्हणत शोध थांबवला.

अजून दोन वर्षांनी बायकोला स्वतःचेच घर हवेच झाले. अन्यथा मी भाड्याच्या घरात निवांत होतो. म्हणून पहिल्याच पोस्टमध्ये म्हटले होते की दोघांनी मिळून जोडीने घ्यायचा हा निर्णय आहे. केवळ मला काय हवे आणि माझा आनंद कशात आहे एवढंच विचार करून चालत नाही. स्वानुभव आहे. रोज चर्चा चालायची.

अर्थात मुलांचे बालपण आपल्या हक्काच्या घरात जाऊ दे, हिच योग्य वेळ हा बायकोचा मुद्दा मलाही पटला आणि आम्ही पुन्हा घर शोधायला सुरुवात केली.

कसलीही घाई न करता शोधले कारण मला माहीत आहे की मी स्वतः किती आळशी आहे. जे एकदा घेतल्यास आयुष्यात पुन्हा घर शोधायचे कष्ट मला नको होते.

मागे वळून पाहताना जाणवते की तिने मांडलेला मुद्दा मुलांच्या दृष्टीने योग्यच होता.

बहुतेक सदर धागा एक विशिष्ठ वर्ग समोर ठेवून लिहिला असावा असे वाटते.
साधारण प्राप्ती असणारा, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्राथमिकता वेगळ्या असू शकतात.
आज जर मध्यम उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीने कर्ज घेऊन घर बांधले तर तो निवृत्त होई पर्यंत कर्ज फ़िटलेले असेल, मुलांचे शिक्षण पूर्ण झालेले असेल आणि कदाचित मुले बाहेरगावी गेली असतील (ज्याला एकच मुलगी आहे तिचे लग्न झाले असेल) अश्या व्यक्तींची गुंतवणूक किती राहिली असेल (आज शिक्षण किती महाग आहे याचा विचार करून )?
त्याला किमान / कमाल निवृत्तीवेतन ६/७ हजार इतकेच असेल तर त्याला भाड्याच्या घरात राहणे परवडेल कि स्वतःच्या मालकीच्या? उतारवयात दर दोन तीन वर्षांनी घर बदलणे आर्थिक / शारीरिक दृष्ट्या शक्य असेल का?
जिथे बरीच वर्षे राहिलेले असतील तेथेच कमी भाड्यात घर मिळणे अशक्य, कमी भाड्याचे घर जिथे असेल तेथून दवाखाने (उतारवयातील प्राथमिक गरज) किती अंतरावर असतील? तेथे नियमित येणे जाणे परवडेल का?
एकंदरीत ममव साठी स्वतःचे घर असणेच योग्य वाटते.

विस्कळीत प्रतिसादासाठी क्षमस्व

जाई, नव्या घराबद्दल अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

घर आणि सोने -सोन्याचे दागिने या बाबत बरेचदा भावनिक होवून निर्णय घेतले जातात आणि हे लक्षात घेवून व्यावसायिकही त्या प्रकारे जाहीरात करतात. स्वप्नपूर्ती ते यू डिझर्व पर्यंत काहीही सांगून ही मंडळी बजेटबाहेर जायला सांगत रहातात. त्यात आता भर रोज नव्याने उगवणार्‍या सो कॉल्ड आर्थिक गुरुंची. स्वतःचे घर नकोच हे एक टोक तर रिअल इस्टेट मधे गुंतवणूक करुन पॅसिव इनकम हे दुसरे टोक. सामान्य माणसासाठी बरेचदा नोकरीच्या सुरुवातीला शक्यतो पालकांसोबत राहून किंवा शेयर बेसिसवर राहून सेविंग करत इमरजन्सी फंड, मग लहान भाड्याचा फ्लॅट/ कर्ज काढून छोटा फ्लॅट अशी सुरुवात करत हळू हळू वाटचाल करणे शहाणपणाचे ठरते. इमरजन्सी फंड हा खर्‍या इमरजन्सीसाठी, डाऊन पेमेंटचे सेविंग वेगळे, 'इंटिरियर' ही इमरजन्सी नाही एवढे जरी पथ्य पाळले तरी अचानक आर्थिक संकट आल्यास गणित बिनसणे, इएमआयचा ताण वगैरे टाळता येतो.

भारतात सगळीकडेच आधीचा फ्लॅट विकून नवा घेणं तितकं सरळ सोपं नाही. आधीचा फ्लॅट विकला जायला आणि हवी ती किंमत मिळायला वेळ लागू शकतो.. इतके नवे फ्लॅट्स उपलब्ध असल्याने जुन्या फ्लॅट्सना सरसकट लवकर गिऱ्हाईक मिळेल असं सांगता येत नाही. चांगलं लोकेशन, छान सोसायटी असेल तर सोपं होतं.
त्यामुळे पहिला फ्लॅट घेताना नीट विचार करून घ्यायला हवा

>> भारतात सगळीकडेच आधीचा फ्लॅट विकून नवा घेणं तितकं सरळ सोपं नाही. आधीचा फ्लॅट विकला जायला आणि हवी ती किंमत मिळायला वेळ लागू शकतो.. इतके नवे फ्लॅट्स उपलब्ध असल्याने जुन्या फ्लॅट्सना सरसकट लवकर गिऱ्हाईक मिळेल असं सांगता येत नाही. <<

१००% सत्य.

कमीत कमी वर्ष आणि जास्तीत जास्त कितीही वर्षे.

शिवाय टॅक्स, रजिस्ट्रेशन इत्यादी गोष्टी सरळ नीट होत नाहीत.

त्यामुळे लहान घरातून मोठ्या घरात जाणे वगैरे लोक जे म्हणत आहेत ते इकोनॉमिकल तर नाहीच नाही वरती मनस्वास्थ्य हरवण्याची ग्यारंटी.

त्यामुळे आयुष्याला जोवर नीट स्थैर्य येत नाही तोवर घर विकत घेऊ नये,

इतर ठिकाणांचं माहीत नाही, माझ्या आजूबाजूला हे होताना दिसतं.

ही मुंबईबद्दलची बातमी
https://www.hindustantimes.com/real-estate/mumbai-real-estate-96-housing...

अर्थात हे सगळीकडे फीजिबल असेलच असं नाही. हाच मार्ग बरोबर आणि इतर सगळे चुकीचे असं मी म्हणत नाहीए.

स्वतःच्या मालकीचं छत असण्याचा आनंद अवर्णनीय. मुलगा एक वर्षाचा असताना दोन बेडरूम फ्लॅट बुक केला अन् तो तीन वर्षांचा झाल्यावर स्वतःच्या घरात राहायला आलो. पैशांची फार ओढाताण वैगेरे नाही पण जवळचे होते नव्हते ते सर्व पैसे वापरले आणि अर्थातच कर्ज पण घ्यायला लागलं.
पण आयुष्यातला तो सर्वात चांगला निर्णय वाटला. कॉलनी नुकतीच तयार होत होती त्यामुळे मुलगा आणि त्याचे मित्र मैत्रिणी इथे रेती मातीत खेळत वाढले. त्याला आणि आम्हालाही कायम स्वरुपी मित्र मैत्रिणी मिळाले.
काही वर्षांपूर्वी घरातल्या ज्येष्ठ ना मुळे मोठ्या घराची गरज निर्माण झाली तेव्हा आता आहे त्या परिसरात मोठ घर आर्थिक कारणाने शक्य नव्हतं, म्हणून नाईलाजाने जरा लांबच्या ठिकाणी नवीन फ्लॅट बुक केला पण तो हाती येईतो त्याची गरजच संपली.
तसही हे राहत घर आम्हा कुणालाच सोडावंसं वाटत नव्हतच.
आता तर ह्याच बिल्डिंग च्या redevolopment चा विचार चालू आहे. आहे त्याच ठिकाणी 3bhk मिळणार.

शर्मिला छान.. सेम pinch..
आणि हे खालचे बेस्ट!
<<<< आता तर ह्याच बिल्डिंग च्या redevolopment चा विचार चालू आहे. आहे त्याच ठिकाणी 3bhk मिळणार.>>>

Pages