

एबीसी वाहिनीवरच्या 'शार्क टँकचा' प्रेक्षक ह्या शो चा चाहता नसेल असे चित्र कदाचित दिसणार नाही.
अमेरिका - हे स्वप्न बघणार्या आणि ते स्वप्न जगू पाहणार्या लोकांच्यात दडलेला ऊद्योजक शोधतांना त्याला करमणूकीचा तडका देवून एक अतिशय वेगळा आणि ऊत्साह वाढवणारा कार्य्क्रम लोकांसमोर आणल्याबद्दल वाहिनीचे धन्यवाद आणि अभिनंदन.
ईनोवेशन, बिझनेस स्ट्रॅटेजी, बिझनेस मॉडेल अश्या क्वालिटेटिव तर सेल्स, एक्विटी, कॅश फ्लो, रेवेन्यू, नेट, ग्रोस, प्रॉफिट अश्या क्वान्टिटेटिव फायनान्शिअल शब्दांचा भडिमार असलेला का कार्य्क्रम बिझनेस शार्क्स आणि प्रेझेंटर ऊद्योजक त्यांच्या प्रश्नांनी आणि ऊत्तरांनी अतिशय रोमांचक बनवतात.
शो बद्दल जास्त काही सांगून त्याची मजा घालवत नाही पण २००९-१० पासून माझा हा अतिशय आवडता कार्यक्रम शेअर करावा असे वाटले.
आपण इथे, फेमस ऑफर्स, शार्क्स, कॅपिट्ल सीकर्स, मिस्ड ऑफर्स ह्या आणि अनेक विषयांबद्दल गप्पा मारू शकतो.
मला वाटते हा शो भारतात सुद्धा कुठल्याशा वाहिनीवर येतो. यू ट्यूब वरही जवळ जवळ सगळेच एपिसोड्स ऊपलब्ध आहेत. सध्या भारतातले ऊद्योजकांसाठीचे फेवरेबल वातवरण पहाता नवीन ऊद्योजकांसाठी हा शो निश्चितच माहितीवर्धक ठरेल.
हो कार्यक्रम मस्तच आहे. मी
हो कार्यक्रम मस्तच आहे. मी खूप एपिसोड्स पाहिले आहेत. भारतातले अजून पाहिले नाहीत. ऐकताना आपोआपच आपणही कोणतीही आयडिया तोलायाला शिकतो. विक्रीचे मॉडेल काय आहे, नफ्यात यायला किती वेळ लागेल असा विचार आपोआपच केला जातो. यांना कोणीतरी नक्कीच फंड करेल, यांना कोणीही करणार नाही/कायच्या काय आयडिया आहे असे अंदाज बांधले जातात
आणि २००० पैकी १०० यशस्वी झाले तर प्रमाण चांगलेच असावे कारण बाहेर यापेक्षा कमीच असेल.
२००० पैकी १०० यशस्वी झाले >>>
२००० पैकी १०० यशस्वी झाले >>> पैकी नाही. २००० बुडाले. १०० यशस्वी. अधले मधले किती आहेत माहिती नाही.
यातले बरेचसे कसे बसे तग धरून आहेत.
हो समजले. मी साधारण तसे %
हो समजले. मी साधारण तसे % म्हणत होतो - की बाहेर अजून कमी असते.
कुठलीही सर्व्हिस किंवा
कुठलीही सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट्स किंवा फॉर that मॅटर कुठलीही business आयडिया लगेच replicate करता येते. त्यामुळे स्पर्धा लगेच सुरू होते. तुमचे business प्रोमोशन , ब्रँडिंग वगैरे किती स्ट्रॉंग आहे यावर तुम्ही किती काळ तग धरून राहता हे अवलंबून आहे.
स्टार्टअप मध्ये मला जाणवलेली एक गोष्ट अशी, की त्यांना धंदा एका लेव्हल ला आणून तो विकणे ह्यात जास्त रस आहे. त्यामुळे त्यांची नेट वर्थ कितीही जास्त असली तरी ते अंबानी अदानी टाटा कधीच होणार नाहीत
भ्रमर छान पोस्ट.
भ्रमर छान पोस्ट.
केशकिंग चा निर्माता. त्याने केशकिंग ब्रॅण्ड काहीतरी १६०० कोटींना विकला. लगेच पेटसफा ब्रॅण्ड बनवला. तो ही असाच विकून टाकला. आणखी तीन ब्रॅण्ड बनवले आणि विकून टाकले. त्याचं नावच ब्रॅण्ड फॅक्टरी पडलंय.
हा शो बघताना माझे आधीचे
हा शो बघताना माझे आधीचे घरगुती उद्योग आता असते आणि प्रेझेंटेशन द्यावं लागलं असतं तर किती बोलणी खावी लागली असती असं सारखं चित्र डोळ्यांपुढं यायचं.
पण एक जोडपं असलं प्रॉडक्ट घेऊन आलेलं कि पहिल्यांदाच अशनीरचं इन्सल्ट करणं पटलं. त्याच्या प्रॉडक्टचं नाव सुद्धा इथं घेता येणार नाही असलं वात्रट प्रॉडक्ट आणलेलं. त्याचं प्रेझेंटेशन तर
शार्क टँक पाहणार्यांना समजलं असेल ते.
हा प्रोमो आवडलाhttps://www
हा प्रोमो आवडला
https://www.facebook.com/share/v/19RgZH34s8/
गुलाबो जयपूर चा एपिसोड
गुलाबो जयपूर चा एपिसोड पाहिल्यानंतर त्यांची वेबसाईट पाहिली. खूप महाग वाटले (डिस्काउंट धरून).
जोधपूरच्या बाजारात चांगल्या क्वालिटीचे ड्रेसेस स्वस्त पडतात.
Submitted by भरत. on 23 July,
Submitted by भरत. on 23 July, 2025 - 12:02 >
हाहा फारच मस्त प्रोमो!
हाहा फारच मस्त प्रोमो!
Pages