शार्क टँक - कॉलिंग ऑल फिन्स आय मीन फॅन्स :-)

Submitted by हायझेनबर्ग on 14 March, 2016 - 12:23

Shark_Tank_Logo.jpgST.download.jpg

एबीसी वाहिनीवरच्या 'शार्क टँकचा' प्रेक्षक ह्या शो चा चाहता नसेल असे चित्र कदाचित दिसणार नाही.
अमेरिका - हे स्वप्न बघणार्‍या आणि ते स्वप्न जगू पाहणार्‍या लोकांच्यात दडलेला ऊद्योजक शोधतांना त्याला करमणूकीचा तडका देवून एक अतिशय वेगळा आणि ऊत्साह वाढवणारा कार्य्क्रम लोकांसमोर आणल्याबद्दल वाहिनीचे धन्यवाद आणि अभिनंदन.
ईनोवेशन, बिझनेस स्ट्रॅटेजी, बिझनेस मॉडेल अश्या क्वालिटेटिव तर सेल्स, एक्विटी, कॅश फ्लो, रेवेन्यू, नेट, ग्रोस, प्रॉफिट अश्या क्वान्टिटेटिव फायनान्शिअल शब्दांचा भडिमार असलेला का कार्य्क्रम बिझनेस शार्क्स आणि प्रेझेंटर ऊद्योजक त्यांच्या प्रश्नांनी आणि ऊत्तरांनी अतिशय रोमांचक बनवतात.
शो बद्दल जास्त काही सांगून त्याची मजा घालवत नाही पण २००९-१० पासून माझा हा अतिशय आवडता कार्यक्रम शेअर करावा असे वाटले.

आपण इथे, फेमस ऑफर्स, शार्क्स, कॅपिट्ल सीकर्स, मिस्ड ऑफर्स ह्या आणि अनेक विषयांबद्दल गप्पा मारू शकतो.

मला वाटते हा शो भारतात सुद्धा कुठल्याशा वाहिनीवर येतो. यू ट्यूब वरही जवळ जवळ सगळेच एपिसोड्स ऊपलब्ध आहेत. सध्या भारतातले ऊद्योजकांसाठीचे फेवरेबल वातवरण पहाता नवीन ऊद्योजकांसाठी हा शो निश्चितच माहितीवर्धक ठरेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचं आख्खं कुटुंब फॅन आहे शार्क टॅन्क चं ! आम्ही बघताना एकमेकात पैजा लावतो, या माणसाला/ बाईला कोण ऑफर करेल / करणार नाही. किंवा मल्टिपल ऑफर्स असतील तर त्याने कोणासोबत जावे ! Happy
मला त्यांच्यात रॉबर्ट सग़ळ्यात जेन्युइन माणूस वाटतो समहाऊ. मार्क आणि केविन लॉट्स ऑफ अ‍ॅटिट्युड आणि एन्टरटेनमेन्ट पण. लोरी आणि बार्बराची फार अ‍ॅग्रेसिव्ह पर्सनेलिटी नाहीये. प्रेडिक्टेबल. डेमन्ड बोर आहे. कुणाला काही ऑफर करतच नाही बहुधा.

वेगळ्य अलोकांचे वेगळे पर्सेप्शन आहे शार्क्सच्या बाबतीत. आणि ते खरेच आहे कारण प्रत्येक शार्कचे बॅकग्राऊंड आणि एक्स्पर्टीज वेगळे आहेत.
माझा पर्स्नल फेवरिट मार्क क्युबन आणि त्यानंतर केविन (कामाच्य निमित्ताने माझा केविनच्या कामाशी (केविनशी नव्हे) जवळचा संबंध आहे त्यामुळे त्याच्या बोलण्यामागचा हेतू आणि विचार लगेच कळून येतात. माझ्या मते हा एक प्रचंड हुशर मेहनती पण श्रूड आणि ग्रीडी माणूस आहे) फायनान्स डोमेन मधल्या अभ्यासाच्या बाबतीत तो ईतरांपेक्षा बरीव पावलं पुढे आहे)
क्यूबन बाबत सविस्तर लिहावं लागेल. Happy

लोरी चेहरा बदलून? Uhoh आल्यापासून जरा शांत आणि प्लेफुल असते.
स्कॉली अ‍ॅपच्या डील चा एपिसोड बघ, तुझे डेमंड आणि लोरी बद्दलची मतं कदाचित बदलू शकतील.
लोरीची ग्रीड आणि बॅक स्टॅबिंग बघून रॉबर्ट (मला तो रॉबिन विल्यम्सचा कुंभमेळ्यात हरवलेला भाऊ वाटतो) तो शो सोडून निघून गेला होता.

आम्ही पण टोटल फॅन क्लब मधे. मस्त इंटरेस्टिंग प्रोग्रॅम आहे. हुलू वर उपलब्ध आहेत बरेच भाग.

घरी नॉर्मल चर्चेतही, ".. and with that, I am out!" अशी वाक्ये ऐकू येतात Happy

शार्क टँकचे ब्रिटिश वर्जन 'ड्रॅगन्स डेन', तिथले ड्रॅगन्स आणि येणारे ऊद्योजक एवढे सुस्त असतात की मी तो शो १० मिनिटंही बघू शकलो नाही. त्यांची कॉमेंट्रीही फार पांचट असते.

ड्रॅगन - वॉट वेर योर लास्ट ईअर्स सेल्स फिगर्स
बॉब- (चाळीस सेकंद विचार करून) आय थिंक फोर थाऊजंड पाऊंड्स
ड्रॅगन - दॅट्स नॉट वेरी एक्साईटिंग, ईज ईट बॉब?

(कॉमेंट्री - द डेन ईज गेटिंग हॉट, ड्रॅगन्स हॅव स्टार्टेड ब्रीदिंग फायर. विल बॉब गेट बर्न्ट ऑर सर्वाईव धिस फायरी राऊंड ऑफ क्वेस्चन्स)

अर्र्र्र्रे!! त्याने त्याला फक्त सेल्सची फिगर विचारली राव?

रॉबर्ट / रॉबिन विलियम्स - >>> हो हो Happy खुप साम्य आहे .
स्कॉली अ‍ॅपच्या डील चा एपिसोड >>> हा नाही आठवत. बघेन.
तो एक टीनेजर्स साठी काढलेल्या किस एन्हान्सिंग (!)लिप बाम च्या भागात केविन आणि बार्बराने चक्क किस केले ते बघून हहपुवा झाली होती.

माझ्यामते हा शो आता मंडेन झाला आहे. ओपनिंग पिच झाल्यावर शार्क्सची बॅकग्राउंड, बाॅडि लॅंग्वेज, कमेंट्स सुरु केल्यावर काहि सेकंदातच तो/ती इन/आउट आहे कि नाहि याचा अंदाज बांधता येतो... Proud

मला चांगला लक्शात असलेल्यांपैकि एक एपिसोड; ज्यात पार्टिसिपंट मिस्टर वंडरफुलला म्हणालेला - यु आर डेड टु मी... Happy

आणि बर्याचदा क्युबन आपल्या पैशाच्या जोरावर बाकि शार्क्सवर दबाव टाकतो, प्रसंगी बुलींग करतो. हर्जेवॅकची हतबलता/असहाय्यता, झालेला तिळपापड नजरेतुन सुटत नाहि...

राज खरं आहे... सेम भावना माझे पण पण म्हंटलं धाग्याचा सुरूवातीलाच कश्याला नकार घंटा वाजवा.

मला चांगला लक्शात असलेल्यांपैकि एक एपिसोड; ज्यात पार्टिसिपंट मिस्टर वंडरफुलला म्हणालेला - यु आर डेड टु मी... >> हा बहूतेक टेलरमेड शर्ट अ‍ॅप वाला स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट होता का? काही काही खरंच पुरून ऊरले आहेत ह्या अ‍ॅरोगंट शार्क्स ना! तो एक ग्लास वाईन प्रोड्यूसर सेकंड टाईम टँक मध्ये आला आणि तरी मि. वंडरफूल आणि क्युबनची ऑफर दुसर्‍यांदा धुडकवून गेला. तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते.
हॅरिंगट्न ला नारळ देवून क्युबन ला आणला तेव्हा मस्तंच जान आले होती शो मध्ये. रॉबर्ट ही आजकाल कमी दिसतो त्याच्या एवजी क्रिस साचा येतो पण तो बोअर आहे. कुचर वगैरे लोक आले की शो एकदम फिल्मी वाटायला लागतो. नवीन डायनॅमिक चेहरे पाहिजेत आता. आणि शार्क्सच्या मिस्टेक्स ही दाखवायला पाहिजेत की ग्रीडी होवून ऑफर दिली नाही पैसे कमावण्याची संधी घालवून बसले.

बार्बरा ला कायमचा डच्चू द्यायला हवा. पण केविन आणि क्युबन हवेतच त्यांच्याशिवाय मजा नाही.

>>बहूतेक टेलरमेड शर्ट अ‍ॅप वाला स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट होता का?<<

नक्कि आठवत नाहि पण तो बर्यापैकि सिनीयर होता आणि बहुतेक ठरवुनच आला होता कि केविनला टशन द्यायची. Proud

केविन, मार्क बरोबर राॅबर्ट हि एंटरटेनिंग आहे. त्याच्यातल्या लहान मुलाला नेहेमी नविन प्राॅडक्ट/गॅजेट, सगळ्यांच्या आधि ट्राय करायचं असते...

शार्क टॅंक हा एक असा प्लॅटफाॅर्म आहे कि जिथे डिल मिळालेल्यांना फायदा होतोच, त्याचबरोबर डिल न मिळालेल्यांना हि एक्स्पोजर मिळत असल्याने एखाद्या विसी कडुन फंडिंग मिळण्याची शक्यता जास्त असते...

शार्क टॅंक हा एक असा प्लॅटफाॅर्म आहे कि जिथे डिल मिळालेल्यांना फायदा होतोच, त्याचबरोबर डिल न मिळालेल्यांना हि एक्स्पोजर मिळत असल्याने एखाद्या विसी कडुन फंडिंग मिळण्याची शक्यता जास्त असते... >> ऑफकोर्स, सगळ्यात मोठ्ठं ऊदाहरण म्हणजे तो रिंग विडिओ डोअरबेल चा ईन्वेंटर. शार्क टँक मध्ये ऑफर मिळाली नाही तरी वर्जिनच्या रिचर्ड ब्रॅन्सन कडून त्याला २०+ मिलिअन्सची ईन्वेस्टमेंट मिळाली.

डिसकाऊंटेड कॅश फ्लो काढून त्याचा आस्किंग प्राईसवरचा पी/ई काढला आणि तो ५ च्या खाली असेल तर ऑफर मिळण्याचे चांसेस बरे अस्तात पण पी/ई ५ च्या वर असेल तर प्रॉड्क्ट खूप्पच प्रॉमिसिंग असायला हवं. असं माझं आजवरचं निरिक्षण आहे. सर्विस प्रॉडक्ट्समध्ये सहसा ऑफर येत नाहीत. फूड प्रॉडक्ट मध्ये ६०-८० के च्या वर कोणी रिस्क घेत नाहीत. टेक प्रॉड्क्ट म्हंटलं की फक्त क्यूबन आणि रॉबर्ट.. बार्बरा फूल्ल ईमोशनल डिसिजन घेते आणि तिचे खूप सारे प्रिज्युडिस्ड मतं असतात. लोरी डॉलर स्टोअरमध्ये टाईप्स विकणारेप्रॉड्क्ट्स जास्त घेते.

केविनला शक्यतो कॉन्स्टन्ट कॅश फ्लो हवा असतो मग ७ टक्क्याच्य वर तो अगदी लोन द्यायला ही तयार असतो. क्यूबनच्या डील मला खूप डेअरिंग पण थॉट्फुल्ल आणि ईंट्रेस्टिंग वाटतात ... तो बर्‍याच वेळा केवळ पार्टिसिपंटच्या पोटेंशिअलला बघूनच डील करतो असे वाटते.

असामी, मलाही तसेच वाटते. गुड कॉप बॅड कॉप सारखे एक ब्लंट बोलणारा, एक फ्रेन्डली, एक विनोदी असे मुद्दामच करत असतील.