मुर्डेश्वर व आजुबाजुची स्थळे - माहिती हवीय

Submitted by साधना on 14 July, 2025 - 23:28

नमस्कार मित्रांनो,

या गणपतीत आंबोली ते कर्नाटकातील मुर्डेश्वर, गोवा मार्गे गाडीने जायचा बेत आखत आहोत. जाताना वाटेत लागतील ती प्रेक्षणिय स्थळे पाहात, आवश्यकतेनुसार मुक्काम करत जायचे असा दोन-तिन दिवसांचा प्रवास करणार आहोत.

मुर्डेश्वर, गोकर्ण इतके माहिती आहे. जायच्या वाटेवर कारवार, अंकोला वगैरे मोठी शहरे आहेत. बाकी इतरही पाहण्यासारखे असेल.

कृपया आंबोली-गोवा - कारवार-अंकोला-मुर्डेश्वर मार्गावरच्या पाहण्यालायक जागा, चांगले होमस्टे व खादाडीच्या जागा सुचवा.

हा एक चांगला धागा मिळाला : https://www.maayboli.com/node/83627

धन्यवाद. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदाशिवगडावर आता रिझॉर्ट आहे. पण वरून समुद्राचा देखावा सुंदर दिसतो.
मुर्डेश्वरजवळ लोकल खानावळीत शाकाहारी जेवण ट्राय करा.

मुर्डेश्वरपासून जोगचा धबधबा पण जवळ आहे. गाडी घेउन जाणार असाल तर सहज जमेल. ऐन धबधब्याजवळ कर्नाटक टुरीझमचे रिसॉर्ट आहे. रुम्स ओकेइश होत्या. पण आम्ही २ वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा नवीन रिसॉर्टचे काम चालू होते, ते झाले असल्यास त्या रुम चांगल्या असतील. त्यांचे कँटीन भारी होते तेंव्हा - फिल्टर कॉफी तर अहाहा लेव्हल.

माधव धन्यवाद. जोगच्या धबधब्याबद्दल लहानपणी बालभारतीत धडा होता तेव्हापासुन आकर्षण आहे.

आंबोलीत राहणार्‍यांना धबधब्यांचे काय एवढे कौतुक Happy Happy
पण तरीही गोकाक, आत्रपल्ली, जोग हे धबधबे खुप प्रिय आहेत. गोकाकला दोन तिनदा गेलेय पण विराट रुप पाहता आले नाही, अतीवृष्टीच्या वेळेस तिथे असेन तरच पाहता येईल. आत्रपल्ली खुप आवडला पण रविवारी तिथे गेल्यामुळे खाली जाता आले नाही. परत कधी गेले तर… जोगच्या धबधब्याबद्दल खुप वाचलेय. आता प्लॅनमध्ये समाविष्ट करते.

१. मुर्डेश्वर पाहिले आहे. इथे sn shetti यांची राहण्याची जेवण्याची जागा नावाजलेली आहे. मुर्डेश्वर त्यांनीच उभारले आहे. गोपुरात वर जायला १०रु तिकिट आहे. एकवीस मजल्यांचे आता अप्रुप कमी झाले आहे. (शहरात अशा इमारतींतच लोक राहतात). खाली पौराणिक कथांतील बरेच पुतळे आहेत. शंकराची मोठी मूर्ती वरून छान दिसते पण आता सध्या सर्व बाजूंनी बांबू लावून प्लास्टरिंग पेंटिंग चालू आहे. बाकी मुर्डेश्वर एक सुस्त गाव आहे. हा शेवटचा स्टॉप असेल आणि परत यायचे तर ...वाटेत...
२. इडगुंजी हे गणपतीचे स्थान होन्नावरा (होनावर) . अप्सरा कोंडा हा रमणिय धबधबा पाहता येईल. रस्त्यापासून जवळच.
३. होनावरपासून गिरसोप्पा जलाशयाला जाता येते. ( वरच्या जोग फाल्सचे पाणी खाली साठते तो). ....नंतर कुमटा.
४. कुमटा येथून घाट चढून वर गेल्यावर शिरसी गाव येते. इथून चार किमीवर 'बनवासी' ही गोव्याच्या कदंब राजांची राजधानी येते. देऊळ आहे. म्हणजे वारसा आहे. शिरसी येथून एक रस्ता यल्लापुराकडे आणि पुढे हुबळीला जातो. त्या मार्गावर सहस्रलिंग आणि सोंधा नावाचे एक ठिकाण आहे. धार्मिक ठिकाणे. इथल्या नद्या फारच स्वच्छ पाण्याच्या असतात. परतताना 'याना' डोंगर पाहून शकता. ( इकडे अनवाणी जावे लागते ही अडचण ठरते) . एका वाटेवर ' विभुती वाटरफाल' आहे.
५. कुमटा सोडून गोकर्णकडे येताना पाच किमीवर 'मिरजना' ( मिरजन किल्ला) रस्त्यावरच आहे. ) बरा आहे.
६. गोकर्ण. ..इथे मुख्य देऊळ, गणपती देऊळ आहे.(११ ते पाच बंद). समुद्र किनारे पाच आहेत. यासाठी वेळ काढायला हवा.)
७. अन्कोला. येथून यल्लापूर मार्गे हुबळीला जाता येते.
८. कारवार... एक जुनी नौका, विमान ठेवले आहे. कारवारकडून अन्शी- जोईडा - दांडेली मार्गे हुल्याळ- - खानापूर - बेळगाव मार्ग. तीन रम्य ठिकाणे आहेत. दांडेलीला काळा वाघ जरी दिसला नाही तरी हॉर्नबिल भरपूर आहेत.
तर एका मार्गाने ( गोवा) गेलात तर या मार्गे परत जाण्याने फायदा होईल.
.......
या भागात शाकाहारी जेवण सगळीकडे सारखेच आणि कंटाळवाणे आहे. इडली वडे चांगले. 'गोली बज्जे' ( मैद्याची गोल भजी) आणि 'उडुपी बन्स' काही आवडले नाहीत.
कुमट्याचे मसाला काजू आवडले.
या रूटवरची बरीच ठिकाणे ' कोस्टल कर्नाटका' नावाच्या अनुभवच्या टुअरमध्ये ( itinerary )सापडतील. साइट पाहा.
जोग फॉल ज्या शरावती नदीवर आहे त्या नदीला जोगच्या मागे मोठे लिंगमाक्की धरण बांधल्याने जोग धबधब्यात फक्त पाऊस पडत असतानाच मोठी धार असते.
सेल्फी फोटोंसाठी जागा - बनवासी, मिरझन किल्ला, अप्सरा कोंडा धबधबा.
आम्ही हा भाग टुअरमध्ये न जाता रेल्वे, बसने स्वतंत्रपणे केला आहे. बस सर्विस चांगली आहेच आणि रस्ते फारच छान. वाहनाने आणखी गोष्टी कमी वेळात सहज पाहता येतील.

शरावती नदीवर कोकण रेल्वेचा सगळ्यात मोठा पूल आहे. बोटिंग करताना त्याच्याजवळ जाता येते. तसंच तिथे खारफुटीचे छोटे जंगल आहे त्यात एक walkway केला आहे तो छान आहे.

आम्ही जानेवारी 24 मध्ये ठाणे ते गोकर्ण महाबळेश्वर अशी 6 ते 12 जानेवारी रोड ट्रीप केली. फार दिवसांनी आमची रोड ट्रीप झाली. आम्ही दोघेच होतो या वेळेस. त्यामुळे ड्रायव्हिंग च काम अर्थातच नवऱ्याच एकट्याच कारण मला ड्रायव्हिंग येत नाही.
जाताना पहिल्या दिवशी कोल्हापूर ला हॉटेल ओपल येथे मुक्काम. दुसऱ्या दिवशी गोकर्ण महाबळेश्वर इथे art karna म्हणून होम स्टे आहे तिथे राहिलो होतो 5 दिवस (4 रात्री). तिथून 11 ला निघालो आणि येताना कराड येथे हॉटेल पंकज येथे मुक्काम केला. 12 तारखेला रमत गमत ठाण्या ल परत. तशी सगळी ट्रीप रमत गमतच केली.
गोकर्णतले समुद्र किनारे, देवळ, विभूती धबधबा, यांना गुहा, मुरुडेश्र्वर , शरावती back waters मध्ये नौका विहार असे केले.
खादाडी बद्दल फार काही सांगता येणार नाही कारण मधुमेह झाल्यापासून यात बराच फरक पडला आहे. येताना बेळगाव चा स्टॉप घेतला होता खरेदी आणि जेवणासाठी.

तुम्हाला वेळ असेल आणि आवड असेल तर उडुपी(मणिपाल) मध्ये एक अप्रतिम संग्रहालय आहे. हस्तशिल्प हेरिटेज म्युझियम, इथे भारतातील विविध प्रांतातील घरे आणि राजवाडे जतन केले आहेत. गेलात तर नक्की वेळ ठेवून जा कारण तिथे बघण्यासारखे खूप आहे. https://www.heritagevillagemanipal.org