ताडी आणि नीरा

Submitted by हर्ट on 30 December, 2009 - 04:56

मधुकर आणि प्रकाश यांनी ताडी आणि नीराबद्दल मला माहिती दिली ती मी इथे जमा करतो आहे:

मधुकरः

निरा पुण्यात आल्यावर पहिल्यांदी पिलो. ताडी हि नि-यापेक्षा फार वेगळी असते.
ताडीचे दोन प्रकारचे झाड असतात, आणी दिवसातुन तिन वेळा (सकाळ, दुपार व संध्याकाळ) ताडी काढल्या जाते.
१) नर झाडः नर झाडची ताडी गोड असते, हि ताडी सहकुटुंब पिता येते, थोडिशी नशा येते, सकाळचे ताडी असेल तर नशा मुळीच येत नाही.
२) मादी झाड: मादी झाडाची ताडी आंबट असते, हि ताडी फक्त पुरुष पितात. याने नशा तर येतेच, पण पुरुषाची ताकद वैगरे वाढते असं म्हणतात.

ताडी जनरली नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मिळते. एप्रिल ते ऑक्टोबर मध्ये झाडाला ताडी येत नाही.

प्रकाशः
ताडीच्या झाडाला रात्री मडके अडकवून त्याला कोयत्याने खापे मारतात. त्यातून थेम्बाथेम्बाने गोड रस पाझरतो. त्या गोड रसास नीरा म्हनतात. ती मडक्यातून काढून हल्ली मार्केतिंगची व्यवस्था झाल्याने व प्रचार झाल्याने विकतात. ती मधुर असते. मात्र हा गोड रस जसजसे उन वाढत जाते तसे उष्नतेने आम्बू लागतो व दुधाळ रंगाची ताडी तयार होते. हे मात्र मादक पेय आहे. अर्थात हातभट्टी वगैरे इतके नाही.स्वस्तही असते. जो द्रव नीरा म्हणून विकला जातो त्याचे तपमान वाढू नये म्हणून भांडे बर्फात ठेवतात. थन्डगार नीरा अतिशय मधुर लागते. जिथे त्वरित मार्केट उपलब्ध नाही तिथे ताडी बनवून विकली जाते. पुण्याच्या आसपसच्या गावाहून सहकारी सोसायट्यामार्फत पहाटेच नीरा पुण्यात आणून विकायला सुरुवात होते. दुधासारखे नीरा विकनारे खोके तुम्हाला पुण्यात दिसतील. त्यामुळे नीरा आरोग्य दायी आहे ताडी मद्य आहे....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीरा हे माझे अतिशय आवडते पेय आहे... रेल्वे प्लॅटफॉर्मवर नीरावाल्यांचा हिरवा स्टॉल असायचा. तिथे ऑक्टोबर ते जुन पर्यंत मिळायची. हल्ली दिसत नाही कुठे. बाकी नमु/एक्स्प्रेसवेवर ठिकठिकाणी नीरेचे पांढरे स्टॉल दिसतात. मी कधीमधी घेते तिथुन, पण पाणी घालतात त्यात....:( पुण्याला एकदा डेक्कनला एका दुकानात मिळालेली नीरा.

मी असे ऐकलेय की नीरेची ताडी बनु नये म्हणुन तिच्यात चुन्याची निवळी मिसळतात. त्यामुळे नीरा दिवसभर टिकते.

सध्या डुप्लिकेट ताडीच जास्त मिळते. ही ताडी विशिष्ठ प्रकारच्या गोळ्या पाण्यात टाकुन बनवतात. गोळ्यांचे प्रमाण जास्त झाल्यास जिवीत हानी होते. त्यामुळे कोणाला ताडी पिण्याची लहर आल्यास सरळ ताडीच्या बगिच्यात जावे. ताडीच्या दुकानात भेसळीची ताडी असण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच शुध्द निराही सध्या दुर्लभच झालीय.

साधना
पुण्यात जागोजागी निरा स्टॉलवर विकली जाते. मला नाही आवडत.
मी असं ऐकलंय की सुर्य डोक्यावर येत जातो तशी नीरा ताडीचे गुणधर्म धारण करते म्हणे Uhoh (खखोदेजा)

माझ्यामते ताडी ही ताडगोळ्यांना आंबवून बनवतात...
ती मादकच असते...

उष्णता वाढली की नीरा आंबते = ताडीचे गुणधर्म धारण करते...
नीरेची ताडी होत नाही...
ती आंबून ताडी सारखी मादक होते...

होय.. पुण्यात मध्यंतरी एक दोनदा प्यायलेली नीरा इतकी गोड होती - पूर्ण पाणी आणि साखर वाटत होती..
'मधूर' हा शब्द लागू पडणार नाही..
त्यानंतर 'नाही प्यायची रस्त्यावरची नीरा' असं ठरवलं

नीरा ही मस्त पेय आहे. आजोबा सकाळी सगळ्या गँगला ४-५ वाजता वगैरे उठवून हे पाजायचे. मी खूप कमी उठले पण माझा भाऊ रोज प्यायचा आम्ही त्याला चिडवायचो.. सवय लागली तुला. Happy खूप हेल्दी असते. भूक वाढते.
नीरा विकतची बनावटीची असते. अशी नीरा रहात नाही उन्हात वा बर्फात. सुर्य उगवला की आंबतेच जर खरी नीरा असेल तर.

उरलेले पेय थोडे गडी लोक पित, त्यातली मजा और आहे म्हणत व कामाला जात. Happy अर्थात तोवर ती ताडी होत असे (म्हणायचे गावचे लोकं).

मी निरा घेतली (टाकली :-)) आहे पण ईतकी नाही आवडली, निरेचे बरेच आयुर्वेदिक (???) गुणधर्म आहेत असेही वाचलय, खर आहे का?
माडी नावचि पण ताडीसारखी दारु असते का?

माझ्यामते ताडी ही ताडगोळ्यांना आंबवून बनवतात...
ती मादकच असते...>> नाही. ताडगोळ्यांचा काही संबंध नाही. ताडगोळे हि ताडाची फळे आहेत. ती असो वा नसो, ताडी काढतात येते.

नीरा आंबून ताडि होते का नक्की माहीत नाही पण नीरा काढण्याची काहितरी विशिष्ट पद्धत असते बहुधा. सकाळी/पहाटे काढलेली ताडी मी मित्राच्या गावाला गेलो असताना प्यायलेली आठवते पण त्याची चव नीरेसारखी लागल्याचे आठवत नाही. पण गोड होती एव्हढे आठवते.

ताडी ताडापासून काढतात तर माडी माडापासून (असे ऐकलय)

ताडीच्या झाडाखाली बसून ताक पिऊ नये अशी म्हण आहे. ( कारण लोक ताडीचाच संशय घेतात. चांगली वस्तू वाईट स्थळी असली तरी लोक तिला वाईट म्हणतात, असा अर्थ.)

गोले: ताडीच्या झाडाना दोन तिन फुट लांबीचे गोले येतात. साधरणत: नोव्हेंबर महिन्यात हे गोले ताडी नावाच्या द्रवानी भरतात. या गोल्याच्या टोकाला खुप धारधार विळीनी अगदी बारीक (Slice ) निघेल असे कापावे लागते. एकदा असे कापले की साधरन पुढचे पाच तास थेंब थेंब ताडी येते. आम्ही गावाला बांबूचे गोट्टाल (मराठीत काय म्हणतात माहीत नाही) किंवा खेडयात पिण्याच्या पाण्यासाठी दुधी असते ना, ती दुधी त्या ताड गोल्याना अशा प्रकारे बांधतो की गोल्यातुन पडणारे थेंब बरोबर त्या दुधित किंवा गोट्ट्यात पडते. पण पाच तासानंतर त्या गोल्याच्या टोकावर चिकट थर साचतो व हळु हळू थेंबं पडणे बंद होते. म्हणुन दर पाच सहा तासानी झाडावर चढून भरलेले गोट्टाल काढावे लागते आणी गोल्याच्या टोकाचा बारिक Slice कापावा लागतो. एकदा Slice कापले कि परत ताडीचे थेंबं जोरात पडायला सुरुवात होते. नर झाडाला एक वेळी ८-१० गोले असतात. २५-३० दिवसात Slice कापुन कापुन हे गोले संपतात, पण त्याच वेळेला नविन गोले तयार होत असतात. हे प्रक्रिया मार्च पर्यंत चालते. मादी झाडाला तुलनेने दुप्पट गोले येतात.

मुंजारु (रं) : एप्रिल महिन्यापासुन याच गोल्याना गोल नारळासारखं फळं येतात, त्याला मुंजारु म्हणतात. मे-जुन मध्ये हे मुंजारु पुर्ण पणे पाण्यानी भरतं, मग आम्ही ती मुंजारं नारळाचं शहाळं जस पितात अगदी तसं पितो व आत मधिल मलाई तर फारच गोड व चवदार असते.
पण जुन नंतर मुंजारातील आतलं पाणी नाहीस होतं व मुंजारं पिकायला लागतात. जुलै-ऑगस्ट मध्ये ही मुंजार पिकुन पडतात, मग आम्हि ती पिकून पडलेली मुंजारं शेकोटिवर भाजुन खातो. परत सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ताडगोले विकसित होण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणुन मे ते ऑक्टोबर महण्यात ताडी असण्याचा प्रश्ननच येते नाही.

नीरा जर पावसाळयात मिळत असेल तर मग ती १००% ताडी नव्हेच. (नविन काही Hybrid चा प्रकार असल्यास शक्य आहे)

ताडी सारखंच झाडापासुन निघणारे आजुन काही पेय आहेत.
१) शिंदी : शिंदीच झाड असतं त्याला पन गोले असतात व ताडीसारखाच द्रव पदार्थ मिळतो. त्याचि चव पण अगदी मादी ताडी सारखी असते, पण ताडी पिणा-याना ताडी व शिंदीतील फरक कळतो, नविन माणसाना शक्यतो नाही कळत. शिंदीला फळ येतं.
२) गोरगा: गोरग्याचं झाड अगदी ताडाच्या झाडासारखंच दिसतं पन त्याची पानं जरा वेगळि असतात. त्याचंही द्रव अगदी ताडीसारखं वाटत पण थोडसं फरक असतो. गोरग्याला फळं येत नाही.

ताडगोळे हि ताडाची फळे आहेत

हे ताडगोळेही मला खुप आवडतात. हल्ली सिजन आहे चालु... मी कधी एस्टीने ऑफिसात आले तर उरणवरुन येणारी एस्टी पकडायचा प्रयत्न करते. तिच्यातुन येणारी एका भाजीवाली ताडगोळेही विकायला आणते. अर्थात ती एस्टीत विकत नाही पण मी घेते विकत तिच्याकडुन आणि ऑफिसात गुपचुप खाते. Happy

तिच्याकडचे मस्त मऊ कोवळे असतात. मला कोवळे ताडगोळे खुप आवडतात. शहाळ्यातल्या मलईसारखे लागतात आणि आत थोडे गोड पाणी असते. ते एकदम नीरेसारखे लागते. बाजारात भय्ये विकायला आणतात त्या जांभळ्या आवरणासकट.. पण ते जुन निघतात बहुतेक वेळा.

ते जुन झाले की खुप कडक होतात. ओल्या तयार झालेल्या नारळातल्या खोब-यासारखे लागतात पण दात दुखायला लागतात त्यांना खाताना.

दक्षिणा, पुण्यात सगळीकडे जी नीरा मिळते तिच्यात भरपुर पाणी ओतलेले असते.. तु खरी नीरा प्यालीस तर तुला खुप आवडेल.. अतिशय मधुर आणि वेगळीच चव आहे तिला.

मधुकर माहितीबद्दल धन्यवाद.

सुर्योदयानंतर नीरेचे ताडीत रुपांतर होते. ते तसे होऊ नये म्हणुन तिच्यात चुन्याची निवळी घालतात. त्यामुळे ती दुपारी १२-१ पर्यंत टिकते.. तरीही उगाच तोपर्यंत वाट पाहु नये.. Happy

दूर्गा भागवतांच्या भगिनी, कमला सोहोनी यानी नीरेवर बरेच संशोधन केले आहे, पण त्यांचे संशोधन सामान्य लोकांपर्यंत पोहोचले नाही, अशी त्याना खंत होती. त्याना नीरा हे बालकाना देखील देता येईल असे वाटत असे. यातले कॅल्शियम टिकून राहते (प्रक्रिया केल्यावरदेखील ) असे त्याना आढळले होते.
नीरा फ्रीजमधे सुकवली तरी ते टिकते असे त्याना आढळले होते.
नीरेचे तपमान टिकवणे फार गरजेचे असते. ताजी नीरा नारळाच्या पाण्यासारखीच, कदाचित जास्तच गोड लागते. माझ्या लहानपणापासून मी ती रेल्वे स्टेशनवर विकायला असल्याची बघतोय, पण पुरेश्या प्रचारा अभावी ती तितकी लोकप्रिय झाली नाही.

मी एकदाच लहानपणी प्यायले नीरा पण मला बाधली (ताप भरला). डॉक्टरांनी विचारलं "वेगळं काय खाल्लंय प्यायलंय?" त्यावर "नीरा" हे एकच उत्तर होतं. तेव्हापासून नीरेचा धसका.

पहाटे झाडावरून उतरवलेली ताजी नीरा हे पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम पेय आहे.

सूर्योदयानंतर नीरेचे फर्मेंटेशन होऊन ताडीत रुपांतर होते.

मी नीरा खूपदा पीत असते. मंडईजवळ सकाळी ताजी नीरा मिळते, ती फार मस्त लागते!

असे म्हणतात की नीरा मूत्रल आहे - म्हणजे ती प्यायल्याने लघवीला साफ होते.

एकदा भर उन्हाळ्यात मी, माझे ३ मित्र व माझी आई भाड्याच्या गाडीने पुण्याजवळ मंचरला एका कार्यक्रमासाठी चाललो होतो. दुपारची साडेतीन-चारची वेळ. उन्हाने नुस्ते हाय हाय होत होते. आधीच भरपूर पाणी ढोसलेले. पण तरीही उष्म्याने तहान तहान होत होती. राजगुरुनगर गेल्यावर वाटेत एक नीरेचे खोपटे दिसले. अति-उत्साही मित्रांनी लगेच गाडीवानाला गाडी थांबवायला सांगून त्या खोपट्याकडे धाव घेतली. मी व अजून एक मित्र सर्वांना सांगत होतो, की अरे, इतक्या दुपारी उन्हे कलत आल्यावर नीरा नका पिऊ, ती आंबूस होते वगैरे वगैरे. पण आमची ठोठो कोणी ऐकून घेईल तर ना! सगळ्यांना त्या गारेग्गार नीरेचा मोह पडला होता. मग काय!!!! तिघांनीही (२ मित्र व आई) ग्लासवर ग्लास नीरा ढोसली. आम्ही दोन नीरा न पिणारे मोठ्या कष्टाने मनावर ताबा मिळवून स्थितप्रज्ञाचा आव आणत त्यांचे नीरापान बघत होतो. शेवटी त्यांचे नीराप्राशनाने समाधान झाले आणि आम्ही पुढे निघालो. अजून तास - दीडतासाचा रस्ता होता. वाटेत आम्ही माझ्या आईला इतके चिडवले....बाकी मित्र : काकू, तुम्हाला आता नीरा चढणार!!! बघा मग कसं गरगरेल ते, वगैरे वगैरे!! कदाचित आमच्या अति चिडवण्याचा परिणाम की नीरेचा प्रभाव Wink पण आईला थोड्या वेळाने खरेच गरगरू लागले!!

आणि मित्रांची स्थिती? पोट त्या नीरेने एवढे तट्ट फुगले की त्यांना कधी कार्यक्रमस्थळी पोहोचतो व ''मुक्ती'' मिळवतो असे झाले!!!! Lol ते (मी न केलेले) नीरापान कायम लक्षात राहिले!

>>>>> पुण्यात मध्यंतरी एक दोनदा प्यायलेली नीरा इतकी गोड होती - पूर्ण पाणी आणि साखर वाटत होती.. 'मधूर' हा शब्द लागू पडणार नाही..
हल्ली प्युअर नीरा मिळतच नाही! Sad
मी लहानपणी प्यालेल्या निरेची चव्/स्वाद अन हल्लीचे गोड पाणी यात जमिनास्मानाचा फरक आहे!
असो.

पुण्यात चांगली नीरा कुठे मिळेल ? मंडई जवळ असे वर लिहिले आहे , मंडई जवळ नक्की कुठे ?
फक्त १० रुपयांत विकतात म्हणून शंका येते
इतर चांगली जागा असेल पुण्यात तरी सुचवा please !

>>सुर्योदयानंतर नीरेचे रुपांतर ताडीत होते

हे मीही ऐकलेय. दोन वर्षांपूर्वी एक माणुस सरकारी छाप असलेल्या packs मधून नीरा विकायचा. एक पाऊच दहा रुपयेला. फार गोड असायची त्यामुळे त्यात साखर मिक्स केली आहे की काय ह्या भितीने आधी कासाविस झाले होते. पण दहा रुपयाच्या पाऊच मधल्या निरेत साखर घालण्याइतकं सरकार श्रीमंत नाही हे लक्षात आल्यावर बिनधास्त विकत घेऊ लागले Proud मला त्याने कधिही काहीही त्रास झाला नाही. मागच्या वर्षी तो माणुस अगदी मेच्या शेवटी आला. मी चातकासारखी वाट पहात होते. म्हटलं ह्या वर्षी उशिरा का आलात तर म्हणाला प्लास्टिक बंदीमुळे हे कसं विकायचं हा प्रश्न होता Proud