Submitted by दत्तात्रय साळुंके on 24 April, 2025 - 03:18
बोलघेवडी साळुंकी तू
बोल मधूरसा किती
अबोला धरीला असा
उमलेना प्रीत गिती
बहरावीन पारिजात दारा
थांबविला दरवळ सारा
मूक तुझ्या वागण्यात
हरवला मोर पिसारा
थांबव हे जिवघेणे
घाल प्रीतीचे ऊखाणे
हट्टही पुरविल तुझे
गाऊया प्रीत तराणे
ओंथंबले शब्द अंतरी
किती काळ लपवशील?
वेळ उगा नको दवडू
कधी ओठ खोलशील?
काजळला चंद्र बघ
ओसरला चांदण ओघ
थांबेल का कधी जगी?
प्रीत अस्त्र हे अमोघ
©दत्तात्रय साळुंके
२४-५-२०२५
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
वा! आवडली
वा!
आवडली
सामो
सामो
कुमारसर
अनेकानेक धन्यवाद...