निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अनण्ताचा तो आवडता छंद आहे. काहीही करता येण्याजोगे नसावे, तरी ऋतुराज वगैरे मंडळींकडे टिप्स असाव्यात. माझ्या एका अनंताने आयुष्यात एकच फुल दिले आणि त्या विरहात आयुष्यभर कळ्या गाळत राहिला. कंटाळुन शेजारणीला तिच्या बागेत लावायला दिला. मुळांनी जमिनीत हात पाय पसरले तसे ह्याच्या कळ्यांत बळ आले. असो. शेजारच्या दारी का होईना फुलू लागला हे नशीब समजायचे. >> धन्यवाद साधना... मी पण आता खालीच देईन म्हणते हे कुंडीतील रोप बघू या फुलतंय का खाली तरी !
बाकी ही पोस्ट आवडली साधना.

साधनाची पूर्ण पोस्ट हीही हीही करतच वाचली.

^^शेजारच्या दारी का होईना फुलू लागला हे नशीब समजायचे.^^ अनंताने पारिजातकाकडून प्रेरणा घेतलेली दिसतेय.

For the lovers of Flor de Papel

IMG_8262.jpeg

# My Terrace
# My Random Clicks
# Flor de Papel
# बोगनवेल

अनंताने पारिजातकाकडून प्रेरणा घेतलेली दिसतेय. …. >>> हाहाहा.

घुबड भारी आहे, प्रेमळ वाटतंय, नाहीतर मला डोळ्यांची आणि रोखलेल्या नजरेची भीती वाटते. कोकणात अंधारात दोन डोळेच जास्त दिसायचे, बालपणीची गोष्ट. निळू नारींगी पक्षी मस्त.

घुबड क्यूट!!

तो निळा पक्षी टिकेल्स ब्लू आहे? सुंदर आलाय फोटो.

अनंत कुंडीत असेल ना, खूप जास्त किंवा खूप कमी पाणी मिळतंय का? मुळांना श्वास घ्यायला जागा आहे का मातीचा घट्ट दगड झाला तर नाही ना?
एकदा झाड हलवून मोकळं करुन माती बदलून, छाटणी करुन/ थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीत लावता येईल का?
नायट्रोजन असलेलं खत देऊन बघा. नायट्रोजन पानांच्या वाढीला लागतो. नायट्रोजन मातीत कमी असेल तर आहे त्या नायट्रोजन मध्ये झाडं पानांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते त्यामुळे कळ्या आल्या तरी गळुन जातात.
नायट्रोजन जास्त झाला तर भारंभार पानंच वाढतात. मग कळ्या येतच नाहीत. त्यामुळे थोडं नायट्रोजन असलेलं खत देऊन बघा असं सुचवेन.

आहाहा आज बहरल्या आहेत निसर्गाच्या गप्पा.
साधना मजेशीर वर्णन आणडल.
सगळ्यांचे फोटो सुंदर.

हेमाताई केळ्याच्या साली खोदून पूरा अनंतात. कांदा सालीचे पाणी द्या किंवा कांद्याची साले जमिनीत पूरा. राहिलेली चहापावडर धुवून अनंताला टाका.

फणसाच्या बी पासून लावलेल्या झाडाला फणस यायला १० वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. कलम लावल्यास लगेच येतात.

परवा नर्सरीत गेले होते त्यांनीही हेच सांगितले की बी पासुन वाढलेल्या झाडाला फळ येते पण ते मुळ फळासारखेच असेल ह्याची खात्री देता येत नाही. काप्या फळाच्या बी पासुन बरका फणस रुजु शकतो.

सध्या शेतकुंपण दुरुस्तीचे काम सुरु आहे. पाट परुळ्याची पोरे आहेत. ती सांगत होती त्यांच्याकडे वेगवेगळे फणस होते. एक झोप्या फणस होता. त्याचे ४-५ गरे खाल्ले की माणुस दिवसभर लोळतच पडायला हवा. काम होणारच नाही हातुन आणि सतत पडुन राहावेसे वाटेल. पण गेला हा फणस नंतर.

त्यांच्या गावात, अंगणात वाघ येतो. माणुस तिथे असला तरी दुर्लक्ष करुन कुत्रे उचलतो. वाटेने जाताना माणुस आडवा आला तरी खुशाल दुर्लक्ष करतो. मला वाटले बिबट्या असेल. पण नाही म्हणे, पट्टेरी वाघ. मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्याने वाघ यायची वाट दाखवली. वर सगळा सडा आहे तिकडुन येतो. सडा म्हणजे दगडी जागा, जमिनीच्या जागी कातळ असलेली जागा.

सावंतवाडीवरून आलेल्या काप्या फणसाची बी आईने हौसेने जमिनीत लावली होती.थोडा फणस शेजारणीला दिला.तिनेही बी लावली.आईच्या झाडाला बरेच वर्षांनी फणस यायला सुरुवात झाली.पण आतमध्ये जास्त चार असायची.गरा म्हणून कधी आला नव्हता.एकदाch फक्त 1 कापा गरा आईला मिळाला होता.शेजारणीच्या झाडाला छान गरे असलेले फणस यायचे .

बापरे काय पळतोय हा धागा.
आमच्याकडे अनंताच्या कळ्या फुलण्याआधी गळून पडतायत, काय करावं बरं ?>>>>>> मँगॅनीज बोरॉन जस्त कमतरतेमुळे पण कोंब कळ्या गळून पडतात. दोडका बारीक चिरून घाला.
बाकीच्यांनी पण सांगितले आहेत उपाय.
साधनाताई, ७०० एवढी रोपे म्हणजे भारीच.
तो पिंगळा कसला भारी आहे. Cute.
जो एस कसला भारी आहे तो Tickell's blue flycatcher
येऊरला पाहिला आहे.
पिवळी बोगनवेल मस्त.
साधना फणस, वाघाची इंटरेस्टिंग माहिती आहे.>>>>>+११

आज फुले फळं का येती शेजारी असं झालंय, हाहाहा.

वाघ बाब्बो.

मी खूप वर्षांपूर्वी गावाहून आणून लिलीचा कंद लावला, सुरेख रंग आहे. दरवर्षी फुलायची लिली. सोसायटीतल्या एकीने मागितली, मी दिले दोन तीन कंद. नंतर दोन तीन वर्ष तिच्याकडे फुले आली, माझ्याकडे येईचना. हल्ली दोन वर्ष आली फुलं परत.

दोडका बारीक चिरून घाला >>> इथेपण आला दोडका? Lol

माझ्या मोगर्‍याला सध्या हा प्रॉब्लेम झालाय. कळ्या अर्धवट उमलून गळतायत. अमितने सुचवलेल्या गोष्टी चेक करते एकदा.

इथेपण आला दोडका? >>> हाहाहा. अस्मिताकडून मागवा दोडका.

आमची लीलाबाई पण लय बेभरवशाची
एखादा वर्ष फुलतच नाही. >>> ओहह. सलग पाच सहा वर्ष येऊन नंतर दोन तीन वर्ष असं झालं. माझा दिलदारपणा आवडला नाही बहुतेक तिला. तिथे आली आणि इथे नाही, रुसली माझ्यावर . यावर्षी बघुया, गेली दोन वर्ष आल्या होत्या बाईसाहेब.

पेट्रीया = 👌

वाघ ? तो ही इतका समजुतदार? जय हो

आमच्याकडेही काही नवीन रोप आणली.... ती नीट उचलून ठेव सांगितले तर लेकाने ती उचलून अशी ठेवली होती, जी मी नंतर अंगणभर शोधत बसले होते.

मला थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे. माझ्या घरामागे एक आंब्याचे झाड आहे जिथे फारसे काही उगवत नाही. त्याच्या semi shade area मध्ये कोणती रोप लाऊ जी फरशी उंच होणार नसतील आणि फारशी देखभाल लागणार नाही.
मी ठाणे जिल्ह्यात राहते... पाऊस बऱ्यापैकी असतो.

गंधकुटी - भाज्यांमध्ये अळू, पुदीना, ओवा(पानांना वास असतो तो) अशी लागवड होऊ शकते.

बाकी गार्डनची इनडोअर झाडे बरीच आहेत. सकुलंट पण चांगली होतात.

मी काही नर्सरी वाल्याने सांगितली ती आणलीत, वरचे ribbon plant sarakhi but it will be trial and error... कुणी अनुभवी व्यक्तीने सांगितले तर bar hoil.

झाड आहे म्हणजे जमिन आहे. त्या सावलीत आले, हळद, अननस लावा. मस्त होतील. मसाल्याच्या रोपात वेलची, दालचिनी लावा. या सगळ्यांना सावली हवी.

आले व हळदीचे कंद मे मध्ये पुरलेत तरी चालतील, पाऊस पडला की पाने येतील. अननस बाजारातुन आणुन त्याचा तुरा लावा. हळदीमुळे जमीन सुधारेल.

Pages