
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .

असे वाचल्यावर मी बापाला बापच
असे वाचल्यावर मी बापाला बापच म्हणायला लागलो. >>
जाळीम दुनिया
जाळीम दुनिया
वरची "बाप" माणसाची चर्चा
वरची "बाप" माणसाची चर्चा वाचली आणि अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधवांचे सुप्रसिद्ध "आमचा बाप आन् आम्ही" हे पुस्तक आठवले.
डामरट, डॅम्बिस अशा शेलक्या शब्दांची नक्की उत्पत्ती काय आहे हे वरील पुस्तक वाचून कळले.
असे वाचल्यावर मी बापाला बापच
असे वाचल्यावर मी बापाला बापच म्हणायला लागलो. >>> ही अर्धवट माहिती झाली केकू! त्यांच्या समोर का त्यांच्या अपरोक्ष (हे खरंतर परोक्ष हवं ना?) आणि समोर म्हणाला असाल तर त्यांची प्रतिक्रीया किंवा तुमच्या गालाचा फोटो हवा
ते सगळे देशावर नाहीतर यूपी
ते सगळे देशावर नाहीतर यूपी मध्ये, तिथे लहान मुलांना पण "आप" म्हणून संबोधतात. आमच्या इकडे गावी बापाला अरे तुरे करतात.
असे वाचल्यावर मी बापाला बापच
असे वाचल्यावर मी बापाला बापच म्हणायला लागलो. >>>

ये जाळीम दुनिया>>>
स्मृतिपर्ण, मलाही आवडला.
"त्यांच्यापर्यंत पोहचविणारे माणूसप्रिय कृष्णा चौधरी अनंतात विलीन झाले. पण कालपरवा स्मृतिपर्ण सळसळली... एका नोंदीवर दृष्टी स्थिरावली". >>>> ह्यात जास्त चपखल वाटतोय.
बरोबर !
बरोबर !
*स्मृतिपर्ण सळसळली. >>> गोड वाक्य.
बरोबर !
दु प्र
"स्मरणपृष्ठ" चालेल का
"स्मरणपृष्ठ" चालेल का
स्मृतिपर्ण सळसळली >>
स्मृतिपर्ण सळसळली >> इथे स्मृतीपर्णे किंवा स्मृतीपर्णं पाहिजे ना? नपु वाटतो तो शब्द, त्याचं अनेकवचन.
वरील दोन्ही मुद्द्यांवर जरा
वरील दोन्ही मुद्द्यांवर जरा शांतपणे विचार करावा लागेल.
डामरट, डॅम्बिस अशा शेलक्या
डामरट, डॅम्बिस अशा शेलक्या शब्दांची नक्की उत्पत्ती काय आहे हे वरील पुस्तक वाचून कळले.>>>मी अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधवांचे सुप्रसिद्ध "आमचा बाप आन् आम्ही" हे पुस्तक हे पुस्तक वाचलेले नाही पण मी माझ्यापरीने ह्या शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केला. आणि surprises were waiting for for me.
डॅम्बिस/डांबिस= हा शब्द damn ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी अवतार दिसतो आहे,
डांबीस, डँबिस
वि. ठक; लबाड; हरामखोर. [इं. डॅम]
दाते शब्दकोश
डामरट= डांबरट, डांबऱ्या
वि. १. डांबरासारखा; डांबर लावलेला. २. निगरगट्ट; निर्लज्ज; कोडगा; निलाजरा; दांडगा; डांबीस; लबाड; बेरड. : ‘जमातच डांबरट आहे.’ –फकिरा ८६.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
एक मिनिट
डांबरट [ सं. दस्म (=लुच्चा) > डाम्ह > डांम.
(दस्मतर - डामरट)] निलाजरा; लबाड.
हे कृ. पा. कुलकर्णी ह्यांच्या व्युत्पत्ति कोशामधून.
* डामरट, डॅम्बिस>>> छान
* डामरट, डॅम्बिस>>> छान डॅम्बिसगिरी
माझा एक इंग्रज मित्र बाँकस हा
माझा एक इंग्रज मित्र बाँकस (bonkers - r silent) हा शब्द फार वापरतो आणि त्याचा अर्थ भंकस असाच लागला मला. बहुधा तीच व्युत्पत्ती असावी.
damn ass = डँबिस हे इथेच वर
damn ass = डँबिस हे इथेच वर कुठेतरी वाचलेय.
damn ass = डँबिस हे इथेच वर
damn ass = डँबिस हे इथेच वर कुठेतरी वाचलेय.>>>> मी ही हे इथेच वाचलंय कुठेतरी पण dumb ass म्हणून.
dumb ass = मूर्ख/
dumb ass = मूर्ख/ मंदबुद्धीचा
https://www.etymonline.com/search?q=dumb-ass
हा वेगळा.
ओह मग माझी गफलत झाली वाटते.
ओह मग माझी गफलत झाली वाटते.
हरकत नाही ; dammit !
हरकत नाही ; dammit !

हपा
हपा
भंकस ह्या शब्दाची व्युत्पत्ति मी पहिल्याच पानावर सिली आहे. ती पहा.
bohunkas
हा मूळ शब्द इंग्लिश आहे.
https://www.wordsandphrasesfromthepast.com/word-of-the-day/word-of-the-d...
अच्छा. धन्यवाद
अच्छा. धन्यवाद
पारतंत्र्याच्या काळात गोरे
पारतंत्र्याच्या काळात गोरे इंग्रज एतद्देशीय भारतीयांना तिरस्काराने damn beast किंवा damn rat असे संबोधत असत.
त्याचाच अपभ्रंश डांबीस, डँबिस आणि डामरट झाला असे त्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.
Damn doll>>>> डामडौल
Damn doll>>>> डामडौल
इंग्रजांना न आवडणारे विमानतळ
इंग्रजांना न आवडणारे विमानतळ कोणते मग?
कोलकाता? डम डम
.
हो, तेच म्हणायचे होते.
हो, तेच म्हणायचे होते.
damn beast
damn beast
हे मी पण वाचले आहे.
मराठी अभ्यास परिषदेतर्फे
मराठी अभ्यास परिषदेतर्फे देण्यात येणारा प्रा. ना गो कालेलकर पुरस्कार डॉ. अपर्णा झा यांच्या मराठी- बांगला शब्दकोशाला जाहीर करण्यात आला आहे.
अभिनंदन !
होड
होड
= १. पैज; पण; शर्यत.
२. (क्रि.) बांध, लाव
(दाते + मोल्सवर्थ)
हा शब्द खालील मजकुरात वाचण्यात आला :
“शब्दांच्या या काटकसरीमुळे, अनेक शब्द भाषेतून हद्दपार होत आहेत. होत राहतील. ही होड अशी वाढत गेली तर, काही काळानंतर भाषेचे चित्र वेगळे असेल”.
होड आणि होडी या शब्दांचा
होड आणि होडी या शब्दांचा एकमेकांशी संबंध असेल असे उगाचच वाटते परंतु शब्दकोशानुसार नाही.
Pages