ब्रेकिंग न्युज - मोदींचा अंबानी अदाणीवर काँग्रेसशी सौदा केल्याचा आरोप

Submitted by अग्निवीर on 8 May, 2024 - 04:34

तेलंगणातील एका प्रचारसभेत भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शहजादा असे सं बोधत राहुल गांधींना प्रश्न विचारला आहे, की चुनाव में अंबाणी अदाणी से कितना माल उठाया है? काले धन के कितने बोरे भर कर के रुपये मारे है?क्या टेंपो भर कर के नोटें काँग्रेस के लिए पहुंची है क्या? क्या सौदा हुआ है?
असे प्रश्न विचा रण्याचे कारण, त्यांच्या मते राहुल गांधीने रातोरात अंबानी अदाणीला शिव्या देणं बंद केलं.

जरूर दाल में कुछ काला है?

आता मोदीजी ईडी, सीबी आय, आयकर खाते यांना अंबानी अदाणीवर सोडतील का?
भाजप आयटी सेल अंबानी अदाणीच्या उत्पादनांवर बहिष्काराची द्वाही फिरवेल का?

मोदी जींच्या भाषणाचा हा अंश त्यांनीच ट्वीट केला आहे. काँग्रेसचा अदाणी अंबानीशी सौदा हे शीर्षकही त्यांनीच दिले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकायत प्रकाशनच्या छोट्या पुस्तिकांमधल्या या मोफत पुस्तिकेतला विचार लक्षणीय आहे.

भारत पुन्हा गुलामगिरीकडे
https://lokayat.org.in/books/gulamikade.pdf

जागतिकीकरण
https://lokayat.org.in/books/globook_marathi.pdf

शिक्षणाच्या बाजारीकरणाबाबतचे पत्रक
https://lokayat.org.in/pamphlets/pamphlet-marathi-shikshanacha-khazagika...

इथे अन्य काही प्रकाशने आहेत. १००% सहमत असावे असा काही आग्रह नाही. क्षीण होत चाललेला विचार चर्चेत असावा यासाठी लिंक दिली आहे.
https://lokayat.org.in/publication/

मायबोली , मिसळपाव किंवा अन्य काही संकेतस्थळांवर सरकारने सर्व काही करावे हे हास्यास्पद असल्याचे सातत्याने मांडले जाते. फेसबुक वर सुद्धा अशी मांडणी होत असावी. संघटीत मुद्देआदळआपट पथकापुढे सामान्यांचे काही चालत नाही. शिवाय कुणी मुद्देसूद उत्तरे दिली तरी थोड्या काळाने पुन्हा ये रे माझ्या मागल्या हे चालू असते. यावरून संबंधितांना मतं तपासून घेण्याऐवजी रेटण्यात रस आहे हे कळते. असो.
लोकायतने सरकार खरंच गरीब आहे का ही पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.
https://lokayat.org.in/books/sarkar_garib_ahe_ka_2nd_edition.pdf

यात काही तथ्ये आहेत ती विचार करायला लावणारी आहेत. म्हणजे श्रीमंतांना केलेली कर्जमाफी, करमाफी एव्हढी प्रचंड आहे कि जनतेवर फुकटचा आरोप करणारे यावर का बोलत नसतील हा प्रश्न पडतो.

लोकायतची बरीचशी मतं एकांगी वाटतात. पण अशा एकांगी मतआदळआपट पथकाला डोके देण्यापेक्षा आयते पुस्तक बरे पडते.

<< असल्या उद्योगपतींशी अकारण वैर पत्करून राहुल गांधी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेत आहे. >>
----- राहुल गांधी आपल्या पायावर कुर्‍हाड मारुन घेत आहेत आणि म्हणून मोदींची झोप उडाली आहे?

मास्टरस्ट्रोक ने भारलेले त्यांचे भाषण बघितल्यावर कधी झोला उचलून चालायला लागतील काही सांगता येत नाही. डोळ्यातून अश्रू काढायचा अभिनय केव्हा ? कुठल्या टप्प्यात करणार आहेत ?

मोदींचं तो आरोप करतानाचं भाषण पाहिलं ते टंग इन चीक आहे की रडत खडत थकलेल्या शरीराला आणि डोक्याला उसनं अवसान देत रडीस येऊन केलेलं वक्तव्य आहे ते सामान्य लोकांना कळेल. आणि त्यावर विरोधी पक्षांचा जळफळाट कशाला होतोय? उलट राहुलपासून मीमर्सपर्यंत सगळ्यांनी ते वक्तव्य उचलून धरलं आहे. काँग्रेसने प्रचारात टेंपोच उतरवलेत.

राहुलने अदाणीचं बिझिनेस ग्रोथ मॉडेल छान एक्स्प्लेन केलं आहे. अदानीने स्वतः उभारलेले उद्योग फारच कमी आहेत. भाजप जसा दुसर्‍या पक्षातून नेते प ळवतो, तसा अदाणी दुसर्‍यांचे बिझिनेस हडप करतो. भाजपप्रमाणेच अदाणीला त्यात ईडी, सीबीआय ,आय टी मदत करतात. त्यासाठी बँका कर्जे देतात.

अदाणीच्या मुंद्रा पोर्टने आपण सर्वाधिक कार्गो हँडल करणारे पोर्ट झालो अशी जाहिरात नुकतीच दिली. जे एन पी टी ला त्यांनी मागे टाकले. हे मोदीकृपेशिवाय झाले? एक उदाहरण ओरिसातल्या खाणींतला कोळसा पंजाब आणि पश्चिमेकडच्या राज्यांना पाठवायचा तो कसा? रस्ता किंवा रेलमार्गाने ? अंहं. रेल-समुद्र- रेल. आधी ओरिसाच्या बंदरांपर्यंत.तिथून समुद्रमार्गे संपूर्ण दक्षिण भारताला वळसा घालून मुंद्रा बंदरावर आणि तिथून रेलमार्गे या राज्यांत. खर्च अर्थात राज्य सरकारांच्या खिशातून. खूपच आरडाओरडा झाल्यावर ऊर्जा मंत्रालयाने हा आदेश मागे घेतला.

मोदीच्या काळात जेवढ कर्ज अदानी अंबानीले आरबिआयन माफ केल तैव्हढ कर्ज कुनाच्याच काळात केल नाय तवा टेंपो भरुन प्रत्येक सा कुनाले भेटला ह्ये दिसतच की

मोदीच्या काळात जेवढ कर्ज अदानी अंबानीले आरबिआयन माफ केल तैव्हढ कर्ज कुनाच्याच काळात केल नाय तवा टेंपो भरुन प्रत्येक सा कुनाले भेटला ह्ये दिसतच की

Pages