Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक दोन रिल्समध्ये जो काय तिचा
एक दोन रिल्समध्ये जो काय तिचा नाच दिसला त्यात ती स्वतः नृत्यांगना असल्यासारखं नाचत नाही.
तिचे डायलॉग्ज ऐकूनच बघण्याची
तिचे डायलॉग्ज ऐकूनच बघण्याची इच्छा होत नाही...
जवळजवळ पूर्ण वाक्य स्वच्छ प्रमाण उच्चार करण्याची स्पर्धा असल्यासारखं म्हणते आणि मधेच एखादा शब्द आपण स्पर्धेत नाही तर फुलवंती बाई करतो आहोत हे अठवल्यासारखा बोलते
हिरो छान
अरे देवा!!!
अरे देवा!!!
फुलवंती आणि मदनमंजिरी गाण्यात
फुलवंती आणि मदनमंजिरी गाण्यात प्राजक्ताचा नाच फार अपील झाला नाही पण ते नवे भो शंभो गाणे आहे त्यात तिच्या भरतनाट्यम स्किल्स ची झलक दिसते. चांगला आहे तो नाच.
मामी च्या रीव्ह्यू ने एकूण अपेक्षा जरा वाढल्यात. बघायचाय हा मूव्ही.
फुलवन्ती उत्तरेकडून येते अस
फुलवन्ती उत्तरेकडून येते अस दाखवल असेल तर जुन्या फुलवन्तीत अर्चनाने कत्थक नृत्यागना सादर केलिये ते अगदी बरोबर वाटत( फार ऑथेटिक वाटलय ते )कथ्थक उत्तरेकडुनच आलय ... प्राजुने मराठीला अपिल व्हाव म्हणून लावणिची मराठी साडी नेसलिये (त्यावर स्वत;च्या ब्रॅन्डचे दागिने घालता येवुन तेही एक प्रमोशन) गाणी बघितली तर फुलवन्ती टायटल सॉन्ग मधे घागरा आहे पण सगळ्या गाण्यात बाज लावणीचाच आहे.
मुव्हि म्हणून थोड स्वातत्र्य घेतलय का?की ती लावणी कलावन्तच दाखवली आहे? तस असेल तर ठी़क आहे.
भो शम्भो मधे सुद्धा भरतनाट्यम सद्रुष्य काहितरी केलय पण तेही सगळ धेडगुजरी आहे..सायोशी सहमत ती कसलेली कलावन्त वाटत नाही
तस असल तरी मुव्हि चकाचक वाटतोय यात शन्का नाही, मामिचा रिव्ह्यु वाचुन बघावासा नक्किच वाटतोय..गष्मिर साठी तर नक्किच
मामी मस्त लिहिलंय.
मामी मस्त लिहिलंय.
स्वच्छतेची आवड असेल तर जास्त वेळा बघायलाही काहीच हरकत नाही.
मुव्हि म्हणून थोड स्वातत्र्य घेतलय का?की ती लावणी कलावन्तच दाखवली आहे?>>>>हा प्रश्न मलाही पडलाय.
अर्चना जोगळेकरचाही फुलवंती
अर्चना जोगळेकरचाही फुलवंती पिक्चर होता का?
हल्ली ह्या अशा पिक्चरमध्ये खण, इरकल अशा पारंपारिक साड्यांवर ब्रोकेड टाईपचे ब्लाऊज सर्रास दाखवतात. जराही डोकं वापरावंसं वाटत नाही.
प्राजक्ताचे स्वतःच्या ब्रँडचे दागिने भयंकर चकचकीत दिसतायत. आवडले नाहीत बघायला.
अर्चना जोगळेकरचाही फुलवंती
अर्चना जोगळेकरचाही फुलवंती पिक्चर होता का?>>> नाहि ग! जुनि सिरियल फुलवन्ती मधे अर्चना जोगळेकर होती.
मी आधीची अर्चना जोगळेकरची
मी आधीची अर्चना जोगळेकरची सिरीयल पाहिली नव्हती. हा सिनेमाच डायरेक पाहिला त्यामुळे आधीचं काहीच इंप्रेशन नाही. जाताना अजिबात काहीच अपेक्षा नव्हत्या... त्यामुळे बर्याच गोष्टी खटकूनही सिनेमा अॅज सच आवडला.
प्राजक्ता माळी कोण, काय हे ही माहित नाहीये. तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे हे देखिल आताच कळलं.
मलाही एकदा बघायला आवडला
मलाही एकदा बघायला आवडला फुलवन्ती, भन्सालीचा प्रचंड् प्रभाव, जर भन्सालीचे सिनेमे आवडत असतील तर हा आवडेल, खूप लॉजिक, दर्जा वगैरे शोधायचा असेल तर नाही आवडणार
भन्साली इफेक्टचे कारण ऑबव्हियस , हीरामंडीची सिनेमॅटोग्राफी केलेल्या द ग्रेङ महेश लिमयेच्या फ्रेम मधे नटलेला सिनेमा.. सुंदर प्रत्येक फ्रेम ! लांब लचक पदर , लांबाच लांब मोकळे केस सोडून पायर्यांवर पळत जाणेही आहेच !
गाणी पण आवडली.,कोरिओग्राफी हे शंभोची छान आहे.
स्टोरी म्हणली तर महान लव्हस्टोरी वगैरे मला दिसली नाही, तिच्यासाइडने दिसते पण त्यानी त्याग केला तो इमेज जपायला.
प्राजक्ता माळी बद्दल मिक्स फिलिंग आहेत, उत्कृष्ट नृत्यांगना वगैरे विशेषणं देण्या इतकी तिची नृत्य भारी वगैरे वाटत नाही, इन फॅक्ट क्लासिकल नृत्याची पारंगत आहे हे तिच्या डान्स्वरून वाटतच नाही तरी खूप मेहनत घेतली आहे, मनापासून काम केलय हे मात्रं जाणवतं . तिचा शेवटचा तुळशी वृन्दावना भवतीचा डान्स मात्रं आवडला.
खूप लहानपणी दूरदर्शन वरची फुलवन्ती पाहिली होती , अर्चना जोगळेकर परफेक्ट फिट होती , ती कथ्थक पंडिता आहेच ,याशिवाय तिच्या पर्सनॅल्क्टी मधला अॅरोगन्स, माज हा सुद्धा फुलवन्तीला १०० % योग्य होता.
आत्ताच्या मराठी सिनेमात उत्तम क्लासिकल डान्सर + अभिनय करणारी + रूपगर्विता अशी कोणी अभिनेत्री डोळ्या समोरच येत नाही.
हिन्दीत जुन्या बॉलिवुड मधल्या वैजयन्तीमाला, पद्मिनी, हेमा मालिनी या पण फिट बसल्या असत्या या रोल मधे .
स्नेहल तरडेला बघताना बाजीराव मस्तानीची प्रियांका चोप्रा आठवली, खूप प्रभाव वाटला त्या कॅरॅक्टरवर आणि फेसिंगही काशीबाई सारखे आहे तिचे !
गश्मीरने स्क्रीन व्यापून टाकलाय, त्याचा ऑरा खूप भारी, जास्तं संवाद नसून अभिनय आणि बॉडी लँग्वेज् वर शो स्टिलर झालाय, शास्त्रीजी लुक मधे त्याचं फेसिंग पाहून हिन्दीतला गुर्मीत चौधरी आठवला, किती सेम आहे दोघांचे फेसिंग!
गश्मीर टोटल 'डोळ्यात बदाम'
गश्मीर टोटल 'डोळ्यात बदाम' कॅटेगरी दिसलाय यात. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रींच्या भूमिकेसाठी म्हणून का होईना, पण स्वच्छ दाढी केलेला लूक आहे आणि ते आवडलंय मला. हल्ली त्या दाढ्या पहायचा कंटाळा आलाय. बरेच जण तर कळकट दिसतात.
पिक्चर पहायचा आहे खरंतर. ओटीटी वर आल्याशिवाय जमणार नाहीये पण.
आलाय ना ओटीटी वर.
आलाय ना ओटीटी वर.
कुठे?
कुठे?
छान चर्चा चालली आहे. फुलवंती
छान चर्चा चालली आहे. फुलवंती मालिका फार थोडी आठवते. नृत्यांगना शर्यत हारते आणि गायकाची दासी होते असे काही तरी होते.
गश्मीर नेहमीच बदाम दिसतो.
आयपी टिव्हीवर असावा ना?
आयपी टिव्हीवर असावा ना? नेटफ्लिक्स किंवा प्राईमबद्दल कल्पना नाही.
आयपीटीव्हीवर आलाय पण खराब
आयपीटीव्हीवर आलाय पण खराब क्वालिटी आहे.
मामी, मस्त रिव्ह्यू! डिजे,
मामी, मस्त रिव्ह्यू! डिजे, तुझाही रिव्ह्यू छान. गश्मीरसाठी बघेन. खरे तर मोठ्या स्क्रिनवर बघायला आवडेल पण नेहमीप्रमाणे शेवटी ओटिटीवर यायची वाट बघावी लागणार.
मला गुरमित आवडतो, मस्त actor.
मला गुरमित आवडतो, मस्त actor. गश्मीर आणि तो सेम वाटत नाही, पण दोघांसाठी डोळ्यात बदाम.
कॉण्टॅक्ट लेन्स च्या ऐवजी
कॉण्टॅक्ट लेन्स च्या ऐवजी बदामची टेक्नॉलॉजी आली आहे का ?
(No subject)
र.आ.
र.आ.
त्याला वॉण्ट टू कॉण्टॅक्ट लेन्स म्हणायला पाहिजे
प्रस्जक्तानी आज पोस्ट केलेत
प्रस्जक्तानी आज पोस्ट केलेत फोटो, बाकीचे तिचे डान्सेस खूप अपिल होतीलच असे नाही , पण हाच तो सीन ज्यात तिचे नृत्य सर्वात सुंदर आहे.

काल "लाइक आणि सब्स्क्राइब"
काल "लाइक आणि सब्स्क्राइब" नावाचा मराठी
चित्रपट थिएटर मधे पाहिला.
खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. चित्रपट वेगळ्या धर्तीचा आहे. त्यात रहस्य आहे, आणि शेवटच्या मिनिटापर्यंत उत्कंठा टिकवणारे आहे. चित्रपटाची कथा जलद उलगडत जाते. अजिबात एक मिनिट सुद्धा चित्रपट रेंगाळत नाही. दोनच गाणी आहेत. एक गौतमी पाटीलची लावणी. आणि दुसरं ब्लॉगरच. अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा अभिनय उत्तम. जुई भागवतचा पदार्पणातही छान अभिनय. दिग्दर्षकाने प्रत्येक पात्राचा व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे. एकही पात्र उगाचच आहे वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीही अचूक आणि जिथल्या तिथे आहेत.
खूप चांगला सिनेमा अचानक पाहिला मिळाला आणि मराठी सिनेमा असल्याचा आनंदही झाला.
अवश्य बघा. तुम्हाला आवडेल आणि रहस्याचा धक्का बसेल.
पण थिएटर मधे मोजून २५-३० माणसे होती. याचे आश्चर्य वाटले. असे का?. फक्त मराठी सिनेमाबाबत असे होते का सगळ्याच नविन चमुच्या चित्रपटांचे असेच होते.?
अरे वा! बघतो मिळाला की.
अरे वा! बघतो मिळाला की.
सांगितल्याबद्दल धन्यवाद.
गर्दी कमी याचा फार विचार करू नये. आपण बघावा, आवडला तर सांगावा. बाकी त्यांचा धंदा आहे, चालला तर चालेल नाही तर बुडेल. मग आपण दुसरं काही बघू. आपल्याला दोन तीन भाषा येतात. यात नाही तर त्यात. मनोरंजन मात्र चांगलं झालं पाहिजे. ते फालतू साऊथ चे पिक्चर बघायचे नाहीत, अर्थात कधी आवडले तर बघायचे पण. तसेच फालतू मराठी पण बघायचे नाहीत. उगा फालतू पिक्चर बघून मराठी इंडस्ट्री बिंडस्त्री जगवायच्या बाता व्हॉट्स अॅपवर पण वाचवत नाहीत. अंमलात आणणे अशक्य. चुकुन दोन मिनिटं कुंडलकरचा आत्मा शिरला का काय वाटलं. पण नाहीये तसं. ब्रश करुन झोपायची वेळ झाली.
सठी सामाशी एखादा चांगला पिक्चर येतो. बाकी बाईपणभारी आहेच त्यांना पैसे मिळवून द्यायला.
बाकी जो जे वांछिल तो ते लाहो!
चांगला आहे का? मिळाल्यावर
चांगला आहे का? मिळाल्यावर बघेन नक्की. धन्यवाद सांगितल्याबद्दल.
एबीसीएल ने तेरे मेरे सपने
एबीसीएल ने तेरे मेरे सपने साठी शोधले होते त्याला.
तो पिक्चर हिट होता चंद्रचूर आणि अर्शदचा. अर्थात अर्शदच भाव खाऊन गेलेला. पण ओपोजिट कॅरेक्टर जोडी म्हणून दोघे एकत्र चांगले वाटलेले.
पिक्चर विसरलो बराचसा पण त्यातले आंख मारे ओ लडकी गाणे अजरामर झाले..
आमचा लाँड्रीवाला हा रोज येऊन
आमचा लाँड्रीवाला रोज येऊन हसून विचारतो "कपडे आहेत का ?"
त्याचे दर वाढतच चालले आहेत. मी रोज ठरवतो एव्हढे कपडे आता प्रेस करण्यासाठी याला द्यायचे नाहीत. पण गेली दहा वर्षे काही ते जमले नाही. रोज चडफडत गाठोडं उचलून देतो.
तो सेम प्राजक्ता माळी सारखा दिसतो हे आत्ताच ध्यानात आले. स्त्रीवेषात हुबेहूब (स्लिम) प्राजक्ता माळी दिसेल
बहुतेक त्यामुळेच प्राजक्ता माळीचा चेहरा आवडेनासा झाला असणार.
हास्यरसिक, हास्यसरपंच, हास्यतलाठी, हास्यपाटील हे निमित्त फक्त.
आमचा लाँड्रीवाला हा रोज येऊन
डपो
फुलवंती पाहिला. सिनेमा आवडला
फुलवंती पाहिला. सिनेमा आवडला कारण cinematography आणि गश्मिर महाजनी. इतकेच कारण आहे. तो फारच हँडसम दिसला आहे. ( मात्र सुरुवातीचं शास्त्रिंच वर्णन आणि achivments ऐकून वयाने जास्त कोणीतरी समोर येईल वाटत असतानाच तो दिसतो )
प्राजक्ता माळी अजिबात नृत्यांगना वाटत नाहीये. आणि जे वर्णन सिनेमात येतं त्यापेक्षा वयाने फार मोठी वाटते. जसं वर्णन आहे तशी सुंदर दिसत नाही तर साधी मराठमोळी मुलगी वाटते.
पहिल्याच गाण्यात कथक चा ड्रेस घातला आहे त्यात वेल्वेट ब्लाऊज आहे आणि त्याचं fitting खराब आहे. ( उगाचच तिथे काहे छेडे मोहे हे या गाण्यातली मधुबाला ची एन्ट्री आठवली आणि मग प्रा. मा. च्या नसलेल्या अदा अजिबात आवडल्या नाहीत )
नर्तिका म्हणून तिचा मेकप देखील आवडला नाही. डोळे, ओठ हायलाईट व्हायला पाहिजेत, आकर्षक अदा दिसायला पाहिजेत त्या दिसत नाहीत. ( शेवटच्या सीन मध्ये आहे तसा बरोबर आहे )
तेवढ्या एका गाण्यानंतर तर ती चक्क लावणी कलावंत वाटते. तिच्याबरोबर असलेला नाच्या, तिचे नाच आणि एकूण वागणं लावणी फडाची आठवण करून देतात. ज्याची खरच गरज नव्हती. ती कथक नर्तिका आणि हिंदी मिश्रित भाषा कदाचित जास्त अहंकारी आणि साजेशी वाटली असती. ( इथे अदिती राव हैदरी छान वाटली असती असं उगाच वाटून गेलं )
भाषा गावरान असावी की शुद्ध, उच्चार गावरान असावे की स्वच्छ या कात्रीत लेखक आणि प्रा. मा. अडकली आहे.
चिन्मयी सुमित अजिबात म्हणजे अजिबातच नर्तिका गुरू वाटत नाही. ( ती देखील लावणी मधल्या मावशी सारखी दिसते ) नंतर बोलावून घेतलेल्या दोन नर्तिका पैकी एक बहुतेक विभावरी देशपांडे ? ( मद्रासी किंवा केरळी गेट अप? ) चक्क फॅन्सी ड्रेस स्पर्धेला आल्यासारखी दिसते. आणि त्यात बोलताना चक्क हिंदीत बोलते.
पेशव्यांचा काहीच रुबाब, थाट दिसत नाही. उगाच आपले एक पात्र आहे असं वाटतं. म्हणजे फुलवंतीने मला न्याय हवा असं मागणं वेगळं आणि पेशव्यांनी ती जे बोलेल ते काहीच आक्षेप न घेता मान्य करणं वेगळं. ते काहीही वाटलं.
सगळ्यांच्या कपड्यांना प्लास्टिक जऱ्या, टिकल्या, मणी दिसतात ते फारच काचतात ( मनाला)
पण तरीही सिनेमा एकदा बघायला चांगला आहे. वातावरण आणि शास्त्री साठी..
या कात्रीत लेखक आणि प्रा. मा.
या कात्रीत लेखक आणि प्रा. मा. अडकली आहे.
चिन्मयी सुमित अजिबात म्हणजे अजिबातच नर्तिका गुरू वाटत नाही. ( ती देखील लावणी मधल्या मावशी सारखी दिसते ) नंतर बोलावून घेतलेल्या दोन नर्तिका पैकी एक बहुतेक विभावरी देशपांडे ? ( मद्रासी किंवा केरळी गेट अप? ) चक्क फॅन्सी ड्रेस स्पर्धेला आल्यासारखी दिसते. आणि त्यात बोलताना चक्क हिंदीत बोलते.
<<<<
Exactly 100000 %
Totally agree with all your points!
Pages