मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यापेक्षा भयानक होते, स्वजोला शर्टलेस बघणे.

>> ईथे थोडे अवांतर आणि पर्सनल होईल पण प्रामाणिकपणे या सिनेमात स्वजोची चेस्ट बघून त्याची कोणतीतरी शस्त्रक्रिया झाली आहे असे वाटत होते. मसल्स पण नव्हते आणि fat पण. काहितरी कृत्रिम चेस्ट वाटत होते.

मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा

>> अरे देवा. ते तर चळ लागल्यासारखा तोच जप होता पूर्ण सिनेमात.

'पाणी' बघितला.
सुंदर आहे.
नांदेड जवळच्या पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या नागदरवाडी नावाच्या खेड्यातील शिकला सवरलेला मुलगा (आदिनाथ कोठारे) कांदेपोह्याच्या कार्यक्रमात मुलगी (रुचा वैद्य) पसंत करतो. पण नंतर मुलीकडून नकार येतो कारण गावात पाण्याची सोय नसते. गावची विहीर आटली की तीन किलोमीटरवरच्या विहीरीतून पाणी आणणे हेच गावच्या बायांचं जीवन असतं. त्याच वेळी पर्जन्यखड्डे श्रमदान + रोजगार हमी सारख्या सरकारी योजनेतून गावकर्‍यांनी घाम गाळून खणणे, भूजल पातळी वाढवणे अशी स्किम गावात आणणे शक्य होणार असते. पण गावात जराही एकी नसते. अंतर्गत आणि तालुका/ जिल्ह्याचे राजकारण आणि गोंधळ कमी नसतात.
नवरा नवरी एकमेकांना पसंत असतात आणि हे लग्न तडीस न्यायचं तर गावात बारमाही पाण्याची सोय करण्याशिवाय आ.को. ला गत्यंतर नसतं. तो गावाला एक कसं करतो. एनपॉवर कसं करतो त्याची कहाणी म्हणजे पाणी.
सिनेमा जसा दृष्यांतून बोलला पाहिजे तसाच दृष्यातून, अभिनयातून, चेहर्‍यांतून बोलतो. मराठी सिरियल/ सिनेमाची ओळख बनलेल्या मनातल्या गोष्टी निवेदक मोठ्याने बोलून आपल्याला सांगणे, प्रेक्षकाला ओ का ठो समजत नाही हे गृहितक धरुन सगळं समजावून सांगणे असलं काही न करता क्रिस्प दृष्यात्मकता दिसत रहाते. आको चेच दिग्दर्शन आहे. आदिनाथ आणि रुचा दोघांनी सहज कामं केली आहेत.
नांदेड/ मराठवाड्यातील भाषा मला तरी मस्त वाटली ऐकायला. ती किती वरिजिनल आहे काही कल्पना नाही. पण एफर्ट घेतलेले न दिसता जे आहे ते नैसर्गिक वाटत होतं. गावचे लोक पण छान निवडले आहेत. कुठे ही न रेंगाळता, उगाच मेलोड्रामा न करता, देवाची वगैरे आळवणी न करता (मला काले मेघा प्रकार करतील, ओ पालनहारे प्रकार करतील फार भिती होती. पण तसं काही काही होत नाही) नो नॉनसेन्स शेवट पूर्णत्वाकडे जातो. इथे थोडं फारच सोयिस्कर होतं पण ते तसं होणार हे आपल्याला माहीतच असतं. ते झाल्यावर शेवट ही अ‍ॅप्ट जिकडे जसा मला व्हायला हवा वाटलं असतं तिथेच तसाच होतो.
प्रेम आकर्षण ही सुंदर दाखवंय. दोघांचे डोळे बोलतात. आर्ची अवघडलेली वाटायची तशी ही नाही वाटत. बाकी कपडे, घरं, मेकप, गाव, तो डोंगर, माळरान सगळं जसं हवं तसं दिसतं.
मला फार आवडला. मराठी असल्याने काही एखाद उणं असेल तर अर्थात माफच आहे. (सुभा आहे. आणि तो सुसह्य आहे.)
किशोर कदमला घेऊन तो केवळ किशोर कदम आहे म्हणून त्याला वापरलं पाहिजे, तर फुटेज द्या असं अजिबात केलेलं नाही. फोकस कुठे ढळत नाही.
(इथे आयपी टीव्ही वर एचडी मध्ये बघितला)

Happy भाषा किती वरिजनल आहे हे मी बघून सांगेन. छान लिहिले आहेस, उत्सुकता वाटते आहे. रेकोबद्दल धन्यवाद. फायनली नांदेडला/ मराठवाड्याला काहीतरी रेकगनिशन मिळतेय चित्रपटांत.

मी विचार करतोय माझी पाणी पोस्ट कुठे होती.
तर ती चिकवा धाग्यावर होती. मचिकवा धाग्यावर सुद्धा पोस्ट करतो.

पाणी - एक प्रेमकथा पाहिला.
छान वाटला. आवडला.
पाणी प्रश्न अस्वस्थ करून न जाता लव्ह स्टोरी गुदगुल्या करून जाते हे डोक्यात ठेवून त्या जोनरचा आहे समजून बघायला हरकत नाही.

इतकीच होती Proud

फुलवंती बघितला
भाषा मध्येच प्रमाण आणि अचानक गावसकडची का बोलते कळत नाही, प्राजक्ता प्राजक्ताच वाटते फुलवंती नाही वाटत.
.
बाकी छान आहे
सिरीयस हास्यजत्रा बघितल्यासारखं आहे.
वाईट नाहीये.
कितीतरी दिवसांनी नवीन मराठी चित्रपट न पळवता पूर्ण पाहिला

Submitted by अमितव on 13 December, 2024 - 01:15 >>> आवडले परीक्षण

फुलवाती घरी ott वर बघितल्यावर एकच वाटले की हा थेटर मध्ये बघायला नक्की सुंदर वाटला असेल प्रेक्षकांना. बाकी सगळा उजेड आहे.

तिचा तो शेवटचा पांढऱ्या साडीत एकटी पायऱ्यांवर पदर टाकून बसलेला शॉट आहे तो मोठ्या स्क्रीनवर खूप छान दिसला असणार.

अवांतर : कोणाला सिनेमाभर स्क्रीनवर किंचित अंधार आहे असे जाणवले का? पूर्ण व्यवस्थित उजेड फार म्हणजे फार कमी ठिकाणी आहे.

बाकी आंघोळ शौकीन पब्लिक साठी आदिनाथ कोठारेची आंघोळ पण आहे. आणि तो खरंच चांगला दिसतो. गश्मिर सारखा रोबो नाही दिसत.

किल्ली पाणी प्राईमवर आहे
बाई दवे, कुठलाही चित्रपट असो गूगलवर नाव टाकून पुढे ओटीटी लिहिले की मिळून जातो.
आणि तिथूनच क्लिक केले की चालू होऊन जातो.

पाणी पाहिला पाहिजे
फुलवंती नकोच
कथेचा जीव नसलेला चित्रपट पाहिला की वेळ वाया गेल्याचं दुःख होतं. ( भले तीच वेळ टुकार रिल्स बघत गेला तरी त्यांचं काही वाटतं नाही ) Lol

मोठ्ठी चांगली रीलच आहे मग फुलवंती.
जरूर बघा
लॉजिक लावू नका फक्त
गश्मीर छान दिसतो ही सुद्धा एक अफवा आहे.
विचित्रपनणे बघत राहतो, तो creep वाटतो.

छान परिचय अमित! पाहायचा आहेच कारण इतर ठिकाणीही चांगले लिहीलेले वाचले आहे.

बाकी आंघोळ शौकीन पब्लिक साठी आदिनाथ कोठारेची आंघोळ पण आहे >>> Happy होपफुली पाणीप्रश्न सोडवल्यावर आहे.

सिरीयस हास्यजत्रा बघितल्यासारखं >>> Lol

पाणीचा रिव्ह्यू वाचून पहावासा वाटतो आहे. एकदम टॉयलेट एक लव्ह स्टोरीची आठवण आली.

होपफुली पाणीप्रश्न सोडवल्यावर आहे. >>> Lol

अरे वा, बरेच आंघोळोत्सुक हिरो निर्माण होऊ लागलेले दिसतायत. अशानं लवकरच 'कोहरे का धोतर लपेटे हूं, पानी में खुद को समेटे हूं' टाईप गाणं घातलं जाईलसं वाटतंय.

सरदारजीचा एक जोक होता. त्याने एक सिनेमा रोजचे तिन्ही शो ज पाहिलेले असतात, त्याला डोअरकीपर्स ओळखायला लागतात. शेवटी डोकी त्याला विचारतात कि, "ये फिल्म तो फ्लॉप है. तुम्हें इसमे इतना क्या पसंद आया?"
तर सरदार सांगतो कि "अरे, उस सीन मे नै क्या रेल लाईन के पास होज पाईप के नीचे हिरोइन नहाती है.. "
"लेकिन उस सीन मे तो मौके पर ट्रैन आ जाती है.. और ट्रेन गुजर जाती है तब तक हिरोइन नहाके कपडे पहनकर जा रही होती है"
" वही तो. भारतीय रेल है.. कभी तो लेट आयेगी"

हा जोक आता लिंगबदल होऊन व्हायरल होईल.
ताक - तेव्हा इंटरनेट नसताना जोक्स कसे व्हायरल होत होते?

कोहरे का धोतर लपेटे हूं, पानी में खुद को समेटे हूं'
भारतीय रेल है.. कभी तो लेट आयेगी"
>>>> Lol Lol

ती पुन्हा गाईल >>> 'मी पुन्हा येईन'पेक्षा हे जास्त डेंजरस वाटते का Wink

कथेचा जीव नसलेला चित्रपट पाहिला की वेळ वाया गेल्याचं दुःख होतं. ( भले तीच वेळ टुकार रिल्स बघत गेला तरी त्यांचं काही वाटतं नाही )

>> झकोबा Lol

बाकी आंघोळ शौकीन पब्लिक साठी आदिनाथ कोठारेची आंघोळ पण आहे.

>> अरे वा. नवीनच ट्रेण्ड सुरू झालेला दिसतो हा. या निमित्ताने मराठीतले पोट सुटलेले, तात्या विंचू तोंडाचे स्वजो सारखे लोक सिनेमातून हद्दपार होतील तर बरं.

किल्ली, रील 30 सेकंदापेक्षा जास्त मोठी असेल तर लगेच बोअर व्हायला सुरू होते. Happy

सिरियस हास्यजत्रा Lol

कोहरे का धोतर Lol

पियु , तात्या विंचू बाहुले तोंड Lol

या निमित्ताने मराठीतले पोट सुटलेले, तात्या विंचू तोंडाचे स्वजो सारखे लोक सिनेमातून हद्दपार होतील तर बरं
>>>>>>

जवानी चार दिनाची असते
नंतर तुमचे सुरकुतलेले उघडे नागडे शरीर बघायला कोणी येणार नाही..
पण टॅलेंट आयुष्यभर सोबत राहते.. मैतालाही गर्दी होते

दूरदर्शनवर १९८० ~८५ च्या सुमाराला आलेली फुलवंती ही मालिका खूपच सरस होती असे आताचा फुलवंती पाहिल्यावर वाटत राहिले .
त्यात अर्चना जोगळेकर आणि अरूण गोविल यांनी उत्तम भूमिका साकार केल्या होत्या. याचे भाग युट्युब वर पहायला मिळतात

Pages