अंत: अस्ति प्रारंभ: - 2 - {कोरडे} - {SharmilaR }

Submitted by शर्मिला. on 10 September, 2024 - 02:04

अंत: अस्ति प्रारंभ: - 2 - {कोरडे} - {SharmilaR }

कॉलेज पासूनच्या त्यांच्या मैत्रीतच त्यांना उमगलं होतं, आपल्या दोघांचीही लेखनाची आवड आहे. दोघांनीही आधी इथे तिथे थोडं फार लिहिलं होतं, पण अजून चाचपडणं चालूच होतं.

नशिबाने पुढे कामाचं ठिकाणही एकच होतं. मग दोघांनाही वाटलं आपण मिळूनच काही लिहून बघूया का? आणि मग जन्माला आलं, ते नव्या पिढीच्या भाषेतलं, तरुणाईला रुचेल असं पुस्तक. सुदैवाने ते प्रकाशितही झालं.

नुकताच त्याच पुस्तकावर आधारित चित्रपटाला देश पातळीवरचा पुरस्कार मिळाला होता. आज तो पुरस्कार साजरा करण्यासाठी समारंभ आयोजित केला होता निर्मात्याने. मंचावर दिग्दर्शक, नट नट्या होते. ते दोघे हॉल मधे होते.

संपूर्ण हॉल मधे टाळ्यांची बरसात होत होती.
ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच.
*************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
असेच होत असावे.. होते.. किती वाईट वाटत असेल तेव्हा.

छान

खरच नॅशनल अवॉर्ड जिंकलेले सिनेमा आणि कलाकारांचा पैश्याशी छत्तीसचा आकडा असतो बरेचदा.
कल्पना सुंदर.

हॉल मधे म्हणजे प्रेक्षकांत होते/मंचावर नव्हते अशा अर्थाने दिसते.>> हो.लेखकांच्या वाट्याला कौतुकाची, प्रशंसेची बरसात नव्हती.

हो त्याच अर्थाने घेतले. फक्त कन्फर्म करत होतो. जमली आहे.

नुकतीच ती सलीम-जावेद वरची सिरीज पाहिली तेव्हा त्यातही ते ही याबद्दल बोलत होते, की लेखकांना काहीच क्रेडिट मिळत नसे.