अमेरिकेत राहूनही आपण भारत कसे मिस करतो - याविषयी बरेच ऐकले आहे, वाचले आहे, अनुभवले तर आहेच आहे. पण कधी कधी विचार येतो, इथे आवडण्यासारखे काय आहे? गूळाला लागणार्या मुंग्यांप्रमणे जगभरातून लोक इथे येतात. या देशाला 'मेल्टिंग पॉट' म्हटले जाते, असे काय आकर्षण आहे इथे?मग अर्थात पहीला मुद्दा येतो तो म्हणजे, समृद्धी, श्रीमंती, सुबत्ता, वैभव, पैसा, हिरवे डॉलर्स. पण त्याच्यापलिकडे काय आहे? ते पाहू यात.
इथल्या हवेत आहे आशा, एक संधी आणि ती संधी आपल्याला मिळणारच हा विश्वास. सोशल फॅब्रिक (फायबर?) मध्ये अपवर्ड मोबिलिटी इथे फार सोपी आहे. तुम्ही काळे, गोरे, पिवळे असा वा लाल. इथे कोणीतरी तुमच्याहून अगदी वेगळे आणि कदाचित सोशली वेल ऑफ तुमच्या प्रेमात पडू शकते. ना जात आड येते ना धर्म ना वंश. अगदी तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा आड येणार नाही. तुम्ही कॉफीशॉप मधले बरिस्ता असाल की प्लंबर, ट्रक ड्रायव्हर असा की उबर चालक - तुमच्या प्रेमात राजा पासून रंकापर्यंत कोणीही पडू शकते आणि ते समाजमान्यच आहे. कोणी जजमेन्ट पास करणार नाही. तुम्ही कोणीही असा, जर लायकी असेल तर तुम्हाला पदोन्नतीसाठी कोणी डावलणार नाही. खरीखुरी लँड ऑफ अपॉर्च्युनिटी.
ओह माय गॉड!! ज-ज-मे-न्ट. आपण जादूचा पेटाराच उघडला. किती किती प्रकारे नॉनजजमेन्टल फ्रीडम(स्वातंत्र्य) हवे ते करण्याचे, हवे ते लेण्याचे, खाण्याचे, वागण्याचे स्वातंत्र्य, मुभा मिळू शकते. मुभा? कोण देणार मुभा तुम्हाला? आहेच कोण द्यायला. प्रत्येकाला स्वतःचे व्याप आहेत. आयुष्य आहे. कोणालाही दुसर्याच्या जीवनात नाक खुपसण्यात अजिबात म्हणजे अजिबात स्वारस्य नाही. जर सामाजिक शिष्टाचारांच्या चौकटीच्या (जी की खूप खूप व्यापक आहे) आत तुम्ही राहणार असाल तर कोणी तुमच्याकडे ढुंकुनही पहाणार नाही. अदृष्य आहात तुम्ही. हव्या तितक्या आयडिओसिंक्रसीज (विक्षिप्तपणा) जपा, हवे ते करा. खरच स्टॅचु ऑफ लिबर्टी हेच या देशाचे प्रतिक म्हणुन योग्य आहे. खूप इन्डिव्हिज्युअॅलिटी आहे. अगदी हवीहवीशी. अर्थात हे जास्त प्रमाणात न्यू यॉर्क सारख्या महानगरांमध्ये दिसते. विस्कॉन्सिनच्या लहान खेड्यात क्वचित पायात पाय येतात.
अगदी महानगरात, खेड्यात यत्र तित्र सर्वत्र इथे उपवने, वाटिका, बागा, उद्याने आहेत. खेळाची मैदाने आहेत, लहान मुलांकरता जंगलजिम आहेत. कधी मूड फार पेन्सिव्ह झाला, खुशाल एखाद्या वाटिकेत फिरुन या, निवांत बाकावर बसा. नाहीतर सार्वजनिक वाचनालयात जाउन , कवितांचे पुस्तक काढुन निवांत वाचत बसा. कोणी डिस्टर्ब करणार नाही. खूप 'सुकून' आहे, असीम शांती आणि 'मी-टाईम'. हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी. बागेत कोणी सॅक्सोफोन वाजवते कोणी क्लॅरिनेट तर कोणी व्हायोलिन - पैसे टाका पुढे जा. बरं खिशात पैसे नाहीत का, कोई बात नही. ऐका अगदि फुकट ऐका. एका सुंदर कवितेच्या या ओळीच पहा ना -
It is a place where
as you sit on the grass by the lake
a tall black man of a certain age
strolls by
blowing his saxophone
you smile and bow
he bows back
with his horn, his day is mellow
He's in the sun.
He has given mellowness
and sun
free of charge to you.
बाकी गर्दीचा अभाव, गर्दीतल्या धक्क्यांचा अभाव, सर्वत्र रेस्टरुम्स असणे, हवा तेवढा गर्दीतला एकांत मिळणे आणि अनेक ऑब्व्हियस आणि सर्वांना माहीत असलेले मुद्देही आहेत.
मला या धाग्यावर 'तुम्हाला, अमेरिकेबद्दल' काय आवडते त्याविषयी चर्चा अपेक्षित आहे. शक्यतो गाडी रुळावरती राहो 
सगळ्याच पोस्ट्स उत्तम. मै,
सगळ्याच पोस्ट्स उत्तम. मै, विकु, स्वाती२ चे मुद्दे पटले.
मुकुंद, छान लिहीताय. डिटेल्ड पोस्ट्स येऊद्यात.
अमेरिकेतील पब्लिक सुखसोयी,
अमेरिकेतील पब्लिक सुखसोयी, प्रोफेशन/करीयर शैक्षणिक संधी तर झाल्याच पण 'अमेरिकन' कल्चरमधले इतर कुठले मुद्दे आवडतात, हेही ऐकायला आवडेल सर्वांकडून.
उदा. अठरानंतर स्वतंत्र राहून शिक्षण/नोकरी करणे, विकेंडला आवर्जून आउटडोअर अॅक्टीव्हीटी करणे उदा खेळ्/पोहणे/ट्रेल्सला जाणे/कॅम्पिंग्/ट्रेकींग्/इतर आउटडोअर व्हॉलंटरी वर्क इ
मैत्रेयी, काय मस्त पोस्ट आहे
मैत्रेयी, काय मस्त पोस्ट आहे ग तुझ! अगदी माझ्या मनातल लिहीले आहेस. तु कव्हर केलेले सगळे मुद्दे माझ्याही मनात होते! थोडक्यात पण किती महत्वाचे मुद्दे तु मांडलेस!
रस्त्यावरचे साफसफाईचे व्हॉलंटीअरींग चे काम मी ( माझ्या हॉस्पिटलतर्फे) माझा मुलगा( त्याच्या शाळेतर्फे) नेहमी करतो. मीच काय अमेरिकेतले कित्येक लोक करतात! शनिवार रविवारी रस्त्याच्या बाजुला, स्पेशली तुमच्या घराच्या/ कामाच्या जागेच्या जवळ असलेल्या हायवेच्या दुतर्फा तुम्हाला हातात पिवळ्या गारबेजच्या पिशव्या घेउन विद्यार्थी / माणसे रस्त्याच्या बाजुचा कचरा साफ करण्याचे ( व्हॉलंटरी) काम करताना दिसतील. “ अॅडॉप्ट द हायवे" या कॉन्सेप्ट च्या नावाखाली कित्येक शाळकरी विद्यार्थी, लोकल चर्च मधे जाणारी माणसे व जवळपासच्या ऑफिसमधली माणसे असे हायवेच्या बाजु साफ करताना तुम्हाला दिसतील. किंबहुना तुमच्या लोकल एरिया मधे विद्यार्थ्यांना व्हॉलंटीअरींग करायला अमेरिकेत नुसते प्रोत्साहनच देत नाहीत तर ते केल्याबद्दल तश्या विद्यार्थ्यांकडे कॉलेज अॅडमिशन मधे फेव्हरेबली बघीतले जाते. इथे तुम्हाला विद्यार्थी रस्ते साफ करायचेच नाही तर लोकल हॉस्पिटल मधे/ वुद्धाश्रमां मधे/ लायब्ररीज मधे ही व्हॉलंटीअरींग करताना दिसतील. अश्या विद्यार्थ्यांना अगदी खुद्द तत्कालीन अमेरिकन प्रेसीडेंटकडुन सर्टीफिकेटही मिळते! व्हॉलंटीअरींगचे असे बाळकडु व महत्व अमेरिकेत शाळकरी वयातच मिळते. ते पुढे
लोकल चर्चेस मधुनही चालु राहते. विद्यार्थीच नाही तर अॅडल्टही( खासकरुन रिटायर्ड झालेली माणसे) अमेरिकेत ठिकठिकाणी असे व्हॉलंटीअरींगचे काम करताना आपल्याला दिसतात. हे देशाचे एक प्रकारचे वैभवच नाही तर काय म्हणायचे तुम्हीच सांगा!
त्यामुळे अमेरिकेमधे " सिव्हिक सेंस" चा आय क्यु फारच वरचा असल्याचा माझा अनुभव आहे.
मैत्रेयीने म्हटल्याप्रमाणे अमेरिकेत जे अठरा पग्गड देशातुन विविध देशातुन माणसे ( मोस्टली)) गुण्यागोविंदाने राहतात त्याला जगात कुठेच तोड नाही! जगाच्या पाठीवर अमेरिका हा एकच देश असा आहे की जिथे तुम्हाला भारतिय, पाकीस्तानी, बांगला देशी, श्रिलंकन, चायनीज, नेपाळी, ग्रीक, इटालिअन्स, जर्मन्स,ब्रिटीश, पोलिश, डच, फिनिश, स्विडिश, मेक्सिकन्स्,क्युबन्स, कोरिअन, जॅपनीज, व्हिएतनामीज, इराकी, अफगाणी, इरानिअन्स, इथिओपिअन्स, केनिअन्स, नायजेरिअन्स, सोमालिज, पॅलेस्टिनिअन्स etc etc अश्या विविध देशातील माणसे/ इमिग्रंट्स (व म्हणुन त्यांचे फुड/त्यांची रेस्टॉरंट्स) दिसतील. अश्या विविध देशातील लोकांची संख्या तुरळक व तोंडी लावायचे म्हणुन / नुसतेच नाव घेण्याइतपतच नाही बर का! खरी मेल्टींग पॉट आहे अमेरिका!मैत्रेयी म्हणाली त्याप्रमाणे माझ्याही द्रुष्टीने खरच हेही अमेरिकेचे अजुन एक वैभव आहे!
खर म्हणजे सामोचे इंट्रोडक्टरी पोस्ट, स्वाती२ चे पोस्ट व मैत्रेयीचे पोस्ट या तिन्ही सुटसुटीत व सुंदर पोस्टमधे पुष्कळसे मुद्दे व या बीबीचे सार आलेले आहे!
आत्तापर्यंत आलेले सगळे मुद्दे
.
आत्तापर्यंत आलेले सगळे मुद्दे
आत्तापर्यंत आलेले सगळे मुद्दे छान आहेत. टोटली सहमत!
मला भावणारी आणखी एक गोष्ट user friendly/ intuitive design - मग ते कार्यालयीन प्रॉसेसेस मधलं असो, महामार्गांवरच्या एक्झिट्स चं असो, बिल्डिंग कोडमधलं असो किंवा वेबसाईट्स नॅव्हिगेशन मधलं असो. आणि एखादी गोष्ट user expectancy प्रमाणे नसेल (उदा. लेफ्ट एक्झिट) तर त्याविषयी युझर्स ना वारंवार केलेलं दिशादर्शन. त्यामुळे सुरूवातीच्या नवखेपणातून आलेलं बावचळलेपण संपलं कि इथल्या आयुष्याशी सरावणं सोपं होतं.
दुसरं म्हणजे माणसाच्या शब्दाची विश्वासार्हता. For the most part, you can trust people at their face value.
एकंदरीत आयुष्य सुखा-समाधानाचं आणि सोपं होतं.
इथल्या पोस्ट वाचून न जाता
इथल्या पोस्ट वाचून न जाता अमेरिकेच्या प्रेमात पडायला होईल असे वाटतेय
अपंग लोकांच्या सोयीबद्दल पण
अपंग लोकांच्या सोयीबद्दल पण लिहा कोणीतरी.
अमेरिकेतच नाही तर दुसऱ्या
अमेरिकेतच नाही तर दुसऱ्या कोणत्याही देशात राहायला गेलो की आपला जुना एका रंगाचा चष्मा काढूनच ठेवावा लागतो. ते केलं की काम सोपं होतं. नातेवाईक तिकडे आहेत आणि एकूण त्यांच्या अनुभवावरून सगळं छान आहे.
छान चर्चा, एकदम वाचनीय
छान चर्चा, एकदम वाचनीय चित्रदर्शी लिहिलंय सर्वांनी. पूर्वी अमेरिका वाचून समजायची, हल्ली अनेक vlogs बघितले जातात, त्यातूनही उमगत जाते.
मला तिथली शिस्त, नियम, भ्रष्टाचारमुक्त कारभार, रस्ते, निसर्ग, सुखसोयी या गोष्टी फार आवडतात. माणसे मात्र कमी दिसतात, गाड्या जास्त दिसतात.
काय छान लिहिताय सगळे. स्वाती2
काय छान लिहिताय सगळे. स्वाती2, मैत्रेयी, मुकुंद फार छान अनुभव लिहिताय.
लेख छान आहे. आवडला.
लेख छान आहे. आवडला.
प्रतिक्रियाही अनेक रिझोनेट झाल्या. पूर्वी भारतात असताना अमेरिका म्हणजे चकाचक, हाय टेक शहरे, उंच इमारती असे काहीतरी चित्र होते - इथले डाउनटाउन किंवा त्यातही बिझिनेस डिस्ट्रिक्ट - जेथे मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिसेस असतात तो भाग - यांचेच फोटो जास्त पाहिले असावेत. इथे आल्यावर खरे वैभव वेगळेच आहे हे हळुहळू जाणवू लागले. आता तर भारतात शहरातील इमारती अमेरिकेपेक्षा पॉश वाटतात. तुम्ही जर बंगलोरवरून सॅन फ्रान्सिस्कोला आलात व तेथील सबर्ब मधे गेलात तर पॉश एरियातून साध्या एरियात आलो आहोत असे आधी वाटेल. मात्र पुढे जसे राहाल तसे फरक जाणवू लागेल.
सार्वजनिक पोलाइटनेस, पर्सनल स्पेसचा कन्स्पेट, सर्वसाधारणपणे नियम पाळ्ण्याची वृत्ती, दुसर्याला पुढे जाऊ देणे - चालताना असो वा वाहनामधे, रांग असो वा नसो आपल्या आधी जो आलेला आहे त्याला आधी पुढे जाऊ देण्याची सवय - या सगळ्याची एकदा सवय लागली की इव्हन भारतात अॅडजस्ट व्हायला २-३ दिवस लागात. हे नुकतेच कोठेतरी लिहीले होते - मला इथल्या पब्लिक फेसिंग ऑफिसेसची पद्धत फार डिग्निफाइड वाटते - सरकारी कार्यालये, बँका, विमानतळे - सगळीकडे रांगेतील लोकांनी सरकत पुढे आल्यावर एका लाइनच्या अलीकडे थांबायचे. काउंटरवरची व्यक्ती मोकळी झाली की ती स्वत:हून बोलावते. मगच तेथे जायचे. एकदा काउंटरवर आपण गेलो की पलीकडची व्यक्ती तुम्हाला पूर्ण फोकस देते. पुलंच्या बिगरी ते मॅट्रिक मधल्या चार यत्ता एकाच वेळेस हाकणार्या दामले मास्तरांसारखे करत नाहीत.
बाकी व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, लायब्ररीज, गावागावांतील पब्लिक पार्क्स/फॅसिलिटीज ई सगळे तर आहेच.
इथे पब्लिक डेकॉरलाही खूप महत्त्व आहे. जागा सार्वजनिक असो वा खाजगी, ती बाहेरून अजागळ दिसू नये याकरता खूप नियम आहेत व लोकही त्याकरता खूप प्रयत्न करतात. सहसा कोठेही गोष्टी अस्ताव्यस्त दिसत नाहीत. सरकारी असो किंवा खाजगी, तेथील गाड्या, इक्विपमेण्ट्स, लाकडी फर्निचर्स, झाडांची रोपे कोणतेही सामान बाहेर असो, ते सहसा व्यवस्थिक लावलेले/रचून ठेवलेले असते. इव्हन खाजगी. घर जरी तुमच्या मालकीचे असेल तरी गावाच्या किंवा एचओए (साधारण आपल्या सोसायटीसारखे) च्या नियमांप्रमाणेच तुम्हाला त्याचे बाह्य रूप ठेवावे लागते. म्हणजे माझे घर आहे मी बाहेरून जांभळा रंग देईन असे चालत नाही. पुढे मागे यार्ड मधे रान माजले आहे असेही चालत नाही. अशा अजागळ गोष्टींना "आयसोअर" हा इथे खूप कॉमन शब्द आहे (क्लिंट इस्टवूडच्या एका पिक्चर मधे तो समोर आलेल्या एशियन कुटुंबातील पोरांना ते समजावतो व त्यांच्याकडून ते नीट करून घेतो तो सीन आठवला). गावे/शहरे सुंदर दिसण्यामागे हे ही एक कारण आहे.
इथे धूळ का नसते याचे कारण मला बरेच दिवस कळत नव्हते. इथे लूज माती ठेवली जात नाही. तुमचे अंगण असो किंवा कमर्शियल बिल्डिंगचा पुढचा भाग असो - तेथे "ग्राउण्ड कव्हर" करण्याची जबाबदारी मालकाची असते. म्हणजे तेथे गवत वाढून माती वाहून जाणार नाही अशी व्यवस्था करणे. रस्ता आणि साइडवॉक यातही गॅप नसते. बहुधा हेच कारण असावे.
धूळ नसते- मी जरा बारकाईनच
धूळ नसते- मी जरा बारकाईनच पाहिलं. जिथे माती असू शकते, तिथे तिथे लाकडाचे बारीक तुकडे आढळले. बहुदा घरं लाकडी, लाकूड कामातून उरलेला ऐवज सुक्या मातीवर पसरतात बहुदा. सो मातीवरची हा थर असतो. हळूहळू पाण्याने तो मातीवर चिटकून रहात असावा.
लेक रहात असलेल्या सोसायटीत तरी असे दिसलेले.
मुद्दा अतिशय पोरकट किंवा
मुद्दा अतिशय पोरकट किंवा फालतू वाटू शकतो पण मला रोजच्या आयुष्यात महत्वाचा वाटला -
कचरा उचलणारी गाडी नियमित वेळी येते आणि कचरा टाकण्याकरता आपल्याला पळापळ करावी लागत नाही. स्टॅंडर्ड बीन मधे ठेवलेला कचरा व्यवस्थित नेला जातो. भटकी जनावर येऊन तो रस्त्यावर उधळून टाकत नाही.
सुबत्ता, श्रीमंती, स्वच्छता,
सुबत्ता, श्रीमंती, स्वच्छता, मेहनत करण्याची तयारी, बागा, उद्याने या अश्या गोष्टी इतर संपन्न देशातही दिसतात. पण सामान्य माणसाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य, गुणवत्तेचा आदर, नियम पाळण्याची वृत्ती आणि भ्रष्टाचारामुळे त्रास न होणे. माझ्या मते याव्यतिरिक्त महत्त्वाचे म्हणजे चौकस बुद्धी आणि संशोधन करण्याची वृत्ती. अजून एक म्हणजे कुठल्याही गोष्टीचे मार्केटिंग करण्यात अमेरिकन्स उस्ताद आहेत, मला नाही वाटत की जगात दुसरे कुणी त्यांचा हात धरू शकेल. मार्केटिंग शिकायला अमेरिकेसारखा दुसरा देश नाही.
सामो. बघ मी म्हटले होते ना
सामो. बघ मी म्हटले होते ना माझ्या पहिल्याच प्रतिसादात की या विषयाचा आवाका फार मोट्ठा आहे म्हणुन? बघ कसे एक एक मस्त मुद्दे बाहेर येत आहेत प्रत्येकांकडुन!
पण सर्वप्रथम , ऋन्मेष तुझ्या कॉमेंट बद्दल. अरे मला नाही वाटत सामोचा हा बीबी उघडायचा हा हेतु आहे की हा बीबी वाचुन कोणी अमेरिकेच्या प्रेमात पडावे किंवा त्यासाठी अॅड्व्हर्टाइजमेंटसाठी हा बीबी आहे.किंबहुना मला असा वाटत की तिला जाणुन घ्यायच आहे की इथे ज्यांनी अमेरिकेत बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना तो निर्णय घेताना इथल्या कुठल्या गोष्टी आवडल्या. आम्ही इथले सगळे त्या आवडलेल्या गोष्टी इथे मांडत आहोत. त्याचा अर्थ असा काढु नकोस की इथे सगळेच आलबेल आहे व आम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम्स किंवा कॉन्सना सामोरे जावे लागत नाहीत किंवा ते दिसत नाहीत. आता या बीबीवरच बघ ना. जिज्ञासाने तिला अमेरिकेतले काय आवडले हे नमुद करताना हेही सागीतले की तिच्यासाठी इथले कॉन्स आउटवेड इथले प्रोज! आणी तिने परत जायचा निर्णय घेतला. टोटल रिस्पेक्ट जिज्ञासा तुझ्या त्या निर्णयाला! हे निर्णय हायली इंडिव्हिज्युअलाइज्ड असतात. त्यामुळे ऋन्मेष, या बीबीमुळे गैरसमज नसावा!
फेरफटका व फारएन्ड, फार छान व महत्वाचे मुद्दे तुम्ही लिहीलेत. फेरफटका, तुमच्या इथे एक “ सिस्टिम“ व सगळीकडे एक “ प्रॉसेस“ असल्याच्या मुद्द्याबाबत १००% सहमत! त्याबाबत माझे विचार व माझे अनुभव पुढच्या पोस्टमधे टाकतो.
छान मुद्दे सगळ्यांनी मांडलेत.
छान मुद्दे सगळ्यांनी मांडलेत.
माझे दोन पैसे -
1. कुठल्याही सणाला किंव्वा बारशाला /वाढदिवसाला लाऊड स्पीकर Che स्वर नसतात. कुठून दूरवरून ढोल ताशा चे सूर ऐकू येत नाहीत. हॉर्न नसतात शक्यतो. ध्वनी प्रदूषण नसतेच.
2. रस्ते वर कुणीतरी लिहिले आहेत. पण freeway, त्याचे exits हे पहिल्यांदा बघून चकित झालेले. सगळ्या रस्त्याच्या पाट्या पण व्यवस्थित दिसतात. आपल्याकडे पोस्टमन la पत्ते कसे सापडतात हा पुल चा प्रश्न नेहमी आठवतो.
3. Superbowl, ऑस्कर सारखे मेजर events ग्रँड पद्धतीने सादर करणे.
अहो मुकुंद कौतुकानेच म्हटले
अहो मुकुंद कौतुकानेच म्हटले होते ते की हे वाचून अमेरिकेच्या प्रेमात पडायला होईल
या आधी कधी अमेरीतील घडामोडी, राजकारण, तिथे जाणाऱ्या राहणाऱ्यांनी मागितलेले सल्ले, माहिती हवी आहे वगैरे धागे कधी वाचले नव्हते. कारण आपला काय संबंध त्याच्याशी असा विचार करायचो. पण पहिल्यांदा एखादा अमेरिकेचा धागा इतका मन लाऊन आणि पूर्ण वाचला आहे. तेही गणपतीत जेव्हा मायबोलीवर वाचायला इतके सारे असताना देखील हे वाचतोय हे विशेष. तर अजूनही माझ्यासारखे बरेच जण वाचत असतील. छान लिहिता आहात तुम्ही सारे. लिहीत राहा..
अमेरिकेतील वाहतुकीचा विषयी
अमेरिकेतील वाहतुकीचा विषयी इथे आल्यानंतर वाटवलेले आश्चर्य, कौतुक त्याची (अल्पमतीने केलेली) कारण मीमांसा तसेच जाता जाता न राहवून भारतीय ( त्यातही मुंबई/ठणा ) रहदारी शी केलेली तुलना..
https://www.maayboli.com/node/85702
अमेरिकेतील वाचनालये आणि वाचन संस्कृती
Mala आलेले अनुभव आणि त्यावरील टिपण्णी/ विचार/ :
वाचनालयाची तर मी शतश: ऋणी आहे. नवीन देशात, संस्कृतीत एक पालक म्हणून मुलांसाठी आणि व्यक्तिशः स्वतः ला भरभरून दिलंय यांनी..
फा, चामुंडराय, फेफ, रायगड,
फा, चामुंडराय, फेफ, रायगड, शर्मिला व छंदीफंदी नवीन प्रतिसादकांचे स्वागत आणि आभार. मग लिहीते.
स्वाती ताई, मैत्रेयी आणि बाकी
स्वाती ताई, मैत्रेयी आणि बाकी सर्वांनी मांडलेले नवीन मुद्दे आवडले!
भारताची आणि अमेरिकेची तुलना मनात होतेच पण तशी करणं योग्य नाही हे ही जाणवतं.
मी गेली दोन वर्षे नेदरलॅंडला रहाते आहे. नेदरलॅंडला रहावे असे काही मनात नव्हते पण life happened and I am here now! माझ्या मनात अमेरिका आणि नेदरलॅंडची तुलना बऱ्याच वेळा होते. ज्या गोष्टी मला एक विकसित देश म्हणून अमेरिकेत राहताना आवडल्या नव्हत्या त्या गोष्टी इथे निश्चितच चांगल्या पद्धतीने राबवलेल्या दिसतात. पण तरीही व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत there is nothing like America! तिथे असलेल्या स्वातंत्र्याला खरोखरच तुलना नाही - विशेषतः for PoCs like us. ते मला इथे वाटत नाही. Kudos to America for that!
छन्दिफन्दि, इथल्या
छन्दिफन्दि, इथल्या वाचनालयांबद्दलचा उत्तम लेख! माझ्या वाचनातुन हा लेख कसा बर सुटला? खुप उत्तम व डिटेल्ड् माहीती दिली आहेत तुम्ही इथल्या सार्वजनिक वाचनालयांची! सगळ्यांनी जरुर वाचा! इथल्या विषयाला धरुन आहे म्हणुन तिथे दिलेल्या प्रतिसादाची कॉपी या बीबीवरही चिकटवतो.
या अश्या लोकल लायब्ररीजचे फंडींग तुमच्या घराचा जो प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही तुमच्या काऊंर्टीला भरता त्यातुन येते. त्यात स्टेट व फेडरल गव्हरमेंटही थोडी भर घालते. अपारट्मेंट मधे राहात असाल तर ही सेवा मोफत असते.
तुमच्याशी व अमितशी १००% सहमत. माझाही मुलगा वय ३ महिन्यांपासुन ते आतापर्यंत लायब्ररीचा उपभोग घेत आहे! इथे बहुतेक लायब्ररीमधे स्टोरी टाइम फॉर बेबीज( वय अप टु २ वर्षे), व स्टोरी टाइम फॉर टॉडलर्स ( वय २ वर्षे ते ५ ) असा २०-३० मिनिटांचा प्रोग्राम असतो. त्याच्यात लायब्ररीचा स्टाफ बच्चे कंपनींना ग्रुप स्टोरी रिडींग करतात व ग्रुप नर्सरी र्हाइम्स म्हणुन दाखवतात. त्यातले ग्रुप रिडींग करणारे बहुतेक वेळा वय वर्षे ६५ नंतर रिटायर झालेल्या व्रुद्ध बायका लायब्ररीमधे व्हॉलंटीअरींग करणार्या असायच्या.
त्यातले
The more we read together,
together, together
The more we read together,
the happier we’ll be.
Read big books and small books
and short books and tall books
The more we read together,
the happier we’ll be.
हे गाणे तर माझ्या डोक्यात चालीसकट आजही आहे!
या अश्या लोकल सार्वजनिक लायब्ररीजच्या २०-३० ब्रँचेस एका एका शहरात असतात हे विशेष! आणी प्रत्येक ब्रँच तितकीच सुसज्ज ! तुम्ही तुमच्या घराच्या जवळची लायब्ररी तुमच्या सोयिनुसार निवडायची! असामी म्हणतो त्याप्रमाणे त्या ब्रँच मधे तुम्हाला हवे असलेले पुस्तक, गाण्यांची/ म्युझिकची सीडी किंवा मुव्हीची डिव्हीडी नसेल तर शहरातल्या दुसर्या इतर ब्रँच मधुन तेच आणुन देतात. तेवढच नाही, शहरातल्या इतर लायब्ररीमधे ते अव्हेलेबल नसेल तर दुसर्या शहरातल्या लायब्ररीज मधुन. तिथेहीनसेल तर तुमच्या राज्यातल्या इतर लायब्ररीमधुन आणी तुमच्या राज्यातही मिळत नसेल तर सबंध अमेरिकेत जिथल्या लायब्ररीत ते अव्हेलेबल असेल तिथुन ते तुम्हाला हवे असलेले पुस्तक/ गाण्यांची/ म्युझिकची सीडी/ मुव्हीची डिव्हीडी विनामुल्य आणुन द्यायचा प्रयत्न करतात! आणी विकु म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या लोकल लायब्ररीच्या लायब्ररीमनच्या चेहर्यावर त्यांच्याकडे ते पुस्तक, सीडी किंवा डिव्हीडी नाही म्हणुन दिलगीरी असते व ते दिलगिरी व्यक्त करतात की त्यांच्याकडे ते अव्हेलेबल नाही म्हणुन!
आता बोला! आहे की नाही हे कुठल्याही समाजाच्या/ देशाच्या वैभवाचे प्रतिक?
काय सुंदर प्रोग्रॅम आहे इथल्या लायब्ररीमधे हा.
माझ्या अमेरिकेत कायमचे राहायच्या निर्णय घेण्यात अनेक गोष्टी कारणीभुत होत्या पण माझ्यासारख्या वाचनाची प्रचंड आवड असणार्या पुस्तकप्रेमी माणसाला अमेरिकेच्या वैभवाचा हा एक पैलु अमेरिकेत कायमचे राहायचे की नाही हे ठरवायला खर म्हणजे पुरेसा होता! आय वॉज सोल्ड!
अपंगांना अमेरिकेत लाईफ आहे,
अपंगांना अमेरिकेत लाईफ आहे, भविष्य आहे. अॅक्सेसिबल इमारती, डिजिटल अॅक्सेसिबिलिटी याविषयी सरकार कायदे करते. त्यामुळे जागरुकता तर येतेच पण या सुविधा कंपल्सरी केलेल्या आहेत. त्याकरता खूप डॉक्युमेन्टेशन आहे, इम्प्लिमेन्ट करण्याकरखत, सरकार रिसोर्सेस खर्च करते. यातून अपंगांना आयुष्य मिळते. किती अॅकमोडेट करतात इथे. सर्व प्रकारचे वैविध्य जोपासले जाते, आदर केला जातो. मग ते सेक्श्युअल असो, रेशिअल की डिसेबिलिटी (अपंगत्व, पागळेपणा) असो.
उबोंचा मुद्दा इतका बरोबर आहे - ' गुणवत्तेचा आदर/कदर' - होय आणि होयच!
>>>>सामो. बघ मी म्हटले होते ना माझ्या पहिल्याच प्रतिसादात की या विषयाचा आवाका फार मोट्ठा आहे
अगदी खरे आहे.
प्रत्येक इमारतीला असलेला
प्रत्येक इमारतीला असलेला युनिक नंबर आणि पत्ता. अंतर्गत रोड ची नंबर सिस्टिम. चौकात सिग्नल ला ट्रॅफिक होऊ नये म्हणून असलेल्या एक्स्ट्रा लेन्स. अर्थात त्या सन फ्रान्सिस्को किंवा न्यू यॉर्क मध्ये नाही पण बाकी बहुधा आहेत. छोट्या छोट्या अगणित गोष्टी आहेत.
विकसित आणि विकसनशील मधला फरक फार मोठा आहे.
अमेरिकेच्या वैभवाचा मुद्दा
अमेरिकेच्या वैभवाचा मुद्दा निघाला तर इथे मिळणारं व्यक्तिस्वातंत्र्य, संधी इ. मुबलक असल्या तरिहि त्यांची उपलब्धता व्यक्तिसापेक्ष असु शकते. याकारणामुळे काहिंकरता ते वैभव होउ शकत नाहि. वर काहि आउटलायर्सची उदाहरणं आलेली आहेत..
माझ्या मते हुवर डॅम, इंटरस्टेट सिस्टम, स्टॅच्यु ऑफ लिबर्टि, माउंट रश्मोर, इ. मॅनमेड मान्युमेंट्स हि खरी वैभवाची लक्षणं आहेत. हुवर डॅम्सारखं एंजिनियरिंग मार्वल, त्या बांधकामात केलेली निसर्गावर मात; स्टॅचु ऑफ लिबर्टिच्या उभारणी/असेंब्लिकरता यँकिजनी मोबलाय्ज केलेलं फंडिंग इ. अनेक घटना पुढच्या पिढिकरता प्रेरणादायी ठरल्या आहेत. या व्यतिरिक्त अमेरिकेला लाभलेले नेते (लिंकन, रोझवेल्ट, आय्झेन्हॉवर, रेगन) इंडर्ट्रियलिस्ट (वँडरबिल्ट, कार्नेगी, रॉकफेलर, वेस्टिंगहौस, फोर्ड) यांचा अमेरिकेला सुपर्पॉवर करण्यात सिंहाचा वाटा असल्याने तेहि या वैभवाचे मानकरी आहेत...
>>जिथे माती असू शकते, तिथे
>>जिथे माती असू शकते, तिथे तिथे लाकडाचे बारीक तुकडे आढळले.<<
मल्च म्हणतात त्याला. मल्च व्यतितिक्त पाइन स्ट्रॉज देखील ग्राउंड कवर करता वापरले जातात. हे एक अॅन्युअल रिच्युअल आहे, एचओएचं लवलेटर टाळण्याकरता करावं लागतं...
>>जिथे माती असू शकते, तिथे
डपो
हे गाणे तर माझ्या डोक्यात
हे गाणे तर माझ्या डोक्यात चालीसकट आजही आहे! >>> मुकुंद, "वी विश यू (उच्चारी विश्श्यू) अ मेरी ख्रिसमस" ची चाल का?
तीच आठवली पहिल्यांदा 
जिज्ञासा - ही स्वातंत्र्ये नेदरलॅण्डमधेही तितक्याच प्रमाणात असतील असा माझा समज होता. इन जनरल पश्चिम युरोपात. तसे नाही का? बाय द वे पीओसी म्हणजे पीपल ऑफ कलर का?
प्रत्येक इमारतीला असलेला युनिक नंबर आणि पत्ता >> याबद्दल एक नवीन माहिती मधे मिळाली. शक्यतो रस्त्याच्या उत्तरेला व पूर्वेला असलेल्या घरांचे नंबर्स हे "सम" असतात व दक्षिण किंवा पश्चिमेला असलेल्या घरांचे "विषम" (इथे अजून माहिती आहे). कधी रस्ता अगदीच तिरपा असेल तर काय करतात माहीत नाही. तसेच तुम्ही रस्त्याच्या एका बाजूला (एका एण्डला) उभे राहिलात आणि ज्या दिशेला तोंड करून उभे आहात तिकडे हे नंबर्स तुमच्याकडून पुढे वाढत जात असतील, तर नेहमी तुमच्या डाव्या बाजूला विषम व उजव्या बाजूला सम असतात.
फारएण्ड, नाही त्या चालीवर
फारएण्ड, नाही त्या चालीवर नाही . ही यु ट्युब वरची लिंक बघ त्यासाठी
https://youtu.be/GWJ5wyLNH_c?feature=shared
अरे घराच्या नंबरची सिस्टिम मला माहीत नव्हती पण बाहेर आमच्या नेबरबुड मधे जाउन आमच्या घराच्या नंबरशी पडताळुन बघीतले तर खरे आहे!
राज , तु त्या इंडस्ट्रिअलिस्टची नावे इथे नमुद करुन अजुन एक पँडोराज बॉक्स ओपन केलास! त्याबद्दल सविस्तर लिहायला पाहीजे होतेस! त्यावर पुढे कधीतरी. आज दुपारी रिच अमेरिकन स्पोर्ट्स कल्चरवर लिहायचे मनात आहे.
(कोणाला हॉलीवुडने जगाला दिलेले एपिक मुव्हिज , अॅक्टर्स, डिरेक्टर्स व अनेक अमेझिंग अमेरिकन टीव्ही सिट कॉम/ कॉमेडीज( आय लव्ह ल्युसी पासुन ते थ्रिज कंपनी, चिअर्स, फॅमिली टाइज, साइन्फिल्ड, फ्रेंड्स, बिग बँग थिअरी, जॉनी कार्सन, जे लेनो, डेव्हिड लेटरमन, सॅटरडे नाइट लाइव्ह, जॉन स्टुअर्ट, स्टिव्हन कोबेअर्,जिमी फॅलन, जिमी किमेल वगैरे) ची रिच व अमेझिंग ट्रॅडिशन आवडते का व ती इथे आवडलेल्या गोष्टीत नमुद केलेले प्रस्तुत वाटते का? आणी वाटत असेल तर कोणीतरी फारएन्ड किंवा इतर मुव्ही/ सिटकॉम प्रेमींनी त्याचा आढावा व तश्या सिटकॉम व कॉमेडिअन्सचे अमेरिकन कल्चरमधले जे अविभाज्य स्थान आहे त्याचा आढावा घेतलेला आवडेल
)
धागा काय सुंदर ब्लॉसम होतोय.
धागा काय सुंदर ब्लॉसम होतोय. सर्वांचेच आभार. प्लीज लिहा. खूप आवडतय वाचायला. किती उत्कटतेने लिहीताय.
फा, PoC म्हणजे person of
फा, होय, PoC म्हणजे person of color. स्वातंत्र्य निश्चित आहे पण इथे भारतीय इतक्या प्रमाणात दिसत नाहीत आणि भाषा वेगळी आहे. या दोन्हीमुळे इथल्या समाजात इतक्या पटकन मिसळणे घडत नाही. अमेरिका ही बाहेरुन आलेल्या लोकांनीच वसवली आहे आणि मूळ निवासी आता बहुसंख्य नाहीत त्यामुळे स्थानिक आणि बाहेरचे असा भेद करणे कमी होते.
युरोपात प्रत्येक देशाची संस्कृती, इतिहास, भाषा यांचे ताणेबाणे आहेत. त्यांनी केलेल्या वसाहतवादाची ओझी आहेत. भाषेचा अभिमान आहे. हे सगळं सुरूवातीला झेपत नाही. या सुरूवातीच्या संघर्षात असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे आकलन व्हायला वेळ लागतो बराच. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
अमेरिकेत मात्र आल्या दिवसापासून तुम्ही रूळता. Ease of doing things, no language barrier, and the knowledge of the American pop culture helps you integrate much quicker and with ease.
Pages