चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फिर हसीना ... पाहिला कालच. फारच ढोबळ चुका आहेत. काही काही सीन्स उगाचच ताणलेत . जीमी शेरगील चा entry scene चांगला आहे पण नंतर त्याच character build up होत नाही. सनी कौशल आवडला. विक्रांत मेसी भारी वाटतो .
मध्ये मध्ये येणारी गाणी पण मला आवडली.
एकंदरीत अगदीच टाकाऊ नाही one time watch वाटला.

>>सावी हा असाच भुषण कुमारने आपल्या बायकोच्या प्रेमासाठी काढलेला आणि अनिल कपूरच्या खांद्यावरून वाहिलेला सिनेमा आहे.

असू द्या हो! आपण ममव माणसे बायकोच्या प्रेमासाठी पु ना गाडगीळ वा आठवले आणी शहाडे च्या पलिकडे जात नाही. काही लोक बायकोच्या प्रेमाखातर शंभर दीडशे कोटींचा सिनेमा बनवतात. व्यक्ती तितक्या प्रकृती !

तुमच्या यादीत ताजमहाल पण घ्या विकु.
मला तर कल्पनाही नाही- कोणता सिनेमा , कोणाची बायको, कोण वाहतोय-मधेमधे करतेय. Lol

सनी कौशल विकीचा कमी नवाजुद्दीनचा भाऊ वाटतो>> Lol यामी गौतम सोबत हायजॅकमधे होता. लक्षात राहण्यासारखा नाही. उग्र वाटतो.

हसिन दिलबुरा Wink पहिल्या भागात पण जाम गूफ अप्स होते. मेलेल्याचा डीएने वगैरे.

दुसरा पण बघण्याची इच्छा आहे. १ टाईम वॉच नक्कीच असेल विक्रांत & तापसी मुळे.
रेल्वे वर मिळणारे मसालेदार थ्रिलर पुस्तक Wink

काकुडा पाहिला
ठीकठाक चित्रपट
स्त्री सारखे हॉरर कॉमेडी करण्याचा प्रयत्न
रितेश मुळे सुसह्य

तुंबाड पाहिला
फार भारी वाटला
हाव = greed ची गोष्ट

स्त्री मधला त्रिपाठीचा डायलॉग भारी आहे.
वो स्त्री है पुरुषोंकी तरह जबरदस्ती नही करती Lol आणि त्याची डायलॉग म्हणण्याची स्टाईल.. अजूनच हहपुवा..

सावी आणि हसीन दिलरूबा २ दोन्ही पाहिले.
दोन्ही अचाट आणी अ तर्क्य कॅटेगरी. तापसीला एवढे रिव्हिलिंग ब्लाऊज का दिले आहेत? गावाच्या वातावरणात एकदम मिसमॅच वाटलेत.
आणि ब्युटी पार्लरवाली हून डायरेक्ट शिक्षिका होते का नंतर ती? फक्त त्या २-४ ओळी अचानक वाचता याव्या गृहपाठ वहीतून म्हणून कि सेटल लाईफ झालेलं दाखवायचं म्हणून..

काल इंडियन-२ पहायला घेतला होता. तासाभरातच आपली चूक झाली आहे हे उमजून बंद केला. सुरूवातीला जवळपास पंचवीसेक मिनीटं फक्त अन्याय, फ्रॉड, आत्महत्या असंच काय काय दाखवलं आहे. थोड्या वेळाने मला चेन्नई हे एक भयंकर ( आणि अस्वच्छ ) शहर असून इथे दर सेकंदाला एखादा गुन्हा घडत असावा असं वाटायला लागलं. हिरो आणि त्याचे मित्र सोमिवर आपल्या चॅनल थ्रू या अन्यायाला सो कॉल्ड वाचा फोडत असतात. ज्याचा कोणावर आणि कशावरच परिणाम होत नसतो. म्हणून मग सेनापथीचा धावा करतात. मग एक्दम सेनापथीची एंट्री. तो ताइपेला बसून डायरेक्ट निवारण कार्यच चालू करतो. इतकी विस्कळीत मांडणी होती सगळ्याची की मन मुळीच एंगेज झालं नाही. नाही म्हणायला गुलशन ग्रोव्हर आहे थोड्या वेळासाठी. त्याचाच काय तो सुखद वावर. २ गाणी ऐकली. दोन्ही सुमार वाटली. सेनापथी उद्धारासाठी येणार हे कळल्यावर जो काही धांगडधिंगा दाखवला आहे ते पाहून सेनापथी आधी यांना शिक्षा करेल असं वाटलं.

सेनापथी उद्धारासाठी येणार हे कळल्यावर जो काही धांगडधिंगा दाखवला आहे ते पाहून सेनापथी आधी यांना शिक्षा करेल असं वाटलं. >>> Lol

रिकॅप करायला पहिला इंण्डियन बघायचा होता पण नेफिवर तो हिंदीत नाही. डब्ड व्हर्जन्स येत आहेत म्हणे. म्हणजे त्या जुन्याची डब्ड व्हर्जन येणार की तो हिंदीतील "हिंदुस्तानी" येणार माहीत नाही.

भयंकर परीक्षण Happy
इंडियन 2 बघू नये असं अंतःप्रेरणा सांगते आहेच.जरा नॉस्टॅल्जिया म्हणून इंडियन1 उर्फ हिंदुस्थानीच परत बघून टाकावा.

इंडियन 2 बघू नये असं अंतःप्रेरणा सांगते आहेच>> सेम हियर. मला तर कल्की पण बघू नये असेच वाटत होते.. रिव्ह्यु वाचून बरेच वाटले.

डायरेक्ट शंकरचा सिनेमा आहे का हा, अशी शंका घ्यायला लावणारा इंडियन-२... अतिबोअर, भयंकर बोअर, तरीही अर्धा झाला बघून, पुढे पण बघतेच आहे...
जवान,मेर्सल, अपरिचित सगळ्यांची खिचडी आहे सिनेमात..
थांबा पूर्ण बघून झाल्यावर लिहिते नीट.

जवान,मेर्सल, अपरिचित सगळ्यांची खिचडी आहे सिनेमात..
>>
+ विक्रम हिटलिस्ट / जेलर पण असेल

मेर्सल >> उच्चार मार्शल

Spelling : Mersal
उच्चार - मेर्सल च.

विक्रम हिटलिस्ट / जेलर पण असेल>>>> पूर्ण बघून झाल्यावर लिहिते ना हे पण Lol

सगळ्यांची खिचडी आहे सिनेमात >>> +१ माणसं मरतात म्हणजे अगदी डिटेलवारी फुटून वगैरे मरतात यात. इंडियन२ आहे की Final Destination असं वाटायला लागलं होतं मला.

थांबा पूर्ण बघून झाल्यावर लिहिते नीट >>> थँक्यू मृणाली! प्लीज लिही. माझ्यात तो पूर्ण पहायचा अजिबात पेशन्स नाही

यूट्यूबवर 'ऐतबार' थोडा बघितला. प्रिंट खास नव्हती, त्यामुळे बंद केला.

'किसी नजर को तेरा' गाण्यात एक कडवं झाल्यावर तो बहनो और भाईयोंना सांगतो, बरसो पहले इस गझल में एक और आवाज जुडी थी... आणि डिंपलकडे माईक देतो. ती गायला लागते - 'वो प्यार जिस के लिए हम ने छोड दी दुनिया, वफा की राह में घायल वो प्यार आज भी है' ....

तर प्रश्न असा आहे, की बरसों पहले ते दोघं छान प्रेमात असताना ती या दु:खी, निगेटिव्ह ओळी का गायली असेल?
: जुदाईतला परेश रावल स्मायली:

उच्चार - मेर्सल च
>>
टीम मधले समस्त तमिळ जन मार्शल म्हणत होते...
म्हणुन मला वाटलं की तसंच असेल

बरसों पहले ते दोघं छान प्रेमात असताना ती या दु:खी, निगेटिव्ह ओळी का गायली असेल >>
सध्या नसतील..
त्या वेळी तिनी काही तरी वेगळं गायलं असेल

त्या वेळी तिनी काही तरी वेगळं गायलं असेल>>> +१ आयत्या वेळचं अ‍ॅडीशन आहे ते, अगदी चपखल ओळी असतात त्या तिच्या सद्ध्या वाल्या परिस्थिती ला.

गब्बर सिंगचा ओरिजिनल काल पाहिला.
मुंगळा , सर्वांचं विकट हास्य, रासवटपणा, डोळ्यातली ती झाक..
फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर.

Pages