"माय बॉडी, माय चॉईस "

Submitted by Revati1980 on 2 February, 2024 - 06:31

तुमच्या घरातली तारुण्यात पदार्पण केलेली मुलगी "मेरा अब्दुल" वगैरे म्हणते आहे का याकडे लक्ष ठेवा. ती किंवा अगदी जवळच्या नात्यातली एखादी षोडश वर्षीय बालिका अचानकच शाह रुक्ष खान, सॉलोमन खान किंवा हम्मीर खान यांचे सिनेमे आवडीने बींज वॉच करते आहे किंवा सुअव्वर फारुकी बिग बॉस मधून विनर झाला त्याबद्दल त्याचे तोंड भरभरून कौतुक करते आहे किंवा ती सारखे "माय बॉडी, माय चॉईस "अशी घोकंपट्टी करणारी पिदीका षट्कोन तिचा आदर्श आहे असे सांगत असेल तर ती लव्ह जिहादची शिकार होत आहे असे समजा. तसे असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी तिच्या आवडीचे अगदी मनापासून समर्थन करा. ती मेरा अब्दुल सारख्या सुंदर अशा जीवन साथीची निवड करणार आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन करा आणि भरभरून कौतुक करा. होय. मुलगी प्रौढ आहे. तुम्ही तिला तिच्या आवडीचे लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, म्हणून तिला साथ द्या.

नवीन धर्माच्या वातावरणानुसार तिला संस्कार देणे ही आई वडील म्हणून तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर तिचे सर्व आधुनिक कपडे वॉर्डरोबमधून काढून टाकून बोहारणीला द्या. तिच्या वॉर्डरोब मध्ये आता हिजाब आणि बुरखा ठेवा. जमल्यास कुराणाची एक प्रत आणून ठेवा. ती घराबाहेर पडताना संपूर्ण शरीरासह चेहरा झाकण्याच्या सक्त सूचना द्या. तिने घराबाहेर एकटी जाऊ नये, पुरुषांशी बोलू नये, नाटक, चित्रपट वगैरे पाहायला जाऊ नये आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करावी या सूचना देखील तिला देऊन ठेवा. मेरा अब्दुल तिला तीन सवत्या आणू शकतो हे ही सांगून ठेवा. कदाचित सवतीचे मूल वाढवावे लागेल याचीही मानसिक तयारी तिच्याकडून करून घ्या. रोज तिला मटन मार्केट मध्ये चक्कर मारायला सांगा. कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला सांगा.

तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या होणाऱ्या धर्माच्या चालीरीती आणि परंपरा शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही ना? बस्स... वर्ष सहा महिने तोंड बंद ठेवून आवाज न करता हे सगळं केलंत तर... सहा महिन्यांनंतर तुम्ही नक्कीच स्वतःला एक "यशस्वी" पालक म्हणवून घेऊ शकाल.

माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही वरील सर्व Screenshot_2024-02-02-21-57-35-23_0b2fce7a16bf2b728d6ffa28c8d60efb.jpgनियमांचे काटेकोरपणे पालन करा.

......................................

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लव्ह जिहाद हा प्रकार खरा की खोटा माहीत नाही पण या हिंदू मुस्लिम आंतरधर्मीय विवाहात फसतात हिंदू मुली जर मुलाने लग्नानंतर आपल्या धर्माची बंधने मुलीवर लादली तर...
तसे न झाल्यास प्रेमाला नेहमीच सपोर्ट.

प्रेम करा पण डोळे उघडे ठेवून..
प्रेम वेडे असावे.. आंधळे नसावे..

रोज तिला मटन मार्केट मध्ये चक्कर मारायला सांगा. कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला सांगा.## हायला,फकस्त मुसलमान मटण आणि कोंबडी खातात हे ठाऊक नव्हतं Proud

माझ्या कॉलेजमधल्या एका बौद्धधर्मिय मुलिने (मूळ गाव वर्धा) मुस्लिम युवकाशी लग्न केले आहे. सुरुवातील तिच्या घरुन थोडा विरोध झाला, पण नन्तर ते तयार झाले. लग्न मुस्लिम पद्धतीने झाले.
सुरुवातीला सर्व छान चालले होते, पण आता तिला सर्व जातीवरुन हिणवत आहेत, ती मुस्लिम झाली आहे, पण तिच्या घरच्यान्नीही धर्म बदलावा म्हणून आता मारझोड होत आहे.

नवरा सौदीला चालला आहे आणि आता हिला बाळ होत नाही म्हणून दुसर्‍या लग्नाचा घाट घातलाय.

माझी 18 वर्षाची भाची अनिओगासिओ असं काहीतरी म्हणत असते. अचानक केड्रामा आवडीने बींज वॉच करते किंवा ली मिन हो च भरभरून कौतुक करते किंवा ती सारखे "सरंगई , गमसमनीदा "अशी घोकंपट्टी करत असते. तिच्या वार्डरोब मध्ये आता वूलन क्रॉप टॉप्स , हायवेस्ट प्यांट्स आहेत. घरात चॉपस्टिक्स आणून ठेवल्या आहेत. घराबाहेर पडताना इवलीशी handpurse आणि भला मोठा गॉगल लावते. चॉपस्टीकने भात कसा खातात याचे युट्युब व्हिडिओ बघत असते. दिवसातून दोन वेळा 10 step skin care कशी करावी याची तिला कल्पना आहे.

एकंदरीतच परिस्थिती चिंताजनक आहे खरी.

स्वस्ति, ऋन्मेष - खरंच हाताबाहेर गेलीय परिस्थिती तुमच्याकडे… नीट वॉच ठेवण्यासाठी आता तुम्हीच कोरिअन शिका बरं.

प्रथम म्हात्रे,
धर्म कुठलाही असो, जगाची संस्कृती पुरुष प्रधान आहे.
लग्नानंतर मुलीचे घर आणि आयुष्य बदलते. मुलाचे नाही.
भले प्रेम कितीही का असेना पण जर मुलगा आपली जात आणि आपला धर्म कवटाळून बसणारा असेल तर मुलीने असे लग्न टाळलेलेच उत्तम.
अन्यथा असे होणे स्वाभाविकच आहे.
आणि हो, याची कल्पना येते लग्नाआधीच. फक्त डोळे आणि डोके उघडे हवे.
इथे मुलाचा आणि मुलीचा धर्म कुठलाही असो.. सर्वप्रकारच्या आंतरधर्मीय लग्नाला हे लागू! फक्त दोघांच्या जाती धर्मातील प्रथा परंपरेतील फरक जितका जास्त तितकी मुलीची फरफट.

नीट वॉच ठेवण्यासाठी आता तुम्हीच कोरिअन शिका बरं.
>>>>>>>

इथे इंग्लिशची बोंब.. कोरियन कुठे शिकायची आता Sad
माझी मायबाप मायबोलीच आहे.. इथेच धागा काढावा लागेल.

तिचे नाक कोरियन स्पेक्स नुसार आहे ना? अन्यथा प्लॅस्टिक सर्जरी करून घ्या लगेच. नाहीतर कोरियात चांगले जॉब्स, प्रोमोशन मिळणे अवघड होईल.

सेन्सिटिव्ह विषय आहे. मात्र हा धागा हा कसा अन्यायी व असहिष्णु आहे हे सांगत आपली सहिष्णुता दाखवायच्या चढाओढीत भाग घेणार नाहीये.

घाणेरडे लिखाण.
Submitted by कॉमी on 2 February, 2024 - 17:33

कॉमी महोदय, यात नेमके काय घाणेरडे वाटले आपणास? मला तरी यात घाणेरडे काहीही वाटले नाही. धागाकर्तीने आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुलीची मानसिक तयारी कशी करून घ्यावी हे सांगितले आहे.

हायला,फकस्त मुसलमान मटण आणि कोंबडी खातात हे ठाऊक नव्हतं
Submitted by भ्रमर on 2 February, 2024 - 20:33
फक्त मुसलमान मटण आणि कोंबडी खातात असे धागाकर्तीने कोठेही म्हटलेले नाही. धागाकर्तीने 'मटन मार्केट मध्ये चक्कर मारायला, कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला' यासाठी सांगितले आहे कारण हिंदू खाटीक आणि मुस्लीम कसाई यांच्या प्राणी मारण्याच्या पद्धतीत फरक आहे. हिंदू खाटीक एकाच घावात प्राण्याची मान धडावेगळी करतात. या पद्धतीत तुलनेने लवकर जीव शांत होतो. या पद्धतीने प्राणी मारून मिळालेल्या मांसाला 'झटका' मांस म्हणतात जे हिंदू व शीख लोक खातात तर मुस्लीम खाटीक प्राण्याला एका झटक्यात न मारता त्याच्या मानेवर सुरा फिरवून प्राण्याची नस कापतात व सारे रक्त वाहून जाऊ देतात, कारण इस्लाममधील मान्यतेनुसार प्राण्याचे मांस 'हलाल' (acceptable) असते तर रक्त मात्र 'हराम' (non-acceptable) असते. अर्थात संपूर्ण शरीरातील रक्त वाहून जाईपर्यंत प्राणी जिवंत तर असतो पण आत्यंतिक वेदनेने तडफडत असतो. या साहजिक या पद्धतीत जीव जायला (शांत व्हायला) बराच वेळ लागतो. या पद्धतीने प्राणी मारून मिळालेल्या मांसाला 'हलाल' मांस म्हणतात, जे मुस्लीम लोक खातात. आणि मुस्लीम लोक या बाबतीत कट्टर असतात. म्हणजे ते मांस खायचे असले तर हलालच खाणार, झटका मांस कधीही खाणार नाहीत. बहुतांशी हिंदूंना मात्र हलाल - झटका या संकल्पनाच माहीत नसल्याने तसेच दुर्दैवाने आता या व्यवसायात मुस्लीम कसाई मोठ्या संख्येने असल्याने मिळेल ते (अर्थात हलाल) मांस खातात.
शिवाय मुलीला या गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास सांगण्यामागे अजून एक उद्देश असू शकतो. बकरी ईदच्या आधी महिनाभर अनेक मुस्लीम कुटुंबे बकरा विकत आणून त्याला खाऊ-पिऊ घालून धष्टपुष्ट करतात आणि मग बकरी ईदच्या सणाच्या दिवशी सोसायटीत एखाद्या ठिकाणी ताडपत्रीचा वगैरे आडोसा करून तिथे त्या बकऱ्याची 'कुर्बानी' देतात (मारतात). जर मुलीला हे सगळे पाहण्याची सवय नसेल तर बकरी ईदच्या दिवशी असे रक्त वगैरे पाहून तिला भोवळ आली तर ऐन सणाच्या दिवशी घरातील स्वयंपाकाचे नियोजन बिघडू शकते.

अवांतर - अंधेरी प. मध्ये जयप्रकाश मार्गावर मनीष नगर जवळ (मेट्रो कारशेडच्या समोर) चारबंगला गुरुद्वारा आहे. त्याच्या शेजारच्या इमारतीत 'पंजाब मराठा' नावाचे दुकान आहे जेथे १००% झटका मांस मिळते. (किंमत वगैरे माहित नाही, कारण मी शुद्ध शाकाहारी आहे!)

कारण मी शुद्ध शाकाहारी आहे
>>>>

हॅट्स ऑफ डूड!!

शाकाहारी असून हलाल झटका मांस भक्षणाबद्दल इतकी माहिती ठेवता आणि शेअर सुद्धा करता.

मी लहानपणापासून चिकन मटण खात आलेलो आहे, पण मलाही वि_मु यांच्याइतकी माहिती नव्हती. बाकी हलाल असो वा झटका, चिकन मटण तितकेच खुमासदार लागते हे खरे. नसत्या उचापती हव्यात कशाला?

रूनमेश,

तुझा वरचा एक प्रतिसाद लिहिण्याची स्टाईल सेम टु सेम हेमंत सारखी वाटली.

आमचे एक नातेवाईक म्हणतात, प्रेम आंधळ असत, पण लग्न हा डोळे उघडायचा मार्ग आहे. Lol

Actually, दोन्ही मुलामुलींनी जात/धर्म सेम असला तरी किंवा वेगळं असलं तरी 1 वर्ष हे ट्राय करायला हरकत नाही. It's a good test to see if u would fit.
दोन्ही घरातला extreme चक्रमपणा/परंपरा पाळण (ण वर टिंब) शक्य नसेल तर बेक ऑफ करायचा ऑप्शन राहील.

प्रत्येक लग्नाळूनी अवलंबल तर त्यांना बर् पडेल

मला पण झटका आणि हलाल हे माहीत नव्हते,आणि माझे काही मुस्लिम मित्र पण आहेत त्यांच्या तोडून पण कधी ही ऐकले नाही.

पण आमच्या गावात परंपरे नी आलेली एक गोष्ट बघितली आहे.
खाटीक समाज जो हिंदू आहे मटण विक्री च व्यवसाय करतात.
पण ते बकरे कापत नाहीत बकरा मुस्लिम समाजातील व्यक्ती च कापतो .
नस कापली की एक दोन मिनिटात प्राण्याचा जीव जातो .
मान तोडली तरी तितकाच वेळ जीव जाण्यास लागणार च .

झट्का काय किंवा हलाल काय, प्राणी मरणारच की. आणि मारणारा किंवा खाणारा हिंदू असो वा मुसलमान , चव एकच असेल.

माझे काही मुस्लिम मित्र पण आहेत त्यांच्या तोडून पण कधी ही ऐकले नाही.
>>>>>

विषय निघाल्याशिवाय कश्याला कोण का सांगणार..

हलाल पद्धतीचे टीकाकार त्याला हालहाल म्हणतात कारण त्यात प्राण्याचे जीव जाताना हाल होतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे मुस्लिम मित्र स्वताहून हे सांगणार नाहीत. पण नक्की त्यात तडफडून मृत्यु होतो की रक्तवाहिन्या तोडताच प्राणी मरतो लगेच हे जाणकार सांगतील.मला खात्रीने माहीत नाही..

आमच्याइथे हॉटेल मध्ये सुद्धा बोर्ड लागले असतात की इथे हलाल मटण असते म्हणून..

एकाच वेळी दोन धाग्यावर ही चर्चा सुरू आहे अचानक...

रूनमेश,
तुझा वरचा एक प्रतिसाद लिहिण्याची स्टाईल सेम टु सेम हेमंत सारखी वाटली.
>>>>>>

नानबा ओके.. पण आम्ही वेगळे आहोत Happy
त्यांचा प्रभाव असू शकतो माझ्यावर, जो एखाद्या पोस्टमध्ये दिसला असावा.

हलाल=> मला इकडे येऊनच कळलं ह्या विषयी.
मुस्लिम लोक फक्त (?) हलाल मीट खतात.इकडे काही ठिकाणी हॉटेलात हलाल मीट मिळतं म्हणून पाटी असते..
३-४ मित्र होते मुलाचे.. वेगवेगळ्या देशातून आलेले, त्यांच्या आया नोट ठेवायच्या मुलाला नॉन वेज असेल तर देऊ नका... आम्ही बाहेरच नॉनव्हेज खात नाही.. ( कारण ते हलाल नसतं..)

डिसेंबर मधे NYC ची subway घेतलेली त्यात मोठ मोठ्या जाहिराती होत्या मुस्लिम matrimony app/ साईट च्या... त्यात नायक मध्ये १ मिलियन पेक्षा जास्त मुस्लिम राहतात.. असाही prominent मेसेज होता.
****

मला trivialize nahi करायचं. काही वेळेला काही जणींना खरच खूप त्रास होत असेल.

हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन किंवा इतर आंतरधर्मीय अनेक लग्न अगदी यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे बघितली आहेत.
आणि अगदी सगळ बघून नीट जुळवलेली लग्न ही कधी मोडतात ज्यात मुलीला दबावातून, कुचंबणेतून जावे लागते .. अर्थात कधी मुलांची पण बाजू दरवेळी चुकीची असते अस नाही.

काही वेळेला काही जणींना खरच खूप त्रास होत असेल. >> ते तर अगदी एका धर्मातील दोन विभिन्न जाती/प्रांत ह्यामधील जोडप्यांना पण होत असेलच की.

एकाध्या वेळी एकाच प्रांतातील लोकांत आंतरधर्मीय विवाह झाला तर त्रास होत नाही पण .
अंतर प्रांतीय विवाह झाला तर मात्र त्रास होतो.

१) खाण्याच्या दोघांच्या सवयी वेगळ्या असतात.
२) विविध विषयात दोघांची मत वेगळी असतात.
३) भाषेचा आणि राहणीमानाचा जवळचा संबंध आहे भाषा म्हणजे फक्त संवाद च साधन नाही .. भाषे बरीवर विविध गोष्टी पण येतात..
त्या मुळे त्यांची भाषा वेगळी असल्या मुळे विचार करण्याची पद्धत पण वेगळी असते

Live in मध्ये राहावे.
जमते असे वाटले तर लग्न करावे.
Live in relationship कायद्याने कंपलसरी केले पाहिजे.
एक वर्षे असे राहिल्यावरच अधिकृतरीत्या लग्नाला परवानगी.

छान कायद्या ल पार बेडरूम मध्ये घेवून या .
चार पोलिस पण प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये duty ल ठेवा.

कुटुंबात कायद्याचा आणि सरकार च कमीत कमी हस्तक्षेप असवा.
प्रतेक गोष्टीत कायद्याची गरज नाही

Pages