चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॉर्वेत Åndalsnes एरीयामधे Rampestreken हा एका छोट्या डोंगरावरचा viewpoint आहे. वर जायला cable car आहे पण डोंगर चढून जाताना अप्रतिम दृश्य पहायला मिळतं.
हा वरुन काढलेला फोटो, त्यातही पूल असल्यामुळे इथे टाकता आला.

IMG_6548.JPG

टोकियोला रिव्हर क्रुझ सुरु असताना घेतलेले काही फोटो
फोटो क्र. ४ - पुलाचा हा पोटाचा भाग बघायची वेळ क्वचितच येते.
00019.jpg

वर Rampestreken चा फोटो टाकलाय तिकडे जाताना वाटेत Trollstigen scenic route लागतो. इथे ड्राईव्ह करणे म्हणजे ड्रायविंगची आवड असणार्‍यांसाठी पर्वणी! त्यामुळे पाहुण्यांना इथे नेण्यासाठी मी कायम तयार असतो Happy
जुने ट्रीपचे फोटोज चाळताना काही पूल असलेले फोटो सापडले त्यातला हा एक.

IMG_E6581.JPG

वर Trollstigen scenic route चा वरुन काढलेला फोटो आहे, त्यात दिसणार्‍या पूलाचा उतरताना काढलेला फोटो:

IMG_E6572.JPG

हर्पेन , तुमच्य लेन्स मधून पुणे वेगळंच दिसतंय. खास तुमच्यासाठी पुणेकरांनी लकडी पूल रिकामा केलेला असणार.
पुणेकरांचा पुणेकर आला असं काहीसं झालं असेल Wink

माबो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ह्या खेळालाही पुढे न्यावे म्हणून हा झब्बू Happy

हा फोटो मी नाही घेतला. माझ्या पेक्षा याने घेतलेला फोटो जास्त सुंदर आहे म्हणून थोडा वेळ अपडेट करतोय. मी टेकडीवर चढून घेतलेला, त्याचा कोन तिरका आहे. हा ड्रोन आहे. माझ्या कडे अशी सोय नाही.
स्थळ - लक्ष्मी नारायण मंदिर, नरे आंबेगाव
FB_IMG_1695795976915.jpg

Pages