चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20230919_120427_Gallery.jpg

Big Cedar Lodge, Missouri मधला हा पूल. क्रिसमस करता खास रोषणाई केली आहे पुलावर.

कनाल स्ट्रीट रेलरोड ब्रिज. हा शिकागो नदीच्या दक्षिण पात्रात ११० वर्षे जुना पूल आहे आणि आजही दररोजच्या वापरात आहे. विकी प्रमाणे रोज तीनशे ट्रेन्स यावरुन जातात आणि नदीवरच्या वाहतुकीसाठी हा वर-खाली ही करता येतो. फोटोत एक गाडी जाताना दिसत्येय बघा!

chicago-train-bridge-1.jpgchicago-train-bridge-2.jpg
शिकागो मध्ये नदीपात्रावर बांधलेले असे तीन एकशे पूल आहेत!

सुंदर फोटो.
IMG-20230920-WA0003.jpg
सॅन ॲन्टोनियो डाउनटाउन रिव्हर वॉक

हा माझा आणि एका मैत्रिणीचा सॅन अँटॉनिओ रिव्हर वॉकवरचा फोटो. जवळ जवळ मी प्रत्येक वीकेंडला रिव्हरवॉकला जायचे -
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AIL4fc_6RE37uW-K1Y3mq0xxEyWgt8HtmN3utfZC648AXNXax9Lwn_hRj8RGUXA2Y3mdk9dYBYuDUgma4zArHDihGeJTQekGtq7j9kU-xP2GBeaqCs-jCZsKeeRLVDlzOLFDc84PqxBBgBEetN-18gR1DDO3dQ=w720-h540-s-no?authuser=0

Pages