कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?

Submitted by छन्दिफन्दि on 16 September, 2023 - 21:13

कॉमेडी, हॉरर, ऍक्शन किंवा मसाला चित्रपटांबद्दल बऱ्याचदा लिहिलं, बोललं जात, चर्चा रंगतात.
या वेळी इमोशनल / भावनावश चित्रपटाची चर्चा करूया.
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?
कुठल्या दृश्याला?
रडणे म्हणजे ओक्सा बोक्शी किंवा डोळे पुसायला रुमाल / tissues लागेल असेच नाही, डोळे भरून येणे किंवा मन हेलावणे हेही चालेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pursuit of happiness
सदमा
मसान

टिपिकल।मेलोमेलो ड्रॅमा आवडत नाही.

रडू येतं हे सत्य माहित असून ही परत परत चित्रपट पाहिले जातात का? खरंच विचारतेय. <<<

प्रत्येक वेळा पाहतो तेव्हा काही तरी नवीन समझतं, अंतर्मुख व्हायला होतं, जसं ताण येतं तसं अंतर्मुख झाल्यावर विस्डम येतं.
विस्डम हा शब्द मोठा ही असेल कदाचित, भावनाओ को समझो Happy
राजेश खन्ना आणि संजीवकुमार दोघे ही खुप आवडतात, संजीवकुमार तर डोळ्यांनी जे काही अभिनय करतो, कधी गप्प राहुन जे काही करतो ते लाजवाब असतं Happy

संजीवकुमार तर डोळ्यांनी जे काही अभिनय करतो, कधी गप्प राहुन जे काही करतो ते लाजवाब असतं >>> रोल कॉमिक असो वा एमोशनल. त्याच्यात त्या रोल ला न्याय देण्याची हातोटी होती.

आमचे आगामी आकर्षण
हटकून रडवणारा मराठी चित्रपट

ढसाढसा

प्रभू - अलका कुबल (आई)
राधिका मसालेवाले (मुलगी)
नवरा कुणीही जो हिला सोडून दुसरीही संसार करेल
दुसरी - रसिका धबडगावकर / सई ताम्हणकर किंवा कुणीही नवरा पळवणारी बाई
कथा - या हो या, राधिका मसाले संगे रडूया.

Proud
'ओ कसा बो कशी'
'We, the daughters in law' चे भारतीय + मराठीकरण केलेला: 'हमसून हमसून'
'दहा यमक लेऊन' चे ग्रामिणीकरणं केलेला: 'धा यमोक लुन'
'Original Root' चे एकाच वेळी कानडी + मराठीकरण केलेला 'मूळुमूळु'

हे सुद्धा रडण्यासारखे चित्रपट आहेत, सगळयांमध्ये वरील निकष पूर्ण होतात.

आताच दिलवाले पाहिला
त्यात काजोल आणि शाहरूखचे पंधरा वर्षांनी गैरसमज दूर होऊन ते पुन्हा भेटतात तेव्हा काजोल म्हणते, पंधरा साल हो गये काली...
त्यावर शाहरूख उत्तर देतो.. नही.. पंधरा साल नही.. पंधरा साल, चार महिने, दस दिन....
या एका डायलॉगने काजोलला त्याचे आजही आपल्यावर किती प्रेम आहे हे पटते... आणि आपल्याही डोळ्यात पाणी येते.. आय मीन माझ्या आले Happy

बरेच आहेत. नाव चटकन सांग असं कोणी विचारलं तर सगळीच नाही आठवणार एकावेळी.

तरी कॉमन पॅटर्न हा जे सिनेमे किंवा सीन मनाचा तळ गाठू शकले ते पहाताना रडू आले. ते रडू त्या सीन/मुव्हीतल्या इमोशनमुळे तर होते पण त्याहून अधीक ते माझ्या मेमरीतल्या कुठल्याश्या हळव्या तारेला स्पर्श करुन माझेच जुने मेमरीतले काही क्षण नव्याने अनुभव देऊन गेले म्हणूनही होते. ते रडू हे या दोन्हीचा मिळून परिणाम होते.

कधी उगाच blame it on hormones टाईप कशानेही टपकन डोळ्यातला नळ सुरु होईल अशी अवस्था असताना जर जे मुव्ही समोर आले ते हकनाक रडवून गेले Lol

लगे रहो मुन्नाभाई - संजय दत्त अर्शदला सॉरी म्हणतो तो प्रसंग
Pursuit of Happyness - आपल्याला जॉब मिळाला हे कळल्याचा प्रसंग
Sixth sense - आई आणि मुलाचे गाडीतील संभाषण, वडील गेलेल्या मुलीचा व्हिडिओ पाहातात तो प्रसंग, ब्रुस विलिसचे बायकोबरोबर शेवटचे संभाषण
Crash - मुलीला गोळी लागते तो प्रसंग
Pan's labyrinth - शेवट. त्यात त्या lullaby ची haunting tune आहे एकदम

एकूण हिंदी चित्रपटात डोळ्यातून अश्रू यावेत असे प्रसंग फारसे सापडले नाहीत, त्या मानाने इंग्रजी चित्रपट जास्त भावून जातात हे वैयक्तिक मत Happy

लहान असताना मामा शान बघायला टोकिज मधे घेऊन गेला होता. त्यात जेंव्हा शाकाल अमिताभला मगर असलेल्या पाण्यात टाकतो तेंव्हा अमिताभ मरणार ह्या भितीने मी ओक्साबोक्षी रडलो होतो. एव्हढा आरडा ओरडा केला होता कि सिनेमा थांबवून मला बाहेर नेऊन आईस क्रीम घायला घालून परत आणाले गेले होते Lol

कळायला लागल्यावर गंगा जमना सरस्वती बघून आयुष्यातले तीन तास वाया घालवले म्हणून वैफल्याने रडलो होतो.

>>>>>>अमिताभ मरणार ह्या भितीने मी ओक्साबोक्षी रडलो होतो.
Lol
मी सिनेमातील, ज्ञानेश्वरांच्या समाधीप्रसंगी रडलेले.

क्वालिटेटिव्ह (तत्वशः) फरक काहीच नाही Happy

पीकू बघताना अपेक्षित असून ही शेवटाला डोळ्यात पाणी आले, थोडंसं आई वडीलांचं म्हातारपण नाहि म्हटलं तरी तर्हेवाईक पणा हे रीलेट झालं..

बधाई हो चित्रपटात नीनाच्या नणंदा तिला संस्कार शिकवत असतात त्यावेळी तिची सासू निनाची बाजू घेऊन मुलींना झाडते तेंव्हा डोळ्यात पाणी येते (नीनाच्या भावना आपल्या डोळ्यातून वाहतात) विशेषकरून आधी हीच सासू नीनाला उतारवयात गरोदर असल्याबद्दल दूषणं देत असते पण वेळ पडताच सुनेसाठी मुलींनाही बोलायला कमी करत नाही.

Shawshank Redemption - बरेच सीन आहेत जे बघताना डोळ्यांच्या कडा पाणावतात, अगदी घळाघळा रडले नाही तरी. असं असूनही हा ऑल टाईम फेव्हरिट सिनेमा आहे आणि पुन्हा पुन्हा बघायला माझी हरकत नसते Happy

>>>>>>>>हा चित्रपट नाहीये. पण डिस्नेचे हे छोटेसे गाणे खूप आवडते डोळ्यात पाणी आणते.
सुंदर गाणे आहे.

अजून एक कोणतातरी इंग्रजी सिनेमा ज्यात लहान मुलगा मेलेला असतो पण तो जिथे मेलेला असतो तिथेच त्याचा आत्मा थांबलेला असतो. कारण त्याच्या आईने त्याला सांगितलेले असते की तिथे ती त्याला घ्यायला येईल.

मग त्या मुलाचा आत्मा एका तरुण मुलीला दिसतो आणि तिच्याशी बोलतो सुद्धा. ती मुलगी या मुलाच्या आई वडिलांना भेटते. आधी तर तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. मग नंतर मात्र त्या आईचा हिच्यावर विश्वास बसतो.

मग हिच्या सांगण्याप्रमाणे ती आई त्याच जागी जाऊन त्याला ' आता तू जा बाळा ' असं म्हणते आणि मग त्याचा आत्मा मुक्त होतो.

भयंकर हृदय हेलावून टाकणारा सिनेमा आहे. विशेषत: त्याच वयाचे मुल असणाऱ्या आईने तर बघूच नये असा.

एवढं लिहून सिनेमाचं नाव मात्र आत्ता आठवत नाहीये.

पठाण

कधी कधी बातम्या/पेपर वाचताना किती अन्याय सुरू आहे सगळीकडे असं वाटून रडू येते का? विशेषतः कुटुंबा च्या आपसी कलहातून घडलेल्या हत्या, लहान मुलांच्या हत्या व इतर.

https://youtu.be/rLnX8pOAPQ8?si=CfmkaUW9-Wckpamd

मूळ इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ एडिट करून कोणीतरी हे मराठी गाणं त्यात ऍड केलं आहे . यात शेवटी पिलू परतून जात असताना बाकीची राजहंसाची पिल्लं मागून पोहत येतात आणि त्यांची आई यालाही जवळ येते तो सीन .. दरवेळी पाहताना डोळ्यात पाणी आलं आहे जरासं .

777 Charlie- एक तर त्या दिवशी काही कारणास्तव आधीच मन हळव झालेले त्यात हा भूभूचा सिनेमा... कधी डोळे घळघळ वाहायला लागले हे कळलेच नाही...

बाकी मी दंगल किंवा चक दे किंवा बजरंगी भाईजान बघताना पण रडू येणाऱ्या कॅटेगरीमधली....

Pages