Submitted by मीस्वच्छंदी on 16 September, 2023 - 21:13
कॉमेडी, हॉरर, ऍक्शन किंवा मसाला चित्रपटांबद्दल बऱ्याचदा लिहिलं, बोललं जात, चर्चा रंगतात.
या वेळी इमोशनल / भावनावश चित्रपटाची चर्चा करूया.
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?
कुठल्या दृश्याला?
रडणे म्हणजे ओक्सा बोक्शी किंवा डोळे पुसायला रुमाल / tissues लागेल असेच नाही, डोळे भरून येणे किंवा मन हेलावणे हेही चालेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुरदर्शनवर चित्रपट पाहात
दुरदर्शनवर चित्रपट पाहात लहानाची मोठी झाले. तेव्हा खुप चटकन रडु यायचे. किती/कोणते चित्रपट पाहताना रडले असेन याची गणती करता येणार नाही. तेव्हाचे जग खुपच निरागस होते.
आताशा तितके चटकन रडु येत नाही. तरी मसानमधला ‘साला ये दुख काहे खतम नही होता बे‘ म्हणत ओक्शाबोक्शी रडणारा विकी कौशल माझ्याही डोळ्यातुन पाणी काढण्यात यशस्वी झाला.
तारे जमिनपर , रंग दे बसंती -
तारे जमिनपर , रंग दे बसंती - लुकाछिपी गाणं , श्वास , जो जीता वहि सिकंदर - रूठकर हमसे .. जेव्हा आमिर खान सकाळी कुखरबंदाच्या गळ्यात पडून रडतो . इंग्लिश विंग्लिश मधलं लग्नातलं भाषण.
Stepmom .. yesss . बहुतेक एकच हॉलिवूड मुवी असेल जो बघून मी रडले.
Life is beautiful
Life is beautiful
अगदी जवान बघताना देखील
अगदी जवान बघताना देखील डोळ्यात पाणी आले.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2023 - 11:47
सरांच्या डोळ्यात जवान बघून पाणी आले, फालतू सिनेमासाठी खूप खर्च केला या दुःखामुळे का?
श्यामची आई
श्यामची आई
The pursuit of happiness आणि
The pursuit of happiness आणि श्वास
आनंद, दो आंखे बारह हाथ, भगत
आनंद, दो आंखे बारह हाथ, भगत सिन्ग (मनोज कुमार चा) शेवटचा फाशीचा सीन, मुन्नाभाइ , एकटी .
बापरे मलापण फार रडु यायचं.
बापरे मलापण फार रडु यायचं. हल्ली कमी झालं पण तरीही येतं.
भगत सिंग अजय देवगण चा पण छान
भगत सिंग अजय देवगण चा पण छान होता.
अनेकदा रडू आलंय. लिहिणे कठीण
खूपदा रडू आलंय. लिहिणे कठीण आहे. काही पिक्चर्स वर आलेत त्यातले.
संजीव कुमारचा कोशिश
संजीव कुमारचा कोशिश
खामोशि, The pursuit of
खामोशि, The pursuit of happiness, ़कांकण, अजुन बरेच
'टायटॅनिक' मधले दोन सिन
'टायटॅनिक' मधले दोन सिन जेव्हा जॅक , रोजला त्या लाईफ बोटीत जायला सांगतो ती बोट अशी खाली खाली जाते आणि त्यांची एकमेकांत गुंतलेली नजर , आता पुन्हा भेटणार नाही वैग्रे , दुसरा सिन ज्यात फळकुटाच्या आधारे तरंगणारा जॅक पाण्यात खोल खोल जातो व रोज त्याला बघत राहते जॅकची नजर .....आता पुन्हा भेटणार नाही.
ममा / मामा एक हॉरर मुवि त्यातली भूत शेवटी त्या लहान मुलीला घेऊन जाते तेव्हा तिच्या बहिणीची तिला हाक मारणे व दोघींची नजरानजर। आता पुन्हा भेटणार नाही.
बर्फी सिनेमातला तो प्रेयसी ला
बर्फी सिनेमातला तो प्रेयसी ला भेटायला जातो आणि मग बाहेर येऊन माझ्या सारख्या फाटक्या माणसाशी तू का लग्न करशील हा भावनिक अभिनय. अश्रु आवरायचे तरी कसे? त्यातलाच शेवटी प्रि.चो ला शेवटच्या सिन मधे भेटायला जातो तेंव्हा प्रेयसी ला परत- मी बरा दिसतोय ना गं? हा भावनिक अभिनय परत :आऑऑऑऑ मॉमेंटः
ब्लॅक हा सिनेमा- थियेटरात पाहिला होता. रडू आवरत नव्हतं.
थेटरात पाहताना भावना आवरत नाहीत. घरी टाळू शकतो..
आर आर आर मधे हिरो ला कुटत असताना ही वाईट पण वाटत नव्ह्ते..कारण अ&आ ने भरलेल्या चित्रपटात वाघाच्य जबड्यात तोंड देणार्या ला चाबकाचं काय कौतुक असा काहिसा विचार!
मुन्नाभाई सारख्या खो खो
मुन्नाभाई सारख्या खो खो हसवणार्यांतही मुन्ना झाडू वाल्या काकांना मिठी मारतो तेंव्हा आपोआप डोळ्यात पाणी येतं..
मुन्ना भाई मध्ये किमान दहा
मुन्ना भाई मध्ये किमान दहा बारा वेळा पाणी येते..
आमच्या कडे सकाळी आणि
आमच्या कडे सकाळी आणि संध्याकाळी येते.
>> खूपदा रडू आलंय
>> खूपदा रडू आलंय
+१
अनेकदा हे सिच्युएशनल असते. कोणत्या फेज मधून आपण जात आहोत/गेलो आहोत त्यावर सुद्धा अवलंबून असते.
बालगंधर्व चित्रपट पाहताना सुरवातीची जुन्या काळातली दृश्ये पाहून अश्रू थांबत नव्हते. का ते मलाही नक्की सांगता येत नाही.
पुलं वरचा भाई चित्रपट पाहताना सुद्धा अनेकदा अश्रू आले. का ते सांगता येत नाही. पण भाई भाग दुसरा बघायचे धाडस झाले नाही.
जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला यशवंतराव चव्हाणांवरचा चित्रपट पाहताना सुद्धा खूप खूप भावविवश झालो होतो.
थोडक्यात, "हा काळ हे लोक आता पुन्हा येणे नाही" हे जिथे जिथे वाटले तिथे अश्रू न चुकता आलेले आहेत.
सलमानचा कोणताही पिक्चर बघताना
सलमानचा कोणताही पिक्चर बघताना रडू येते.
बिना लग्नाचं पोर. तरी अभिनयाची अपेक्षा ठेवतात लोक.
सुपर ३० शेवट - आनंदाश्रू
सुपर ३० शेवट - आनंदाश्रू
लगे रहो मुन्नाभाई - अपुन माँ
लगे रहो मुन्नाभाई - अपुन माँ की याद आ रही है बोला , तुने सिर गोद में ले कर लोरी सुनाया अपुन को और तेरे पे हाथ उठाया असा काहीतरी डायलॉग आहे त्यावेळी अर्शद वारसीची acting.. अर्शद वारसी अंडररेटेड ऍक्टर आहे , अलीकडे असुरमध्ये त्याच्या अभिनयाच्या सगळ्या छटा पाहता आल्या , त्याच्या अभिनयाला पूर्ण वाव मिळाला ..
मुन्नाभाई mbbs मध्ये आजोबांनी जेवावं म्हणून कॅरमचा खेळ मांडतात तो सीन , जेव्हा आजोबा ज्यूस पितात तेव्हा सगळ्यांची आणि त्यांच्या मुलाची त्या डॉक्टरची रिऍक्शन .
अमर प्रेम मध्ये लहान मुलाला
अमर प्रेम मध्ये लहान मुलाला सावत्र आई छळते ते प्रसंग
सौतन मध्ये पद्मिनी विष पिते
मिशन मंङल चा एक सीन आहे जेव्हा अक्षय आणि विद्या त्यंच्या टीम ला त्या सर्वानी तिथवर पोहोचायला कीती स्ट्रुगल केलय ते सांगुन मोटिव्हेट करतात
अनुराग मध्ला लहान मुलगा
अनुराग मध्ला लहान मुलगा देवाघरी जातो
>>> जलजले हा चित्रपट बघताना
>>> जलजले हा चित्रपट बघताना मेकॅनोज गोल्ड साठी रडू आलं होतं.

आचार्य - एक नंबर प्रतिक्रिया
आचार्य - एक नंबर प्रतिक्रिया
आचार्य
आचार्य
र आ
र आ
मला टचिंग सीनला अरेरे वाटतं पण रडू नाही येत कधी..
माझ्या आईचा लहाणपणापासून ऐकत आलेला किस्सा.. लहानपणी आईचे आई बाबा आणि आई क्रांती सिनेमा बघायला गावातल्या थिएटरमध्ये गेलेले..तेव्हा आजी आणि आई फार रडलेल्या..
घरी टीव्हीवर हाची चित्रपट
घरी टीव्हीवर हाची चित्रपट पाहत होते. माझी मुलगी तेव्हा बारा-एक वर्षांची असेल. ती शाळेतून घरी आली तेव्हा अगदी शेवटला अर्धा तास उरला होता. ती येऊन बसली आणि शेवटचं दृश्य सुरू होताच तिनं गळाच काढला. तिचं पाहून मी पण.. तो कुत्रा त्याचा मालक येणारच अशा खात्रीनं जो त्या स्टेशन बाहेर बसला असतो ते पाहूनच आम्हाला ते सोसवेनासं झालं. त्यातल्या त्यात आमचा कुत्रा येऊन आम्हाला पाहत बसला होता की, काय ह्या दोघी वेड्यासारख्या रडताहेत म्हणून...
अखेर चा हा तुला दंडवत गाणं
अखेर चा हा तुला दंडवत गाणं ऐकताना गुझबंप्स येतात
आप की कसम तर कित्येक वेळा पहिलंय, राजेश खन्ना ला जेव्हा पश्वाताप होतं आणि शेवटचा सीन ला ही रडु येतं
अनिल कपूर चा ईश्वर सिनेमा पाहताना ही रडु येतं
रेव्यु यांनी उल्लेख केलेल्या संजीवकुमार यांचा कोशिश सिनेमा ही पाहताना रडु येतं
आप की कसम तर कित्येक वेळा
आप की कसम तर कित्येक वेळा पहिलंय, >>> रडू येतं हे सत्य माहित असून ही परत परत चित्रपट पाहिले जातात का? खरंच विचारतेय. कारण मी सदमा लागला तरी बघत च नाही.. बर्फी पण नाही. परत त्या प्रोसेस मधून जाण्याची ताकत नसते. ताण येतो.
रडू येणारे चित्रपट आजकाल फारसे तसेही पाहत नाही.. ह्याच कारणास्तव अजून इच्छा असूनही मसान & प्रि.चो. चा मुलीला आजार असलेला मुवी पाहिला नाहिये.
Pages