खेळ-१ - बातमीचा मथळा आणि रीड मोअर

Submitted by संयोजक on 19 September, 2023 - 00:24

मायबोलीकरांनो, तुम्ही ऑनलाईन वृत्तपत्र नक्कीच वाचत असाल. त्यात एखादा बातमीचा मथळा ठळक अक्षरात लिहिलेला असतो आणि पुढे ती बातमी सविस्तर वाचण्यासाठी रीड मोअर ची लिंक दिलेली असते. बातमीचा मथळा वाचून असे वाटते कि यात काहीतरी विशेष असे किंवा एखादे रहस्य सांगितले असावे. प्रत्यक्षात मात्र ती बातमी अतिशय सामान्य, गमतीशीर किंवा असंबद्ध असते.
उदा. ऐश्वर्या रायने आराध्याबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय, ऐकून अभिषेक झाला चकित. रीड मोअर- ही आहे तिच्या नवीन ड्रेसची किंमत.
किंवा , श्रीकृष्णाचे ठसे सापडले तुळशीबागेत. रीड मोअर - ते प्लास्टिकचे चिकटवण्याचे ठसे होते.

हाच खेळ आपल्याला खेळायचा आहे. यात संयोजक पहिल्यांदा एक बातमीचा मथळा देतील. तो मथळा आणि त्यापुढे रीड मोअर असे लिहून पुढची काल्पनिक ओळ तुम्हाला लिहायची आहे. जो आयडी रीड मोअर देईल त्याने पुढचा बातमीचा मथळा द्यायचा आहे. पुढचा मथळा येईपर्यंत इतर जण आधीच्या मथळ्याचे रीड मोअर लिहू शकतात. दुसऱ्या कोणाला मथळा सुचत नसल्यास इतर कोणीही नवीन काल्पनिक मथळा देऊ शकतो त्याचे काल्पनिक रीड मोअर दुसऱ्यांनी लिहायचे आहे.

पहिला काल्पनिक मथळा खालीलप्रमाणे आहे.

"राणादाची के बी सी मधील एंट्री बघून प्रेक्षक झाले चकित. रीड मोअर ..."

सुरु करा मित्र -मैत्रिणींनो हा खेळ खेळायला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>पासष्ट वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब अमेरिकेच्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ह्यांच्या Mar-a-Lago ह्या रिसॉर्ट च्या तळघरात असल्याचे आढळले. Lol
आई ग्ग!!!! Lol Lol काहीही होउ शकते. ही तर क्लिक बेट नसून खरच सनसनाटी बातमी आहे. बरे झाले रीड मोअर क्लिक केले असे वाटायला लावणारी.

पासष्ट वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब अमेरिकेच्या माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ह्यांच्या Mar-a-Lago ह्या रिसॉर्ट च्या तळघरात असल्याचे आढळले. >> Lol
तळघरातही नाही. स्टडी मध्ये ड्रॉवर चेस्ट मधुन क्लासिफाईड डॉक्युमेंट्स ढकलल्याने पडून तळातल्या ड्रॉवरच्या मागे गेलेला. Lol

असामी, अमीतव Lol
रच्याकने, मला नेहमीच्या रीड मोअर सोबत लष्कराची भाकरी पण अपेक्षीत होती, दाबे वरुन.

आमच्या सत्य इतिहास संशोधन चमुच्या अहवाला नुसार सतराव्या शतकापर्यंत इंडिया हे नाव अस्तित्वात नव्हतेच. इंग्रजांनी तेव्हा भारतीयांचा अभ्यास केला. भारतीय लोक निद्रस्त आहेत, सहज जागे होणार नाहीत हे लक्षात येताच त्यांनी अखंड भारत ताब्यात घेण्याची योजना आखली. या योजनेला त्यांनी नाव दिले होते "निंदिया" (NINDIA) जे गुप्त राखण्यात आले. ही योजना यशस्वी झाल्यावर त्यांनी देशाला नाव देताना त्यातील सुरवातीचा N तेवढा काढुन टाकला आणि नाव दिले INDIA. लोकांनी आता तरी निंदियातून जागे व्हायला हवे आणि या नावाला कडाडून विरोध केला हवा. आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान हाच खुलासा करणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात आहे.

करोना गेला पण आता येणार "हा" जीवघेणा विषाणु? पुन्हा सुरू होणार लॉकडाऊन?
.......... Read More

"ट्रंप ने जनतेची जाहीर माफी मागीतली .....................रीड मोअर

>>> घरातल्या मांजरीच्या शेपटीवर पाय पडल्याने (ट्रंपचा नव्हे तर तो फ्रिजमधून काढत असलेला ॲपल पाय) ट्रंपने मांजरीला सॉरी म्हटले. या मांजरीचे नाव 'जनता' असल्याचे सूत्रांकडून कळते.

करोना गेला पण आता येणार "हा" जीवघेणा विषाणु? पुन्हा सुरू होणार लॉकडाऊन?
.......... Read More

सगळीकडे तापाची साथ चालू असतानाच सध्या तरी असा कोणता विषाणू अस्तित्वास नसल्याचे तज्ञानी सांगितले.

कैफ चढण्यासाठी कतरिना रोज रात्री घालते 'असे' कपडे!
........ Read More

कतरीना ने सांगितले की मेकअप नीट धुवून कॉटन होजियरीचे टीशर्ट पॅन्ट घातल्यास तिला गाढ झोप लागते

नेटकर झाले थक्क!!! नोरा फतेही ने टेरेन्स लुईस बरोबर केली 'ही' आकर्षक गोष्ट!!!
Read more...

मांजरीचे नाव जनता अतिभयंकर Happy

मायबोलीवर लवकरच चालू होणार 'मनातले विचार टाईप न करता नुसते मोबाईल किंवा कॉम्प्युटर कडे बघून मायबोली कळफलकावर उमटण्याची' सुविधा!!

नोरा फतेही ने टेरेन्स लुईस बरोबर केली 'ही' आकर्षक गोष्ट!!!
Read more...

नोरा फतेही ने टेरेन्स ल्युईस (जीभ किंवा बोटांना फेफरं भरुन अर्धांगवायूचा झटका येईल) बरोबर अत्यंत, अतिशय, अत्यावश्यक, अतुलनीय ही अक्षरे टाईप केली.

जनता मांजर Rofl

वरती anjali_kool यांनी read more इतकं परफेक्ट लिहिलंय, की मी चुकून त्यावर क्लिक केलं.

>>>>>>मायबोलीवर लवकरच चालू होणार 'मनातले विचार टाईप न करता नुसते मोबाईल किंवा कॉम्प्युटर कडे बघून मायबोली कळफलकावर उमटण्याची' सुविधा!!

Lol Lol बाप रे!!!

मीच देते.
कधीही ओलांडू नका 'या' 5 गोष्टी!! 'या' विशिष्ट कारणांमुळे!!
Read more

नवा मथळा -
कॅनडीअन पंतप्रधानांनी भारतात येउन, मोदींचे केले हार्दिक अभिनंदन. परंतु, मोदींनी त्यांच्या चंबटी चंबटी वरती लत्ताप्रहार करुन केली हकालपट्टी. कारणही तसेच घडले....... - रीड मोअर

कधीही ओलांडू नका 'या' 5 गोष्टी!! 'या' विशिष्ट कारणांमुळे!!
- रस्ता , रस्ता, रस्ता, रस्ता आणि रस्ता कारण रस्ता ओलांडणार्‍या कोंबडीचे काय काय प्रकार होतात ते तुम्ही जाणताच

कधीही ओलांडू नका 'या' 5 गोष्टी!! 'या' विशिष्ट कारणांमुळे!!

कोर्टाची पायरी, पोलीस स्टेशनचे प्रवेशद्वार, भोंदू बाबाच्या आश्रमाची पायरी, हॉस्पिटलची कमान आणि
सुंदर शेजारणीचा उंबरा

>>>>>>>सुंदर शेजारणीचा उंबरा
Lol Lol Lol
कारण तिथे तुम्हाला सापडायची तुमची बायको, अर्धी वाटी साखर मागायला आलेली Wink आणि मग घरात जे काही रामायण घडेल त्याला आम्ही जबाबदार नाही. मग तुम्हाला शॅगीचीच युक्ती वापरावी लागेल -

https://www.youtube.com/watch?v=2g5Hz17C4is

रस्ता , रस्ता, रस्ता, रस्ता आणि रस्ता कारण रस्ता ओलांडणार्‍या कोंबडीचे काय काय प्रकार होतात ते तुम्ही जाणताच >>>>

कारण तिथे तुम्हाला सापडायची तुमची बायको, अर्धी वाटी साखर मागायला आलेली Wink आणि मग घरात जे काही रामायण घडेल त्याला आम्ही जबाबदार नाही. मग तुम्हाला शॅगीचीच युक्ती वापरावी लागेल -

>>>>> Lol सामो.

सामो आज ऐकत नाहीये.

कॅनडीअन पंतप्रधानांनी भारतात येउन, मोदींचे केले हार्दिक अभिनंदन. परंतु, मोदींनी त्यांच्या चंबटी चंबटी वरती लत्ताप्रहार करुन केली हकालपट्टी. कारणही तसेच घडले....... - रीड मोअर
..
.
चंबटी चंबटी हे श्री ट्रुडो यांचे श्वान. हे आपण जाणले असेलच.

सामो सुटलीये ...

कधीही ओलांडू नका 'या' 5 गोष्टी!! 'या' विशिष्ट कारणांमुळे!! ....... - रीड मोअर

मायबोलीवर ऋम्याचे बाफ, बोकलत चे पोस्ट्स , फुरोगामी नि भरत ह्यांची फुरोगामी, रिक्शावाला नि चप्स चे शुद्धलेखन, शेंडेनक्षत्राचे तात्या प्रेम ह्या गोष्टी वेळ वाया घालवायची तयारी असल्याशिवाय अजिबात ओलांडू नका. Wink

"त्या" दोघांनी वर्षाविहारामधे केली तूफान "मजा" - रीड मोअर

असामी Lol

Pages