खेळ-१ - बातमीचा मथळा आणि रीड मोअर

Submitted by संयोजक on 19 September, 2023 - 00:24

मायबोलीकरांनो, तुम्ही ऑनलाईन वृत्तपत्र नक्कीच वाचत असाल. त्यात एखादा बातमीचा मथळा ठळक अक्षरात लिहिलेला असतो आणि पुढे ती बातमी सविस्तर वाचण्यासाठी रीड मोअर ची लिंक दिलेली असते. बातमीचा मथळा वाचून असे वाटते कि यात काहीतरी विशेष असे किंवा एखादे रहस्य सांगितले असावे. प्रत्यक्षात मात्र ती बातमी अतिशय सामान्य, गमतीशीर किंवा असंबद्ध असते.
उदा. ऐश्वर्या रायने आराध्याबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय, ऐकून अभिषेक झाला चकित. रीड मोअर- ही आहे तिच्या नवीन ड्रेसची किंमत.
किंवा , श्रीकृष्णाचे ठसे सापडले तुळशीबागेत. रीड मोअर - ते प्लास्टिकचे चिकटवण्याचे ठसे होते.

हाच खेळ आपल्याला खेळायचा आहे. यात संयोजक पहिल्यांदा एक बातमीचा मथळा देतील. तो मथळा आणि त्यापुढे रीड मोअर असे लिहून पुढची काल्पनिक ओळ तुम्हाला लिहायची आहे. जो आयडी रीड मोअर देईल त्याने पुढचा बातमीचा मथळा द्यायचा आहे. पुढचा मथळा येईपर्यंत इतर जण आधीच्या मथळ्याचे रीड मोअर लिहू शकतात. दुसऱ्या कोणाला मथळा सुचत नसल्यास इतर कोणीही नवीन काल्पनिक मथळा देऊ शकतो त्याचे काल्पनिक रीड मोअर दुसऱ्यांनी लिहायचे आहे.

पहिला काल्पनिक मथळा खालीलप्रमाणे आहे.

"राणादाची के बी सी मधील एंट्री बघून प्रेक्षक झाले चकित. रीड मोअर ..."

सुरु करा मित्र -मैत्रिणींनो हा खेळ खेळायला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज रात्री विष्णु सहस्रनाम म्हटल्याशिवाय सनी झोपत नाही. >> सामो Lol आता ह्याच्यापुढेही एक read more हवा इतकी रोचक बातमी आहे ही.

Read more
"मी रोज झोपताना न चुकता विष्णुसहस्रनाम म्हणतो, त्यामुळे चांगली झोप लागते" असं प्रतिपादन सनी देओल यांनी केलं.

शाखा आणि त्याचा माबोफॅन सापडले बंद खोलीत नको त्या अवस्थेत!.......... Read more!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
सतत दारूचा विरोध करणारा आयडी चक्क शाखाबरोबर बसून ड्रिंक घेताना सापडला Lol

>>>>>>>"मी रोज झोपताना न चुकता विष्णुसहस्रनाम म्हणतो, त्यामुळे चांगली झोप लागते" असं प्रतिपादन सनी देओल यांनी केलं.
हपा Lol Lol Lol

रेल्वे मध्ये या पाच वस्तू अजिबात नेऊ नका... रीड मोअर...

बाँब,सुरा, विळी, पिस्तूल आणि हातोडा कारण कोणत्याही राजकारणावरच्या चर्चांमध्ये तुम्हाला माहीतच आहे किती आणि कसले कसले टेम्टेशन होते Wink

जगातील लहान मोठ्या देशांनी राज्यकारभार कसा चालवावा ते निसर्गाचे काय चुकते, शास्त्रज्ञांनी काय करावे व करू नये, डॉक्टर या प्राण्याने कसे निदान करावे अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणारे मायबोली एकमेव संस्थळ असल्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉड्स ने स्वतः घेतली आहे.

>>>>>जगातील लहान मोठ्या देशांनी राज्यकारभार कसा चालवावा ते निसर्गाचे काय चुकते, शास्त्रज्ञांनी काय करावे व करू नये, डॉक्टर या प्राण्याने कसे निदान करावे
Proud Proud Proud

१००

उत्क्रांतीवादात निसर्गाने काय सुधारणा घडवुन आणायला हव्या होत्या व काय शॉर्ट्कटस घेणे आवश्यक होते - हे खरोखर इथेच वाचलेले आहे Happy

Proud

निसर्गाचे काय चुकते >> Lol

सतत दारूचा विरोध करणारा आयडी चक्क शाखाबरोबर बसून ड्रिंक घेताना सापडला >> Lol

पुढचा रीड मोअर द्या रे

नवरा पुढे करवादून व बायको ३ पावल मागे, पाय ओढत, असे अन्य विवाहीत जोडप्यांसारखे चालायचे सोडून, भर चौकात नवरा बायको एकत्र फिरत होते. हे लक्षण सामाजिक स्वास्थ्याच्या दॄष्टीने बरे नाही. अशाने, विवाह सुखी होउ शकतात- असा एक अशक्य, अतर्क्य विचार समाजात बळावतो.

भर चौकात नवरा बायको करत होते हे
रीड मोअर

भर चौकात नवरा बायको करत होते 'झुमका- ठुमका' ह्या सध्याच्या लोकप्रिय गाण्यावर ठुमके देत फ्लॅश मॉब डान्स करत होते. रोज रोज ट्रॅफिक जॅम मधे अडकल्यामूळे आमची डान्स प्रॅक्टिस बुडते हे लक्षात आल्यावर वैतागून नुसतेच कावण्यापेक्षा मोटारीच्या टपावर फ्लॅश मॉब करून आपले नि इतरांचेही मनोरंजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमच्या वार्ताहराला सांगण्यात आले.

स्थळ अर्थातच : चांदणी चौक, पुणे Wink

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा लग्नापुर्वीच प्रेग्नंट 'त्या' पोस्टनं
रीड मोअर

मौजे भंपकवाडी येथील धोंडाजी यांनी सांगितले की त्यांच्या बायकोने डोळ्यांच्या रंगसाधर्म्यामुळे त्यांच्या गाढवाचे नाव हृतिक रोशन असं ठेवलं आहे. त्यांच्या गाढवाला ते इतकं जपत असूनही शेजारच्या आळीतल्या तुका मानमोडे यांच्याकडची शबरी उर्फ सबा गाढवीण चोरून हृतिकला भेटत असे. परिणामस्वरूप धोंडाजी यांच्या 'गाढवाचं लग्न' होण्याआधीच सबा प्रेग्नंट झाली आहे.

लिंगबदलासाठी आली तरुणी, डॉक्टरने केला घोळ!.... पुढे वाचा...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लिंग बदल करून घेण्यासाठी आलेल्या तरुणीचे डॉक्टरने क्लोनिंग करून 'वचन' बदलले.

लिंगबदलासाठी आली तरुणी, डॉक्टरने केला घोळ!.... पुढे वाचा...
.
.
.
.
. संसर्गजन्य तापासाठी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर आपले जेंडर चुकून Male नमुद केलेले पाहुन ते बदलून Female करण्यास परत आलेल्या तरुणीला दुसर्‍या पाळीच्या डॉक्टरने दिला Sex Reassignment Surgery चा सल्ला, तरुणी झाली बेहोष.

Pages