चला हवा येऊ द्या, हस्याजात्रा असे शो आवडणाऱ्या लोकांचं मला कुतूहल वाटतं. कारण या शोमध्ये कलाकार एकसे एक पाणचट जोक मरतात आणि पब्लिक पण कधी जोक न ऐकल्यासारखी हसत सुटते. त्यामुळे हा शो आवडणारी पब्लिक खऱ्या आयुष्यात कधी मित्रांसोबत, घरच्यांसोबत जोक्स मारून हसतात की नाही अशी शंका येते.
कलाकार चां गले आहेत . मला प्राजक्ता माळीच असह्य होते. एक तर तिचे कपडे विचित्र गावठी फॅशनचे असतात. आजिबात शोभत नाहीत. तशी सुंदर आहे ती. व ओरडा आरडा फार करते. पूर्वी मी बघत असे हा कार्यक्रम आजकाल मागे पड ला आहे. रील्स दिसत रहतात. समीर चौगुले बेस्ट.
Submitted by अश्विनीमामी on 23 August, 2023 - 04:08
मला हास्य जत्रा तिच्या वेगळेपणामुळे आवडते. त्यांच्या प्रहसनात पुरुष साड्या नेसत नाहीत. कुठल्यातरी सिनेमावर आधारित प्रहसन ते करत नाहीत. प्रत्येक विषय स्वतंत्र असतो. याच कलाकारांचं पोष्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका विनोदी आणि करुण होती.
यांचे विनोद केवळ शाब्दिक नसतात ते प्रसंगानुरूप येतात. मुद्दामहून घुसडलेत असं वाटतं नाही. त्यातही ते बहुतेक वेळा पातळी सोडून नसतात.
प्राजक्ता माळी एवढं सातत्याने समालोचन करते म्हणजे ते लोकांना आवडतं.
Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 August, 2023 - 05:00
लोकांना काय आवडतं याचा आणि टिव्हीवरच्या कार्यक्रमांचा संबंध नाही. ज्याला जसे वाटेल ते तो दाखवतो, लोक पर्याय नसल्याने बघत बसतात.
नाईलाजात ईलाज असेल ते बघितले जाते, मग तेच लोकांना आवडते असे समजून तसेच कार्यक्रम इतर चॅनेल्स वर येत राहतात.
कपिल शर्मा शो मधे पुरूषांनी सतत बायकांची हिडीस सोंगं आणायची हे लोकांना आवडतं का हे समजायला मार्ग नव्हता. कपिल शर्मा शो चं रेटिंग बरं म्हणून चहयेद्या वाल्यांनी सुद्धा सुरू केलं. एखाद , दुसर्या वेळी ठीक. पण सतत बाईचं सोंग करायला सांगितल्याने कलाकार कपिल शर्मा शो सोडून जातात. पैसेच सगळं काही नसतं.
सोशल मीडीयामधे जेव्हां या किळसवाण्या प्रकारावर लोकांनी आवाज उठवायला सुरूवात केली तेव्हां लक्षात आलं कि लोकांना हे नकोय.
लोकांना चांगले मनोरंजन दिले तर लोक ते नाकारतील असा का समज करून घेतलाय ? कारण लोकांना सवय लावली तर दीर्घ काळ तसा कंटेट देणं अशक्य आहे ही निर्मात्यांची अडचण आहे. पोस्ट लवकर बंद केली हा कौतुकास्पद निर्णय आहे.
जत्रा त्यातल्या त्यात बरी आहे. चांगले आहे म्हणवत नाही. समीर विशाखा या जोडीने जत्रा फेमस केली.
सई ताम्हणकरच्या कमेण्ट्स हा एका वेगळ्या स्किटचा विषय आहे. कुठल्या अँगलने तिला जज्ज बनवलेय ?
Submitted by रघू आचार्य on 23 August, 2023 - 05:15
माझाही आवडीचा कार्यक्रम, सहकुटुंब बघता येईल असा एकमेव कार्यक्रम
कित्येकदा स्किट गंडतात, विषय फसतो, हसू येण्यासारखे काय होतं यात हे कळत नाही
पण तरीही कित्येक स्किट धमाल आणतात
नम्रता संभेराव सगळ्यात बेस्ट, लॉली पासून बिहारी, मारवाडीभाभी ते अग अग आई म्हणणाऱ्या लेकराची आई इतकं भन्नाट ट्रान्सफॉर्म करते ना त्याला तोड नाही
तशीच शिवाली परब, फक्त लहान मुलीचा गेटअप सोडून
राजकन्या ते मिस मोना जबरदस्त काम
प्रियदर्शनी तर कसली सुंदर दिसते, गालावरच्या खळ्या एकदम मोहक
त्या मानाने रसिका आणि चेतना लिमिटेड अभिनय करतात
वनिता खरात पण कधी कधी असह्य वाटते
इशा डे लाऊड होते अनेकदा पण टायमिंग भारी असतं
प्राजक्ता माळी ला काही बोलायचं नाही
आमच्यासारखे कित्येकजण आहेत जे फक्त तिला बघायला म्हणून पहिल्या सेकंदापासून डोळे लावून बसतात
तिचे ओरडणे डोक्यात जातं खरंय पण वाह दादा वाह फेमस झालंय तिच्यामुळे
पुरुष कलाकारांमध्ये सगळ्यात आवडतात ती पृथ्वीक प्रताप आणि ओंकार राऊत ची स्किट
शंकऱ्या आणि शितली ची गावातली लव्ह स्टोरी तर कसली मस्त फुलवत नेलेली त्यांनी
गौरव मोरे चे काही काही पंचेस अफाट असतात, एका स्किट मध्ये तो इशा डे ला विचारतो काय झालं रडायला, तुमचेच स्किट पाहिलेत का तुम्ही
प्रभाकर मोरे भयानक बोर, आणि त्यांची बायको रसिका आणि दत्तू हे तर फार बोर
दत्तू चा हिरवा टोळ झालेला एपिसोड तर अशक्य खतरनाक आहे
मला पण आवडते हास्यजत्रा. आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक "हाही असाच पाणचट कार्यक्रम असणार" अशा विचाराने पाहिलाच नव्हता! गेले २ वर्ष पहातेय , केव्हाही कोणतंही जुनं स्किट पाहिले तरी आवडते आता. चहयेद्या पेक्षा अगदीच वेगळि जातकुळी आहे याची. कलाकार उत्तम आहेतच पण मुख्य लेखन दिग्दर्शन फार मस्त असते.
जत्रा त्यातल्या त्यात बरी आहे. चांगले आहे म्हणवत
नाही. समीर विशाखा या जोडीने जत्रा फेमस
केली. >>> नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब इ. आहेतच की.
•••••••
कित्येकदा स्किट गंडतात, विषय फसतो, हसू
येण्यासारखे काय होतं यात हे कळत नाही >> नाही हो, असं कधीकधी होत असेल ; पण स्किट्स च्या क्वालिटी मध्ये सातत्य असते.
प्राजक्ता माळी ला काही बोलायचं नाही
आमच्यासारखे कित्येकजण आहेत जे फक्त तिला
बघायला म्हणून पहिल्या सेकंदापासून डोळे लावून
बसतात >> हो. हे मान्य करावेच लागेल. थॅंक्यू.
•••••••
@maitrayee - चहयेद्या पेक्षा अगदीच वेगळि
जातकुळी आहे याची. कलाकार उत्तम आहेतच पण
मुख्य लेखन दिग्दर्शन फार मस्त असते. >> अगदी खरं. Thank you
•••••••
मला हास्य जत्रा तिच्या वेगळेपणामुळे आवडते.
त्यांच्या प्रहसनात पुरुष साड्या नेसत नाहीत.
कुठल्यातरी सिनेमावर आधारित प्रहसन ते करत
नाहीत. प्रत्येक विषय स्वतंत्र असतो. याच
कलाकारांचं पोष्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका
विनोदी आणि करुण होती. >>> well said ; पण सिनेमावर आधारित प्रहसन करण्यात काय हरकत आहे.
Submitted by प्रथमेश काटे on 23 August, 2023 - 07:34
>>>>सिनेमावर आधारित प्रहसन करण्यात काय हरकत आहे.>>>
संपूर्ण नवा विषय आणि सिनेमा आधारित विषय यात पूर्णतः नवीन कल्पना मला अधिक भावते. सिनेमावर आधारित विषयावर लेखकाला जास्त डोकं लावावं लागतं नाही.
Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 August, 2023 - 07:23
मी फार रेग्युलरली बघायचे हास्यजत्रा. हा एपिसोड पाहिलेला नाही असं झालेलं नाही. विशाखा सुभेदार आणि समीर चौगुलेचा आचरटपणा आणि तेच तेच मुलाखतीतले जोक्स अगदीच प्रेडिक्टेबल झाले होते आणि सगळे परिक्षक फार कौतुक करायचे त्यांचं. पण ती बाहेर पडल्यावर बर्याच नवीन टॅलंटला न्याय मिळाला असं वाटतं. मला ओंकार भोजनेही फार आवडायचा. रोहित माने, श्रमेश, प्रथमेश, पृथ्विक, वनिता, नम्रता जास्त आवडतात. अर्थात दत्तू मोरे, निखिल बनेही आवडतातच.
आवली पावली, लॉली, मोना डार्लिंग वगैरे मुळीच आवडत नाही. पण युट्युबवर बघत असल्यामुळे फॉर्वर्ड मारता येतं.
प्राजक्ता माळीच्या कपड्यांपेक्षा सई ताम्हणकरला दिलेले कपडे यडचाप असतात आणि ती त्यात दिसतेही यडी. तिला मुळीच कॅरी करता येत नाहीत असं वाटतं. ती स्टेजवर जाऊन पुरुषांचे हात कशाला किस करते हे न उलगडलेलं कोडं आहे
मुळात ती कॉमेडी शो ची जज का आहे? ती जो करते तो अभिनय विनोदी नसतो हास्यास्पद असतो
मुळात ना तिला काही बोलता येत, एकदम मस्त छान खूप आवडला या पलीकडे काही सांगता येत नाही
त्या मानाने प्रसाद ओक कधी कधी चांगले अनलिसस करतो
असेही काही कलाकार झाले ज्यांनी हे करून दाखवलं मराठी मनोरंजन क्षेत्राच्या सुरुवातीच्या काळात दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेते चित्रपट निर्माते दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटांतून नाटकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पुढे लक्ष्या व अशोक सराफ या जोडीने आपल्या अभिनय आणि संवाद फेक करण्याच्या विशिष्ट स्टाईल्सने निखळ हास्य निर्मिती करत मनोरंजन विश्वात आपला अवीट ठसा उमटवला.
त्यानंतरही मच्छिंद्र कांबळे, विजय चव्हाण भरत जाधव, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर प्रशांत दामले, क्रांती रेडकर, भाऊ कदम मकरंद अनासपुरे अशा कलाकारांनी नाटक चित्रपट आपलं खूप करमणूक>>>>
पू. ल. देशपांडे आणि
दिलीप प्रभावळकर ही महत्वाची नाव राहिली.
Submitted by छन्दिफन्दि on 23 August, 2023 - 13:29
>>त्या मानाने प्रसाद ओक कधी कधी चांगले अनलिसस करतो<<
कार्यक्रमाचा तो भाग माझ्यामते रिडंडंट आहे. दोन्हि परिक्षकांना नारळ देउन निर्मात्यांनी ते पैसे लेखनाकडे वळवावे..
>>ती स्टेजवर जाऊन पुरुषांचे हात कशाला किस करते<<
त्या प्रकाराला येड्यांनी कायतरी नांव सुद्दा दिलं होतं, जणु काहि तो अगदि रेर पुरस्कार आहे...
समीर चौगुले बर्याचदा डोक्यात
जातो. >> माफ करा सर ; पण ही जरा मला अतिशयोक्ती वाटली. अहो प्रत्येकाची स्टाईल असते. हो आता सारखा तोचतोचपणा आला तर कंटाळवाणा वैगेरे वाटूच शकतो. पण ते शेवटी प्रेक्षकांची करमणूकच करत असल्याने ' डोक्यात जातो ' हे जरा.. तुम्ही जसं आपलं मत मांडलत, तसं मी माझं सांगतोय एवढंच. बाकी काही नाही. प्रतिसादाबद्दल थॅंक्यू.
Submitted by प्रथमेश काटे on 23 August, 2023 - 14:35
आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक "हाही असाच पाणचट कार्यक्रम असणार" अशा विचाराने पाहिलाच नव्हता! >>> मै - माझाही साधारण असाच अनुभव आहे. मी कायम तुकड्यातुकड्यांत पाहिला आहे. पूर्ण स्किट चांगले जमले आहे असे फार वेळा होत नाही पण मधेमधे चांगले विनोद जमून जातात. It grows on you.
मला परीक्षक म्हणून सई व प्रसाद हेच रूळलेले वाटतात. त्यांचे प्रतिसाद बर्याचदा बरोब्बर काहीतरी टिपतात. इतर उपरे वाटतात त्यामानाने. पण तो माझ्या सवयीचाही भाग असेल.
ते श्रमेश-प्रथमेश स्किट्स असतात त्यातील पल्लेदार भाषेचे/वाक्यांचे नमुने अनेकदा धमाल असतात. त्यात अनेकदा स्वतःवरच केलेले विनोद असतात - मराठीत जरा ते कमीच आहे.
सई आणि प्राजक्ताचे कपडे मात्र तेथील एकूण डेकोरमशी टोटली फटकून असलेले वाटतात.
सगळेच मराठी विनोदी कार्यक्रम महा-लाउड असतात. ते जरा कमी करायला पाहिजे. आणि सतत वाजणारे ट्यांग-टुंग सुद्धा. पब्लिकला विनोद आपोआप कळू दे. टांगटुंगची गरज नाही.
नम्रता, समीर, ओंकार भोजने, रोहित माने, विशाखा आणि फार थोडा वेळ होता पण प्रचंड ताकदीचा कॉमेडियन भुषण कडू हे सगळ्यात आवडते.
नम्रता तर अभिनेत्री म्हणून फारच उच्चकोटीची आहे असे वाटते.
आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक "हाही असाच पाणचट कार्यक्रम असणार" अशा विचाराने पाहिलाच नव्हता! >>> सेम . पण हा कार्यक्रम पहायला लागल्यापासून चहयेद्या एक्दम पाणचट वाटायला लागला .
काही काही स्किट्स , विषय , सादरीकरण , प्रासंगिक विनोद एक्दम भन्नाट असतात .
द्वियर्थी संवादांची रेलचेल असते बर्याचदा पण कधीही कमरेखालचे विनोद नसतात .
दोन्ही ओम्कार , नमा , शिवाली , पृथ्विक ही आवडती मंडळी माझी . गौरव मोरे , निखील आणि दत्तू यांच्या अभिनयात प्रचंड सहजता आहे .
कधी कधी समीर चौघुले ही आवडतो . अन्शुमन विचारे ही आवडायचा आणि कधी कधी पॅडी.
नमा,चेतु आणि वनिता यांची सासू सुनेची स्किट्स , निमिष , शिवाली आणि समीरची "शिवाली हे खर आहे " वाली स्किट्स , श्रमेश आणि प्रथमेश ला वनिता-नम्रता ट्रेनमध्ये भेटतात , गौरव वरचा पाठ्यपुस्तकातला धडा , विशाखा-पाहुणे कलाकर यांच एक बायकोच्या वाढदिवसासाठी हॉटेलमध्ये जाउन गाणी गायचं एक स्कीट होत , एक क्रीकेट मॅच वालं स्कीट , भोजने आणि गौरव चं ईलेक्ट्रीशयन वालं पहिल स्कीट , भोजने-प्रसाद-नमाची अगं अगं आई वाली स्कीट्स , गौरव चे केस जातात ते स्किट ज्यात मोटे-गोस्वामी आले होते , श्रमेश-प्रथमेश ची काही काही अकबर-सलीम वाली स्किटस अशी बरीच स्कीट्स सदाबहार आहेत . परत परत बघितली तरी मजा येते .
प्रभाकर मोरे , प्रसाद खांडेकर , बने या लोकानी स्त्री पात्र केली आहेत पण ती कधी हिडीस नाही वाटली . एका स्कीट मध्ये तर दाढीवाला दत्तू साडी नेसून होता , पण जराही विचित्र वाटला नाही - छान कॅरी केला होता एकंदरीत प्रकार .
प्राजक्ता ओरडते जरा जास्तच , कपडे प्रसंगानुरुप नसतात पण जे घालते ते तिला फार शोभून दिसतं . तिचे वेगवेगळे लूक्स , साड्यांचे रंग , नाजूक दागिने आणि प्रसन्न हास्य - ती गोडच दिसते .
मी पण कधी हा प्रोग्राम पाहिला नव्हता. आत्ता काही महिन्यापुर्वी बरेच भाग पाहिले. गौरव मोरे बेश्टेश्ट वाटला. नम्रता सुभेदार बायांत बेश्ट. ते चौगुले व प्रुथ्विक उत्तम काम करतात पण मला हसुच येत नाही म्हणुन त्यांचे भाग मी कटाप करते.
एका भागात पंढरीनाथ कांबळेनी जुन्या ऐतिहासिक नाटक कलाकाराचा रोल केला होता… तो मला व्यक्तीशः सर्वोत्तम भाग व अभिनय वाटला होता (जितके पाहिले त्यात). हसवता हसवता रडवणे हा (मला खरंतर आवडत नसलेला) प्रकार आजवर मी पाहिलेल्यात उत्कृष्ट वाटला. झाडुन सगळे खरंच रडले अॅक्टर्स आणि जज. पुन्हा शोधुन पहावा लागेल.
हवा येऊ द्या सुरू झालं होतं तेव्हा त्याचे बरेचसे भाग आवडायचे. हळूहळू ते कमी होत गेलं आणि मग बघणं बंद केलं. रोज रोज नावीन्य कुठून आणतील ते? मग तोचतोचपणा येतो. हास्यजत्रा कार्यक्रमाचंही तसच आहे. सध्या काही स्कित्स आवडतात, आधी जास्त आवडायचे. काही दिवसांनी कंटाळा येईल. आत्ता तुलनेत हास्यजत्रा चांगला वाटतो कारण तो ह ये द्या पेक्षा थोडा नवीन आहे.
Submitted by हरचंद पालव on 24 August, 2023 - 17:44
चला हवा येऊ द्या, हस्याजात्रा
चला हवा येऊ द्या, हस्याजात्रा असे शो आवडणाऱ्या लोकांचं मला कुतूहल वाटतं. कारण या शोमध्ये कलाकार एकसे एक पाणचट जोक मरतात आणि पब्लिक पण कधी जोक न ऐकल्यासारखी हसत सुटते. त्यामुळे हा शो आवडणारी पब्लिक खऱ्या आयुष्यात कधी मित्रांसोबत, घरच्यांसोबत जोक्स मारून हसतात की नाही अशी शंका येते.
कलाकार चां गले आहेत . मला
कलाकार चां गले आहेत . मला प्राजक्ता माळीच असह्य होते. एक तर तिचे कपडे विचित्र गावठी फॅशनचे असतात. आजिबात शोभत नाहीत. तशी सुंदर आहे ती. व ओरडा आरडा फार करते. पूर्वी मी बघत असे हा कार्यक्रम आजकाल मागे पड ला आहे. रील्स दिसत रहतात. समीर चौगुले बेस्ट.
खर आहे..प्राजक्ता माळीचा आरडा
खर आहे..प्राजक्ता माळीचा आरडा ओरडा सोडला तर खरंच छान असतात काही काही skits..... Pruthvik Pratap सुंदर काम करतो...बाकीचे कलाकारही मस्त..
माझा आवडता कार्यक्रम..
माझा आवडता कार्यक्रम.. मनसोक्त हसवतो.. कलाकार सगळेच छान काम करतात... गौर्याची खुप वाट लावतात सगळे
मला हास्य जत्रा तिच्या
मला हास्य जत्रा तिच्या वेगळेपणामुळे आवडते. त्यांच्या प्रहसनात पुरुष साड्या नेसत नाहीत. कुठल्यातरी सिनेमावर आधारित प्रहसन ते करत नाहीत. प्रत्येक विषय स्वतंत्र असतो. याच कलाकारांचं पोष्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका विनोदी आणि करुण होती.
यांचे विनोद केवळ शाब्दिक नसतात ते प्रसंगानुरूप येतात. मुद्दामहून घुसडलेत असं वाटतं नाही. त्यातही ते बहुतेक वेळा पातळी सोडून नसतात.
प्राजक्ता माळी एवढं सातत्याने समालोचन करते म्हणजे ते लोकांना आवडतं.
लोकांना काय आवडतं याचा आणि
लोकांना काय आवडतं याचा आणि टिव्हीवरच्या कार्यक्रमांचा संबंध नाही. ज्याला जसे वाटेल ते तो दाखवतो, लोक पर्याय नसल्याने बघत बसतात.
नाईलाजात ईलाज असेल ते बघितले जाते, मग तेच लोकांना आवडते असे समजून तसेच कार्यक्रम इतर चॅनेल्स वर येत राहतात.
कपिल शर्मा शो मधे पुरूषांनी सतत बायकांची हिडीस सोंगं आणायची हे लोकांना आवडतं का हे समजायला मार्ग नव्हता. कपिल शर्मा शो चं रेटिंग बरं म्हणून चहयेद्या वाल्यांनी सुद्धा सुरू केलं. एखाद , दुसर्या वेळी ठीक. पण सतत बाईचं सोंग करायला सांगितल्याने कलाकार कपिल शर्मा शो सोडून जातात. पैसेच सगळं काही नसतं.
सोशल मीडीयामधे जेव्हां या किळसवाण्या प्रकारावर लोकांनी आवाज उठवायला सुरूवात केली तेव्हां लक्षात आलं कि लोकांना हे नकोय.
लोकांना चांगले मनोरंजन दिले तर लोक ते नाकारतील असा का समज करून घेतलाय ? कारण लोकांना सवय लावली तर दीर्घ काळ तसा कंटेट देणं अशक्य आहे ही निर्मात्यांची अडचण आहे. पोस्ट लवकर बंद केली हा कौतुकास्पद निर्णय आहे.
जत्रा त्यातल्या त्यात बरी आहे. चांगले आहे म्हणवत नाही. समीर विशाखा या जोडीने जत्रा फेमस केली.
सई ताम्हणकरच्या कमेण्ट्स हा एका वेगळ्या स्किटचा विषय आहे. कुठल्या अँगलने तिला जज्ज बनवलेय ?
माझे फेवरिट आवली बावली पावली
माझे फेवरिट आवली बावली पावली चवली.
त्यानंतरही मच्छिंद्र कांबळे,
त्यानंतरही मच्छिंद्र कांबळे, विजय चव्हाण भरत जाधव
>>>> मच्छिंद्र कांबळे नव्हे मच्छिंद्र कांबळी.. वस्त्रहरणवालेच ना !!
माझाही आवडीचा कार्यक्रम,
माझाही आवडीचा कार्यक्रम, सहकुटुंब बघता येईल असा एकमेव कार्यक्रम
कित्येकदा स्किट गंडतात, विषय फसतो, हसू येण्यासारखे काय होतं यात हे कळत नाही
पण तरीही कित्येक स्किट धमाल आणतात
नम्रता संभेराव सगळ्यात बेस्ट, लॉली पासून बिहारी, मारवाडीभाभी ते अग अग आई म्हणणाऱ्या लेकराची आई इतकं भन्नाट ट्रान्सफॉर्म करते ना त्याला तोड नाही
तशीच शिवाली परब, फक्त लहान मुलीचा गेटअप सोडून
राजकन्या ते मिस मोना जबरदस्त काम
प्रियदर्शनी तर कसली सुंदर दिसते, गालावरच्या खळ्या एकदम मोहक
त्या मानाने रसिका आणि चेतना लिमिटेड अभिनय करतात
वनिता खरात पण कधी कधी असह्य वाटते
इशा डे लाऊड होते अनेकदा पण टायमिंग भारी असतं
प्राजक्ता माळी ला काही बोलायचं नाही
आमच्यासारखे कित्येकजण आहेत जे फक्त तिला बघायला म्हणून पहिल्या सेकंदापासून डोळे लावून बसतात
तिचे ओरडणे डोक्यात जातं खरंय पण वाह दादा वाह फेमस झालंय तिच्यामुळे
पुरुष कलाकारांमध्ये सगळ्यात आवडतात ती पृथ्वीक प्रताप आणि ओंकार राऊत ची स्किट
शंकऱ्या आणि शितली ची गावातली लव्ह स्टोरी तर कसली मस्त फुलवत नेलेली त्यांनी
गौरव मोरे चे काही काही पंचेस अफाट असतात, एका स्किट मध्ये तो इशा डे ला विचारतो काय झालं रडायला, तुमचेच स्किट पाहिलेत का तुम्ही
प्रभाकर मोरे भयानक बोर, आणि त्यांची बायको रसिका आणि दत्तू हे तर फार बोर
दत्तू चा हिरवा टोळ झालेला एपिसोड तर अशक्य खतरनाक आहे
मला पण आवडते हास्यजत्रा. आधी
मला पण आवडते हास्यजत्रा. आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक "हाही असाच पाणचट कार्यक्रम असणार" अशा विचाराने पाहिलाच नव्हता! गेले २ वर्ष पहातेय , केव्हाही कोणतंही जुनं स्किट पाहिले तरी आवडते आता. चहयेद्या पेक्षा अगदीच वेगळि जातकुळी आहे याची. कलाकार उत्तम आहेतच पण मुख्य लेखन दिग्दर्शन फार मस्त असते.
जत्रा त्यातल्या त्यात बरी आहे
जत्रा त्यातल्या त्यात बरी आहे. चांगले आहे म्हणवत
नाही. समीर विशाखा या जोडीने जत्रा फेमस
केली. >>> नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब इ. आहेतच की.
•••••••
कित्येकदा स्किट गंडतात, विषय फसतो, हसू
येण्यासारखे काय होतं यात हे कळत नाही >> नाही हो, असं कधीकधी होत असेल ; पण स्किट्स च्या क्वालिटी मध्ये सातत्य असते.
प्राजक्ता माळी ला काही बोलायचं नाही
आमच्यासारखे कित्येकजण आहेत जे फक्त तिला
बघायला म्हणून पहिल्या सेकंदापासून डोळे लावून
बसतात >> हो. हे मान्य करावेच लागेल. थॅंक्यू.
•••••••
@maitrayee - चहयेद्या पेक्षा अगदीच वेगळि
जातकुळी आहे याची. कलाकार उत्तम आहेतच पण
मुख्य लेखन दिग्दर्शन फार मस्त असते. >> अगदी खरं. Thank you
•••••••
मला हास्य जत्रा तिच्या वेगळेपणामुळे आवडते.
त्यांच्या प्रहसनात पुरुष साड्या नेसत नाहीत.
कुठल्यातरी सिनेमावर आधारित प्रहसन ते करत
नाहीत. प्रत्येक विषय स्वतंत्र असतो. याच
कलाकारांचं पोष्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका
विनोदी आणि करुण होती. >>> well said ; पण सिनेमावर आधारित प्रहसन करण्यात काय हरकत आहे.
>>>>सिनेमावर आधारित प्रहसन
>>>>सिनेमावर आधारित प्रहसन करण्यात काय हरकत आहे.>>>
संपूर्ण नवा विषय आणि सिनेमा आधारित विषय यात पूर्णतः नवीन कल्पना मला अधिक भावते. सिनेमावर आधारित विषयावर लेखकाला जास्त डोकं लावावं लागतं नाही.
@दत्तात्रय साळुंके - हो बरोबर
@दत्तात्रय साळुंके - हो बरोबर.
मी फार रेग्युलरली बघायचे
मी फार रेग्युलरली बघायचे हास्यजत्रा. हा एपिसोड पाहिलेला नाही असं झालेलं नाही. विशाखा सुभेदार आणि समीर चौगुलेचा आचरटपणा आणि तेच तेच मुलाखतीतले जोक्स अगदीच प्रेडिक्टेबल झाले होते आणि सगळे परिक्षक फार कौतुक करायचे त्यांचं. पण ती बाहेर पडल्यावर बर्याच नवीन टॅलंटला न्याय मिळाला असं वाटतं. मला ओंकार भोजनेही फार आवडायचा. रोहित माने, श्रमेश, प्रथमेश, पृथ्विक, वनिता, नम्रता जास्त आवडतात. अर्थात दत्तू मोरे, निखिल बनेही आवडतातच.
आवली पावली, लॉली, मोना डार्लिंग वगैरे मुळीच आवडत नाही. पण युट्युबवर बघत असल्यामुळे फॉर्वर्ड मारता येतं.
प्राजक्ता माळीच्या कपड्यांपेक्षा सई ताम्हणकरला दिलेले कपडे यडचाप असतात आणि ती त्यात दिसतेही यडी. तिला मुळीच कॅरी करता येत नाहीत असं वाटतं. ती स्टेजवर जाऊन पुरुषांचे हात कशाला किस करते हे न उलगडलेलं कोडं आहे
मुळात ती कॉमेडी शो ची जज का
मुळात ती कॉमेडी शो ची जज का आहे? ती जो करते तो अभिनय विनोदी नसतो हास्यास्पद असतो
मुळात ना तिला काही बोलता येत, एकदम मस्त छान खूप आवडला या पलीकडे काही सांगता येत नाही
त्या मानाने प्रसाद ओक कधी कधी चांगले अनलिसस करतो
Mhj मधूनच कधी बघायला मजा येते
Mhj मधूनच कधी बघायला मजा येते.
दिग्दर्शन , लेखन, आणि acting हे टीम work tyana उत्तम जमलय.
आणि हो हसविणे हे अत्यंत कठीण काम आहे.
अवली पावली कोहली
शितली
मोना darling
Chanchal मजनू
बॉस विशाखा, ईशा डे
जाऊ या गप्पांच्या गावा
डॉली
ही काही पटकन आठवणारी आणि हमखास आवडणारी skits
असेही काही कलाकार झाले
असेही काही कलाकार झाले ज्यांनी हे करून दाखवलं मराठी मनोरंजन क्षेत्राच्या सुरुवातीच्या काळात दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेते चित्रपट निर्माते दादा कोंडके यांनी आपल्या चित्रपटांतून नाटकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पुढे लक्ष्या व अशोक सराफ या जोडीने आपल्या अभिनय आणि संवाद फेक करण्याच्या विशिष्ट स्टाईल्सने निखळ हास्य निर्मिती करत मनोरंजन विश्वात आपला अवीट ठसा उमटवला.
त्यानंतरही मच्छिंद्र कांबळे, विजय चव्हाण भरत जाधव, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर प्रशांत दामले, क्रांती रेडकर, भाऊ कदम मकरंद अनासपुरे अशा कलाकारांनी नाटक चित्रपट आपलं खूप करमणूक>>>>
पू. ल. देशपांडे आणि
दिलीप प्रभावळकर ही महत्वाची नाव राहिली.
>>त्या मानाने प्रसाद ओक कधी
>>त्या मानाने प्रसाद ओक कधी कधी चांगले अनलिसस करतो<<
कार्यक्रमाचा तो भाग माझ्यामते रिडंडंट आहे. दोन्हि परिक्षकांना नारळ देउन निर्मात्यांनी ते पैसे लेखनाकडे वळवावे..
>>ती स्टेजवर जाऊन पुरुषांचे हात कशाला किस करते<<
त्या प्रकाराला येड्यांनी कायतरी नांव सुद्दा दिलं होतं, जणु काहि तो अगदि रेर पुरस्कार आहे...
गौर्या बेस्ट, समीर चौगुले बर्याचदा डोक्यात जातो. पृथ्विक, दोन्हि ओंकार (भोजने, राउत) सरप्राइज पॅकेज, मोरे, कदम अंडर्युटलाय्ज्ड...
@छन्दिफन्दि :-
@छन्दिफन्दि :-
दिग्दर्शन , लेखन, आणि acting हे टीम work tyana
उत्तम जमलय. >> अगदीच.
••••••
@राज :-
गौर्या बेस्ट, पृथ्विक, दोन्हि ओंकार (भोजने, राउत)
सरप्राइज पॅकेज, मोरे, कदम अंडर्युटलाय्ज्ड...>>
समीर चौगुले बर्याचदा डोक्यात
जातो. >> माफ करा सर ; पण ही जरा मला अतिशयोक्ती वाटली. अहो प्रत्येकाची स्टाईल असते. हो आता सारखा तोचतोचपणा आला तर कंटाळवाणा वैगेरे वाटूच शकतो. पण ते शेवटी प्रेक्षकांची करमणूकच करत असल्याने ' डोक्यात जातो ' हे जरा.. तुम्ही जसं आपलं मत मांडलत, तसं मी माझं सांगतोय एवढंच. बाकी काही नाही. प्रतिसादाबद्दल थॅंक्यू.
आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक
आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक "हाही असाच पाणचट कार्यक्रम असणार" अशा विचाराने पाहिलाच नव्हता! >>> मै - माझाही साधारण असाच अनुभव आहे. मी कायम तुकड्यातुकड्यांत पाहिला आहे. पूर्ण स्किट चांगले जमले आहे असे फार वेळा होत नाही पण मधेमधे चांगले विनोद जमून जातात. It grows on you.
मला परीक्षक म्हणून सई व प्रसाद हेच रूळलेले वाटतात. त्यांचे प्रतिसाद बर्याचदा बरोब्बर काहीतरी टिपतात. इतर उपरे वाटतात त्यामानाने. पण तो माझ्या सवयीचाही भाग असेल.
ते श्रमेश-प्रथमेश स्किट्स असतात त्यातील पल्लेदार भाषेचे/वाक्यांचे नमुने अनेकदा धमाल असतात. त्यात अनेकदा स्वतःवरच केलेले विनोद असतात - मराठीत जरा ते कमीच आहे.
सई आणि प्राजक्ताचे कपडे मात्र तेथील एकूण डेकोरमशी टोटली फटकून असलेले वाटतात.
सगळेच मराठी विनोदी कार्यक्रम महा-लाउड असतात. ते जरा कमी करायला पाहिजे. आणि सतत वाजणारे ट्यांग-टुंग सुद्धा. पब्लिकला विनोद आपोआप कळू दे. टांगटुंगची गरज नाही.
नम्रता, समीर, ओंकार भोजने,
नम्रता, समीर, ओंकार भोजने, रोहित माने, विशाखा आणि फार थोडा वेळ होता पण प्रचंड ताकदीचा कॉमेडियन भुषण कडू हे सगळ्यात आवडते.
नम्रता तर अभिनेत्री म्हणून फारच उच्चकोटीची आहे असे वाटते.
नम्रता तर अभिनेत्री म्हणून
नम्रता तर अभिनेत्री म्हणून फारच उच्चकोटीची आहे
>>>> सहमत.
वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारी तिची देहबोली आणि चेहऱ्यावरचे हावभाव... एकदम भारी!!
@रिक्शाचालक :- अ बे गाढवा,
क. पु. टा. आ.
मला परीक्षक म्हणून सई व
मला परीक्षक म्हणून सई व प्रसाद हेच रूळलेले वाटतात.
त्यांचे प्रतिसाद बर्याचदा बरोब्बर काहीतरी
टिपतात. >> बरोबर.
वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारी तिची देहबोली आणि
चेहऱ्यावरचे हावभाव... एकदम भारी!! >> हो ना. She is fantastic.
आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक
आधी १-२ वर्षे का कुणास ठाऊक "हाही असाच पाणचट कार्यक्रम असणार" अशा विचाराने पाहिलाच नव्हता! >>> सेम . पण हा कार्यक्रम पहायला लागल्यापासून चहयेद्या एक्दम पाणचट वाटायला लागला .
काही काही स्किट्स , विषय , सादरीकरण , प्रासंगिक विनोद एक्दम भन्नाट असतात .
द्वियर्थी संवादांची रेलचेल असते बर्याचदा पण कधीही कमरेखालचे विनोद नसतात .
दोन्ही ओम्कार , नमा , शिवाली , पृथ्विक ही आवडती मंडळी माझी . गौरव मोरे , निखील आणि दत्तू यांच्या अभिनयात प्रचंड सहजता आहे .
कधी कधी समीर चौघुले ही आवडतो . अन्शुमन विचारे ही आवडायचा आणि कधी कधी पॅडी.
नमा,चेतु आणि वनिता यांची सासू सुनेची स्किट्स , निमिष , शिवाली आणि समीरची "शिवाली हे खर आहे " वाली स्किट्स , श्रमेश आणि प्रथमेश ला वनिता-नम्रता ट्रेनमध्ये भेटतात , गौरव वरचा पाठ्यपुस्तकातला धडा , विशाखा-पाहुणे कलाकर यांच एक बायकोच्या वाढदिवसासाठी हॉटेलमध्ये जाउन गाणी गायचं एक स्कीट होत , एक क्रीकेट मॅच वालं स्कीट , भोजने आणि गौरव चं ईलेक्ट्रीशयन वालं पहिल स्कीट , भोजने-प्रसाद-नमाची अगं अगं आई वाली स्कीट्स , गौरव चे केस जातात ते स्किट ज्यात मोटे-गोस्वामी आले होते , श्रमेश-प्रथमेश ची काही काही अकबर-सलीम वाली स्किटस अशी बरीच स्कीट्स सदाबहार आहेत . परत परत बघितली तरी मजा येते .
प्रभाकर मोरे , प्रसाद खांडेकर , बने या लोकानी स्त्री पात्र केली आहेत पण ती कधी हिडीस नाही वाटली . एका स्कीट मध्ये तर दाढीवाला दत्तू साडी नेसून होता , पण जराही विचित्र वाटला नाही - छान कॅरी केला होता एकंदरीत प्रकार .
.
प्राजक्ता ओरडते जरा जास्तच , कपडे प्रसंगानुरुप नसतात पण जे घालते ते तिला फार शोभून दिसतं . तिचे वेगवेगळे लूक्स , साड्यांचे रंग , नाजूक दागिने आणि प्रसन्न हास्य - ती गोडच दिसते
आम्हाला देखील आवडते
आम्हाला देखील आवडते हास्यजत्रा... गौरव मोरे आणि पृथ्वीक चे स्किट आवडायचे.. चौगुले आणि सुभेदार स्कीपच करतो... फार ओव्हर असतात...
मी पण कधी हा प्रोग्राम पाहिला
मी पण कधी हा प्रोग्राम पाहिला नव्हता. आत्ता काही महिन्यापुर्वी बरेच भाग पाहिले. गौरव मोरे बेश्टेश्ट वाटला. नम्रता सुभेदार बायांत बेश्ट. ते चौगुले व प्रुथ्विक उत्तम काम करतात पण मला हसुच येत नाही म्हणुन त्यांचे भाग मी कटाप करते.
एका भागात पंढरीनाथ कांबळेनी जुन्या ऐतिहासिक नाटक कलाकाराचा रोल केला होता… तो मला व्यक्तीशः सर्वोत्तम भाग व अभिनय वाटला होता (जितके पाहिले त्यात). हसवता हसवता रडवणे हा (मला खरंतर आवडत नसलेला) प्रकार आजवर मी पाहिलेल्यात उत्कृष्ट वाटला. झाडुन सगळे खरंच रडले अॅक्टर्स आणि जज. पुन्हा शोधुन पहावा लागेल.
हवा येऊ द्या सुरू झालं होतं
हवा येऊ द्या सुरू झालं होतं तेव्हा त्याचे बरेचसे भाग आवडायचे. हळूहळू ते कमी होत गेलं आणि मग बघणं बंद केलं. रोज रोज नावीन्य कुठून आणतील ते? मग तोचतोचपणा येतो. हास्यजत्रा कार्यक्रमाचंही तसच आहे. सध्या काही स्कित्स आवडतात, आधी जास्त आवडायचे. काही दिवसांनी कंटाळा येईल. आत्ता तुलनेत हास्यजत्रा चांगला वाटतो कारण तो ह ये द्या पेक्षा थोडा नवीन आहे.
हास्यजत्रा बराच क्रिएटिव्ह
हास्यजत्रा बराच क्रिएटिव्ह आहे चहयेद्यापेक्षा. मला तो बघवत नाही अजिबात.
सुनिधी, पृथ्विक, नम्रता संभेरावचं शंकर शितली स्कीट बघ आवडतंय का ते.
हो, ते स्किट चांगलं आहे.
हो, ते स्किट चांगलं आहे.
Pages