Submitted by ढंपस टंपू on 17 August, 2023 - 22:22

तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ?
आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमिताभने भगवान दादाची स्टाइल
अमिताभने भगवान दादाची स्टाइल उचलली, लहान लहान स्टेप्स टाकायच्या.
तसे 'मला बोवा गोविंदाचा डान्स
तसे 'मला बोवा गोविंदाचा डान्स आवडतो' असे पटकन कुणी म्हणते का?
>>>>
गोविंदाच्या नाचाचां सेपरेट फॅन बेस आहे.

ते सुद्धा डेव्हिड धवन फेम गोविंदाच नाही तर त्याच्या हत्या, इलजाम, खुदगर्ज वगैरे चित्रपटकाळापासून
तुमचे आणि माझे अनुभव विश्व कदाचित वेगळे असावे त्यामुळे तुम्हाला कल्पना नसावी. पण हे सत्य आहे. आमच्याइथे चांगला डान्स करणाऱ्याला गोविंदाच म्हटले जायचे. तो नाचाचा एक बेंच मार्क होता
मिथुनचा कोणी पंखा नाहीये का
मिथुनचा कोणी पंखा नाहीये का इकडे कुणी?
मिथुनचा कोणी पंखा नाहीये का
मिथुनचा कोणी पंखा नाहीये का इकडे कुणी?
>>>>>
मीच आहे
पण फार लहानपणी. डिस्को डान्सर आणि कसम पैदा करनेवाले की मिथूनचा..
म्हणजे इतके लहानपणी की इलजाम मधील गोविंदाला तो नाचतो म्हणून मी मिथुनच समजायचो
गोविंदा
गोविंदा
शाहिद
माधुरी
राणी मुखर्जी
गोविंदा म्हटल्याबरोबर डब्बू
गोविंदा म्हटल्याबरोबर डब्बू अंकलची आठवण झाली.
मिथुन आला तेव्हां नाचणारे
मिथुन आला तेव्हां नाचणारे नायक मोजके होते. त्यात थोडी कंबर, थोडं ढुंगण हलवलं कि "काय भारी डान्सर" म्हणायचे. त्यात डिस्को म्हणजे काय हे माहिती नसताना मिथुन जे काही करेल ते मॉडर्न जगातलं, आपल्याला त्यातलं काही कळत नाही, तर बोला कशाला म्हणून हाताची पाचही बोटं आ वासलेल्या चंबूत कोंबून बघत रहायचं. उलट मिथुनचा डान्स ही इन थिंग असल्याने आपल्याला हे जमलं तर कॉलेजमधे इंप्रेशन मारता येईल म्हणून मिथुनचे डान्स हिट झाले. त्याचे ते डान्सेस बघताना हास्यास्पद वाटतात.
गोविंदा हा अमिताभच्या तोडीचा एंटरटेनर आहे यात शंकाच नाही. पण परत तेच. त्याने अनेक नायकांच्या स्टेप्स मिक्स करून चालू डान्स स्टाईल बनवली. त्यात दादा कोंडके सारखे हावभाव, मधेच दोन दात बाहेर निघेलसे कोंडकीय हसू तर लगेच चेहरा फ्लॅट हे लोकांनी सहनच केलं. पण जे काही करत होता ते चालून जात होतं.
जे अ-नर्तक आहेत त्यांचीच नृत्ये जास्त गाजली आहेत.
जसे धर्मेन्द्रचे मै जट यमला पगला दिवाना, अरे रफ्ता रफ्ता देखो किंवा जमाना कहे नौकर बिवी का.
अमिताभचं खईके पान बनारस वाला .
शास्त्रशुद्ध नाच बघायला सामान्य प्रेक्षक जातच नाही.
हेमामालिनी, वैजयंती मालाच्या शास्त्रीय नृत्यापेक्षा शास्त्रीय वाटतीलशी जयाप्रदाची सरगम मधली नृत्ये जास्त गाजली.
श्रीदेवीचे हवा हवाईच आठवते.
जितेंद्रची कारवा मधली किंवा हमजोली मधली लयबद्ध नृत्ये आजही बघायला आवडतात. पण त्याला चांगले दिवस आले ते पद्मालया स्टुडीओज आणि साऊथच्या बीए, बीएससी डिग्र्या लावणार्या निर्मात्या दिग्दर्शकांच्या सिनेमातल्या कवायतींमुळे.
हिरविनी राहिल्याच का शेवटी ?
कुमकुम, कुक्कू, जयश्री मीना टी, पद्मिनी -रागिनी , मेहमूद ची बहीण असे सगळे डान्सर्सच होते. त्यांच्यावर वेगळाच धागा काढा. त्यातही हेलन शिकलेली नाही.
मुमताज डान्समुळे एव्हढी फेमस झाली कि लीड रोल्स मिळू लागले. पद्मिनीलाही मिळाले. अशा बर्याच असतील.
आता कंटाळा आला.
संध्याची भयनृत्ये विसरून कसे
संध्याची भयनृत्ये विसरून कसे चालेल ?
>>म्हणजे जसे वैजयंती माला
>>म्हणजे जसे वैजयंती माला वगैरे संबंधात म्हटले जाते तसे 'मला बोवा गोविंदाचा डान्स आवडतो' असे पटकन कुणी म्हणते का?<<
मी आहे.
नाच कुठल्याहि प्रकारचा (क्लासिकल, सेमाय-क्लासिकल, गणपती मिरवणुक) असला तरि तो नाचणार्याच्या सहज देहबोलि, मुद्राभिनयाने खुलतो. उदा. भगवानदादा फक्त हात वर खाली करत ढुंगण हलवुन पब्लिकला पागल करायचे..
माझे आवडते, उतरत्या क्रमाने -
गोविंदा, मिठुन, बच्चन, शाहिद कपूर
वहिदा रेहमान, माधुरी, वैजयंती माला, हेमा मालिनी
नाच फक्त वरची मंडळी करतात, बाकिचे करतात तो अंगविक्षेप...
शाहिद कपूर मस्त आहे, एकदम
शाहिद कपूर मस्त आहे, एकदम एफर्टलेस. रणबीर कपूर - पूर्वीचा - दिलीवाली गर्ल्फ्रेन्ड, बदतमीज दिल वगैरे बघताना दीपिकाकडे लक्ष जात नाही. (आता पार जंकी दिसतो ). रणवीर सिंग पण आवडतो मला. जबरद्स्त एनर्जेटिक. लहू मूह लग गया, एवी एवी लूट गया , बाजीराव, खली बली डान्स! अनबिलिवेबल! आता पुष्पामधे अल्लू अर्जुन चा पण डान्स - कदाचित त्याच्या त्या स्वॅग मुळे लय भारी वाटला. बाकी नाही पाहिलेत त्याचे.
ह्रितिक आणि टायगर दोघांकडे स्किल उत्तम आहे, कदाचित वरच्या सर्वांपेक्षा बेटर, पण मला ते कवायती टाइप जास्त वाटतात त्यामुळे पर्सनली तितके आवडत नाहीत.
@राज गुड पोस्ट
@राज गुड पोस्ट
पण मला वाटत तुम्ही हृत्तिक , करिष्मा आणि करीनाला का वगळावे?
त्या एका पिक्चर मध्ये -दिल तो पागल है-माधुरी आणि करिष्मा ह्यांची डान्स कॉंंपिटीशन होती . मला वाटत त्यात करिष्मा विनर होती.
BTW मायकेल जाक्सन ज्याने करोडो लोकांना वेड लावलं तो कुठला डान्स करत होता.
ह्रितिक आणि टायगर दोघांकडे
ह्रितिक आणि टायगर दोघांकडे स्किल उत्तम आहे, कदाचित वरच्या सर्वांपेक्षा बेटर, पण मला ते कवायती टाइप जास्त वाटतात त्यामुळे पर्सनली तितके आवडत नाहीत.
>>>>
हे मी नेहमी ह्रतिक टायगरचा तुलनेत बोलतो.
मला टायगर कवायती टाईप वाटतो. ह्रतिक नाही म्हणून जास्त आवडतो. त्याने ज्या एकेक आयकोनिक स्टेप्स दिल्या आहेत. ज्यावर स्वतंत्र लेख बनेल
जावेद जाफ्रीचं बोल बेबी बोल
जावेद जाफ्रीचं बोल बेबी बोल पण आवडलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी टीव्हीवर त्याने अप्रतिम परफॉर्मन्सेस दिले होते. युट्यूबवर होते. आता सापडत नाहीत. त्यानंतर प्रभू देवा आला. जाजा ने का बंद केले डान्स माहिती नाही. कुणीतरी सांगितलं कि त्याच्या हाडांना इजा झाली.
फरहा खान बरोबरचा त्याचा एक परफॉर्मन्स
https://www.youtube.com/watch?v=FLz7PE7CQOQ
जावेद जाफ्रीचं बोल बेबी बोल
जावेद जाफ्रीचं बोल बेबी बोल पण आवडलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी टीव्हीवर त्याने अप्रतिम परफॉर्मन्सेस दिले होते. युट्यूबवर होते. आता सापडत नाहीत. त्यानंतर प्रभू देवा आला. जाजा ने का बंद केले डान्स माहिती नाही. कुणीतरी सांगितलं कि त्याच्या हाडांना इजा झाली.
BTW मायकेल जाक्सन ज्याने
BTW मायकेल जाक्सन ज्याने करोडो लोकांना वेड लावलं तो कुठला डान्स करत होता.
>>>
मायकेलचा बाकी मून वॉक आजवर कोणाचा तसा पाहिला नाही.
सध्या आमच्याकडे बीटीएस क्रेझ आहे. त्यावर एक वेगळा धागा काढता येईल. कोणी आहे का इथे त्या फेन क्लब मध्ये तर काढू
जावेद नावेद दोघे भाऊ सही होते
जावेद नावेद दोघे भाऊ सही होते. आणि तिसरा रवी बेहेल.. बुगी वूगी ने बालपण व्यापलेले
आताचे बंडल रिऍलिटी शो मात्र बिलकुल बघवत नाहीत..
ह्रितिक कवायत करतो. >>> लोल!!
ह्रितिक कवायत करतो. >>> लोल!!
एक पल का जिना ... कवायत हंं.
मला डान्स येत नाही तरी पहायला
मला डान्स येत नाही तरी पहायला खूप सहज वाटतो व खूप मजा येते ते म्हणजे गोविंदा. बेस्ट. अफलातुन माणुस. कमीतकमी हालचालीत जास्तीतजास्त भावना. त्याचे जुने टिपिकल खुदगर्ज वगैरे आवडत नाहीत. तसे सर्वजणच करायचे. पण त्याची खासियत डेविड धवनच्या गाण्यात खुलली. तो असताना करिश्मा, उर्मिलाकडेपण माझं लक्ष जात नाही.
शाहीद, र्हित्तिक भारी. पण शाहीदचे जात आठवेनात. र्हित्तिक टु पर्फेक्ट (जरा जास्तच) करतो जे मला भावत नाही व भावना पोचत नाहीत. म्हणजे चेहर्यावर एकच हसु, त्यात बदल नसतो.
दिपिकाचा नवरा भारी करतो. जबरदस्त. टाळ्या त्याच्यासाठी.
ऋषी डान्सर नव्हता पण काहीतरी होते त्याच्या नाचात, जे फार भारी व जवळचे वाटायचे. (तो कलाकारच भारी होता)
बायांत, श्रीदेवी, माधुरी, उर्मिला, करिष्मा, हेलन. प्रत्येकीचे आपापले भारीपण आहे.
गोविंदा Dance भारी करतो.
गोविंदा Dance भारी करतो. Expressions, सहजता आणि केवढा लवचिक असतो त्याच dance! त्याचे नाव माझ्या लिस्ट मध्ये खूप वर आहे
माझ्या लिस्ट मध्ये वैजयंती माला सगळ्यात वर (आम्रपाली तिच्या नृत्या करता परत परत पाहते, त्यात ती खरच कोणी अप्सराच वाटते. आणि सुनील दत्त म्हणजे uff too hot :),
श्रीदेवी, माधुरी दीक्षित, हृतिक (याचा Dance कवायत? Come on
बाकी couple dance हा वेगळा विषय आहे. त्यात डान्सर chemistry फार जरुरी आहे. त्यात धरम हेमा, अमिताभ परवीन बाबी(मच गय शोर), ऋषि नितु सिंग, गोविंदा करिश्मा कपूर आवडतात.
बरे झाले गोंद्या फॅन अवतरले
बरे झाले गोंद्या फॅन अवतरले धाग्यावर..
गोविंदा आणि त्याचा डान्स दोन्ही सर्वात शेवटी पार्टनरमध्ये आवडलेले आठवताहेत. त्यानंतर काही आठवत नाही त्याचे..
त्याचे जुने टिपिकल खुदगर्ज
त्याचे जुने टिपिकल खुदगर्ज वगैरे आवडत नाही..
>>>>
हो बरोबर आहे. पण प्रॉब्लेम त्या काळातले कोरिओ ग्राफर टिपिकल असल्याचा होता. गोविंदा चे डान्स स्किल तेव्हाही उठून दिसायचे..
हे खुदगर्जचे गाणे
https://youtu.be/tauUrxXWKCM?si=cXiLX_uPl72FX32L
किती बोर स्टेप्स आहेत सुरुवातीलाच. पण 27 व्या सेकंदाला तो जे करतो ते त्यावेळी गोविंदाच करू जाणे..
बहुधा अल्लू अर्जुन ने श्रीवल्ली गाण्यात याचेच स्लो वर्जन तर नाही ना केले असे आता बघताना वाटले
तुम मिलो तो सही या चित्रपटात
तुम मिलो तो सही या चित्रपटात एक प्रसंग आहे. नाना पाटेकरसमोर एक तृतीयपंथी व्यक्ती नाचते आणि म्हणते पैसा दे, मै तेरे वास्ते नाची रे. तर त्यावर प्रत्युत्तर म्हणून नाना पण नाचतो आणि म्हणतो, चल मैं भी नाचा, अब पैसा दे. त्याने केलेला तो जगातला सर्वात भारी डान्स आहे.
गो विं दा
गो विं दा
कोई शक हो तो आयडी देख लेना...
बेस्ट डान्सरच्या यादीत येणार
बेस्ट डान्सरच्या यादीत येणार नाही पण ज्याला नृत्याची जाण होती आणि अंगात लय होती असं एक ऑफबीट वाटू शकेलसं नाव म्हणजे राज कपूर. त्याच्या सिनेमात हीरोने नाचावं अश्या सिच्युएशन्स फारश्या नव्हत्याच. पण पडद्यावर गाणी सादर करण्याची त्याची ताकद मोठी होती. त्या तिघां भावंडात नृत्याच्या बाबतीत शशी कपूर अपवाद होता.
हेलन आणि माधुरी. बस्स.
हेलन आणि माधुरी. बस्स.
त्या गाण्यात नीलम चे केस कसले
त्या गाण्यात नीलम चे केस कसले मस्त आहेत!! या गाण्यावर नाचून ते गृहस्थ प्रसिद्ध झाले आणि त्यांना जाहिराती मिळाल्या होत्या ना?
मला नाचू शकणाऱ्या सर्व बॉलिवूड हिरोज चं कौतुक आहे.प्रत्येकाची वेगळी स्टाईल.
मला मतवाली नार ठुमक ठुम चली
मला मतवाली नार ठुमक ठुम चली जाए ह्या गाण्यावरचं वाहीदाचं नृत्य खूप आवडतं. दाणादाणकारी उड्या नाहीत, गर्र गिरक्या नाहीत. स्टेजच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत धावत सुटणं नाही, वामनावतारासारखं एक पाऊल ( पाय) जमिनीवर तर दुसरं पार आकाशात अशा हाडमोड्या स्टेप्स नाहीत. साध्या सोप्या त्या काळातल्या प्रचलित मुद्रा आणि पदन्यास. फार वेगात नव्हे. पण वाहीदाची काय ग्रेस आणि मुद्राभिनय! तिच्या कोपरापासून पुढच्या हातांची आणि बोटांची अप्रतिम हालचाल पाहात राहावी अशी.
आता म्हणजे कोणतीही स्टेप
आता म्हणजे कोणतीही स्टेप करायची तर एकदम कुठूनही वाकडं, क्षणात पालथं क्षणात उभं अश्या जोरदार वेग वाल्या याव्याच लागतात
उगाच नाही बिचाऱ्या लोकांना बॅक इंज्युरी होत.मला नोरा फतेही, अलु अर्जुन, ह्रितीक, प्रभुदेवा हे लोक जादूगार आहेत असं बरेचदा वाटतं त्यांचे नाच बघून.टॉप लेसी पोडी मधली ती तिरकं तिरकं लाट बनून आडवं पुढे सरकायची स्टेप, नोरा ची हाय गर्मी मधली सिग्नेचर स्टेप.नातू नातू तर कमालच आहे(कदाचित इथे चर्चा झाली तसं थोडं vfx ने वेग वाढवला असेलही.
माफ करा, हसु नका. सिजी म्हणजे
माफ करा, हसु नका. सिजी म्हणजे काय?
Computer Graphics
Computer Graphics
Pages