भारतीय सिनेसृष्टीत बेस्ट डान्सर कोण ?

Submitted by ढंपस टंपू on 17 August, 2023 - 22:22
file picture

तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ?

आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बडजात्यांच्याच 'विवाह' " - विवाह मधे बडजात्याने सुसंस्कारात वहावत जायला सुरूवात केली होती (उगाच घरी आलेल्या पाव्हण्याला 'जल?' विचारणे वगैरे) आणी त्याची परिसीमा (किंवा कडेलोट) 'मैं प्रेम किं दिवानी हूँ' मधे झाली.

फेफ Lol
माधुरीच्या नशिबात गचाळ कपडे, बटबटीत खोटे दागिने व भडक मेकअप, लांब लेहंगे-परकर आणि कुरळ्या केसांचा बॉब टाईप शोल्डर कट हेच होतं. कुठेही गेले तरी, 'कोयलसी तेरी बोली कुककुकुकूकू'. मला तर अजूनही नाईन्टिज मधे अडकल्यासारखी वाटते. आताही जज होऊन येते, तेंव्हाही यापैकी एकतरी सुव्हिनिअर घेऊन येते.

अस्मिता +१
राणी मुखर्जी केके एच एच मधे सुरेख कपड्यांत वावरते आणि गोविंदा बरोबर अचाट कपड्यांत अवतरते. मला वाटते त्यांच्या डीझायनर चा प्रॉब्लेम असावा.
दिपिका चा डिझायनर अफलातून आहे. भंसाली च्या चित्रपटांचा कपडेपट आणि दर्जा वेगळाच.
असो डान्स वर येऊयात Wink

अनुमोदन, हम आपके है कौ न व इतर बड जात्या पटांचा रोस्ट धागा काढा ना लापि. मनाव र घ्या.

राणी मुखर्जी केके एच एच मधे सुरेख कपड्यांत वावरते आणि गोविंदा बरोबर अचाट कपड्यांत अवतरते.
>>>

तेच तर म्हणालो
करन जोहर.. त्याचा सेन्स भारी आहे या बाबत

अनुमोदनासाठी सर्वांना धन्यवाद. Happy
--------
आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?

>>>>
https://youtu.be/HVZz-qlrNzw?si=UH3oBr4wmWeEdsoP
बेस्ट आहे की नाही माहिती नाही. पण मनोहरी ह्या बाहुबली मधल्या आयटम साँगची कोरिओग्राफी अतिउत्तम वाटते. याआधी स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय करणारी भरपूर आयटम गाणी आली आहेत उदा. मुन्नी बदनाम, बिडी जलैले, फेविकॉलसे, चिकनी चमेली इ. ज्यात हिरोईन एकटी व पन्नास शंभर लंपट आजूबाजूला, गॅन्ग रेप करता की काय वाटावं इतकं अंगचटीला येतात. Hyper sexual, स्टेप्स लाऊड, टिपिकल, गीताच्या ओळीही हिंग्लिश किंवा चीप असतात.

त्यात हे मनोहरी मधे असं हिरोला ऑब्जेक्टिफाय करणाऱ्या तीन नृत्यनिपुण ललना व उत्तम कोरिओग्राफी, ग्रेसफुल अदा. त्यात त्या मेल डान्सर्सच्या पाठीवरचा नाच, दोरखंड फेकून गुंडाळलेला व उलगडत केलेला नाच मला फारच नाविन्यपूर्ण वाटला होता. जबरदस्त सिन्क्रोनायझेशन आहे. मूळ तेलूगू शब्द तर संस्कृत वाटतात, त्यामुळे ऐकायलाही अद्भुत वाटलं होतं. कोरिओग्राफीमुळं हे माझं आवडतं आयटम साँग आहे. हे गाणं सेन्शुअल वाटतं, सेक्शुअल नाही. सुरवातीला त्या टिपिकल नाचणाऱ्या वाटतात, पण तो राज्यातला most eligible bachelor, युवराज आणि वीर असल्याने क्रश आहे असं दाखवलं आहे. फक्त हे गाणं बल्लावर शूट व्हायचं असतं अजून मस्त वाटलं असतं. Happy

आयटम सॉंग बद्दल सहमत.नाचाच्या स्टेप्स, गाणी चाल सर्व कॅची असलं तरी त्या आजूबाजूला मेल क्राऊड, हपापल्या स्टेप्स यामुळे बघायला नको वाटतं.

अस्मिता, माधुरीच्या कपडेपटाबद्दल पर्फेक्ट लिहिलं आहे. वाह वाह रामजी गाण्यात लक्ष सलमानवरच खिळून राहतं. असाच तिचा अक्षय खन्ना (आणि संजय कपूर) सोबत एक चित्रपट होता. त्यातही गाण्यांत अक्षय खन्नाच अधिक बघणेबल वाटला. अर्थात या दोघांपेक्षा माधुरी वयाने मोठी आहे आणि दिसतेही हा भागही आहे.

बेस्ट डान्सर असं नाही, पण कुमकुम सुद्धा नृत्यनिपुण होती ना? आशा पारेख पण भरतानाट्यम शिकलेली होती.
शर्मिलाला फार नाचायला मिळालेलं नाही. पण जेव्हा मिळालंय तेव्हा छान नाचलीय. अब चाहे माँ रूठे या बाबा या गाण्यात ती नाचलीय आणि काकाने अजिबात पदन्यास न करता नाच केलाय. गाणं संपता संपता भांगड्याच्या उड्या मारल्यात तेवढ्याच.

हेलनच्या आधी कक्कु या नर्तकीचं राज्य होतं. पतली कमर है, तिरछी नजर है बघा. या दोघींचे एकत्रही नाच असतील.

पहिल्या क्रमांकासाठी माझी पसंती वहिदा आणि पुरुषांत गोविंदा.

माझी वैजयंती माला व कमला हसन. वहिदा व गोविंदा पण ग्रेटच नाचतात. वहिदाचा गाइड मधला सर्प नृत्याचा प्रसंग ग्रेट आहे. व गोविन्दाचे पार्टनर व किसी डिस्को में जाये. मखणा . इन जनरल. स्वासमें स्वासमे गाण्यात कमल ज्या सहजतेने बीट पकडतो ते फार भारी आहे. व सागर संगम म मधले नाच. जया प्रदाला विसरले का लोक. मुझे नौलख्हा मंगवादे रे गाण्यातले तिचे हाताचे आविर्भाव अगदी नाजूक व सुरेख आसरग. नक्की बघा. किती बारकीशी पण स्फोटक नर्तिका. सरगम मधील नाचांवर लेख लिहिता येइल. सोनाली बेंद्रे एका गोविंदाच्या पिक्चर मध्ये दोन तीन गाणी आहेत त्यात अफलातून दिसली व नाचली आहे. तसेच चम चम करता है ये नशीला बदन. ऑसम गाणे.

अमा, सागर संगमम मधला विहीरावरचा नाच पाहिल्यानंतरच कमल हसन काय चीज आहे हे माहिती झाले.
जयाप्रदा चांगली डान्सर आहे. पण तिला उड्या का माराव्या लागतात सतत ?

सोनाली बेंद्रे आणि नाच? हजम नही हुव्या.

करन जोहर.. त्याचा सेन्स भारी आहे या बाबत>>> अर्रे बाबा क.जो. कपडेपट नाही बघत. त्यांचं क्रेडीट त्यांनाच ठेव.

टेरेन्स लुवीस चा इन्स्टा नुकताच पाहण्यात आला. लयीत नाचतो मस्तं!

आशू,
करन जोहरने कारकिर्दीची सुरुवात costume designer म्हणून केली होती. पुढेही त्याने हे केले आहे. हे विकी वरून कॉपी पेस्ट करतो..

Karan Johar has worked as a costume designer for Shah Rukh Khan on many films like Dilwale Dulhania Le Jayenge (1995), Dil To Pagal Hai (1997), Duplicate (1998), Mohabbatein (2000), Main Hoon Na (2004), Veer-Zaara (2004), and Om Shanti Om (2007).

हे पिक्चर त्याचे नव्हते. तरी त्याने हे काम केले. मग स्वताच्या पिक्चरमध्ये तो यात लक्ष घालणार ना.. सेन्स आहे त्याला कपडेपटाचा Happy

ह्रितिक रोशन, वैजयंती माला (वैजयंती माला हाउसफुल सोलो डान्स पर्फॉर्मन्स करत असे. चित्रपटात तुकड्या तुकड्याने चित्रित केलेले नृत्य हे कलेचा भाग स्पष्ट करत नाही)

अमा, सागर संगमम मधला विहीरावरचा नाच पाहिल्यानंतरच कमल हसन काय चीज आहे हे माहिती झाले.
जयाप्रदा चांगली डान्सर आहे. पण तिला उड्या का माराव्या लागतात सतत ?
>>
एका जितेद्र बरोबर्च्या चित्रपटात ते उडी मारुन स्क्रीन बाहेर जात आणि कपडे बदलुन खाली येत!

श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंकात जीवनकला यांच्या आगामी आत्मचरित्रातील अंश छापले आहेत. त्यात त्यांनी स्वतःची ओळख कुकू , हेलन यांच्यानंतर ज्या चार सहा जणी डान्सर म्हणून फेमस झाल्या त्यात मी होते, असे लिहिले आहे. मराठा तितुका मेळवावा हा चित्रपट, हंसता हुआ नूरानी चेहरा (यात सोबत नलिनी चोणकर आहे ) अशी आता लक्षात राहिलेली किंवा आधीपासून यांची म्हणून माहीत असलेली कामगिरी. वैशाख वणवा चित्रपटातल्या साडी दिली शंभर रुपयांची या गाण्यावरचा नाच गाजला होता म्हणे. तो शोधून पाहिला. आवडला.
या लेखात इतर अनेक डान्सर्सचा उल्लेख आला आहे. मधुमती, लक्ष्मीछाया , मिनू मुमताज, बेला बोस, कुमकुम , शीला वाझ

Pages