गदर २ - बॉक्स ऑफीस वर दंगल, रेकॉर्ड्स मागून रेकॉर्ड तोडले

Submitted by ढंपस टंपू on 11 August, 2023 - 07:26

अपेक्षेप्रमाणे सनी देओलच्या गदर २ ने अ‍ॅडव्हान्स बुकींगलाच नवीन रेकॉर्ड बनवले.
कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी, कोणत्याही एका सिंगल भारतीय भाषेतल्या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकींगला सर्वाधिक कमाई करत काल दिवस अखेर रु. १७.७३ कोटी रूपये कमावले.

ओ माय गॉड हा दुसरा चित्रपट गदर सोबत रिलीज झाला आहे. त्याने अ‍ॅडव्हान्स बुकींगला ४ कोटी रूपये कमावले.

रजनीकांतच्या जेलर ने तमिळ आणि तेलगू मिळून १८.५ कोटी रूपये अ‍ॅडव्हान्स बुकींगमधे कमावले. त्याच्या हिंदी डब्ड प्रिंटने कमी व्यवसाय केला.

जेलर ४५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला.
गदर २ फक्त ३२०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
पठाण च्या नावावर अ‍ॅडव्हान्स बुकींगचे रेकॉर्ड होते. रु ११ कोटी !
पठाण ९००० स्क्रीन्सवर रिलीज झालेला.
बाहुबली सुद्धा ९००० स्क्रीन्सवर रिलीज झालेला होता.

गदर २ हा विनर बनला आहे.

जेलर ची देश - विदेशातली कमाई (फक्त बॉक्स ऑफीस) ६५ कोटी रूपये + ३० कोटी रूपये = ९५ कोटी असा अंदाज आहे.
गदर २ पहिल्या दिवशीचा अंदाज ४० कोटी रूपये.

गदरचे स्क्रीन्स वाढवण्याची दाट शक्यता आहे.
हिंदी बेल्टमधे सिंगल स्क्रीन वर तिकीटासाठी प्रेक्षक दंगल करू लागले आहे. त्यांना आवरताना थेटर मालकांच्या नाकी नऊ आले आहेत.
मल्टी प्लेक्स मधे तीन पट शोज वाढवण्यात येत आहेत.

एकंदरीत शुक्रवारचा दिवस हा बड्या चित्रपटांच्या बिग फाईटचा आहे.
पहिल्या पाच दिवसात कोण जास्त धंदा करतो हे बघायचे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मै निकला गड्डी लेके..
आशिर्वाद द्या मंडळी. कामगिरी फत्ते करूनच येणार. Happy

आताच नवुचा शो अर्ध्यात सोडून आलो.
मी आणि कन्या गेलो होतो.
भ या ण आहे. कृपया पैसे वाया घालवू नये.
अतिशय बालिश प्लॉट, भयानक हिरो हिर्विन आणि आमिशा पटेल.
शक्य झाल्यास फक्त मध्यंतरानंतर बघा. माझी सहनशक्ती संपल्याने मी निघून आलो.
हार्डली चालीसभर माणसे होती.
न्यू प्राइड सिनेमा सांगली.

मागच्या आठवड्यात ओपनहेमर पाहिला होता, तो अतिशय सुंदर होता.

पैसा वसूल चित्रपट आहे. नक्कीच बघा. संपूर्ण थिएटर भरलेलं होत. रात्रीच्या शो लाही लोक रांगा लावून जात होते.

तारासिंगचा द्वेष ? शेम !! Lol

पॉप्युलर रिव्ह्यु
गदर ज्यांनी पाहिला आहे त्यांना गदर २ मधे काय पहायला मिळणार याची कल्पना असेलच. ते सगळं दाखवलं आहे पण इंतरव्हल नंतर. मध्यांतराच्या किंचित आधी सनी अवतीर्ण होतो आणि मग नुसती दण्णादण्णी, डायलॉगबाजी, हॅण्डपंप सोडून जमिनीत जे काही गाडलंय ते उखाडणे, जमिनीवर जे उभे आहे ते उचलून फेकणे हा सगळा कार्यक्रम साग्रसंगीत पार पाडला आहे. इंटर्व्हलनंतर देशभक्ती, तिरंगे झेंडे थेटरमधे नाचवणे, टाळ्या, शिट्ट्या, हिंदुस्थान झिंदाबाद च्या घोषणा हे वातावरण थेटरात होतं.

१५ ऑगस्टचा मुहूर्त असल्याने त्या सेलिब्रेशन मूडचा सिनेमा आहे. मेंदूचे काही स्विचेस ऑफ आणि काही ऑन केले तर फुल्ल एंटरटेनमेंट आहे.

क्रिटीकल रिव्ह्यू
गदर ब्रॅण्डची लोकप्रियता एण्कॅश करत मुलाला लॉच केलं आहे. तो अजिबात अ‍ॅक्शन हिरो मटेरिअल नाही. टीव्ही मालिकात शोभेल. हिरॉईन सुंदर आहे पण पंजाबात अशा मुली पावलोपावली दिसतात. काही फ्रेम्स मधे मात्र विलक्षण दिसलीय. दोघांच्या अभिनयाबद्दल बोलू नये. आमिशा पटेल नसती तरी चालली असती.

सनी देओल यात लाऊड असणार हे गृहीतच धरलेले होते. मेलोड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा ठासून आहे. इमोशनल सीन्स ची भरमार आहे. उत्सवी मूड मधल्या प्रेक्षकाला काय काय देऊ शकतो या विचारात पटकथा ठिसूळ झाली आहे. अ‍ॅक्शन सीन्स अ आणि अ आहेत. पण सनीमुळे कन्व्हिन्सिंग वाटतात. तारासिंग इज इंडियन हल्क. तो अतिमानवच आहे. अजय देवगण, सलमान, शाहरूख सारख्यांचे अ आणि अ सीन चालवून घेतलेल्यांना सनीचे सीन्स नैसर्गिक वाटतील.

गदर १ मधे सीजी नव्हते. यात सीजी भरपूर आहे. पडद्यावर सतत बॉबस्फोट, त्याचे कानठाळ्या बसणारे आवाज. सतत आगी लागल्याने डोळ्यावर येणारा ताण हे नंतर असह्य होतं. पाकिस्तानातून सुटका हा भाग थरारक च्या ऐवजी मार्वल कॉमिक्सच्या चित्रपटा प्रमाणे झाला आहे.

व्हिलनची जेव्हढी जाहिरात केली त्याच्या १% सुद्धा नाही. त्यामुळे वाघ आणि सिंहाची फाईट बघायला जावे आणि प्रत्यक्षात सिंहापुढे मांजर यावे तसा प्रकार आहे. गदर एक ची गाणी पुन्हा धमाल करतात. उदीत चा आवाज कानाला खटकतो. वयस्कर वाटतो आवाज. नवीन गाण्यातले आवाज चांगले आहेत. गाणी लक्षात राहत नाहीत. ७० च्या दशकातली वाटत नाहीत. पण श्रवणीय आहेत.
बाकि आनंद आहे.
कोणत्या मूड मधे बघायचा ते ठरवा म्हणजे पैसे वसूल होतील.

OMG 2 चे reviews खूप चांगले आहेत, त्यामुळे गदर 2 दोन दिवसात गाशा गुंडाळेल. पुण्यात कोणीच फिरकत नाहीय गदर 2 च्या स्क्रीन जवळ

च्रप्स सर,
तुम्ही जे काही म्हणाल ते खरं. नाहीतर या धाग्याला पण कुलूप लावाल, आयडी उडवाल. __/\__

गदर २ ची घोडदौड
पहिल्या दिवशी भारतात ४० कोटीची दमदार ओपनिंग. ते ही फक्त ३५०० स्क्रीन्सवर.
स्क्रीन्स टू कलेक्शन रेशो चं गदरचं रेकॉर्ड पहिल्या क्रमांकाचे ठरले.
ओएमजी ची ९ करोड
https://www.sacnilk.com/quicknews/Oh_My_God_2022_Box_Office_Collection_D...

जेलर एक दिवस आधी रिलीज झाला आणि ९६ कोटी ओव्हरसीज + इंडीया कलेक्शन.

गदर बॉक्स ऑफीस
https://sscnr.net.in/gadar-2-box-office-collection/

( ओटीटी + टीव्ही राईट्स नसल्याने ते उत्पन्न यात नाही. पहिल्या दिवशी ४० करोड ओपनिंग असेल तर ओटीटी हक्क १२० ते १५० कोटी रूपये. टीव्हीचे हक्क १०० कोटी. म्हणजे गदर २ चा धंदा ३०० करोड झाला आहे).

टंपु उर्फ रघू कुठल्याही लिंक देऊन काहिही सिद्ध होत नाही, मुंबई- पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र जिथे हिंदी चित्रपटाच्या एकूण business पैकी 40 % धंदा होतो, तिथे गदर 2 ला शून्य प्रतिसाद आहे. OMG 2 खूप चांगला चित्रपट आहे, त्यामुळे गदर 2 दोन दिवसात उतरेल चित्रपट गृहातून. आणि मी कोणाचाही डुप्लिकेट id नाही.

ठीक आहे च्रप्स उर्फ झंपू दामलु उर्फ साधा माणुस उर्फ .... इन्फिनिटी, तुम्ही म्हणाल ते खरे. तुम्हाला नो चॅलेंज. Lol
तुम्ही मला ड्युआयडी म्हटले तरी चालेल. शेवटी अ‍ॅडमिन आहात सर तुम्ही.

च्रप्स उर्फ झंपू दामलु उर्फ साधा माणुस उर्फ .... इन्फिनिटी, तुम्ही म्हणाल ते खरे. तुम्हाला नो चॅलेंज. शेवटी अ‍ॅडमिन आहात सर तुम्ही.
>>> जे अंधारात होते ते आज उजेडात आलं ... एका मोठ्या रहस्यावर पडदा पडला...

साधा माणूस, तुम्ही च्रप्स आहात कि ऋन्मेष याच्याशी मला घेणं देणं नाही. या दोन आयडींशी ऑनलाईन संवाद साधणे माझ्यासाठी अवघड आहे. तुमचाही त्यात समावेश करत आहे. कृपया माझे नाव वापरू नये ही नम्र विनंती. काही काळाने शिवराळ आयडी येऊन गोंधळ घालतात, पण ते न उडता भलतेच आयडी उडवले जातात. त्यामुळे कृपया मला माफ करा.

याउप्पर तुमची मर्जी.

बरं , रघु ते डुप्लीकेट id वगैरे जाऊ दया, पण खरे सांगा तुम्ही काल पुण्यात गदर 2 बघायला गेला तेव्हा 10% तरी प्रेक्षक होते का

च्रप्स / ऋन्मेष, प्लीज . तुम्हाला काहीही बरळायचे ते बरळा. माझे काहीच म्हणणे नाही.
मला तुमच्या खुनशी स्वभावापासून लांब रहायचे आहे. प्लीज रिस्पेक्ट माय डिसीजन. पुन्हा नवीन आयडीने तेच तेच नको. धन्यवाद.

गदर २ ने पठाण ला दोन बाबतीत मागे टाकले.

नॉन वर्किंग डे ची सर्वाधिक ओपनिंग घेणारा हिंदी चित्रपट म्हणून एक रेकॉर्ड झाला.
(पठाण २५ आणि २६ जानेवारी या सलग दोन सुट्ट्यांच्या दिवशी रिलीज झाला होता).

नॉन वर्किंग डे ला सर्वाधिक ओपनिंग घेणारा फक्त एकाच भाषेत रिलीज झालेला चित्रपट.

तिसर्‍या दिवशी सर्वाधिक ओपनिंग घेणारा कोणताही भारतीय चित्रपट - बाहुबली, केजीएफचे रेकॉर्ड मोडले. पठाण तिसर्‍या दिवशी २६ करोड. गदर २ - ५२ करोड
तिसर्‍या दिवशी भारतात सर्वाधिक ओपनिंग घेणारा हिंदी चित्रपट

फक्त ३५०० स्क्रीन्सवर रिलीज झालेला बिगेस्ट ब्लॉकबस्टर. स्क्रीन्स आणि कमाईचे गुणोत्तरात सर्वात यशस्वी चित्रपट. पठाण नऊ हजार स्क्रीन्सवर रिलीज झालेला चित्रपट.

बजेट आणि कमाई यांच्या गुणोत्तरातला भारतातला सर्वाधिक यशस्वी चित्रपट

पाचव्या दिवशी ५५ करोड (नाईट शोज चे उत्पन्न सोडून) करणारा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट.

ओमाय गॉड, गदर २, जेलर, ओपनहायमर, बार्बी अशा सर्व चित्रपटांनी मिळून एकाच आठवड्यात कमावले २००० कोटी. हा शंभर वर्षातला विक्रम आहे. यातला सर्वाधिक वाटा जेलर आणि गदर २ चा. एकाच वेळी अनेक चित्रपट चालणारा आठवडा हा एक विक्रम झाला.

ओ एम जी २ नसता तर गदरचे आकडे आणखी वेगळे असते. पण बॉलीवूड माफियांप्रमाणे सगळेच्या सगळे स्क्रीन्स बुक करून कुणालाही रिलीज करता येणार नाही असा प्रकार या आठवड्यात झालेला नाही. हा ही एक विक्रमच आहे.

एव्हढ्या प्रचंड कमाई करणार्‍या चित्रपटाच्या लीड रोल मधे काम करणार्‍या अभिनेत्याने घेतलेली २० कोटी रूपये ही फीस ही सर्वात कमी आहे. हा ही एक विक्रम आहे. लालसिंग चढ्ढा साठी आमीर खानने १०० कोटी घेतले होते. त्याच्यावर पैसे परत करण्याची वेळ आली.
गदर २ च्या यशानंतर १०० - १०० कोटी रूपये एव्हढी अवाजवी रक्कम फीस म्हणून का द्यायची हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. २० कोटी रूपये ही काही कमी रक्कम नाही. १०० कोटी फीस दिल्यावर बजेट वाढते. त्यामुळे इन्कम लवकरात लवकर बसूल करण्यासाठी जास्तीत जास्त स्क्रीन्स अडवाव्या लागतात. पठाण साठी शाहरूख खानने १५० कोटी रूपये घेतलेत.

सनीने तोडले १३०७ रेकॉर्डस.
https://www.youtube.com/watch?v=iasW996dFDw

पब्लीक ट्रॅक्टर, ट्रेलरने थेटरात येतंय. मै निकला या गाण्यावर पब्लीक नाचतानाचे दृश्य अनेक वर्षांनी दिसतंय. ८९% ते ९९% ऑक्युपन्सी सर्वच मेजर शहरात असे रेकॉर्ड पहिल्यांदाच झाले आहे. मल्टीप्लेक्स मधे पुढच्या दोन तीन रांगा पठाणला सुद्धा फुल्ल नव्हत्या. गदर ने हाऊसफुल्लचे नवे रेकॉर्डस केले. तिकिटाच्या दरात फरक असल्याने सर्वाधिक तिकीट विक्रीचा उच्चांक गदर २ ने केला. पठाणचे तिकीट काही स्क्रीन्स साठी १५०० , ११,००, ९०० होते. गदरचे जास्तीत जास्त तिकीट ३०० रूपये आहे. सरासरी तिकीट १२० रूपये आहे.

Pages