गदर २ - बॉक्स ऑफीस वर दंगल, रेकॉर्ड्स मागून रेकॉर्ड तोडले

Submitted by ढंपस टंपू on 11 August, 2023 - 07:26

अपेक्षेप्रमाणे सनी देओलच्या गदर २ ने अ‍ॅडव्हान्स बुकींगलाच नवीन रेकॉर्ड बनवले.
कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी, कोणत्याही एका सिंगल भारतीय भाषेतल्या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकींगला सर्वाधिक कमाई करत काल दिवस अखेर रु. १७.७३ कोटी रूपये कमावले.

ओ माय गॉड हा दुसरा चित्रपट गदर सोबत रिलीज झाला आहे. त्याने अ‍ॅडव्हान्स बुकींगला ४ कोटी रूपये कमावले.

रजनीकांतच्या जेलर ने तमिळ आणि तेलगू मिळून १८.५ कोटी रूपये अ‍ॅडव्हान्स बुकींगमधे कमावले. त्याच्या हिंदी डब्ड प्रिंटने कमी व्यवसाय केला.

जेलर ४५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला.
गदर २ फक्त ३२०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
पठाण च्या नावावर अ‍ॅडव्हान्स बुकींगचे रेकॉर्ड होते. रु ११ कोटी !
पठाण ९००० स्क्रीन्सवर रिलीज झालेला.
बाहुबली सुद्धा ९००० स्क्रीन्सवर रिलीज झालेला होता.

गदर २ हा विनर बनला आहे.

जेलर ची देश - विदेशातली कमाई (फक्त बॉक्स ऑफीस) ६५ कोटी रूपये + ३० कोटी रूपये = ९५ कोटी असा अंदाज आहे.
गदर २ पहिल्या दिवशीचा अंदाज ४० कोटी रूपये.

गदरचे स्क्रीन्स वाढवण्याची दाट शक्यता आहे.
हिंदी बेल्टमधे सिंगल स्क्रीन वर तिकीटासाठी प्रेक्षक दंगल करू लागले आहे. त्यांना आवरताना थेटर मालकांच्या नाकी नऊ आले आहेत.
मल्टी प्लेक्स मधे तीन पट शोज वाढवण्यात येत आहेत.

एकंदरीत शुक्रवारचा दिवस हा बड्या चित्रपटांच्या बिग फाईटचा आहे.
पहिल्या पाच दिवसात कोण जास्त धंदा करतो हे बघायचे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते गाणं मस्त जोशभरं आहे.थिएटर्स मध्ये नाचायला मस्त वाटत असेल.लोक सैराट वर नाचायचे तसं.
कथेतले लूपहोल्स भाग 1 मध्येही होतेच.मुळात सनी देओल च्या आवेशासाठी घायल, घातक, गदर बघायचे. कथा असते किंवा नसते.

लोकं आता तेच तेच बघून कंटाळली आहेत त्यामुळे पिक्चरला जास्त गर्दी होत नाही. टॉम क्रुझने ज्या प्रमाणे गडीवरून उडी मारण्याचा रियल स्टंट केला तसं खरं लोकांना बघायचं आहे. पार्ट 3 मध्ये सनी खरोखर पाकिस्तानात जाऊन दोन चार जणांना टपलवून आला तर पिक्चर अजून हिट होईल.

एकदाचा गदर २ बघितला !
बरा वाटला , पण सनीची थकलेली शरीरयष्टी पाहता संपूर्ण बटालियन चोपून काढण्या सारख्या मारधाड मुव्हीत काम न केलेले बर असेल.
अमिताभ ने देखील उतरत्या वयात शे पाचशे लोकांना धोपटण्याचे मूव्ही केले नव्हते .

उतरत्या वयातील Pierce brosnan पेक्षा हॅरिसन फोर्ड चे मूव्ही बरे वाटतात , अशी तुलना सनी आणि अमिताभ मध्ये करायची होती .....

140 कोटी लोकात एक दोन करोड लोक भंगार असतात..
त्यांनी सिनेमा बघितला तरी दोनशे तीनशे करोड होतात.
बॉक्स ऑफिस वर जावू नका.
एक नंबर च भंगार सिनेमा आहे गदर 2

अमिताभ ने देखील उतरत्या वयात शे पाचशे लोकांना धोपटण्याचे मूव्ही केले नव्हते .

>> सन्जय दत्त ला दोन वेळा. धोपटले

इंडिया नेट ६ दिवस
Gadar_2_Article_4.jpeg

काल दिवस अखेरचा आकडा ( जागतिक + इंडिया ग्रॉस ) = ३६९ करोड.
आज चारशेच्या पार जाईल. उद्या सुटीचा दिवस. पाचशेच्या जवळ जाईल. साडेपाचशे कोटी दोन आठवड्याची कमाई असा अंदाज आहे.

https://www.google.com/search?sca_esv=558309031&rlz=1C1CHZL_enIN800IN800...

हे पण रेकॉर्ड

गदरच्या तिकिटांवरून राडा. काळाबाजार सुरू. बॉंबस्फोट
Screenshot_20230819_123211_Facebook.jpg

पहिल्या दिवशीच लॉक होऊनही गदर २ ने इतिहस रचला. पण आता रोज वेगवेगळ्या फेक चॅनेल्सच्या माध्यमातून युट्यूबवर अपलोड होतोय. विशेष म्हणजे या नव्या चॅनेल्सला ताबडतोब मिलियन्स व्ह्यू मिळत असल्याने हे कारस्थान आहे का असा प्रश्न विचारला जातोय. जोपर्यंत निर्मात्यांच्या लक्षात येऊन ते युट्यूला कारवाई करायला भाग पाडताहेत, तोपर्यंत मिलियन्स व्ह्यू झाल्याने डाऊनलोड होण्यापासून रोखणे अशक्य झाले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/videos/etimes/bollywood/sunny-deol-a...

आज आत्ता जाणार आहे पहायला.

>> यात सीजी भरपूर आहे. पडद्यावर सतत बॉबस्फोट, त्याचे कानठाळ्या बसणारे आवाज. सतत आगी लागल्याने डोळ्यावर येणारा ताण हे नंतर असह्य होतं

याचीच भीती होती. पण ते आता इथे वाचल्याने मानसिक तयारी झाली Happy कॉम्प्युटरवर बनवलेले सर्व scenes, vfx इत्यादीचा अतिरेक (हॉलीवूड वा बॉलीवूड) आजकाल पहायला नको वाटत आहे. असो. बघून येतो आणि सांगतो.

आज आत्ता जाणार आहे पहायला. >> आवडला नाही तर मला जबाबदार धरू नका. Lol
टीपी करत होतो. माबोवर सध्या एखाद्या पिक्चरची वीट येईल अशी जाहीरात करण्याचा ट्रेण्ड आहे. Proud

>> गदर २ बघितला !
>> बरा वाटला

+1
बरा म्हणजे "ओके टाईप" वाटला.

अजून एक आठवडा गदर गोंधळ घालेल. मग पुढच्या आठवड्यात बड्या बॅनर्स कडून 95% स्क्रीन्स वर्षभर आधीच बुक झाले आहेत. आता चालू सिनेमा उतरवून नवीन सिनेमाला सगळेच्या सगळे स्क्रीनस थेटर मालक देणार का?
नाही तर गदर 2 चे इंडिया नेट 750 CR सहज होईल.
म्हणजे ग्रॉस 1000 CR
World wide collection 1300 CR

छान , सनीला सांगा जे काही १०० करोड त्याने घेतले आहेत त्यातले ५५ करोड देऊन बंगल्याचे कर्ज फेडून टाक मग बंगला जप्तीची वेळ येणार नाही

20 कोटी घेतले फक्त. म्हणून तिकीट स्वस्त होते होते.
कर्ज फेडण्यासाठी आणखी एक धागा काढतो.

योग आला फायनली गदर 2 बघण्याचा... चित्रपट खरे तर कॉमेडी आहे.. ऍक्शन नाही... संपुर्ण थेटर हसत होते...
तारा आणि जिते ला सगळे ओळखत असतात आणि तारा ला घाबरत असतात... तारा च्या हातात एक हातोडा येतो त्या सिन ला हसायला येतेच.... हातोडा मारून मोठे मोठे ट्रक उडवतो.. गाड्या उडवतो...
सेकंड हाल्फ च्या शेवटाला फुल्ल हाणामारी आहे आणि सनी एक विजेचा खांब उखडून लोकांना मारायला लागतो... हजारो लोक मार खातात... फुल्ल कॉमेडी...

अभिनंदन चप्र्स माणुस.
प्रत्येकाने गदर २ पाहिला पाहिजे एव्हढेच माहिती आहे. फिल्म इंडस्ट्री चालायची असेल तर गदर पाठोपाठ बॉर्डर २ सुद्धा आपण हिट केला पाहीजे. तुम्हाला पठाण सारखे फुल्ल कॉमेडी पिक्चर आवडतात. त्यामुळे गदर सारखा क्लासिक मुवी आवडणारच. पठाण पण चालायला पाहिजे आणि गदर पण. आता सालार चं बुकींग करा. अ‍ॅड बुकींगला ओव्हरसीजला ३.८३ करोड कमावलेत.
रीलीज डेट २८ सप्टेंबर

Dhanpas - मी गदर अजून एक वेळा बघणार आहे... सनी देओल आणि सनी लिओनी माझे फेव्ह आहेत.. कोणताही पिच्चर सोडत नाही मी यांचे...
बॉर्डर 2 बघणार आहे .. पण don 3 नका बघू...

Pages