Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वरूण धवन , जान्हवी कपूर वर
वरूण धवन , जान्हवी कपूर वर मोठी फुली आहे.
ओटीटीवर सुद्धा बघत नाही. कुली नंबर वन ने शिक्कामोर्तबच केलं.
वाल सोलल्या सारखा सोला मग
वाल सोलल्या सारखा सोला मग बवालला.
पाऊस खूप असल्याने अ वाल मिळत
पाऊस खूप असल्याने अ वाल मिळत नाही .
ब वाल वरती काम चालवून घेताहेत लोक.
मिडसोमर>>>> नेटफ्लिक्स,
मिडसोमर>>>> नेटफ्लिक्स, प्राईम, झीफाईव्ह, हॉटस्टार वर नाही.. कुणाला कुठे मिळाला तर सांगावे.
अशा वेळी गुगल वर सिनेमाचं नाव
अशा वेळी गुगल वर सिनेमाचं नाव टाकून व्हेअर टू वॉच प्रॉम्प्ट द्यायचा.
माझा ऑपनहायमरचा हॅन्ग ओव्हर
माझा ऑपनहायमरचा हॅन्ग ओव्हर उतरवला त्याने. <<< बर झालं मी उलट्या क्रमाने बघितलं हाहाहा
रॉकी ऑर रानी कि प्रेमकहानी
रॉकी ऑर रानी कि प्रेमकहानी

)
कोणीतरी केजोच्या आउटडेटेड सिनेमांचा रोस्ट मुव्ही काढलाय असं फिलिंग शेवटपर्यन्तं येतं रहातं तीन तास आणि अचानक फिल्म बाय करण जोहर क्रेडिट येतं आणि कळतं हे सार्कॅस्टिक नाही खरच चाल्लं होतं
बकवासपन्तीची हद्द !
सुरवातीलाच दिल्लीच्या क्रेझी रिच पंजाबी फॅमिलीतल्या वाकड्या तोंडाच्या खडुस आज्जीचा नवरा,लंपट धर्मु आजोबा मेमरी लॉसच्या आजाराने त्रस्तं असतो, त्यामुळे आजोबा धर्मेन्द्रं भलत्याच बाईला एक्सलव्हर समजून किस करतात, त्यावर अर्जन्ट उपाय म्हणून डॉक्टर आजोबांच्या एक्स लव्हरला शोधा म्हणजे योग्य व्यक्ती किस केली जाईल असं सांगतात.
गुचीच्या अन्डरवेअर मधे झोपलेला रॉकी नातु जागा होतो आणि आजोबांच्या एक्स लव्हरला शोधल्यावर त्या बाईच्या राणी नातीच्या प्रेमात पडतो, मग एकमेकांच्या आज्जी आजोबांचा आणि नात नातु सगळ्यांचा जुन्या गाण्यांवर लस्ट स्टोरी रोमान्स सुरु होतो , धर्मु आजोबा तर बायको समोरच शबाना आन्टीला किस करतात (मेमरी लॉस ट्रिटमेन्ट यु नो ! )
मग उरलेला सगळा वेळ रणवीर आलिया लस्ट स्टोरी लव्ह स्टोरीत बदलते आणि मिसॉजनिस्ट लाउड कन्झरवेटिव अशिक्षित पंजाबी फॅमिली वर्सेस इन्ट्लॅक्चुअल उच्चशिक्षित क्लासी बंगाली फॅमिली डिफरन्सेस सुरु होतात (हाउ ओरिजनल
बरं त्या आज्जीचा नक्की प्रॉब्लेम काय आहे समजत नाही, ती स्वतः बिजनेस वुमन आहे पण ओव्हर वेट पोतीने मिळेल त्या माणसाशी लग्नं करून घर संभाळावे, करिअर करू नये , बहु ने डोक्यावर ओढणी घेऊन घरी रहायला हवे,!
तिला राणीच्या फॅमिली मधल्या बायका डोक्यावरून पदर घेत नाहीत , वडिल कथ्थक टिचर आहेत हा प्रॉब्लेम आहे पण राणीची आज्जी आपल्या नवर्याबरोबर बागेत रोमान्स करत फिरते याचा काहीच प्रॉब्लेम नाही (मेमरी लॉस ट्रिटमेन्ट यु नो ).
रणवीरच्या आईला तर इतका जाच आहे कि रात्री सगळे झोपल्यस्वर ‘आप जैसा कोई मेरे जिन्दगीमे आए“ गाणं सिक्रेट्ली म्हणावं लागतं !
रणवीरला एकदा आलियाच्या आई बरोबर ब्रा शॉपिंगला जावे लागते , वर ब्रा ट्राय करायलाही त्यालाच मॉडेल म्हणून उभे करते आई, इथे त्याला लाज वाटते म्हणून मग लगेच स्त्रियांच्या समस्या , वुमन एम्पॉवरमेन्ट लेक्चर ऐकावे लागते, राणीची आई फार दु:खाने मेन्शन करते कि ‘चोलीके पिछे क्या है‘ गाणी पुरुषच म्हणतात पण जे पिछे आहे ते बघायला लाजतात.. ( टाळ्या.. स्त्रियांची ही समस्या तेवढीच मोठी आहे जितका आनन्या पांडेचा स्ट्रगल.. तिच्या वडिलांना कोणी कॉफी विथ करण मधेही नाही बोलावलं यु नो ! )
तर थोडक्यात एकमेकांचे कल्चरल डिफरन्सेस दूर करत छपरी रॉकी बंगाली फॅमिलीजला झप्प्या द्यायला शिकवतो, स्वतः कथ्थक शिकतो आणि राणी पंजाबी बायकांना ‘आप जैसा कोई‘ खुल ए आम म्हणायला शिकवत लिबरल करते , चुकीच्या बायांना किस करणारा म्हातारा मरतो , वाकड्या तोंडाची आज्जी पत्रं लिहून तह करते आणि सुखी शेवट होतो !
झाली गोष्टं !
इतक्या सगळ्या गोंधळात मनिष मल्होत्राच्या अप्रतिम साड्या ब्लाउजेसची एक काय ती स्तुति करायची राहिली, सुन्दर आहेत यात वाद नाही पण ५ फूट उंचीच्या काठीला नेसवायला लागल्यामुळे गोची होते !
शिफॉनच्या साड्या नेसाव्या त्या थोड्या कर्व्ही बायकांनी.. श्रीदेवी, रेखा, जुही, सुष्मिता पब्लिकने , नो डायमेन्शन नो हाइट बायका त्याला काय जस्टिस देणार ?
असो, तर अशी ही युनिक प्रेमकाहाणी पिसं काढत नक्की पहा
(No subject)
गंमत म्हणजे मिडिया इज वेल पेड
गंमत म्हणजे मिडिया इज वेल पेड..वेल टेकन केअर ऑफ , कुठेही निगेटिव रिच्युज दिसत नाहीत !
फारच बंडल निघाला की..!
मी ते 'ढिंढोरा बाजे रे' बघितलं, नुसतं लाललाल गाणं आहे. डोळ्यात कुंकू फेकल्यासारखं झालं. जया बच्चनला निळा ड्रेस दिला आहे म्हणून ती ड्रेस कोड न सांगितल्यामुळे रागारागाने निघून जाते. रणवीर लाल अनारकली ड्रेस मध्ये कथ्थक करतो. बार्बी सिनेमा मुळे जगातला सगळा गुलाबी रंग संपला म्हणे, मग या फक्त गाण्यामुळे जगातला सगळा लाल रंग संपला असेल.
हाहाहा अस्मिता, भन्सालीने
हाहाहा अस्मिता, भन्सालीने असाच निळा रंग संपवला सावरीया मुळे
गंमत म्हणजे मिडिया इज वेल पेड
धमाल रिव्ह्यु डिजे !! ट्रेलर आणी गाण्यावरुनच काय पॅकेज असणार आहे त्याचा अन्दाज आला होताच..
लोल अस्मिता!!
गंमत म्हणजे मिडिया इज वेल पेड..वेल टेकन केअर ऑफ , कुठेही निगेटिव रिच्युज दिसत नाहीत !>>> ते तर आहेच, पैसा बोलता है पण पब्लिकच्या हातात भोपळा आल्यावर सोमी वर तो फोडतिलच.
डीजेचा रिव्ह्यू
डीजेचा रिव्ह्यू
डीजे
डीजे
डीजे मस्त रिव्ह्यू!
डीजे
मस्त रिव्ह्यू!
दीपांजली
दीपांजली
(No subject)
स्पॉईलर टाकला डीजे आता कसे
स्पॉईलर टाकला डीजे
आता कसे बघणार मायबोलीकर..
डीजेः छान पिसं काढलीत. बाकी
डीजेः छान पिसं काढलीत. बाकी शिफॉन साड्यांबद्दलचं निरीक्षण पटलंच…
अस्मिताः हो हो. टीव्हीवर ते गाणं बघून कुंकवाच्या उधळपट्टीने शिंका येतील का काय असं वाटत होतं.
संपलेले रंग आणि रिस्पेक्टिव्ह
संपलेले रंग आणि रिस्पेक्टिव्ह सिनेमे
डीजे अफलातून लिहिलयस रॉकी
डीजे अफलातून लिहिलयस
रॉकी रानी तद्दन टुकार नाव असलेल्या चित्रपटाचं ट्रेलर अर्धवट पाहूनच न बघण्याचा घेतलेला निर्णय योग्यच!
अस्मिता... जया बच्चन वरची कॉमेंट हहपुवा
शनिवारी लस्ट स्टोरीज बघितला. मग रेव्हु पाहिले.
फक्त तिलोतमा शोम ची कोंकना शर्मा दिग्दर्शित स्टोरी आवडली. तिचं काम उत्तम आहे. १ आधीच्या चित्रपटात तिने अगदी अस्सल वाटावे असे मेड चे काम केले होते आणि ह्यात ती मॅडम दाखवली आहे. जसा रोल द्यावा तशीच ती वाटते! हॅट्स ऑफ! अम्रुता सुभाष नेहमीप्रमाणे लाऊड अभिनय करते पण ह्यात सुसह्य आहे तरी भांडं फुटतं तेंव्हा उगा वचावचा बोलत असते.. कुणी कामवाली बोलणार नाही सहसा. तिच्या नवर्याचे काम जास्त कन्विन्सिंग वाटले.
बार्बी बघितला नाही का कोणी?
बार्बी बघितला नाही का कोणी? छान आहे सिनेमा. चित्रपटाचे लेखन फार मस्त आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी देशात चांगला चालला आहे. मनीश मलहोत्रा साड्या व ब्लाउज जबरी आहेत. पाउस कमी झाला की मम बुटीक ला जाणार आहे. बंगाली पंजाबी जोक्स हह पुवा. रणवीर फुल्टु एनर्जी पेकेट. धर्मेंद्र आपला ओरिजिनल हँडसम मॅन व शबाना मधील 'प्रेम कहाणी बघायची उत्सुकता आहे. जयाजींचा खडुस म्हातारी रोल पण बघायचा आहे.
बार्बेनहायमर डबल फीचर
बार्बेनहायमर डबल फीचर करण्याचा पूर्ण मानस होता पण आमच्या गावात बार्बी आलाच नाही.
बार्बी आणि रॉकी रानी दोन्ही
बार्बी आणि रॉकी रानी दोन्ही या आठवड्यात पाहणार आहे.
बार्बी प्रचंड हाईप केलेला
बार्बी प्रचंड हाईप केलेला सिनेमा आहे. निम्यातुन उठुन आलो. खरतर ऑपनहायमर बघायचा होता 8.00 pm चा पण traffic मुळे लेट झालो विवियानाला. रॉकी / राणी हाउस फुल्ल होता. बायको म्हणाली बार्बी बघुया. तिलापण नाही झेपला. निम्यातुन गप घरी आलो. वय झाल आता बाकी काही नाही
Entrenched patriarchy
Entrenched patriarchy
एवढी कॉपी?https://twitter.com
एवढी कॉपी?
https://twitter.com/_AdilHussain/status/1685994921873031168
बार्बी बघितला नाही का कोणी? >
बार्बी बघितला नाही का कोणी? >>> मुलींना पाठवले होते. पिंक ड्रेस मधे गेलेल्या त्या.
मी आता फ्री झाल्याने गदर पासून हॉलला शिणुमामा बघायची सुरूवात करणार. मग आहेच नन २ , स्त्री २, ड्रीम गर्ल २, बाहुबली ३.
द नाईस गायस
द नाईस गायस
रायन गोसलिंग, रसेल क्रो विनोदी भूमिकेत. मस्त विनोदी सिनेमा. रायन कोणत्याही भूमिकेत जबरच असतो असे जाणवते आहे.
हो मस्त आहे तो सिनेमा. रायन
हो मस्त आहे तो सिनेमा. रायन गॉसलिंग सुरूवातीचे त्याचे बरेच पिक्चर्स ब्रूडिंग, सिरीयस रोल्स मधे असे. यात एकदम वेगळा आहे. अर्थात हे सगळे त्या "ला ला लॅण्ड" "बार्बी" ई. च्या आधीचे.
त्याचे दोन आवडते पिक्चर्स - अ प्लेस बियॉण्ड द पाइन्स आणि आइड्स ऑफ मार्च.
Pages