मायबोलीकरांच्या टॅलेण्टला न्याय

Submitted by ढंपस टंपू on 30 July, 2023 - 00:11

मायबोलीकरांकडे अफाट टॅलेण्ट आहे हे नेहमी जाणवते.
यातले किती जण बाहेर प्रसिद्ध आहेत हे माबोकर इथे टोपणनाव वापरत असल्याने कळत नाही. काही जण कलेच्या माध्यमातून नाव कमावत आहेत आणि इथेही त्यांचे अनुभव शेअर करत असतात.

पण काही हौशी माबोकर आहेत. त्यांच्याकडे जबरदस्त टॅलेण्ट तर आहे पण वेळ नाही. पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा असल्याने कलेसाठी निर्मात्याच्या मागे चपला झिजवणे त्यांना शक्य नाही. वेल सेटल्ड असल्याने संधी मिळवण्यासाठी लाचारी पत्करणे, हांजीहांजी करणे त्यांना आवडणारे नाही. कलेच्या क्षेत्रात असलेली कंपूशाही, आपल्या कंपूच्या आका ची मर्जी राखणे हे पाहून "जाऊदे, काही गरज नाही. एवढे काही रस्त्यांवर आलेलो नाही" असे वाटून असे गुणी माबोकर संधीपासून वंचित राहतात.
आणखीही कारणे असतीलच..

यावर उपाय आहे. मायबोली हाच उपाय आहे.
माबोवर एखाद्या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला नाही असे होत नाही.
त्यामुळे सन्मानाने संधी मिळण्यासाठी माबोकरांनी एकत्र येऊन चित्रपट बनवला तर?

किती तरी जणांना संधी मिळेल.
अभिनय येत असेल (त्याची गरज नाही. आपोआप येतो) तर
मेन लीड मधे
पूरूष, स्त्री, खलपुरुष, खलस्त्री,
खाष्ट सासू, खट्याळ सासरा, प्रेमळ आई, कडक वडील.
जिवाभावाचे मित्र मैत्रिणी असे शैकडो रोल आहेत.

नृत्य येत असेल तर चोरीओग्राफी, नर्तक, नर्तकी असे हजार जण लागतील.

गायन _ माबोचे किशोरकुमार, रफी, मुकेशजी, उदीतजी, सानू - सोनूजी
लता आशाजी, श्रेया, अलका, अनुराधा, सुनिधी, पलक, नेहा
अशा सर्वांना वाव मिळेल
संगीतकार म्हणून वाव आहे.

याशिवाय लेखक, संवाद लेखक, गीतकार, पटकथा आणि दिग्दर्शक यांचीही गरज आहे.
मेळ अप चा कोर्स केलेले असतील. कॉम्प्युटर ग्राफिक्स, चित्रकार, फोटोग्राफी असे लोक लागतील.
तंत्रज्ञ लागतील..

तर मग काय विचार आहे?

रहस्य पट बनवायचा कि आपत्तीपट?
फॅमिली पट बनवायचा कि एक्शन पट?
बाहुबली कि ओपेनहायमर?
कॉमेडी कि तमाशापट?

यावर एकमत होण्यासाठी या धाग्यावर चर्चा सुरू झाली तर सरतेशेवटी सहकारी तत्त्वावर अविस्मरणीय चित्रपट बनणार यात शंका आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पहा....!!
सल्ला देण्यासाठी मागे हटणार नाही.
चित्रपट इंग्रजी / हिंदी / मराठी कोणत्या भाषेत बनवणार हे ठरवा.

शक्यतो महिलाप्रधान चित्रपट बनवा. म्हणजे पोस्ट प्रोडक्शन पब्लिसिटी वरचा खर्च वाचतो.

चित्रपट पूर्ण झाल्यावर स्क्रीन्स मिळत नाहीत. त्यामुळे सर्वात आधी वर्षानंतरची तारीख धरून दोन तीन हजार स्क्रीन्स आताच बुक करून ठेवा. ऐन वेळी धावपळ नको.

"मला वाटलंच होतं नायकाच्या भूमिकेसाठी मला अडकवण्यात वेगवेगळ्या आयडिया शोधल्या जातील.
पण मला अजिबात वेळ नाही आणि मी कितीही थोडकी भूमिका असली तरी करणार नाही हे स्पष्ट करतो.

बाकी चालु द्या."

असा प्रतिसाद देण्याचा पहिला मान मी पटकावला आहे.

मी अनु Lol
मॄणाल Lol
नायक , नायिकेच्या रोलसाठी भांडणं नाहीत, तंटे नाहीत. सगळे असे रोल मागताहेत जसे बच्चन ने शोलेत गब्बरचा रोल मागितलेला.

बाईपणचा दुसरा भाग बनवा. त्यात सहाच्या सहा जणी भूत होतात असा तडका दिला तर मी अनु यांचा रोल पक्का. Lol

अनु आणि मृ Lol

माझ्याकडे एकही गुण नाही म्हणून मला NPC करा. जे सिनेमात हिरो विव्हळत पियानो बडवताना पार्टीतले NPC छानछान कपडे घालून , हिरोहिरविनच्या सुखदुःखाशी काही देणंघेणं नसताना उगा फुकटचे ॲपेटायझर व कोल्ड ड्रिंक्स गिळतात, तो रोल मला द्या. त्या रोल मधे मी इतरांना 'खाऊन' टाकेन. नाटू नाटू नंतर मीच NPC ऑस्कर आणेन.

-जय हिंद जय महाराष्ट्र.
(साभार रोहित शेट्टी. )

नीट खून झालेलं आणि मग बदला घेणारं सुंदर सोलो भूत बनायचंय.>>>.
Rofl

मला (फुकाची) चिकन तंगडी खायचा (खिल्जी/तत्सम सेनापती) रोल द्या, त्याचे मी अनेक रीटेक करवेन Wink

हेहे
मला काळा टीशर्ट जीन्स आणि स्ट्रेटन हायलाईट हेअर वालं भूत बनायला आवडेल.साडी बिडी नकोच.

खरंच, पूर्ण पिक्चर नाही पण एखादा 10 मिनिटांचा स्पूफ अनेक पात्रं बनायला हरकत नाही Happy केजी चा सांस्कृतिक डे असतो ना, वर्गातल्या सगळ्या चिंट्या पिंट्याना नाचवतात तसं.

बदला घेणारं भूत>> ज्याचा/जिचा बदला घेणार त्याची/तिची पिसे काढून प्रेक्षकांना हसवत बदला घेणारं भूत?

जर चित्रपटातील नायकाची भूमिका शाहरूखला सूट होणारी असेल तर >> पिक्चर कॅन्सल केलेला बरा!
>>>

म्हणून असे म्हणतात की मराठी माणसे मागे आहेत. व्यवसाय जमत नाही Happy

मला काळा टीशर्ट जीन्स आणि स्ट्रेटन हायलाईट हेअर वालं भूत बनायला आवडेल.साडी बिडी नकोच.>>>
बाणेर टू हिंजेवडी व्हाया चांदणी चौक असा हॉरर सिनेमा बनवावा लागेल मग Happy
एकट्याने मोठी कार घेऊन जाणाऱ्या लोकांना अनु अचानक मागच्या सीटवर प्रकट होऊन घाबरवून सोडतील Happy

मॉडर्न कॉश्च्युमच्या भुताला उलटे पाय ठेवण्यास अडचण येणार अश्याने कारण मग हाय हिल्स येणार पुढल्या बाजूला आणि पुढे चलायचं म्हटलं तरी तोल जाणार कायम मागच्या मागेच !!

मी पण अस्मिता च्या ग्रूप मध्ये. लग्नातला थ्री पीस सूट घालून पार्टीला जाणे, चकटफु चखणा व ड्रिंक्स, अधून मधून वा वा असे म्हणणे.
( ये माना मेरी जां हे हसते जख्म मधले गाणे रेफरंस ला )

मला काळा टीशर्ट जीन्स आणि स्ट्रेटन हायलाईट हेअर वालं भूत बनायला आवडेल.साडी बिडी नकोच. >>>> Lol
हे भूत पिक्चरचं बजेट वाढवतंय बहुतेक Lol

मुघल ए आझम सारखा कपडेपट बनवणार असाल तर नायक नायिका राजवाड्यातल्या उद्यानात तळ्याकाठी रोमान्स करताहेत. एकही शब्द संवादु नाहीत. नायिकेचे अर्धोन्मिलित नेत्र धरित्रीकडे कटाक्ष टाकत आहेत. ती नायकाच्या पायांवर पहुडलेली आहे. नायकाचा एक गुडघा किंचित वर आलेला आहे. त्याचा आधार घेत तिने हनुवटी उचललेली आहे. तो तिच्या चेहर्‍यावर कोंबडीचे पीस फिरवत आहे. त्यामुळे तिच्या डोळ्यात आरक्त भाव आलेले आहेत.....

अशातच मागे गाणे नको का ? ते गायला मी तयार आहे.

चलाओ ना नैनो से बाण रे

मला जाने भी दो यारो मधला धृतराष्ट्र सारखा रोल द्या.. एकच डायलॉग- ये क्या हो रहा है?
सध्या एकूण परिस्थिती पण तशीच आहे...

सरळ एकमार्गी पुष्पक सारखा बनवायचा
म्हणजे प्रत्येक सिनसाठी काय डायलॉग्स आहेत /होते /असावे ह्यांच्या चर्चा पिक्चर रिलीज नंतर किमान वर्षभर सुरु राहतील आणि त्यातून सिने जगताला भरपूर सारे अख्तर आणि सलीम मिळतील. आणि ते अख्तर आणि सलिमच का ह्यावर अड्डा कट्टा खडाजंगी दशकभर सुरु राहण्यास भरपूर वाव मिळू शकेल.

Pages