'Perhaps'- वेन यिदुओ (Wen Yiduo) या कवितेचा मराठी भावानुवाद -'बहूतेक…..'

Submitted by मुग्धमानसी on 18 July, 2023 - 06:07

वेन यिदुओ (Wen Yiduo) या चायनिज कवीच्या काही कविता मध्यंतरी वाचनात आल्या आणि फार आवडल्या. त्यातल्या एका ’Perhaps' नावाची गाजलेली कविता मनाला खूप स्पर्शून गेली. कातर करून गेली.
या कवितेचा मराठीत भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलाय.....

'बहूतेक…..'.

बहूतेक फार फार रडून झालंय तुझं.
आणि आता डोळ्यांत पाणी येईना झालंय…

बहूतेक. बहूतेक जराशी झोप घेणं आवश्यक आहे तुझ्यासाठी.
तर मग आता या रातकिड्यांना आपण शांत व्हायला सांगू.
बेडकांना सांगू की तुमचा गलका गप्प करा.
वटवाघळांनो…, तुमची फडफड बंद करा!

सूर्यप्रकाशाला सांगू की तुझ्या डोळ्यांचे पडदे उघडील असा प्रकाश इथं येऊ देऊ नको गड्या
थंडगार वार्‍याच्या झुळुकीनं तुझ्या पापण्या थरथरू नयेत. जराही.
ए…... ऐक नं. तुला कुणीही दचकवून जागं करू शकणार नाही!
मी तुझ्या गाढ झोपेवर झाडांच्या गर्द झावळ्यांची छत्री उघडून धरेन.

बहूतेक खोल चिखलात वळवळणारी गांडूळं ऐकू येताहेत तुला
कींवा मग छोट्याश्या गवताच्या पात्यानं घटाघट प्यालेलं मातीच्या अंतरंगातलं पाणी…....

बहूतेक… तुला ऐकू येत असलेलं संगीत माणसांच्या शपथा-शापांच्या सार्‍या कोलाहलाहून फार सुंदर असावं!

तर मग पापण्या मिट तुझ्या. आणि घट्ट् बंद कर डोळे.
मी तुला झोपू देईन. झोपू देईन मी तुला.
मी तुझ्यावर हळूवारपणे मातीचं पिवळंशार पांघरूण घालेन.
आणि कागदी नोटांची सारी राख…
उडू देईन.
सावकाश. हळू हळू.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह्ह्ह! ह्र्दयस्पर्शी...
"माणसांच्या शपथा-शापांच्या सार्‍या कोलाहलाहून फार सुंदर " ... नि!शब्द

मस्त. ओरिजिनल कविता तर काही मी वाचली नाही. पण या कवितेपासून प्रेरणा घेऊन ती हिंदीत शब्दांतरित करायचा हा एक प्रयत्न केला आहे (अगदीच रहावलं नाही Happy ) -

शायद काफी रो लिए तुम
अब आँसू आना भी बंद हुआ है

शायद.. जरासी नींद जरूरी है तुम्हे
इन झींगुरोंसे कह दें के चुप हो जाए
कह दें मेंढकोंसे के शोर ना करे
चमगादडों अपने पर ना फडफडाओ...

धूपसे कह दें के तुम्हारी आँखोंपर से चिलमन ना उठाएं
ठंडी हवाके झोंकेसे तुम्हारी पलकें जराभी ना कपकपाएं
तुम्हें चौंकाके कोई नींदसे ना जगाए
मैं तुम्हारी गहरी नींद पर घने पत्तोंका छाता धर दूँ

शायद तुम्हें सुनायी देते हैं नीचे जमीनमें रेंगते केंचुएं
या घासकी नन्ही पत्तीयोंका मिट्टीके नमीको गटकना

शायद जो तुम्हें सुनायी देता है वह संगीत ज्यादा सुंदर है
इन्सानोंके कस्मो-श्रापोंके धुनोंसे ज्यादा सुंदर

तो फिर गिरा दो ये पलकें, अपनी आँखें बंद करो
सोने दूँगा मैं तुम्हें
ओढाऊंगा तुम्हे आहिस्तासे मिट्टीकी पीली रजाई
और इन कागजके नोटोंकी राख उडने दूँगा
फुरसतसे. धीरे धीरे.

वा! मस्तच rmd.
'’Perhaps' चा हिंदी अनुवाद फार पूर्वी रामधारीसिंह दिनकर यांनी केलेला आहे. तोही अर्थात अप्रतिमच आहे. तीही कविता सापडली तर टाकेन इथे.

धन्यवाद सर्वांना! आणि मुग्धमानसी, तुला विशेष थँक्स ही कविता इथे टाकल्याबद्दल. नाहीतर असं काही सुचलंच नसतं मला.

'’Perhaps' चा हिंदी अनुवाद फार पूर्वी रामधारीसिंह दिनकर >>> जरूर पोस्ट कर इथे. वाचायला आवडेल.