शींदें मुख्यमंत्रीपदी रहाणार की जाणार?

Submitted by ashokkabade67@g... on 12 July, 2023 - 08:37

संघाला पराजयाचा गंध खुप आधीच येतो व संघ कामाला लागतो भाजपला अपेक्षित यश मिळेलच पुर्वी सारखा मोदींचा करिश्मा मते मिळवून देईलच याची शाश्वती आता संघाच्या थिंकटँकला वाटत नसल्याने संघ कार्यरत झाला आहे एकुण देशातील जनतेत असलेला असंतोष पहाता भाजपला शंभर जागांवर फटका बसु शकतो मग ही हानी भरुन काढण्यासाठी विरोधी पक्षांची लचके तोडुन कमळ फुलवण्याचा प्रयत्न सुरु झाला पण कमळ फुलण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झाला पण तो ईतका झाला की त्याची दलदल झाली आणि भाजप त्या गाळात आता गळ्या पावेतोबुडायला लागली आहे.
खरतर शिवसेना फोडून शिंदेमुख्यमंत्री झाल्यानंतर आलेल सरकार बहुमतात असल्याने पडण्याची भिती नसतांनाही भाजपने अजित पवारांना सोबतघेण्याची काही गरज होती असेही नाही पण शिंदे मत मिळवून देऊ शकत नाही हे भाजपच्या लक्षात आल्याने ईतरत्र झालेल्या पराभवाची भर महाराष्ट्रात काढण्यासाठी महाराष्ट्रातील तेवढाच मोठा नेता सोबत असणे भाजपला गरजेचे वाटल्याने आजित दिदांची सरकारमधे एंन्ट्री झाली पण गोची मात्र शींदे गटाची झाली आहे व नाराजी वाढली आहे त्यातच अपात्रतेची टांगती तलवार शिंदे गटावर आहेच बरे आजितदादाही फक्त उपमुख्यमंत्री पदावर खुष रहातील असेही नाही ते मुख्यमंत्री पदासाठी च सोबत आले आहेत आताच खाते वाटपावरुन सरकारमधे वादावादी सुरु आहे अर्थखाते अजित पवारांना देण्यास शींदे सेनेतील एका गटाचा प्रबळ विरोध आहे अजित पवारही मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतल्यानंतर च भाजप सोबत गेले हेहु सत्य आहे अस असतांना शिंदेचे मुख्यमंत्री पद रहाणार की जाणार हाच आता प्रश्न आहे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जितके भारतात अतंगवादी हल्ले झाले त्या सर्वांना काँग्रेस सरकार नी पकडुन फाशीवर चढवले.>>>>>>
इंडियन एअर लाइन्स चे प्लेन हायजॅक करणाऱ्या देवेंद्र नाथ पांडे आणि भोला पांडे या दोन अतंगवाद्यांना इंदिरा गांघी ने विधानसभा आणि लोकसभेची काँग्रेसची तिकिटे देवून कित्येकवेळा निवडून आणले आहे .
जरा वाचत जा हो ....

पण राहुल जी ची इमेज वर काही ही फरक पडला नाही.
एक तरुण,शिक्षित,सू संस्कृत ही त्यांची इमेज लोकांच्या मनात निर्माण झाली च>>>>>>>>>>
काही अयशस्वी प्रयत्ना नंतर इस्रोचे चांद्रयान ३ देखील लॉन्च झाले , पण तुमचे राहुल शेठ अजून भरकटलेल्या अवस्थेत भारताच्या राजकारणाच्या कक्षेत फिरत आहे , तीस वर्ष झाली पण अजून काही केल्या लाँच सक्सेस होईना Happy

खातेवाटप झाले त्यावर न बोलण्यासाठी कोणत्याही विषयाला धरून नेहमीची कॅसेट चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न ! Biggrin

नगर विकास मात्र शिंदे नी सोडले नाही वाटत.
मलई दार खाते आहे

आणि शिंदे न च राजकीय जीव नगरविकास मध्येच आहे.
त्या जोडीला अर्थ असते तर शिंदे किंग झाले असते.
आता अजित पवार कडे अर्थ आहे म्हणजे आल्या ना अडचणी.
पण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कडे खास पॉवर आहेत.

जस्ट इन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील मंत्री आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत.

अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, आदिती तटकरे, हसन मश्रीफ आदी आमदार शरद पवारांची भेट घेण्यासाठी केंद्रात पोहोचले आहेत.

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनीही वायबी चव्हाण केंद्रात धाव घेतली.

<< मोदी पवारांना घाबरतो. >>

------ पवार मुरब्बी राजकारणी आहेत, ते पवारांना घाबरत नाही.

सत्याला सामोरे जायला घाबरतात. मग ते पुलवामा अपयश असेल किंवा संजय जोशी असतील किंवा संसदेतली अडाणी- हिंडेनबर्ग चर्चा असेल.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटातील राष्ट्रवादीचे आमदार सलग दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील वायबी चव्हाण केंद्रात पोहोचले. शरद पवार नुकतेच त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

अजित पवार आणि समर्थक आमदारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले. पण शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी आज पुन्हा वायबी चव्हाण सेंटर येथे गेले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी अजितदादा गटाकडे मांडल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार आणि समर्थक आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर ते दुसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांनी कोणताही प्रतिक्रिया दिली नाही.

शरद पवार यांच्या भेटीला कोणते नेते गेले ?

अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अतुल बेनके, अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, सुनील शेळके, दत्तामामा भरणे, संजय शिंदे, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, सरोज अहिरे, राजु कारेमोरे या नेत्यांनी शरद पवार यांची वायबी सेंटर येथे जाऊन भेट घेतली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला सगळेजण मानतात. नरेंद्र मोदी हे शरद पवारांना राजकीय गुरू मानतात, असं त्यांनी म्हटलं होतं. जर अजित पवार गट शरद पवारांचं मन वळवण्यात यशस्वी झाला तर आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. शरद पवारांचा अनुभव याची मदत आम्हाला सर्वांनाच होईल. आता शरद पवार आपला निर्णय बदलतील का? हे मी नाही सांगू शकत पण आमची पण अपेक्षा आहे की, त्यांनी जर बदलला तर त्याचे स्वागतच करू, असेही केसरकर म्हणाले. Lol

शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी बंगलोरला गेले नाहीत.
लोकशाही न्युज चॅनेलवर राष्ट्रवादी काँग्रेस संबंधाने ब्रेकिंग न्युज आहे.

Pages