शींदें मुख्यमंत्रीपदी रहाणार की जाणार?

Submitted by ashokkabade67@g... on 12 July, 2023 - 08:37

संघाला पराजयाचा गंध खुप आधीच येतो व संघ कामाला लागतो भाजपला अपेक्षित यश मिळेलच पुर्वी सारखा मोदींचा करिश्मा मते मिळवून देईलच याची शाश्वती आता संघाच्या थिंकटँकला वाटत नसल्याने संघ कार्यरत झाला आहे एकुण देशातील जनतेत असलेला असंतोष पहाता भाजपला शंभर जागांवर फटका बसु शकतो मग ही हानी भरुन काढण्यासाठी विरोधी पक्षांची लचके तोडुन कमळ फुलवण्याचा प्रयत्न सुरु झाला पण कमळ फुलण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झाला पण तो ईतका झाला की त्याची दलदल झाली आणि भाजप त्या गाळात आता गळ्या पावेतोबुडायला लागली आहे.
खरतर शिवसेना फोडून शिंदेमुख्यमंत्री झाल्यानंतर आलेल सरकार बहुमतात असल्याने पडण्याची भिती नसतांनाही भाजपने अजित पवारांना सोबतघेण्याची काही गरज होती असेही नाही पण शिंदे मत मिळवून देऊ शकत नाही हे भाजपच्या लक्षात आल्याने ईतरत्र झालेल्या पराभवाची भर महाराष्ट्रात काढण्यासाठी महाराष्ट्रातील तेवढाच मोठा नेता सोबत असणे भाजपला गरजेचे वाटल्याने आजित दिदांची सरकारमधे एंन्ट्री झाली पण गोची मात्र शींदे गटाची झाली आहे व नाराजी वाढली आहे त्यातच अपात्रतेची टांगती तलवार शिंदे गटावर आहेच बरे आजितदादाही फक्त उपमुख्यमंत्री पदावर खुष रहातील असेही नाही ते मुख्यमंत्री पदासाठी च सोबत आले आहेत आताच खाते वाटपावरुन सरकारमधे वादावादी सुरु आहे अर्थखाते अजित पवारांना देण्यास शींदे सेनेतील एका गटाचा प्रबळ विरोध आहे अजित पवारही मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतल्यानंतर च भाजप सोबत गेले हेहु सत्य आहे अस असतांना शिंदेचे मुख्यमंत्री पद रहाणार की जाणार हाच आता प्रश्न आहे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भाजपाच्या तुलनेने काँग्रेस पक्ष जास्त लोकशाहीवादी होती आणि आहे. समस्त भारतीय समाजाचा विचार करणारा पक्ष आहे. ब्रिटिशांपासून देशाला मुक्त करण्यात काँग्रेस अग्रेसर होती. त्यामुळे स्वातंत्र्याचे महत्व जाणणारा पक्ष आहे. नेते मंडळी शिकलेली होती, आणि विज्ञानवादी नेतृत्व होते.>>
अनुमोदन. सद्य परिस्थितीत काँग्रेस दूर राहुन शहाणी दिसत आहे. अहिंदा काँबिनेशन करुन २०२४ मध्ये कर्नाटक ची पुनरावृत्ती करता येउ शकेल.

विज्ञानवादी नेतृत्व होते.>>
A team of scientists from the Indian Space Research Organisation (ISRO) visited the Sri Venkateswara temple at nearby Tirumala on Thursday morning in the run-up to launch of the lunar exploration mission Chandrayaan-3 on Friday.
न्यूटनची ऐसी तैसी.

भाजपाच्या तुलनेने काँग्रेस पक्ष जास्त लोकशाहीवादी होती आणि आहे.

हे मात्र खरे आहे.साधी सर्वांना माहीत असलेली उदाहरणे द्यायची झाली तर .
डान्स बार वर बंदी घातली तेव्हा राज्यात काँग्रेस/ राष्ट्रवादी आणि केंद्रात काँग्रेस सरकार होते.
भारतीय मीडिया अगदी टोकाची टीका ह्या निर्णय वर करत होती.
अगदी आक्रमक पने.
आता bjp sarkar नी कोणता निर्णय घेतला तर त्या
वर टीका करायची मीडिया ची हिम्मत आहे का?bjp सरकार आल्या पासून आणि त्यांनी पकड मजबूत केल्या पासून .
सरकार विरुद्ध कधी मीडिया आक्रमक झालेली कोणी बघितली आहे का?
कोणता hi sarkari निर्णय असो मीडिया त्याचे आक्रमक पने समर्थन करताना च दिसेल.
नीट बंदी,.
पुलगमा,.
कोरोना मध्ये टाळ्या वाजवणे.
किती तरी उदाहरणे देता येतील.

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, पोलीस तपासात उघड### मिंधेना धक्के द्यायला सुरुवात झाली

>>काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत होती पण तिला हा साधा शोध लागला नाही >>

------ भाजपाच्या तुलनेने काँग्रेस पक्ष जास्त लोकशाहीवादी होती आणि आहे.<<

दिल बहलाने के लिये ये खयाल अच्छा है गालिब Wink
२०१४ पर्यंत बहुतांश तेच आणि त्यांचेच लोक सत्तेत होते मग प्रकरणे कुणाची बाहेर काढणार आणि कुणाला धाक दाखवणार?
आत जर इथुन पुढे ते सत्तेत आले तर मग त्यांना स्कोप असेल; तेंव्हा ते काय करतात ते बघून ठरवा लोकशाहीवादी की काय ते!

बाकी देशावर आणिबाणी लादणाऱ्या पक्षाला लोकशाहीवादी म्हणावेसे वाटत असेल तर अंधभक्ती कोण करतय याचा जरा अंतर्मुख होऊन विचार करा

सध्या आणीबाणी नाहीचे , लोकशाही अगदी ओसंडून वाहते आहे असे मानणाऱ्या शहामृगानी आपली मान आणखी खोल खुपसून घ्यावी

हे इथे सरकारविरोधी अनेक धागे उघडून खऱ्या-खोट्या आयड्यांनी जे लिहताय त्यातच आणिबाणी/विचारस्वातंत्र्य वगैरे आहे की नाही याचे उत्तर दडलेले आहे Proud

आणीबाणी पेक्षा आज ची स्थिती कमी वाईट नाही.
ज्याने गुन्हा केला त्या वर च कारवाई आणीबाणी मध्ये केली जात होती.
आणि आता लोकांची घर बुलडोझर नी पाडली जात आहेत.
तेव्हा मीडिया सरकार विरुद्ध लिहू शकत होती.
आता मीडिया ची हिम्मत नाही सरकार विरुद्ध एक बातमी चालवण्याची.
आणीबाणी पेक्षा पण आताची स्थिती वाईट आहे.

घ्या ! स्वतःचे नाव पण लिहीत नाही आणि इतरांचे खरे खोटे आयडी बघताहेत. Proud मायबोलीवर काही लिहू शकानेंहि लोकशाहीची लिटमस टेस्ट कधीपासून?

सोयिस्करपणे विषयापासून भरकटू नका Wink
Youtube वर खंडीभर चॅनेल आहेत, फेसबुकवरच्या पोस्टी बघा आणि चाय-बिस्किट न्यूज चॅनेल वाले आहेतच
फक्त जरा चष्मा काढून बघा Rofl

Youtube वर खंडीभर चॅनेल आहेत, फेसबुकवरच्या पोस्टी बघा आणि चाय

ह्या सर्व नालायक लोकांची मस्ती २०२४, मध्ये परत सतेत आलो की उतरवणार च आहे. अशी bjp ची विचारधारा आहे
त्या साठी च सोशल मीडिया वरील पोस्ट एडिट करायचे अधिकार सरकार ल हवे आहेत.
Google,twiter, FB,whstsapp ह्यांनी सरकार डेटा द्यावा म्हणून सरकार माग लागले आहे.

BJP विरुद्ध लोकमत आहे.
Bjp वाले ते स्वीकारत नाहीत पण ते खरे आहे.
२०१४ मध्ये bjp ला मतदान करणारे आता पश्र्चाताप करत आहेत.
हे पण सत्य आहे.
मी पण bjp ( म्हणजे युती सेनेला मत दिले होते)ला मत दिले होते २०१४ ला.
काँग्रेस नेहमीच सत्तेत असल्या मुळे.हा पक्ष जरा बरा वाटला.
पण ह्यांनी जे गुण उथलायला सुरुवात केली त्या मुळे bjp पूर्ण मनातून उतरली.
सेना फोडण्या पेक्षा,राष्ट्रवादी फोडन्या पेक्षा bjp नी फक्त तात्विक विरोध करून त्यांना पाच वर्ष पूर्ण करून दिली असती .
तर २०२४ ला bjp स्वतःच्या सामर्थ्यावर निवडून येण्याची शक्यता होती.
फोडा फोडी मुळे bjp विश्वास घातकी आहे हे सिद्धच झाले आहे.
फडणवीस ह्यांची लगेच bjp नी हकालपट्टी केली पाहिजे
आणि ed त्यांच्या मागे लावून त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे

BJP विरुद्ध.
काँग्रेस,शरद पवार, उद्धव ठाकरे ह्यांनी कोणालाही उभ केले तरी तो निवडून येणारं आहे.
घड्याळ,आणि धनुष्य बाण त्यासाठी च bjp चोरत आहे जेणे करून लोकांची फसगत व्हावी
पण आज जग खूप पुढे गेले आहे
पक्षांची चिन्ह ग्रामीण भागात पण सहज लोकांना माहीत करून दिली जातील

अजित पवार,एकनाथ शिंदे लोकांचे नेते आहेत त्यांनी काम केली आहेत.
लोक बिलकुल नाकारत नाहीत.
पण ते bjp समर्थक आहेत हे लोक पचवू शकत नाहीत...
कर्ण सर्व गुण संपन्न होता ..
पण
तो कौरव च्या बाजू नी होता म्हणून
त्याची सजा त्याला महाभारत मध्ये मिळाली आहे.

नेते मंडळी ed ला घाबरतात याचं मुख्य कारण म्हणजे हे सगळे टवाळ पोरं असतात. शाळेची पायरी कधी चढलेले नसतात त्यामुळे त्यांना तोंडी परीक्षा व्हायवा यांचा अनुभव नसतो. लहान वयात हे अनुभव नसल्याने मोठे झाल्यावर असं काही समोर आलं की यांचे हात पाय थरथरतात.

कुरुलकर सेक्स च्या भुकेसाठी फुटला .
हे पहिले डोक्यातून काढून टाका.
बुधवार पेठ पुण्यात च आहे.
कुरुलकर मोठ्या
षडयंत्र च एक भाग असण्याची जास्त शक्यता आहे.
सेक्स च हवासी हे त्याचे गुण नक्कीच नाहीत.
आणि सेक्स च हवसी असेल तर पुण्यात सेक्स worker ची कमी नाही

मुसलमान गुन्हेगार असला की भाजपचे लोक वापर करणार.
.संघाचा सदस्य असला की दुसऱ्या बाजूचे लोक वापर करणार.

Youtube वर खंडीभर चॅनेल आहेत, फेसबुकवरच्या पोस्टी बघा आणि चाय-बिस्किट न्यूज चॅनेल वाले आहेतच ## सगळे भाजपिग्ज चॅनल आहेत. शर्मा वर्मा पात्रा पुनावाला गोस्वामी ही कुत्ते मंडळी भुकतात ते वेगळंच

विषय गंभीर आहे
इथे मुस्लिम किंवा कोण हा विषय नाही.
फक्त सेक्स चाट किंवा सुंदर स्त्री शी सेक्स ची कल्पना .
ह्या मुळे संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ संशोधक बळी पडत असेल तर.
ही खूप गंभीर समस्या आहे.
सेक्स ची ईच्छा भागवण्यासाठी अनंत मार्ग भारतात उपलब्ध आहेत.
त्या मुळे फक्त सेक्स इच्छे मुळे त्यानी देश द्रोह केला हे बिलकुल पटत नाही

कुरुलकरला बाजूला ठेवूया. शिंदेंना मुख्य मंत्री पदावर ठेवायचे कि नाही याचा विचार करा. तिकडे शहेनशहा आपल्या निर्णयाची वाट पहात आहेत याची जाणीव असुंद्या.

शिंदे शी bjp ला काही देने घेणे नाही.
भारतातील सर्व च राजकारणी भ्रष्ट आहेत चोकशी केली तर ते सिद्ध होणार आहे.
शिंदे स्वतःची जागा सोडून एक पण जागा निवडून आणू शकत नाहीत .कारण त्यांच्या कडे जे आमदार आहेत ते फक्त ठाकरे न मुळे निवडून आले आहेत त्याचे स्वतःचे काही वलय नाही.
पण अजित पवार ह्यांची स्थिती वेगळी आहे
अजित पवार समर्थक आमदार न ची स्वतःची इमेज आहे.
(काही सर्व नाही)
त्यानं

ते कोणत्या पक्षात आहे त ह्याचा फरक पडत नाही ..
ते निवडून येवू शकता त.
शिंदे ची बाजू कमजोर आहे

रंगेल संघी म्हातारा >>>>>>
सत्याचे प्रयोग करणारा पण रंगील म्हातारा होता ते आठवल !
बाकी त्या कुरुलकर ला घाणीत बुडवा नाहीतर उकळत्या तेलात टाका , आमचे काहीही म्हणणे नाही .....

ज्युरीतील सभ्य स्त्री पुरुष हो. तुम्हा सर्वाना वर्षा विहाराला ववि जायची घाई आहे. पण त्या आधी वर्षावर कुणी राहायला जायचं? हा प्रश्न सोडवा.

राजकारणी लोक नालायक आहेत आणि ह्यांना दांडक्याने मारली पाहिजेत इतका तीव्र विचार मराठी लोक करत आहेत..
आज ची फालतू गिरी बघून

बघा
आणि तुम्ही म्हणताय आणिबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे Wink

इथे साईटवर भाजपविरोधी वातावरण असलं तरी अमेरिकेत मोदींचा डंका वाजतो. स्वागत काय,भाषणासाठी मायबोलीकरांची नोंदणी काय मज्जाच.

शिंदे जाणार का? का? भाजपने कुणाला कोणते पद द्यावे/देऊ नये यावर राउतांचं भाष्य असतं.
भाजपने शिंदेगटाला आपल्यात घेतलं,सन्मानाने मुख्य मंत्री केलं. राष्ट्रवादीला घेतलं, चांगलं मोठं पद देणार आहेत. त्यात काय चुकलं? पदं आणि खातं सांभाळणं हा वेगळा प्रश्न आहे. पण जे केलं तो सन्मानच नव्हे का? इतरांना पोटदुखी का?

इतकेही भोळे बनू नये बुवा. मोदी एन सी पी ने ७०००० करोडचा सिंचन घोटाळा , राज्य सहकारी बँक घोटाळा केला असं रेकून रेकून सांगतात आणि यात ज्यांचं नाव येतं त्याच अजित पवारांना तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री करतात.

आणि शिंदेंचं सरकार वैध आहे की अवैध ( ते आमदार म्हणून पात्र की अपात्र) याचा निर्णय एक वर्ष प्रलंबित आहे. आणखी एक वर्षही प्रलंबित राहू शकतो.

हे मुद्दे आहेत.

दुसरा मुद्दा : मविआमधून बाहेर पडताना शिंदे गटाने राकॉ आणि अजित पवारांचं कारण सांगितलं. आता त्यांनाच सरकारात सोबत घेतलंय.

अर्थात भाजप समर्थकांना सत्तेसाठी काहीही केलेलं गोड लागत असलं तरी जनता बघते आहे. इतकंच काय भाजपमधलेच नेते , कार्यकर्तेही बघताहेत Wink

अमेरिकेत मोदीच्या नावाने नाचायला वीणा वर्ल्डने आणलेले टुरिस्ट होते. आता मोदी फ्रान्समध्ये आहे तर युरोपियन युनियनच्या संसदेत मणिपूर मधल्या शासनसंमत हिंसाचारावर चर्चा झाली. आता भा रत भलेही म्हणो, हा आमचा अंतर्गत प्रश्न (असा ज्यावर मोदीने ब्रही उच्चारला नाही, हिंसाचार थांबवायला कृती करणं दूर) आहे; पण याच युरोपियन संसदेच्या सदस्यांना मोदीने काश्मीरमध्ये सगळं कसं शांत शांत आहे, हे दाखवायला फिरवलं होतं ( त्यावेळी काश्मिरी नेते नजर कैदेत होते आणि भारतातील नेत्यांना तिथे जायची बंदी होती)

Pages