संघाला पराजयाचा गंध खुप आधीच येतो व संघ कामाला लागतो भाजपला अपेक्षित यश मिळेलच पुर्वी सारखा मोदींचा करिश्मा मते मिळवून देईलच याची शाश्वती आता संघाच्या थिंकटँकला वाटत नसल्याने संघ कार्यरत झाला आहे एकुण देशातील जनतेत असलेला असंतोष पहाता भाजपला शंभर जागांवर फटका बसु शकतो मग ही हानी भरुन काढण्यासाठी विरोधी पक्षांची लचके तोडुन कमळ फुलवण्याचा प्रयत्न सुरु झाला पण कमळ फुलण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झाला पण तो ईतका झाला की त्याची दलदल झाली आणि भाजप त्या गाळात आता गळ्या पावेतोबुडायला लागली आहे.
खरतर शिवसेना फोडून शिंदेमुख्यमंत्री झाल्यानंतर आलेल सरकार बहुमतात असल्याने पडण्याची भिती नसतांनाही भाजपने अजित पवारांना सोबतघेण्याची काही गरज होती असेही नाही पण शिंदे मत मिळवून देऊ शकत नाही हे भाजपच्या लक्षात आल्याने ईतरत्र झालेल्या पराभवाची भर महाराष्ट्रात काढण्यासाठी महाराष्ट्रातील तेवढाच मोठा नेता सोबत असणे भाजपला गरजेचे वाटल्याने आजित दिदांची सरकारमधे एंन्ट्री झाली पण गोची मात्र शींदे गटाची झाली आहे व नाराजी वाढली आहे त्यातच अपात्रतेची टांगती तलवार शिंदे गटावर आहेच बरे आजितदादाही फक्त उपमुख्यमंत्री पदावर खुष रहातील असेही नाही ते मुख्यमंत्री पदासाठी च सोबत आले आहेत आताच खाते वाटपावरुन सरकारमधे वादावादी सुरु आहे अर्थखाते अजित पवारांना देण्यास शींदे सेनेतील एका गटाचा प्रबळ विरोध आहे अजित पवारही मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतल्यानंतर च भाजप सोबत गेले हेहु सत्य आहे अस असतांना शिंदेचे मुख्यमंत्री पद रहाणार की जाणार हाच आता प्रश्न आहे .
शींदें मुख्यमंत्रीपदी रहाणार की जाणार?
Submitted by ashokkabade67@g... on 12 July, 2023 - 08:37
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण जे केलं तो सन्मानच नव्हे
पण जे केलं तो सन्मानच नव्हे का? ### वा, वा! मुश्रीफचा , भुजबळाचा पण सन्मान केला ना ?
मोदीच्या परदेश दौर्याचा
मोदीच्या परदेश दौर्याचा मुद्दा इथे आलाच आहे म्हणून हा १९८५ मधला भारत आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा फोटो

मोदी घेणार का पत्रकार परिषद ?
अमेरिकेत एक प्रश्न विचारला (त्याचं थातुरमातुर , असंबद्ध , खोटं उत्तर दिलं ) त्यावर भाजपायींनी इतका शिमगा केला की व्हाइट हाउसला त्यावरही प्रतिक्रिया द्यावी लागली.
राजीव जी न च्य चेहऱ्यावर च
राजीव जी न च्य चेहऱ्यावर च विद्वत्तेच तेज दिसत आहे...
अगदी बोलका फोटो आहे
भोळे होण्यात काय अडचण? काही
भोळे होण्यात काय अडचण? काही अट्टल होत असतील तर? एके काळी वाखाणलेले मावळे नंतर कावळे होतात की. समजा भाजपसंबंधितांमागेच इडी लागली तर? कल्हई म्हणतील? तावून सुलाखून चमक?
बाकी आत गेलेल्यांना काही दिले नसते तरी ओरड झाली असती 'तोंडाला पाने पुसली'.
हे थोडे इलन मस्क याने ट्विटर घेण्यासारखे झाले का? एक नवी स्टार्टअप काढून ट्विटरला प्रतिस्पर्धा करता आली असती. परंतू ट्विटरला किंमत मोजून स्पर्धेचा खटाटोप वाचला. तसं मला वाटतं. दोन पक्ष मोठ्या संख्याबळाने जोडून भाजपने आघाडी घेतली?
<समजा भाजपसंबंधितांमागेच इडी
<समजा भाजपसंबंधितांमागेच इडी लागली तर?> भाजपमधून बाहेर पडल्याशिवाय नाही लागत ईडी. खडसेंना विचारा किंवा सत्यपाल मलिकना.
आता तुम्हांला काहीही केलेलं चालतंय ना? मग टीकेकडे दुर्लक्ष करा.
भोळं होणं म्हणजे मांजराने डोळे मिटून दूध पिण्यासारखं आहे.
झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते मधल्या फडणवीसांच्या एपिसोडच्या फेस बुक पोस्ट वर Zee Marathi limited who can comment on this post.
तिथे आलेल्या कमेंट्स दिसतही नाहीत. आधीच्या एपिसोड्सच्या फेसबुक पोस्टच्या बाबतही हाच प्रकार आहे का पाहायला हवं.
परंतू ट्विटरला किंमत मोजून
परंतू ट्विटरला किंमत मोजून स्पर्धेचा खटाटोप वाचला. >>> कमाल आहे. अहो इलन मस्क पळून चालला होता. त्याला कायद्याचा बडगा दाखवून ट्वीटर घ्यायला भाग पाडलं गेल.
असंबद्ध , खोटं उत्तर दिलं )
असंबद्ध , खोटं उत्तर दिलं ) त्यावर भाजपायींनी इतका शिमगा केला की व्हाइट हाउसला त्यावरही प्रतिक्रिया द्यावी लागली.>>>>>>
अरे बाप रे !
मग भाजपायी घाबरले का ?
दूनियाभर च्या लिब्रलस ना चुचकरण्यासाठी व्हाईट हाऊस च्या प्रवक्त्याने ती प्रतिक्रिया दिली होती , बाकी त्या बद्दल बायडेन सरकार मधील मंत्र्यांनी गप्प राहणेच पसंद केले यातच सर्व आले .
बायडेन सरकारमध्ये मंत्री
बायडेन सरकारमध्ये मंत्री त्यांच्या त्यांच्या खात्यांनी संबंधित बाबींवर बोलतात. ते काय मोदी सरकार नाही. खातं नावाला आणि काम ट्रोलिंग
एक वर्ष कळ काढा. सगळं मार्गी
एक वर्ष कळ काढा. सगळं मार्गी लागेल. लोकशाही वाचेल.
बरोबर. काम करणारं सरकार आहे.
बरोबर. काम करणारं सरकार आहे. त्यामुळे राज्यपाल आमदार नियुक्तीसाठी एक वर्ष झालं तरी निर्णय घेत नाही. सभापती अर्ज उबवतो.
कागदावर हे दोघे पक्षाच्या पलीकडले आहेत. पण काम पक्षाचंच करतात.
कायदे कलमं स्पष्ट केलेली असली
कायदे कलमं स्पष्ट केलेली असली तरी त्यातूनही अमुक गोष्टीला कलमं लागू होणार का यावर पुन्हा कीस पडतो.
पुन्हा आदेश काढणारा त्या वेळी आदेश काढण्यास सक्षम होता का ही पुन्हा तपासणी. दहावे शेड्यूल कुणाला लागू होते यावरही तपासणी. खूप किचकट काम.
--------
बांगला आणि रोहिंग्यापिग्स ची
बांगला आणि रोहिंग्यापिग्स ची भारतात नीट व्यवस्था झाली असेलच !
प्लीज ते 'शींदे' चं
प्लीज ते 'शींदे' चं 'शिंदे' करा आधी!
प्लीज ते 'शींदे' चं 'शिंदे'
प्लीज ते 'शींदे' चं 'शिंदे' करा आधी!>>> नको नको. ते तसच राहुद्या. "शींदे" मध्ये जो गोडवा आणि आपुलकी आहे ती 'शिंदे' मध्ये कुठून येणार?
विषय काय, हे बेणं बोलतंय काय?
विषय काय, हे बेणं बोलतंय काय??
९ वर्ष सत्तेत आल्याच्या डिंगा मारतो आणो वर रोहिंग्याचं रडगाणं गातो. कसली कुवत ??
हो बरोबर. स्वतःला हवं असेल
हो बरोबर. स्वतःला हवं असेल तेव्हा मध्यरात्री, पहाटे केव्हाही काम करता येतं.
वेळेवर व्याजासहित परत करू
वेळेवर व्याजासहित परत करू
भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या
भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर आमदारांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर जलदगतीने निकाल देण्याचे निर्देश देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून उत्तर मागवले.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विट केले की, "आता ब्रेकिंग: राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) महाराष्ट्रात अर्थ, सहकार आणि कृषी यासह अनेक महत्त्वाची खाती मिळाली आहेत. टीप: भाजपने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर सहकार क्षेत्रातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचे आरोप केले होते. आता, सर्व एकाच बाजूला दिसते: राजकारणात तुम्ही कुठे उभे आहात याचा अंदाज तुम्ही कुठे बसता यावर अवलंबून आहे!
हे सर्व वेळ घाउ प्रकार आहे.
हे सर्व वेळ घाउ प्रकार आहेत
कोर्ट कचेऱ्या ,कायदे,अध्यक्ष..
न्याय जनतेच्या दरबारात च पटकन होणार आहे
अजित दादाच्या हातात हुकुमाचा
अजित पवार उपमुख्यमंत्री होताच लवासा प्रकरण पुन्हा चर्चेत, लवासाप्रकरणी पुढील सुनावणी 21 जुलैला
मुख्यमंत्री करण्याच्या
मुख्यमंत्री करण्याच्या बोलीवरच अजित पवार इकडे आलेत.
केंद्रात bjp आली नाही तर .
केंद्रात bjp आली नाही तर .
ह्या सर्व उड्या मारणाऱ्या लोकांची अवस्था अतिशय केवील वानी होणार आहे.
राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान होण्यास लायक व्यक्ती आहेत.
असे सर्व स्तरातील लोकांना वाटत.
त्या मुळे. .नितीश, ममता,केजरी,आखिलेश, ह्यांनी समजूतदार पना दाखवला पाहिजे
ह्या सर्वांनी समजूतदार पना दाखवला आणि राहुल गांधी हा चेहरा पंतप्रधान म्हणून मान्य केला तर.
Bjp च पराजय नक्की आहे.
बीजेपी पुढील ५००० वर्षे राज्य
बीजेपी पुढील ५००० वर्षे राज्य करणार आहेत.
https://youtu.be/OFq8SXMSnqs
https://youtu.be/OFq8SXMSnqs
बीजेपी पुढील ५००० वर्षे राज्य
बीजेपी पुढील ५००० वर्षे राज्य करणार आहेत.
अशी डायलॉग बाजी करणारे नशा उतरली की येतील जागेवर.
जितके भारतात अतंगवादी हल्ले
जितके भारतात अतंगवादी हल्ले झाले त्या सर्वांना काँग्रेस सरकार नी पकडुन फाशीवर चढवले.
पूलगमा 40 सीआरपीएफ जवान मारले गेले.
अजून एक पण आरोपी ह्यांना पकडता आला नाही.
Bjp Wale म्हणजे फक्त बोल bachhan .
बाकी काही दम नाही
बीजेपी पुढील १०००० वर्षे
बीजेपी पुढील १०००० वर्षे राज्य करणार आहेत.
आता बोला.
राहुल गांधी ना पप्पू
राहुल गांधी ना पप्पू ठरवण्यासाठी हजारो करोड bjp नी खर्च केले.
पण राहुल जी ची इमेज वर काही ही फरक पडला नाही.
एक तरुण,शिक्षित,सू संस्कृत ही त्यांची इमेज लोकांच्या मनात निर्माण झाली च
मागील काही दिवसांपासून
मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. खातेवाटपाची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेली होती. राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आलेय. या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे. भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना महत्वाची खाती राखण्यात यश आलेय. अजित पवार यांच्या गटाला शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही मंत्र्यांकडील खाती येण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे खातेवाटप यादी...
अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे - क्रीडा
आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनजंय मुंडे - कृषी खाते
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा
महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीकडे कोणती खाती होती ?
वित्त आणि नियोजन
गृह खाते
ग्रामविकास
जलसंपदा
गृहनिर्माण
राज्य उत्पादन शुल्क
सामाजिक न्याय
सार्वजनिक आरोग्य
अन्न आणि नागरी पुरवठा
अन्न आणि औषध प्रशासन
अल्पसंख्यांक कामगार
एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली आहेत.
कृषी, मदत आणि पुनर्वसन
अन्न आणि औषध प्रशासन
भाजपकडून सहा खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.य
अर्थ
सहकार
वैद्यकीय शिक्षण
अन्न नागरी पुरवठा
क्रीडा
महिला आणि बालकल्याण
Pages