फराळ गर्भरेशमी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

(विडंबन किंग मिल्याच्या गझलेचे विडंबन करण्याचा मोह आवरला नाही.)

मलाच पेलतो सहज असून थुलथुलीत मी
उमेद एवढीच की 'बनेन स्लिम' हाच मी

कबूल कर मना कशी, नसामांसात चरबी
फितूर देह सांगतो, उभ्या जगास बातमी

जमेल का मला कधी, भयाण पत्थ पाळणे
हवीच वाटते मला, पुरी परात नेहमी

कशास वाढती सदा, तनूत रोज कॅलरी ?
'न मोजताच चेपणे', अशी न होय रे कमी?

नवेच शौक पाळतो, श्रीखंड बळे टाळतो
रसात आम्रखंडही पिऊन टाकतोच मी

मना तुलाच रमविण्या, नवेच खेळ खेळतो
वडी... वड्यास डाव हा! मलाच लागते रमी

तळेल ते... वळेल ते... नकोच ते अता पुन्हा
नकोच ते ... म्हणायचे... विचार फक्त मौसमी

मनाविरुद्ध मी असा भज्यात गुंततो पुन्हा
इलाज काय जर मिळे फराळ गर्भरेशमी

अखेर मोडतोच मी करार जेवणातला
उगा उपास का करू, नसेल जीवना हमी?

प्रकार: