चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हिंदी गाणी व डबिंग मधे स्वर्गातला इंद्र व शकुंतला, दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलतात. सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. बघवत नाहीत. तो कण्व मुनी झाला आहे. सगळे त्याला 'कणव' मुनी म्हणण्याने आपल्याला शकुंतलेबद्दल कणव वाटत नाही. >> अस्मिता Lol Lol

मला बरेचसे असे पिक्चर्स आलेत हेच मुळी इथे वाचून समजतं, हेही मला थोर वाटतं. अडाण्याला शहाणं करुन सोडतो हा धागा.

>>> सर्वांना एकमेकांवर स्पॉयलर्स सोडता येतील
Lol स्पॉयलरास्त्र!

मला बरेचसे असे पिक्चर्स आलेत हेच मुळी इथे वाचून समजतं, हेही मला थोर वाटतं. अडाण्याला शहाणं करुन सोडतो हा धागा.>>>> +१

अंजू +१

>> सर्वांना एकमेकांवर स्पॉयलर्स सोडता येतील>>> Lol
>>> स्पॉयलरास्त्र!>> Lol
>>>समांथा मख्ख आहे खरंच स्वस्ती.

अंजुताई, मी बंडल सिनेमे आवर्जून बघते. Proud
आचार्य, वसा आहे, टाकून कसं चालेल. Lol
सर्वांना Happy

बघ जरुर बघ, पुढच्याच ठेच मागचा शहाणा होतं आमच्यासाठी. आता सांगतेस तशी सांगत जा हो. आम्हाला ठेच लागू देऊ नकोस Wink .

बघ जरुर बघ, >> +१
पुढच्याच ठेच मागचा शहाणा होतं आमच्यासाठी.>> -१
मला शहाणा वगैरे नाही व्हायचंय, फक्त पीसं काढणे वाचायचे आहे.

बऱ्याच पोस्ट्स नंतर उघडला धागा, धमाल झाली इथे.
भुवया रिसायकल्ड मिशा Lol

हिंदी गाणी व डबिंग मधे स्वर्गातला इंद्र व शकुंतला, दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलतात. सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. बघवत नाहीत. तो कण्व मुनी झाला आहे >>>>>>>>>
Lol
काय ती फटकेबाजी Happy

heiress म्हणजे भरपूर इस्टेटीची स्त्री वारसदार. 'भरपूर' नोट करा. Paris Hilton ही Hilton empire ची heiress आहे. दोन एकर शेती, एक पितळंचा तांब्या, दोन पळ्या वगैरे जर एखाद्या काकीला वाटणीत मिळाल्या असतील तर तिला कुणी heiress म्हणत नाही. >>>>>>>
Lol
कुठून सुचत हो ?
शिरीष कणेकर च्या नात्यात आहात का ?

स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडरवर्स - खूप आवडला. पर्सनली मारवेल ने गेल्या 5 एक वर्षात काढलेली बेस्ट फिल्म.

जलसा - प्राइम

एक हिट अ‍ॅंड रनची नाट्यमय घटना, विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन कसलेल्या अभिनेत्री, त्यांना रोहिणी हट्टंगडी आणि दोन चिमुरड्यांची साथ. सुरेश त्रिवेणी हे नाव दिग्दर्शक म्हणून ऐकले नव्हते पण आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नक्की बघावा असा सिनेमा.

१९२० - हॉरर ऑफ द हार्ट ट्रेलर वरून पोल्टगाईस्ट ( ८० च्या दशकातला) ची कॉपी असावा असे वाटले. बघूयात २३ जून लांब नाही.

नुकताच मराठी मूव्ही पहिला... Foot Fairy
गुलशन देवैय्या मेन लीड आहे...छान आहे मूव्ही..सस्पेन्स शेवटपर्यंत आहे...पण त्याचे मराठी उच्चार खटकतात..त्याला देशमुख न दाखवता दुसरं कुठलही नॉन मराठी आडनाव दिलं असतं तर त्याचे उच्चार खपून गेले असते...काम नेहमीप्रमाणे छान त्याच...

नुकताच मराठी मूव्ही पहिला... Foot Fairy
गुलशन देवैय्या मेन लीड आहे..
>>
ओरिजिनल हिंदी आहे, मराठीत डब होऊन आलाय.
एंड टोटल गांडलेला अन् सिक्वल ला ही स्कोप नसलेला सिनेमा आहे.

सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. >>> कहर मी इमॅजिनलं Rofl त्या
भरदार वळलेल्या मिशा खेडकर च्या चेहर्यावर ..

नेफी वर गुमराह बघितला !
तीन चार वर्षापूर्वी पाहिलेल्या South मूव्ही thadam चा रिमेक आहे .
आदित्य रॉय कपूर चा डबल रोल , एक सभ्य तर दुसरा गुंड.
उच्च प्रतिष्ठित व्यक्तीच्या खुनात पोलिस दोघांनाही प्राईम सस्पेक्ट गृहीत धरत असतात .पोलीस टीम मध्ये रोनित रॉय आणि मृणाल ठाकूर ने व्यवस्थित कामे केली आहेत .
खुनी कोण शेवटपर्यंत मस्त ओढले आहे .

सगळे नवीन चित्रपटाबद्दल लिहिताय, त्यामुळे लिहू की नको असे वाटत, पण लिहितो.
सध्या व्हेकेशन चालू आहे, फक्त एक phd ची परीक्षा घेतल्यानंतर दुपारी मोकळा वेळ होता म्हणून यू tube वर १९९८ चा अंजली चित्रपट पाहिला. रेवती, रघुवरण आणि बच्चे कंपनीचा. डोळ्यातून इतके पाणी आले की सांगता येत नाही. अतिशय सुंदर सिनेमा.

याआधी फक्त लहानपणी मदर इंडिया आणि हाथी मेरे साथी बघताना एव्हढे अश्रू आले. असतील.

रेवती आणि राघुवरण आणि ती अंजली, निव्वळ अप्रतिम.

शेवटी काही मुलांना सिस्टीम वर speaker लावून एकत्र पहिला. त्यांना कळेच ना की आपला मास्तर यू ट्यूब पहाताना का रडतोय ते म्हणून मग शेवटाला एकत्र पहिला.

डोळ्यातून इतके पाणी आले की सांगता येत नाही. अतिशय सुंदर सिनेमा. >>> छान आहे. सिनेमा चालू असताना इमोशनल होता येणं हे जिवंत असल्याचं पाहून बरं वाटलं.

आमची अवस्था टणक, नीब्बर शेंगदाण्यासारखी झालेली आहे. ना भूताचे पिक्चर बघून भीती वाटते, ना इमोशनल सीन्सला रडायला येतं,ना ध्क्केपटांनी धक्के बसतात, ना रहस्यपटातल्या रहस्याची उकल उत्तेजित करते. ते इतके घाऊक पाहीलेत की आता रोबोट मधे रूपांतर झालंय. आता तर जय संतोषी मा, लिओनी, खलिफा पट एकसमान तटस्थतेने पाहता येतात. ईक्यू उणे १७३ च्या खाली जाऊन गोठला आहे कायमचा.

रघु सर, फार नर्व्हस असलो की राजेश काकाचा बावर्ची पहातो मी आणि चार्ज होतो. हा सुद्धा माझा ऑल टाईम फेवरेट.

बावर्ची, आनंद आणि अमर प्रेम ची पारायणं केलीत. अमर प्रेम बघताना डोळ्यातून पाणी यायचं. ती आता अश्मयुगीन घटना वाटते.

गुमराह बघितला.
मर्डर मिस्ट्री सोडून चित्रपट काही तरी सेंटी दाखवत सुटतो. मिस्ट्री भाग अगदीच प्रेडिक्टेबल आहे. आणि तरीही आपल्याला समजवायला संत्री सोलून त्याची चिपाडं चावणं बघायची आहेत.
मला नाही आवडला.

ज्युबिली/जुबिली बघितला अ‍ॅमेझॉन वर, मस्त खिळवुन ठेवणारी सिरिज. सगळ्याची काम उत्तम झालियेत...अपारशक्तीचा मोठा रोल असलेली पहिलीच भुमिका बघितली...चान्गल काम करतो.निलोफरच काम करणारी पण छान आहे.

Pages