अभिवाचन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का?

Submitted by हरिभरि on 29 May, 2023 - 07:23

मायबोली वर जर कोणी अभिवाचन केलेलं असेल तर मला थोडी मदत हवीये.
जर मला वेबसाईट वर प्रसिद्ध झालेल्या कथा, दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या कथांचं अभिवाचन करून माझ्या इन्स्टा किंवा सोमी वर पोस्ट करायचं आहे, आणि त्यात वाचन करताना मी लेखकाचे नाव हव तर प्रकाशकाचे नाव वगरे सांगणार असेन तर मला लेखी परवानगी घ्यावी लागेल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओहो, तुम्ही माझ्या कथांचे अभिवाचन कराना. माझी पूर्ण परवानगी आहे.
पाहिजे तर मीच उलट पैसे देईन.

आंतरजालावर उपलब्ध असणे म्हणजे प्रताधिकारमुक्त असणे नाही. जरी तिथे प्रताधिकाराचा उल्लेख नसेल तरी ते मुक्त असेलच असं सांगता येत नाही. अनेक देशात या बाबतीत वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे परवानगी घ्यावी हे उत्तम.

६० वर्षांचा नियम सरसकट लागू होत नाही. जर प्रताधिकार लेखकाने दुसऱ्या कुणाला विकले असतील किंवा ते प्रकाशन संस्थेच्या नावे असतील तर त्याबाबतीत असं गृहीत धरून चालणार नाही. मूळ लेखनाचे प्रताधिकार काय आहेत याची माहिती काढूनच खात्री करावी लागते.