मायाजाल (Honey Trap) की देशाच्या सुरक्षेशी बेईमानी?

Submitted by ढंपस टंपू on 26 May, 2023 - 04:42

सध्या मायाजालात अनेक जबाबदारीच्या पदावरील व्यक्ती अडकल्याचे वारंवार दिसून येते आहे. पुरूषांच्या जोडीला महिला सुद्धा या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे विषकन्याच नाही तर विषकुमारांचा सुद्धा वापर केला जातो हे उघड झाले आहे.

पण सध्या मायाजाल (हनीट्रॅप) या शब्दाच्या वापरावरून वादंग उठले आहे. मायाजाल या शब्दाचा वापर करून काही देशद्रोह्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी करून त्यांना बळी / पीडीत दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे असे काही जणांचे म्हणणे आहे.

त्यांच्या जागी विशिष्ट लोक असते तर मीडिया ने आग लावून त्यात तेल ओतत राहण्याचे काम केले असते असे त्यांचे म्हणणे आहे.

यात किती तथ्य आहे?
मायाजाल /हनीट्रॅप हा शब्द वापरावा कि नाही? का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला झाकापाकी करायची सवयच नाही , कोणत्याही विषयावर धागा काढा !
मनाला जे पटते तेच टाकू , नाहीतर काहीजण ७० वर्षांचे गुलामीचे जोखड अजून उतरवायला तयार नाहीत .

फुरोगामी, स_सा, उपाशी बोका, व्हाईटहॅट, राज.
या धाग्यावर या सर्वांचे प्रतिसाद महत्त्वपूर्ण असतील.
>>>
आणि विशेष भूमिकेत मायबोलीची स्मृती इराणी झाकणझुल्या फेम रशमी बाईंना पण ऍड करा लिसटीत

देशाचे सुरक्षा संबंधातली माहिती, कळत / नकळत, बाहेरच्या राष्ट्राला दिली जाणे गंभिर बाब आहे. माहिती बाहेर गेली.

कळतपणे असे कृत्य केले असेल तर तो देशद्रोह आहे. नकळत अशी माहिती दिल्या गेली असेल तर त्यामुळे सारखेच नुकसान झालेले असते.

प्रदीप कुरुलकरजी होते म्हणून मायाजाल / हनी ट्रॅप असा सौम्य शब्दप्रयोग पुढे आला. कुरुलकरजींच्या चार पिढ्या संघासाठी काम करायच्या असे वाचले आहे. म्हणजे देशप्रेमाचे धडे जन्मजात मिळाले आहेत.

अपराधी इद्रिस /अन्सारी असता तर आरोपीला कुठलिही सवलत मिळाली नसती, गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठलेही पुरावे लागले नसते.... आय टी सेलने ट्रायल करुन निकालही दिला असता. सखोल चौकशी साठी अपराध्याला आग्रा, लखनौ, कानपूर च्या DRDO कार्यालय/ लॅब मधे नेण्याची व्यावस्था झाली असती पुढे भिस्त मॅन्युअल मधे लिहील्याप्रमाणे घटनाक्रम घडत गेला असता...

देशाच्या सुरक्षेसंबंधांत गुपिते बाहेरच्या राष्ट्राला देण्यात मुस्लीम धर्माचे लोक पुढे नाहीत. पहिल्या क्रमांका वर कोण आहे हे आरशांत बघितल्यावर कळते.

<< या धाग्यावर शुकशुकाट का आहे ? >>

------ आपलेच दात आपलेच ओठ.

DRDO मधे कसून background checking हा प्रकार नसतो का? दर दोन वर्षांनी बघायचे.

एव्हढ्या मोठ्या पदावर काम करतांना, आपण कुठली माहिती कुणाला देत आहोत हे पण कळत नाही. काहीच संशय आला नाही? असे अजून किती लोक अडकले असतील " ट्रॅप " मधे?

देशाच्या सुरक्षेसंबंधांत गुपिते बाहेरच्या राष्ट्राला देण्यात मुस्लीम धर्माचे लोक पुढे नाहीत. पहिल्या क्रमांका वर कोण आहे हे आरशांत बघितल्यावर कळते >>>>>>>>
किला तभी ढहा है जब अंदर से कोई मिला हुवा है दुर्दैव , त्यात तो कुरुलकर सापडला.

देशावर प्रेम .
धर्म,जात,प्रांत ,ह्या वर अवलंबून नसते
. भारतीय लोकात मुळातच देश प्रेम बिलकुल नाही.
फक्त स्व स्वार्थ हा भारतीय लोकांचा खास गुण आहे.
सत्य तपासायचे असेल तर केंद्रीय सरकार नी गुप्त पने .
देशाशी गद्दार पण दाखवून स्वार्थ साधणाऱ्या लोकांची परीक्षा घ्यावी
सर्व जात ,धर्म,आर्थिक स्थिती, सर्व घटकातील लोकांना पैसे,स्त्री सुख, संपत्ती ह्याचे आमिष दाखवून त्याची प्रतिक्रिया घ्यावी

पहिल्या क्रमांका वर कोण आहे हे आरशांत बघितल्यावर कळते.>>>>>>>>
20230607_171712.jpg
हाच का तो आरसा ?
देशप्रेम दाखवताना पकडले गेले , आता एन आय ए चौकशी करत ....

ह्या
तुमच्या पोस्ट शी सहमत.
पण ही नावं कोणी दिली तुम्हाला हा प्रश्न तर विचारावा लागेल

सायबर सुरक्षा आणि सोशल मीडीयात घ्यायची काळजी हा खूप मोठा विषय आहे. एका वरीष्ठ पोलीस अधिकार्‍याचे लेक्चर ऐकले.

सोशल मीडीयात ओळख लपवणार्‍यांना दूषणे देणे खूप बघण्यात येते. पण तीच पॉलिसी योग्य आहे. कधी तरी यावर बोलायला हवे.

हनीट्रॅप मधे अडकलेले सगळे देशद्रोह करायचा म्हणून पछाडलेले नसतात.
सोशल मीडीयात पक्षासाठी ऐच्छिक / पेड एन्फ्युएन्सर्स असतात. साहजिकच पक्षाच्या वरच्या स्तरातल्या बॉसेसना खूष करण्यासाठी ते कामाला लागत असतात. इथे जो शास्त्रज्ञ अडकला त्याची एका विशिष्ट संघटनेची पार्श्वभूमी त्याच्यावर एका राजकीय विचारसरणीचा शिक्का मारते, त्यामुळे साहजिकच विरोधी राजकीय विचारांचे लोक या संधीचा फायदा घेणारच.

याशिवाय जातीचा मुद्दा देखील आहे.
हे आपण बाजूला ठेवूयात. म्हणजे या मुद्द्यांवर ज्यांना लढाई करायचीच आहे त्यांनी ती खुशाल करावी. त्याबद्दल काहीच म्हणणे नाही. आपण सोशल मीडीयाचा वापर , सायबर सिक्युरिटी बद्दल बोलूयात.

१. जे अशा संस्थेत काम करतात त्या लोकांनी शक्यतो सोशल मीडीयापासून लांबच राहीले पाहीजे. अगदी व्हॉट्स अ‍ॅप नाही वापरले तरी सुद्धा चालेल.
२. स्टेटसला मी अमक्या संस्थेत काम करतो, अशा पदावर आहे ही जाहीरात करणे टाळले पाहीजे. उच्चपदस्थांना तर हे भान असायलाच हवे. अशाच संस्थेतल्या लोकांनीच नाही तर इतरही अनेकांना सावध राहण्याची गरज आहे.
३. सोशल मीडीया अकाउंटवर आपले फोटो, कुटुंबियांचे फोटो नकोत टाकायला. तुम्ही खासगी कंपनीत असाल, स्वतःचा व्यवसाय असाल आणि त्या गोष्टी जर शत्रूराष्ट्राला आकर्षक वाटू शकतात याची जाणिव तुम्हाला असेल तर तुम्हीही तितकीच जबाबदारी बाळगायला हवी. चिंचवडची एक कंपनी लष्करासाठी जनरेटर बनवते. ही माहिती गुप्त नाही तरी असे समजूयात. तर या प्रोजेक्टवरच नाही तर त्या कंपनीतल्या प्रत्येकाला दक्षता घ्यावी लागते. कारण एका कंपनीत काम करत असलेल्यांमधे संबंध असतातच.
४. एखादी सुंदर महिला आपली चौकशी करत असेल, गुलुगुलु बोलत असेल तर आपण काय देखणा दिवा आहोत कि ऋत्विक रोशन आहोत म्हणून ही आपल्यावर भाळलीय असा विचार मनात यायला हवा.
५. त्या महिलेचे सध्याचे वास्तव्य एखाद्या प्रगत देशाचे दिसेल पण ती पाकिस्तानची असू शकते.
६. एका विशिष्ट वयानंतर भिन्नलिंगी आकर्षण, विवाहबाह्य संबंधांबाबत मनाला आवर घातला पाहीजे. याबद्दलच्या तात्विक चर्चा, पर्सनल स्पेस, व्यक्तीस्वातंत्र्य हे सगळे तत्त्वतः ऐकायला, बोलायला, इंप्रेशन मारायला ठीक आहे. बौद्धीक चर्वितचर्वण म्हणूनही ठीक. पण प्रकरण जेव्हां अंगाशी येतं तेव्हां पोलीस अधिकारी तुमची शाळा घेतो तेव्हां ही बौद्धीकं त्याच्या समोर मूर्खपणा वाटू लागतात. सोमिवरच्या चर्चातली कित्येक व्यक्तीस्वातंत्र्याच्या विरूद्ध जाणारी म्हणून निषेधार्ह किंवा रॅशनल मतं ही पोलीसांसमोर टिकत नाहीत. कारण ते अनुभव सांगत असतात.
७. स्मार्ट फोनच वापरला नाही तरी काही बिघडत नाही.
८. आपली स्वतःची काळजी तर घेऊच. पण एखादा सोमिवर ओळख देत नसेल तर त्यालाही भाग पाडू नये. आपल्यालाही कुणी ओळख देत नाही म्हणून बाजीप्रभूच्या थाटात पळपुटे वगैरे म्हणत असेल तर अशांना फाट्यावर मारावे. अशांच्या समाधानासाठी ओळख न देण्याचे घेतलेले व्रत मोडण्याचे काही एक कारण नाही. त्याने आपल्याला मेडल मिळत नाही. उलट सायबर क्राईमचा शिकार होण्याची शक्यता जास्त.
९. मुंबई ते लंडन चाललोय हे स्टेटस मिरवण्याची काहीच आवश्यकता नाही. सायबर क्राईम वाले या अनावश्यक माहितीचा अचूक फायदा उठवतात. एका पोलीस केस मधे दुबईला एकट्याने जाणार्‍या विवाहीत व्यक्तींच्या पत्नीला फ्लाईट उडाली कि फोन यायचा. तुमच्या नवर्‍याला विमानतळावर ताब्यात घेतलेले आहे. एफआयआर झाली तर सुटणार नाही. असतील तेव्हढे पैसे घेऊन या असे सांगून शरीरसुखासाठी भाग पाडले जायचे. ही माहिती त्यांनी त्यांचा पासपोर्ट एजंट एका ठिकाणी झेरॉक्स करायचा , त्या दुकानातून चोरली. यावरून आपण काय माहिती सोमिवर टाकायला पाहीजे याचे भान बाळगणे गरजेचे.

आपली जादाची माहिती देऊन सरकार काही भारतरत्न देत नसते कि दहा टक्के कोट्यातला वरळी सी फेसचा फ्लॅटही देत नसते.
उगीचच डिंग्या मारणे हा मानवी स्वभाव आहे. यातून काहीही मिळत नाही. अशाच सवयीमुळे शास्त्रज्ञ अडचणीत येतात, लष्करी अधिकाही अडकतात. एकदा का त्यांच्या व्हिडीओ चॅटची, आक्षेपार्ह दृश्यांची रेकॉर्डिंग करून क्लिप बनली कि मग ते काँप्रोमाईज होतात.

सोमिचा वापर कशासाठी करायचा याचं भान पाहीजे. करमणूक, माहिती मिळवणे, कन्सेप्ट्स क्लिअर करणे यासाठी काहीच समस्या नाहीत. पण हे करतानाही सावधगिरी बाळगली पाहीजे. एखादा सावधगिरी बाळगत असेल तर त्याच्या बाबतीत काहीही माहिती नसताना त्याच्यावर त्यावरून आगपाखड करणे पण अयोग्यच.
आपण आधी काही चुका केल्या असतील तरी आता या क्षणापासून त्या न करण्यासाठी कार्यरत राहू.

सीमा हैदर प्रकरणातला सचिन मीणा तर सामान्य मनुष्य आहे. पण आता त्याचे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झाले आहे. जर सीमा हैदर पाक एजंट निघाली तर सचिन मीणाचे घर हा तिच्यासाठी कव्हर असणार होता. म्हणजेच ती अंडरकव्हर एजंट म्हणून कार्यरत झाली असती. आता सचिन मीणा या बाबतीत अनभिज्ञ जरी असला तरी तोच त्याचा गुन्हा आहे.

ही पाळी कुणावरही येऊ शकते.

सायबर क्रिमिनील्सचा उल्लेख झालाच आहे. तिसरा थ्रेट म्हणजे राजकीय.

सोमित राजकीय विचारसरणीचे लोक इतरांना टार्गेट करत असतात. इतकेच नाही तर एकाच विचारसरणीच्या लोकांत सुद्दा नेत्यांनुसार कंपू असतात. हे लोक पोलीस, आयकर विभाग, ईडी याकडे विरोधी गटाच्या तक्रारी करत असतात. सोमित लिहीलेला एकच आक्षेपार्ह शब्द आपले जीवन उद्ध्वस्त करू शकतो.

आणि हे मी आता भारतात नाही किंवा मी भारतात आहे तर अमक्या देशातल्या माणसाबद्दल काहीही लिहीले तर कोण काय करणार अशा भ्रमात राहून चालत नाही. आता सायबर क्राईमच्या देवाणघेवाणीचेही करार होत आहेत.

आपण विवेकाला अनुसरून काळजी घेण्याने नुकसान काहीही नाही. व्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा दिपवून टाकण्यासाठी मारूच. पण प्रत्यक्षात आणताना जरा पोलीसांना कसे पटवणार याचाही विचार करून ठेवलेला बरा.

रघु आचार्य : पोस्ट आवडली. फक्त पॉईंट नंबर ४ बद्दल ऍड करावेसे वाटते.

हनी ट्रॅपिंग लिंगनिरपेक्ष असते. दुसर्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीत याची उदाहरणे सापडली होती कारण २-३ जर्मन पुरुषांच्या पिढ्या युद्धात कापल्या गेल्या होत्या, सिंगल वूमनचे प्रमाण समाजात अचानक वाढले होते. त्या काळात उच्चपदस्थ व्यक्तीसाठी काम करणाऱ्या मध्यमवयीन सेक्रेटरी, टायपिस्ट वगैरे स्त्रियांना अगदी ठरवून टार्गेट केले गेले होते

भारतातही ४-५ वर्षांपूर्वीच्या एका हेरगिरीच्या केसमध्ये रिव्हर्स हनी ट्रॅपिंग चा वापर केला गेला होता असा संशय व्यक्त झाला होता.

हनी ट्रॅपिंग लिंगनिरपेक्ष असते. >>> मान्य आहे. निसटला तो मुद्दा. भारतात सुद्धा महिला बळी पडलेल्या आहेत. माधुरी शुक्ला कि शर्मा.

<< हनीट्रॅप मधे अडकलेले सगळे देशद्रोह करायचा म्हणून पछाडलेले नसतात.
सोशल मीडीयात पक्षासाठी ऐच्छिक / पेड एन्फ्युएन्सर्स असतात. साहजिकच पक्षाच्या वरच्या स्तरातल्या बॉसेसना खूष करण्यासाठी ते कामाला लागत असतात. इथे जो शास्त्रज्ञ अडकला त्याची एका विशिष्ट संघटनेची पार्श्वभूमी त्याच्यावर एका राजकीय विचारसरणीचा शिक्का मारते, त्यामुळे साहजिकच विरोधी राजकीय विचारांचे लोक या संधीचा फायदा घेणारच. >>

------- कुरुलकर च्या जागेवर दुसरा कुणी असता तर हनी ट्रॅप हा गोंडस शब्द वाचायलाही मिळाला नसता...
अब्दूल असता तर १०० % देशद्रोह , दयेस पात्र नाही , उ प्र मधे चौकशी साठी गाडीने नेले असते... आणि आरोपी पळून जात असतांना खास भिस्त स्टाईल शिक्षा मिळाली असती.

मुली/ बायकांबद्दल कितीही आकर्षण असले तरी परतीमधे आपण काय देत ( पृथ्वी, अग्नी, drawings, नकाशे , blue prints) आहोत याचे भान नव्हते हे समजण्यापलीकडे आहे. आमिष / आकर्षण दाखविले गेले आणि देशद्रोह घडला.

कपड्यांवरुन व्यक्तीची विचारसरणी ओळखता येते असे कुणी सुज्ञ म्हणाले होते.

तुम्ही माझ्या पोस्टला भलतेच वळण देत आहात. त्यावर बोलून झाले नाहीये का तुमचे? प्रत्येकाने प्रत्येक शब्दनशब्द कानामात्रावेलांटीसह तुम्हाला हवा तसा लिहावा अशी अपेक्षा असेल तर प्रशासनाकडून माझी कमेंट उडवून त्या जागी तुम्हाला हवी ती कमेंट लिहा. माझे काहीच म्हणणे नाही.

<< तुम्ही माझ्या पोस्टला भलतेच वळण देत आहात. त्यावर बोलून झाले नाहीये का तुमचे? प्रत्येकाने प्रत्येक शब्दनशब्द कानामात्रावेलांटीसह तुम्हाला हवा तसा लिहावा अशी अपेक्षा असेल तर प्रशासनाकडून माझी कमेंट उडवून त्या जागी तुम्हाला हवी ती कमेंट लिहा. माझे काहीच म्हणणे नाही.
नवीन Submitted by रघू आचार्य on 21 July, 2023 - 01:28 >>

------- माझी तुमच्याकडून तसेच इतरांकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत. जसे तुम्हाला तुमचे विचार आहेत तसेच मला माझे मत / विचार आहेत आणि ते मी मांडत रहाणार.

विचारांतला फोलपणा दिसल्यावर तो दाखवावा असे वाटते, इतरांनी ते मान्य करावे असा कुठलाही आग्रह / अपेक्षा नाही. तुमचे विचार वेगळे असतील तरी मी आवर्जून वाचतो, काही वेळा विचार करतो.

ज्या गोष्टीवर मला आत्ता मत द्यायचे नाही त्यावर मत द्या ही सक्ती नाही का? त्याच्या जागी अन्य कुणी असता तर यावर माझे जे काही मत असेल ते मला आता या क्षणी नाही द्यायचे तर ते स्वातंत्र्य मला नसावे का? यात फोलपणा कुठुन नि कसा आला?
तुम्ही काहीही अर्थ काढला आहे आणि त्यानुसार बळेच माझ्या वर आरोप करत आहात. तुम्हाला त्याचे स्वातंत्र्य आहे. मला स्पष्टीकरण द्यायचे नाही. हे माझे स्वातंत्र्य. कोट केलेल्या ओळींशिवाय जी अन्य पोस्ट आहे त्याच्या आशयाला फाट्यावर मारणे आहे हे.
असो.
माझ्या इतर पोस्ट वाचता त्याबद्दल धन्यवाद. त्या वाचूनही भलताच संशय घ्यावासा वाटतो याबद्दलही आभार.

रघु आचार्य, पोस्ट आवडली. सारासार विचार करून सगळे मुद्दे मांडले आहेत. एकच गोष्ट निसटली असं वाटलं तर लगेच पुढील प्रतिसादात ती cover केली गेली.

उदय, तुमच्या प्रतिसादाशी देखील सहमत आहे. दोन्ही बाजुचं समर्थन करते आहे असं वाटेल, पण तुमचा मुद्दा देखील कळला/ पटला आणि आचार्यांनी सोशल मीडिया वापरण्या बद्दल general guidelines दिल्या आहेत, त्या सुध्दा योग्यच आहेत.

मीरा.. - धन्यवाद.

<< ज्या गोष्टीवर मला आत्ता मत द्यायचे नाही त्यावर मत द्या ही सक्ती नाही का? त्याच्या जागी अन्य कुणी असता तर यावर माझे जे काही मत असेल ते मला आता या क्षणी नाही द्यायचे तर ते स्वातंत्र्य मला नसावे का? यात फोलपणा कुठुन नि कसा आला?
तुम्ही काहीही अर्थ काढला आहे आणि त्यानुसार बळेच माझ्या वर आरोप करत आहात. तुम्हाला त्याचे स्वातंत्र्य आहे. मला स्पष्टीकरण द्यायचे नाही. हे माझे स्वातंत्र्य. कोट केलेल्या ओळींशिवाय जी अन्य पोस्ट आहे त्याच्या आशयाला फाट्यावर मारणे आहे हे.
असो.
माझ्या इतर पोस्ट वाचता त्याबद्दल धन्यवाद. त्या वाचूनही भलताच संशय घ्यावासा वाटतो याबद्दलही आभार. >>

----- मी तुमच्यावर अजून तरी कुठलाही आरोप केलेला नाही. तसा समज झाला असेल दोष माझ्या लिहीण्यातला आहे असे मी मानतो Happy . आता थांबतो.

मला पण हनीत्राप मध्ये अडकावयचा प्रयत्न होतो. रोज दोन तीन बायका लोन घ्या म्हणून मला कॉल करतात आणि माझ्याशी गुलुगुलू बोलायला बघतात. पण मी माझ्या लक्ष्यावर केंद्रित असल्याने आणि तपश्चर्या वैगरे करत असल्याने त्यांना साध्य होत नाही.

मीराजी, माझे मन, मी अनु धन्यवाद

@उदयजी, तुम्ही सुरूवातीला पोस्टमधला ठराविक भाग कोट केला आणि बाकिची पोस्ट फाट्यावर मारली आहे. त्याच्याशी तुम्हाला काहीही घेणं देणं नाही. अजूनही तुम्ही त्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आहात. दुसरे , तो अब्दुल असता तर याच्याशी माझ्या पोस्टचा काय संबंध ? आणि तो अब्दुल असता तर याने माझी पोस्ट फोल कशी हे पण सांगत नाही आहात. मी फक्त एव्हढेच म्हटलेय कि सगळेच देहद्रोह करण्यासाठी ट्रॅप मधे सापडत नसतात. जे कुणी जात आणि संघटना हे बघून सोशल मीडीयात तारे तोडत आहेत त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही. तुमचे नाव घेतलेले नाही. तुम्ही बळेच अंगावर ओढवून घेऊन वाद घालत आहात. हे कशासाठी चाललेय ?

कसला तरी संशय वाळगून झाडाझडती घ्यायला तुम्ही सोशल मीडीयातले पोलीस आहात का ? हा संवेदनशील विषय आहे. यात आपली बाजू क्लिअर करणे हे पोस्ट मधे सांगितलेल्या मुद्द्यांशी विसंगत आहे. आता तरी तुमच्या लक्षात येत असेल. तुम्ही जबरदस्ती करून खुलासे करायला भाग पाडत आहात ज्याचा या पोस्टशी संबंध नाही.

तो अब्दुल असता तर काय याच्याशी माझ्या पोस्टचा काहीही संबंध नाही. त्याचा या पोस्टशी संबंध लावू नका. त्यावर चर्चा करायला तुम्ही स्वतंत्र आहात. कोट न करता प्रतिसाद द्या. सेफ असेल तर त्यावर मत मांडेन अन्यथा नाही. सोमितल्या पोस्ट्सवर यंत्रणांची नजर असते एव्हढे भान बाळगायला हरकत नसावी.

या आधी देशद्रोही कृत्यांची अनेक प्रकरणे प्रसिद्ध झालेली आहेत. उदा - संरक्षण क्षेत्राशी संबंधीत महत्वाची कागदपत्रे ५०००० रुपयांना विकली. येथे आर्थिक आमिषाला ते लोक " बळी " पडलेले असतात, पण चर्चा केवळ देशद्रोह यावरच केंद्रित असते.

कुरुलकराच्या जागी दुसरा कुणी असता तर हनीट्रॅप पेक्षा देशद्रोह यावरच चर्चेचा फोकस राहिला असता. केवळ कुरुलकर आहे म्हणूनच हनीट्रॅप शब्द पेरुन घटनेचे गांभिर्य कमी करण्याचा व्यावस्थित प्रयत्न होत आहे असे माझे मत आहे. प्रत्येकाला मत आहे, आणि मला माझे मत आहे, ते मानण्याचा कुठलाही अट्टाहास नाही. उद्या त्याला संस्कारी आहे म्हणून सोडले तरी मला आष्चर्य वाटणार नाही.

प्रत्येक Employer आपल्या कर्मचार्‍यांना स्मार्ट फोन, electronic media च्या वापराबद्दल वेळोवेळी सतर्क / शिक्षित करत असतो. DRDO, ISRO, BARC - मधे काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याने जास्तच सतर्कता बाळगायला हवी. या संस्थां मधे काम करणारा उच्च पदस्थ असेल तर जबाबदारी अजून वाढते. कामासंबंधांत अपरिचीत व्यक्तीशी किती आणि काय संभाषण करत आहात या बद्दलचे code of ethics / आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. work related मुद्द्यांवर चर्चा/ माहिती बाहेर जाणे हे चिंताजनक आहे.

अनोळखी व्यक्ती सोबत व्यावहार कसा करायला हवा , त्या व्यक्तीने काही आमिष (आईसक्रीम, चॉकलेट...) दाखविल्यास काय करायला हवे याचे बाळकडू प्रत्येक पालक आपल्या लहानग्यांना देत असतात. या सुचनांत वेळोवेळी सुधारणा / बदल केल्या जातो. इथे एका संवेदनशील लॅब चा डायरेक्टर कडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही.

<< मला पण हनीत्राप मध्ये अडकावयचा प्रयत्न होतो. रोज दोन तीन बायका लोन घ्या म्हणून मला कॉल करतात आणि माझ्याशी गुलुगुलू बोलायला बघतात. पण मी माझ्या लक्ष्यावर केंद्रित असल्याने आणि तपश्चर्या वैगरे करत असल्याने त्यांना साध्य होत नाही.
Submitted by बोकलत on 21 July, 2023 - 20:03 >>

------- बोकलत AI clone voice असेल. Happy

कुणालाही घबरवून सोडण्याचा उद्देश नाही. आता एक जो युट्यूब व्हिडीओ पाहण्यात आला. यातले दावे खरे, अचूक असतील तर सावध रहावे हाच उद्देश आहे. व्हिडीओची पडताळणी केलेली नाही. त्याची गरज आहे असे वाटत नाही. ज्याला आवश्यक वाटेल त्याने करून पहावी व इथे कळवावे ही विनंती. हा व्हिडीओ पहायला सुरूवात केल्यावर बाजूला एआयच्या अनेक अ‍ॅप्स बाबतचे व्हिडीओज दिसू लागतात. ते ही असेच आहेत. घाबरून जायचे कारण नाही. पण पुरेशी काळजी घेण्यात नुकसान काही नाही. आपले फोटोज नेटवर ठेवायचे कि नाहीत याचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे.

https://www.youtube.com/watch?v=7gxN5SRURc0

Pages