पाककृती, फोटो वरून पदार्थ ओळखा (किंवा उलटे पण चालेल)

Submitted by ढंपस टंपू on 5 May, 2023 - 01:19

चला खेळ खेळूयात.

  • कोडे घालणार्‍याने एखादी पाककृती द्यायची. त्यावरून इतरांनी त्याचे नाव ओळखायचे
  • कोडे घालताना ते सोपे, अवघड कसेही चालेल.
  • लवकर सापडू नये म्हणून साहीत्य दिले नाही तरी चालेल.
  • साहीत्यातल्या काही जिनसांची नावे कोड्यातून किंवा समानार्थी शब्दातून दिले तरी चालेल.
  • कल्पकतेला लिमिट नाही.
  • पाककृती ऐवजी साहीत्य सुद्धा देऊ शकता.
  • फोटो वरून पदार्थ ओळखायला सुद्धा सांगू शकता.
  • एक सारखे दिसणारे अनेक पदार्थ असतील तर कोडे घालणार्याचे उत्तर अंतिम असेल.
  • कोडे घालणार्याने उत्तर द्यावे.

चला, सुरूवात करूयात.

प्रत्येक कोड्याला नंबर टाकावा.
पहिले कोडे सुटले कि दुसरे द्या.
जर पहिले कोडे बराच काळ सुटत नसेल आणि कोडेकर्ता फरार असेल तर बहुमताने पुढे चाल घ्यावी.
शक्यतो देशी / माहितीच्या रेसिपीज असू द्याव्यात. (इतरही चालतील. पण ओळखू येण्यासारख्या असाव्यात)
नवीनच शोधून काढलेल्या रेसिपीज देताना त्या काही महीन्यांपूर्वी कुठे न कुठे प्रसिद्ध झालेल्या असाव्यात.

कोडे क्रमांक १ द्यायच्या आधीच इथे कोडे आले पण. Lol
त्यामुळे ते क्रमांक दोन होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Han थोडे javal आहे ..
पण कैरीची करी नाही हे सासव आहे पिकलेले आंबे वापरतात यात ..
रघु आचार्य पदार्थ ओळखण्यात तुम्ही एकदम तरबेज झालाय की

पण कैरीची करी नाही हे सासव आहे पिकलेले आंबे वापरतात यात ..
>>>>

सासव?
नक्की काय प्रकार आहे? पहिल्यांदाच बघतीय..
रेसिपी द्याल का..

सासव भारीच.

अननस सासव खाल्लंय एका लग्नात, सर्व स्वयंपाक कारवारी पद्धतीचा होता, वेज सर्व. मस्त होतं.

आंब्याचं सासव मस्त दिसतंय. पांढरी घट्ट शेड काजूच्या पेस्टने आली आहे कि नारळ किसून घातला आहे ?
एकदा ट्राय करून पहायला हवं.

रानभुली..
मी तूनळीवर काही रेसिपीज चेक केल्या तिथे ओला नारळच वापरला आहे फक्त..

मानव Lol Lol

सासवाची रेसिपी मी पहील्यांदा मिपावरती गणपत यांनी दिलेली वाचली होती. काय सुरेख फोटो त्यांनी टाकलेला. तेव्हाच ठरवलं करुन पहायची. सापडला तर तो धागा देते. म्हणजे लिंक.

अर्रर्र !
दोन्ही अंदाज चुकले. होतकरू उमेदवारांना प्रोत्साहन देण्याची स्कीम नाही का ?
नाहीतर खट्टू होऊन फिरकणार नाहीत ते अशाने.

हा पदार्थ कोणता??

Screenshot_20230517-234910_Gallery.jpg

Pages