आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यांचे वयाचे तर काही हिशेबच नाहीत. आशू अरुंधती चा क्लास मेट ना?
मग त्याची बहीण वीणा.. त्याच्या हून किती वर्षांनी लहान असेल? ५? जास्तीतजास्त ७? ..
यश आणि त्याच्या आई मध्ये... मिनिमम २३-२४ वर्षांचे तर अंतर असेल?...
म्हणजे यश वीणा मधे...१८-१९ चे तर अंतर हवे ना.? अगदीच इल्लोजिकॉली वागायचे म्हटले.. तरी.. १६...?
मग? Angry
दिल केहता है.... टाइप असेल तर....काय माहित!.

हो.. हे शक्य आहे भरत!
बहुतेक नाहीच आहे सख्खी बहीण. काहीतरी मानलेली वगैरे आहे... Or?
Happy

दिल चाहता है मधे कसं प्रिटी झिंटा तशी इथे वीणा. आशुच्या वडीलांच्या मित्राची मुलगी. तिचे पालक गेल्यावर तिचा सांभाळ केळकरांनी केला. आता म्हणे तिचा बिझनेस पण आशु बघतो.

इशाचा राहिलेला पेपर झाला का कळलं नाही.

दत्तक आहे वीणा. हिन्दीत दाखवल्याप्रमाणे अन्या फिदा होईल वीणावर.

ईशाचही म्हणण पटतय थोडफार की ती मुलगी असल्यामुळे भेदभाव केला जातोय. अभी आणि यशच्या साखरपुडा आणि अभिच्या लग्नावेळी अरु ने हा विचार नाही केला की पैश्याची उधळपट्टी होतेय. अभिच्या पहिल्या साखरपुड्यावेळी तर हिर्याची अन्गठी घेतली. मग इशाला कशाला टोकते?

मला खटकते नेहमीच. तिच्या डोक्यात काही तरी आदर्शवादी विचार असतात १९७० च्या वेळचे. व दुसृयांच्या डोक्यावर थोपत असते.
सार खेच टोकरले तर कोणीही वैतागेल. इशाची सासू खर्च करते आहे तरी हिला का प्रॉब्लेम? गप्प म्हणून बसत नाही. तेच तेच धुवट बोलत राहते. >>>>>>> अगदी अगदी

साखरपुड्याचे विधी करायला वधुचे आई- बाप बसले. म्हणजे ते दोघे नवरा बायको नसले तरी ठीक पण दुसऱ्या कुणाचे तरी नवरा बायको आहेत ना. असं करतात? संजनाला बसवायचं ना.
इशा छान दिसतेय. अनीश अत्यंत बावळट भाव 'रोमॅंटिक' या संज्ञेखाली खपवतोय. कधी नव्हे ते अरुंधती चांगली दिसतेय.

काल का परवा च्या भागात अरुची डार्क मोरपंखी व पदरावर झाडाचे चित्र असलेली साडी मस्त होती. छान साड्या नेसते आज काल. त्यात आयलव्ह यु आशू वगैरे. ऐश आहे एकूण. आज साखरपुढा झाला ते वीणा वादन परत उद्यावर गेले ना!! खरंतर हॉल घेउन इशाचे मित्र मैत्रीणी, इतर नातेवाईक केळकरांचे काँटॅक्ट / नातेवाइक ह्यांना बोलावले असते तर छान झाले असते. पण घरच्या घरी कश्याला खर्च वगैरेत पोरीची हौस गडबडली. एक फंक्षन व बुफे डिनर फार काही खर्चीक नाही ह्या पब्लिकला. असो. इशा टाइप लहंगे दादर मार्केट मध्ये स्वस्तात मिळतात असे मला लोकम त सखी व्हिडीओ बघून समजले.!!!

यशचा सदरा कैच्याकै. अभिचा छान होता.
अनघा आणि छकुली माहेरी गेल्या का??
संजनाची साडी सुंदर होती.

काल का परवा च्या भागात अरुची डार्क मोरपंखी व पदरावर झाडाचे चित्र असलेली साडी मस्त होती. छान साड्या नेसते आज काल. त्यात आयलव्ह यु आशू वगैरे. ऐश आहे एकूण. >>>>>>>> अगदी अगदी. आशूसुद्दा हल्ली रोमॅंटिक आणि हॅण्डसम दिसायला लागलाय.

पण घरच्या घरी कश्याला खर्च वगैरेत पोरीची हौस गडबडली.>>>>>>> नैतर काय. ह्याना सगळेच फ्न्कशन्स घरातच करायचे असतात. ईशा कधी कधी प्रॅक्टिकलही बोलते फक्त ते डेस्टिनेशन वेडिन्ग सोडून.

अनघा आणि छकुली माहेरी गेल्या का?? >>>>>>> हो. अनघाच्या आईच्या हाताला फ्रेक्चर झालय म्हणे.

आपण इनिशा हॅशटॅग केलेला मालिकेत अनिशा केला, तोही अरुने.

वीणा ही आशुची मानलेली बहीण आहे असा उल्लेख होता आधी, आता तिला आत्तेबहीण केलं आहे.

वीणा आणि अन्या काय वादळ आणणार डोंबलाचं ? आणि हे वाक्य अरुच्या तोंडी भर साखरपुड्यात कशाला ?

<<<<वीणा आणि अन्या काय वादळ आणणार डोंबलाचं ? आणि हे वाक्य अरुच्या तोंडी भर साखरपुड्यात कशाला ?>>>

अरु ला बरेच दिवस झाले तिचा छंद जोपासायला जमला नाही ना त्यासाठी चाललंय हे सगळं, आता अरु तिचं सगळ्यात आवडतं काम करु शकेल, रडव्या चेहर्याने देवासमोर हात जोडून प्रार्थना करणे. गाणं, अभ्यास, आश्रम, सख्ख्या आई ची विचारपूस ह्यापैकी कुठल्याही गोष्टीत रस नाही तिला. तिचे छंद दोनच एक जो वर सांगितला आहे आणि दुसरा समृध्दी त जाऊन कांचन च्या शिव्या खाणे, ते जर नाही जमलं तर इश/अभिच्या खाणे.

पर्णीका.. Lol खरे आहे अगदी!
आता पुन्हा आई, भावाला गायब केलेय.... केदार, शेखर, वर्षा, इतकेच काय तर अनघा, छकुली... कुणीच तर नाहीत साखरपुड्याला!
आणि यशला काय डिप्रेशन चे अटॅक!! वाकड तोंडी जाऊन ही बरेच दिवस झालेत की...... बरेच झाले गेली!
अनीष फार वयस्कर दिसतो.
आणि त्याचे आई वडिल अगदीच कृत्रिम ! फारच रोजंदारीवर आणल्या सारखे......

ती वीणा आली तर अनीश च्या आईला रडायला काय झाले? आते नणन्द , तीही वादळ वार्‍या सारखी येणारी अन जाणारी..... तिच्या बद्दल एकदम इतके प्रेम?
अविश्वसनीय वाटते.

वीणा ही आशुची मानलेली बहीण आहे असा उल्लेख होता आधी, आता तिला आत्तेबहीण केलं आहे. >>>>>> सुलेखा मात्र वीणासाठी इतकी इमोशनल होते जशी ती वीणाची सख्खी आई आहे आणि आशू तिचा दत्तक मुलगा. कुछ तो गडबड है!

आता पुन्हा आई, भावाला गायब केलेय.... केदार, शेखर, वर्षा, इतकेच काय तर अनघा, छकुली... कुणीच तर नाहीत साखरपुड्याला! >>>>>>>> अगदी अगदी. विशाखाच्या मुलीला तर कधीच दाखवत नाही. ईशाच्याच वयाची आहे ना ती?

वाकड तोंडी जाऊन ही बरेच दिवस झालेत की..... >>>>>> सॉरी पण नाही आवडले हे. बॉडीशेमिन्ग झाले हे.

अनीश च्या आईचे केस विचित्र आहेत... वर मधेच कुरळे, भुरके! आणि घारे डोळे...ती एकदम भीती दायक सिनेमातील मेणबत्ती हातात घेऊन जाणारी परफेक्ट शोभेल जर तसे पिक्चराईझेशन केले तर....

रुध्दवीणा म्हणा अमा, नथिंग कुल अबाउट दॅट पेअर. वीणा च जे काही इंट्रोडक्शन आतापर्यंत झालय त्यावरुन ती ह्या गॅंग ची शिरोमणी हा किताब तिलाच मिळायला हवा. जो भाऊ आतापर्यंत आपला बिझनेस सांभाळत होता त्याला काहीही न सांगता सावरता एका रॅंडम माणसाचा इंटरव्ह्यू घेऊन त्याला ती आपला बिझनेस पार्टनर नेमणार्या बाईला इतर कुठलच विशेषण न्याय देऊ शकत नाही. आता पुढचे १०० एपिसोड अन्या-संजना, अन्या-अरु, संजना -वीणा आणि आशु-वीणा असे कलगीतुरे रंगणार आहेत.

कसले चिन्धीचोर निर्माते आहेत.घरिच लग्न,बारस, रजिस्टर लग्न, सापू . इशाचा तणतणाट एरवी पटत नाही पण यावेळेस तिच्या उत्साहावर पाणिच ओतण चालु होत.आताच्या जनरेशनला इन्स्टा वर्दी इव्हेन्ट हवासा वाटणे यात आश्चर्य वाटण्यासारख काहीच नाही त्यात एवढा गहजब माजवण्यासारख काय आहे? अरुच लेक्चर भयकर इरिटेटिन्ग होत.
बाहेर हॉल परवडत नसेल तर म्युझिक स्कुल होत की

कसले चिन्धीचोर निर्माते आहेत.घरिच लग्न,बारस, रजिस्टर लग्न, सापू . इशाचा तणतणाट एरवी पटत नाही पण यावेळेस तिच्या उत्साहावर पाणिच ओतण चालु होत. >>>>>> हे सगळे श्रीमंती थाट . अजूनही मिडल क्लास लोकांना हॉलचा खर्च परवडण्यासारखा नसतो त्यामुळे बर्थडे, बारसे, लग्नाची हळद हे घरीच साजरी केले जाते , अगदीच बिल्डिंगचा हॉल असेल किंवा खाली प्रशस्त जागा असेल तर तिथे मांडव घातला जातो। या मालिका नॉर्मली मिडल क्लास आणि अजून कोणता क्लास असेल ते लोकच जास्त पाहतात त्यामुळे जर अश्या मालिकांमधून घरी इव्हेंट्स सेलीब्रेट करताना दाखवलेत तर जनसामान्यांना चांगलाच संदेश जातो लोक अश्या मालिकांमधूनच प्रेरित होतात व यात काही गौण नाही असे त्यांनाही वाटू लागेल। (अरु हि गरीब घरातून सून बनून आली आहे त्यामुळे तिंचे असे विचार असणे काही चूक नाही ) ती इशा हि एक अति लाडावलेली व मुडी मुलगी आहे त्यामुळे तिला व तिच्यासारख्या यंग मुलींना ज्या काही कमवत नाहीत व लग्न करायला मिळतेय मग आपणही आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये कुल दिसण्यासाठी सगळे फ्याड करूया हे वाटणे साहजिकच आहे . सध्या हि मालिका लोकांमध्ये जास्त प्रमाणात पहिली जाते व म्हणूनच लोकांमध्ये जो ऋण काढून सण साजरी करण्याचा ट्रेंड आहे तो जर कमी झाला तर बरेच कि। सगळ्यांनाच सगळे जमत नाही।

आणि अनेक वर्षात वीणा कुठे आहे, काय करते हे ही त्याना माहीत नव्हतं आणि म्हणे आशू तिचा बिझनेस सांभाळत होता , मुळात तो होताच कुठे भारतात बिझनेस सांभाळायला ? वीणा फुलंच गंडलेली व्यक्तिरेखा झालीय.

मुळात आशुतोष स्वतःचा बिझिनेस सांभाळत नाही. त्याचाच (म्हणजे आशुतोषचा) सांभाळ नितीन करतो. रोज त्याला घरून ऑफिसात नेतो आणि परत घरी आणून सोडतो . ऑफिसात पण त्याच्या शेजारी बसून त्याच्या वर लक्ष ठेवत काम करतो.

Pages