Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हातारा म्हातारी पाव रात्र
म्हातारा म्हातारी पाव रात्र घरात एकटे होते तर त्यावरून अशू पनवेलला ओल्ड एज होम काढायला निघालाय. देशमूखांकडे चोरी करायला आलेल्या माणसाला पण हा नोकरी देणार आहे. काहीही!
आता अन्या त्याच्या ॲाफिसात आणि यश त्याच्या स्टुडिओत कामाला जातो त्यामुळे त्यांचा प्रश्न मिटला. इशा तर लग्न करून यांच्या घरात येणार मग तिचाही प्रश्न मिटला. मग त्याने घराजवळ अभिसाठी दवाखाना, त्यातच अनघासाठी समुपदेशन केंद्र, त्याला लागून जानकीसाठी पाळणाघर बांधावे. त्यांच्या सगळ्या बिझीनेसच्या जाहिरातीत संजनाला काम द्यावे. अन्याचा आणि संजनाचा काडीमोड झाल्यावर त्याची बावळट बहीण वीणा आहेच अन्याची काळजी घ्यायला.
हॉटस्टारवर अभिषेक अंकिताच्या
हॉटस्टारवर अभिषेक अंकिताच्या साखरपुड्याचा एपिसोड दिसला म्हणून पाहिला . मी तेव्हा ही मालिका पाहत नव्हतो. त्या भागात अविनाश नाही, पण त्याची बायको आहे. अंकिताची आई सुद्धा नंतर बदलली. मोठी टिकली लावलेली ; कांचन, अरुंधतीची आई यांच्या बॅचची एक बाई होती. ती बहुतेक विशाखाची सासू असावी. कांचन तेव्हा भरभर चालायची. डान्सपण केला.
ईशा तेव्हा बारावीत होती बहुतेक. तेव्हासुद्धा ईशाला कॉलेजातला एक मुलगा त्रास देत होता. फोटो मॉर्फ करणं इ. झालं. इतकं होऊनही ईशा पुढे त्या साहिल आणि फोटोग्राफर कामत मुलाला भुलली. आणि प्रत्येक प्रकरणाचा शेवट मारामारी रडारड असाच झाला.
एखादी मुलगी एकदा असं घडल्यावर पुढे कायम साशंक राहील. पण इथे लेखक मंडळीच शिकायला तयार नाहीत.
भरत..विशाखा ची सासू कधीच
भरत..विशाखा ची सासू कधीच दाखवली नाहिये.
ती बाई तुम्ही म्हणता आहात ती..एकतर कांचन ची बहीण असेल नाहीतर अजून कुणी...
हो तेव्हाही इशा ला त्या मुलाने त्रास दिलेला..
हं.
हं.
एखादी मुलगी एकदा असं घडल्यावर
एखादी मुलगी एकदा असं घडल्यावर पुढे कायम साशंक राहील. >>>हो. पण लेखक अतिहुशार आहे. तसे दाखवण्यासाठी इशा प्रत्येकवेळी अनीषला कुचकटासारखे बोलताना दाखविली आहे. त्यावर तुम्ही मुले अशी-तशी असताचे लेक्चर सुद्धा. एकदा तो तिला मी तुझ्यासाठी पंचींग बॅग बनेन, तुला सुखात ठेवेन बोलतो. मग ती शिक्षण-करिअरच्या आधी लग्नच कर म्हणून मागे लागते.
त्या सापू प्रसंगात शेवटी आरु
त्या सापू प्रसंगात शेवटी आरु त्या मुलाच्या थोबाडीत मारते.
अरुंधती ईशाला सांगते तिच्या
अरुंधती ईशाला सांगते त्याच्या थोबाडीत मार. आणि ईशा थोबाडीत मारेपर्यंत मंडळी बघत बसतात. मग मुलाच्या आईला कंठ फुटतो. पण शेवटी तिचे डोळे उघडतात .
(No subject)
अन्घा म्हणजे अश्विनी
अन्घा म्हणजे अश्विनी महांगडेला अहिल्याबाई होळकरांवरच्या चित्रपटात टायटल रोल मिळालाय. त्यामुळे ती काय एवढ्यात येत नाही. तिच्या वडिलांची भूमिका करणार्या निनाद देशपांडेला (सुलभा- अरविंद यांचा मुलगा) दुसर्या मालिकेत मोठा रोल मिळालाय आणि तिथे जाताना तो अप्पांचा डिमेन्शिया घेऊन गेलाय . (अप्पा बरे होण्याचे रहस्य).
अनिरुद्धला आता पैसे मिळतील. संजना नोकरीसोबत मॉडेलिंग करते. अभिषेकची नोकरी चांगली चालली आहे. यशसुद्धा काम करतो असे म्हणत असतो. अप्पांच्या एफ डीचं व्याज येतंच आहे. अरुंधती ओन्लि विमलचा पगार द्यायची म्हणजे अजूनही इथे कन्ट्रिब्युट करते. त्यात ती आता आशुतोषची बिझिनेस पार्टनर, म्युझिक स्कूलची हेड आणि वर्ल्ड टुर केलेली प्रथितयश गायिका
म्हणजे भरपूर इन्कम असेल. तर इतक्या लोकांनी मिळून देशमुखांकडे किमान एक फुल टाइम डोमेस्टिक वर्कर ठेवायला हवा. सुलेखाताईंच्या आश्रमातल्या एखाददोन बायांना नोकरी मिळेल. त्यानिमित्ताने आशुतोषला आणखी एक बिझिनेस आयडिया मिळेल. या डोमेस्टिक वर्करना ट्रेनिंग अर्थातच अरुंधती देईल.
खरे आहे भरत!! ..एव्हढ्या
खरे आहे भरत!! ..एव्हढ्या मोठ्या खटल्यात.. मदतनीस कुणीच नाही!
आणि अरुंधती तर फारच एस्टॅब्लिश झाली आहे आता...., तिला पंधरा हजार पगार काही जड नाही!
मला काल हे कळले नाही की वडाची पूजा - उपवास करायचा नाही म्हणून संजना कपातला चहा पिते. उपास मोडला म्हणे...
चहा ने उपवास कधी पासून मोडू लागला...? वट सावित्रीचा उपवास म्हणाजे काही हरतालिके सारखा नसतो काही...... अजिबात पाणीही तोंडात धरायचे नाही असा!!
(No subject)
निव्वळ वेड्यांचा जत्रा आहे ती
निव्वळ वेड्यांचा जत्रा आहे ती समृध्द बंगल्यात भरलेली
गौरीला SUN मराठी च्या सिरीयल
गौरीला SUN मराठी च्या सिरीयल मध्ये काम मिळाले आहे। त्यात ती मुकी आहे
(No subject)
आज संजनाचा वाढ दिवस वाढदिवस.
आज संजनाचा वाढ दिवस वाढदिवस. पार्टी, केक नाच औक्षण हे सर्व अन्या घरी यायच्या आधीच उरकले. आरू आसु पण यायला निघालेले अस्तात. आरु ची साडी ब्लाउज छान आहे व सुरेख दिसते. तिचा आधीच्या भागात एक पाठमोरा शॉट आहे त्यात मस्तच दिसते. नित्या येउन आशू ला जयपुरला पाठवतो. आता हिने पण जावे ना? उगीच आय विल अलसो मिस यु म्हणण्यात काय अर्थ? कब होगा अनिमोन. उधर अनुपमा में सौत को बच्चा होने को है.
अरु सवतीला गळा भेट, व औक्षण करते ह्यावरून ती किती मूर्ख किंवा सहन शील किंवा दोन्ही आहे ते कळ ते. सवतीचे कौतू क मुद्दाम का करावे. आणि नव्या नवृया कडे दुर्लक्ष इ ना चॉलबे.
अनुपमामध्ये अनुपमाची आजची साडी हिरवी प्लेन व प्रिंटेड ब्लाउज मस्त आहे. हिला उद्या एकाच वेळी कामाची एक प्रेस कॉन्फरन्स, घरी लग्ना नंतरची पूजा व तेव्हाच अनुजने भेटायला बोलवले आहे. आता ती काय करेल काय करेल हा मोठा प्रश्न आहे. आमच्या सारखे मद्दड कायम कामच पहिले करतात व टीव्ही बघत बसतात.
चाणाक्ष प्रेक्षक विसरले आहेत
चाणाक्ष प्रेक्षक विसरले आहेत का - आधीची संजना असताना अरु आणि संजनाचा वाढदिवस एकाच दिवशी होता. अर्थातच अन्या विसरला होता अरुचा वादि.
अरु सवतीला गळा भेट, व औक्षण
अरु सवतीला गळा भेट, व औक्षण करते ह्यावरून ती किती मूर्ख किंवा सहन शील किंवा दोन्ही आहे ते कळ ते. सवतीचे कौतू क मुद्दाम का करावे>>> तिनेच तर लग्न लावून दिले होते त्यांचे, अन्या नको म्हणत असताना. मनात म्हणत असेल ‘आभोआकफ’
तेव्हा दोघींचा वाढदिवस नव्हता
तेव्हा दोघींचा वाढदिवस नव्हता.
अरु चा होता पण अन्या ते विसरून संजना काहीतरी ऑफिस मध्ये चांगले करते ते celebrate करायला घरी केक घेऊन येतो.
तेव्हा ती जुनी संजना होती..बॉब कट वाली
ओह ओके, मी समजले वादि दोघींचा
ओह ओके, मी समजले वादि दोघींचा एकाच दिवशी की काय.
That old sanjana gets a
That old sanjana gets a promotion. On aru birthday.
संजनाचा वाढदिवस पहिल्यांदाच
संजनाचा वाढदिवस पहिल्यांदाच करताहेत का? देशमुखांकडे एवढी पात्रं आहेत. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला तर ४०-५० एपिसोड त्यातच घालवता येतील. मी एक प्रोमो पाहिला, त्यात संजना म्हणतेय, दोन वर्षांपूर्वी अरुंधती जिथे होती, तिथे आज मी आहे. म्हणजे आता तिला सवत येणार आहे.
आणखी एका प्रोमोत वीणा म्हणते, अरुंधतीने वटपौर्णिमा करायला देशमुखांकडे जाऊ नये. चक्क सेन्सिबल बोलली. वडसुद्धा कन्फ्युज होईल, कोणाचं कॉन्ट्रॅक्ट कोणाशी वाढवायचं म्हणून. तरी ती अनिश्का नाही इथे.
अनिश्का कोण?
अनिश्का कोण?
वीणा सेंसिबल बोलली का तर अन्याला त्रास होऊ नये अरुच्या तिकडे जाण्याचा म्हणून.
वीणा नक्की कोणत्या वयात घर सोडून गेली आणि जिथे असेल तिथे पोटापाण्याचं काय करत असेल असा मला प्रश्न पडलेला आहे. तिचा नक्की प्रेमभंग झालेला असणार आहे, आता ती अन्याच्या प्रेमात पडणार, अन्याचं तिसरं लग्न....
आशुतोषची अचानक उगवलेली
आशुतोषची अचानक उगवलेली बालमैत्रीण . प्लेड बाय स्वरांगी मराठे.
वीणा प्रकरण 'विणाकारण' ताणत
वीणा प्रकरण 'विणाकारण' ताणत आहेत. कैच्याकै.
ती वीणा खूप वरवर बोलते....विचित्र उच्चार आहेत. आणि सुलेखा ताईं ना टोपी काय घालून दिली ..!!!!
विचित्र उच्चार आहेत.>> हो
विचित्र उच्चार आहेत.>> हो तिचा आवाज फुटक्या बासरी सारखा येत होता. कोणी नातेवाइक आहे का जो तिला लहान पणी अब्युज करत होता? म्हणून ती पळून गेली? तिचे कपडे पण घोळदार विचित्रच असतात व केस सुद्धा. इतकी मोठी आहे आता धगुर्डी तर पोलिस कंप्लेंट का नाही करत?! गुलाबी टोपी लै भारी.
ती हिन्दीमधली मुक्कूवाली
ती हिन्दीमधली मुक्कूवाली स्टोरी इथे येतेय. डोमेस्टिक व्हायोलेन्सवाली. हिन्दीत हे छान दाखवल होत.
गेले दोन दिवस तर वीणाचा आवाज
गेले दोन दिवस तर वीणाचा आवाज खूपच बसलाय अस वाटतय.
आजचा सस्पेन्स खूपच हास्यास्पद वाटला.
Btw सासूला " ताई " म्हणायचा ट्रेंड आहे का हल्ली ? अनघा आपल्या सासूला ओन्ली ताई , अरु आपल्या नवीन सासूला सुलेखाताई
वीणा अनिरुद्धच्या गळ्यात
वीणा अनिरुद्धच्या गळ्यात पडली!!! स्पीचलेस.
आज अनु पमा मध्ये मेजर ड्रामा केला मायाने.
ती कान्चनची बहीण मागच्यावेळी
ती कान्चनची बहीण मागच्यावेळी आली होती तेव्हा सेन्सिबल वागत होती. आता तर ही ह्यान्च्या घरच्या इश्शयूजमध्ये नाक खुपसतेय. कान्चनला उकसवतेय. कोणी कस का वागेना हिला काय करायचे? पाहुणी आहेस तर चार दिवस मस्त खा पी आणि जा आपल्या घरी. कशाला त्या नसत्या चौकश्या?
ती कांचन ची बहिण चेहर्याने
ती कांचन ची बहिण चेहर्याने वैभव मांगले ची आई वाटते असं कुणाला वाटलं का? मला नेहमी वाटतं, फार साम्य आहे दोघांच्या चेहेर्यात.
@ अमा तुम्ही वापरलेला धगुर्डी शब्द फार आवडलाय मला. मी पहिल्यांदा च ऐकला, नक्की काय अर्थ आहे?
Pages