Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धगुर्डी जुना शब्द आहे !
धगुर्डी जुना शब्द आहे !
म्हणजे नुसतीच वयाने मोठी झालेली पण समज नसलेली, बालिश पणे वागणारी स्त्री...
ती कांचन ची बहिण खूपच नाक खुपस ते आहे..पण असतात अशा बायका..
ज्यांना नवऱ्याला बायकोने काहीही बोललेले आवडत नाही....
मी अभिषेक अंकिताच्या
मी अभिषेक अंकिताच्या साखरपुड्याचा एपिसोड हल्ली पाहिला, त्यात ही कांचनची बहीण होती.
आता आठवलं, ही मध्येही एकदा तिच्या नवर्यासोबत देशमुखांकडे राहायला आली होती. तिचा नवरा बहिरा आहे .
अभिषेकयशला मानसोपचारतज्ज्ञाने झोपेच्या गोळ्या लिहून दिल्यात. तो काही म्हणो, त्याची सुइसायडल टेन्डन्सी असू शकते आणि गोळ्या त्याच्याकडे असणार आहेत?फोन मेसेज , दगडकागद झाल्यावर वीणा भयंकर घाबरलेली असते. हे लोकही घाबरलेले असतात. तरीसुद्धा अनिरुद्ध केळकरांकडून गेल्यावर कोणीही दार लावून घेत नाही. आशुतोष त्या उघड्या दारातून घरात शिरतो आणि वीणाला बघायला जातो, पण दार सताड उघडंच ठेवतात.
नितीन रात्रभर केळकरांकडेच राहिला? दुसर्या दिवशीच्या सीनमध्ये कपडे बदलेले का ते बघायचं राहिलं.
वीणाचे डोळे चेहर्यावर चिकटवल्यासारखे वाटतात.
भरत.. : हाहा: दगडकागद!
भरत..
दगडकागद!
अभिषेक ला झोपेच्या गोळ्या? की यशला
?
अरुंधती च्या चेहेऱ्यावर तिचे
अरुंधती च्या चेहेऱ्यावर तिचे ते जगप्रसिद्ध कुणीतरी मेल्यासारखे भाव आहेत.... तिला तेच जमते !
नितीन ला काहीच काम नाही केलकरांकडे पडीक असण्याखेरिज!
आशू अगदी सायको सारखं एकदम धावत आत गेला वीणा वीणा करीत .
मी अरुंधती च्या जागी असते तर मला नक्की राग आला असता !!! एवढं काय तिचे कौतुक !
पंधरा वीस वर्षांनी आत्ता उगवली....!!!
अरु वीणाला "बाळा" म्हणुन
अरु वीणाला "बाळा" म्हणुन समजावणे मोड ऑन करते पण वीणा जितक दाखवतायत तितक बाळ नाहिये, अरुच्या जवळपासचीच वाटते.
अनुश्का निदान थोडी लहान तरि वाटत होती... अर्थात समजावणे मोड ऑण व्हायला अरु काकुना वयाचा अडसर नसतोच.... मग सगळेच लहान तिच्यापेक्षा.
मस्तच प्रतिसाद सगळेच.
मस्तच प्रतिसाद सगळेच.
ती कांचन ची बहीण करतेच आहे फुकटची उसकवा उसकवी ..तो दिवाळीत मामा आला होता तो पण तसलाच. कांचन च होल माहेर तसलच दिसतंय
नितीन रात्रभर केळकरांकडेच
नितीन रात्रभर केळकरांकडेच राहिला? दुसर्या दिवशीच्या सीनमध्ये कपडे बदलेले का ते बघायचं राहिलं.>>> शर्ट बदललेला दिसला,( तुम्ही लिहल्याने मी जरा निट लक्ष देवुन पाहिला एपिसोड
...) नाहितर नितिनला ग्रुहित धरलेले असत " बिनपगारी मनसबदार" त्याला प्रत्येक सिन मधे घुसवतात.
<<धगुर्डी जुना शब्द आहे !>>>
<<धगुर्डी जुना शब्द आहे !>>> थॅंक्यु आंबटगोड. हा प्रचलित शब्द आहे तर, मला खरंच माहिती नव्हत. बाकी आई..... मधे वीणा च काय कांचन सुद्धा धगुर्डी आहे.
हो..पण negative अर्थाने आहे
हो..पण negative अर्थाने आहे हं पर्णीका..नाहीतर वापरशील कुणाला म्हणताना...

आता काही विशिष्ट व्यक्तींसाठी
आता काही विशिष्ट व्यक्तींसाठी राखुन ठेवेन वापरायला:)
केळकरांचा ज्येष्ठ
केळकरांचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा हाउसिंग प्रोजेक्ट
https://fb.watch/lg2V4Grjnr/
Introducing Mumbai's First Senior Living Homes at Primus Swarna
✅Spacious 1 & 2 BHK Senior Homes
✅24*7 Medical Care | Housekeeping & Concierge Services
✅Group Activities & Fitness Programs | In-House Restaurant
केळकरांचा कशावरून? आहे पनवेलला , पण सांगतात मुंबई.
भरत..
भरत..
इतक्यात काय सुरुय?
मी बघितले नाही दोन तीन दिवस.....
आशूला बिझनेस मन ऑफ इअर अॅवॉ
आशूला बिझनेस मन ऑफ इअर अॅवॉ र्ड मिळाले. ते घ्यायला जायचे आहे. पण स्पेशल काँग्रॅ ट्स म्हणायला अरुने त्याला डेट वर नेले व हातात हात की हो दिला. आशूचा एकदम . पण निघताना यश चा फोन आला अभि चा कायी एक इशू झाला म्हणजे पोरगीला एका पार्टीला न्यायला अनघाने सांगितले होते त्यागडबडीत त्याने चुकीचा अॅनेस्थेशि आ दिला व म्हणून पेशंट मेला. त्यामुळे तो गिल्ट मु ळे चक्कर येउन पडला आहे. म्हणून आरू कारने तिकडे जाते. आशू साहेब तिला पाठवतात.
इकडे अन्याने ५० लाख चोरले असे दिसते णीटीन ला पण ते नव्या जागेसाठीचे पेमेंट असते. वीणा ते पेपर नित्याच्या अंगावर टाकते. नवा जो इ इन्वेस्टर आलेला असतो तो आशू आरु प्रेझेंटेशन ने खूप्ष होतो व सेल्फी मागतो. अन्या इज बीइन्ग टीम प्लेअर. अभी मेडिकल कोर्स काही मुलांना झेपत नाही पण करव तात तसा भासतो. अनघा बाणेदार पणे लेक्चर देते माझे पण काम महत्वाचे आहे म्हणून त्या धावपळीत पेशंटचा हकनाक मृत्यु होतो. त्याचे अनघाला वाइट वा टत आहे.
संजना वेणी घालून प्लीज प्लीज मोड मध्ये आहे. इशाला मोठ्याच घरात राहायचे आहे लग्नानंतर. आरू कडे किंवा समृद्धी मध्ये घरजावई.
आजी देव दर्शनास गेली आहे म्हणून आप्पा रोज भजी वडे खात आहे.
: हाहा: अमा.. सच पिपाल!!
पण अनघा ने जरा जास्तीच ताणले..पोरीला birthday ला न्यायची काय गोष्ट ! चिकार पब्लिक होते की अभी नसल्यास..
संजना, यश, अप्पा, ईशा.
पण असते अशी सवय सुनांना..की आपल्या पोरीला आपणच न्यायला हवे.. कुणाचे उपकार नकोत !!!
ईशाला स्वतः:साठी मोठी खोली
ईशाला स्वतः:साठी मोठी खोली असलेली मोठं घर हवंय.
लग्नानंतर आशुतोषच्या आणि ते नाही जमलं तर देशमुखांच्या घरात राहायच्ंय
अनिश म्हणतो आपण आपलं घर घेऊ. तर बाई नोकरी करणार नाहीत. घरकाम करायचा प्रश्नच नाही.
अभिषेक, वाढदिवस प्रकरण उगाच आणलंय.
आता आशुतोष नितीनला सांगून त्या पेशंटला जिवंत करेल.
मग आशुतोषची नवं हॉस्पिटल काढून देईल.
मला प्रेझेंटेशन बघायचं होतं. पण लबाडांनी दाखवलंच नाही. प्रेझेंटेशन तयार करणारे पाच. बघणारा एकच. त्यात अरुंधतीने
सुद्धा सूचना दिल्या होत्या.
अभी सारख्या माणसाने डॉक्टर
अभी सारख्या माणसाने डॉक्टर अजिबात होऊ नये. किती हातपाय गाळतो.
आता अरूबाई अवार्ड फंक्शनला जाणार नाही. अभीबाळाला जोजवत बसेल. आता अनुपमा ट्रॅक सुरू व्हायला हरकत नाही. मधे वीणा पुराण आहेच. बेगमीची पूर्ण तयारी आहे.
मी पण मागच्या महिन्याभरात
मी पण मागच्या महिन्याभरात बघिलच नाही. काहीही अचाटपणा चाललाय. अभिने डिग्री विकत घेतली आहे का? घरी जायच्या घाईमुळे पेशंट दगावला हे कारण मेडिकल स्टुडंट सुध्दा देणार नाही.
अभिच्या नाकर्तेपणाचा अनघाला गिल्ट ही तर थीमच आहे सिरियल ची. मागेही अभिचा बाहेरख्यालीपणा मान्य करुन संसार करायला अनघाने नकार दिला म्हणून अभिच मानसिक संतुलन ढासळल होत आणि त्याचा अनघाला गिल्ट आला होता. अनघाची पात्र हे सिरियलच्या अधोगती चा सिंबॉल आहे!
<<<<आता आशुतोष नितीनला सांगून त्या पेशंटला जिवंत करेल.
मग आशुतोषची नवं हॉस्पिटल काढून देईल.>>>>
आता आशुतोष नितीनला सांगून
आता आशुतोष नितीनला सांगून त्या पेशंटला जिवंत करेल.

ते संजनाला कायमच ब्राइट
ते संजनाला कायमच ब्राइट स्लीवलेस, सिंथेटिक साड्या का बरं देतात? ते अर्धवट रंगवलेले सोनेरी केस? साधी साडी नेसलेली बाई पण सुरेख दिसते. पण अरु देवी असल्याने हिला उगीच उथ ळ वाट्तील असे कपडे दिले आहेत. त्या वीणा चे कपडे पण विचित्रच असतात. म्हणजे नको तिथे घोळदार. ड्रेस वर अजून कॉटन मोठे जाकीट, व्हाइट टॉप पण त्याला दोन कसलेच लेयर. आज तिला तिच्या शत्रूने फुले पाठवली ती तिने कचर्यात टाकली. ती उचलून अन्याने चिठ्ठी उघडून वाचली. ती मराठीतच होती. ते वाचून वीणाला परत भीतीचा अॅटेक आला. चिक ट वलेले डोळे अजून मोठे मोठे झाले.
ती म्हणते मी माझा बिझनेस सांभाळते पण त्यासाठी अन्या, नितीन, आशू राबत आहेत व आरू लक्ष ठेवून आहे. मग ही काय करते? जबाबदारी घेते का? नुस्ता डिविडंट चेक हवा हिला.
भारी पोस्ट्स सगळयाच.
भारी पोस्ट्स सगळयाच.
आशू माणूस जिवंत करेल >>
बोलू नये पण अभिचा चेहरा फारच सुजलेला वाटतो का हल्ली ? की मलाच अस वाटतय आणि त्यात एवढी दाढी त्यामुळे तो अधिकच सुजमट दिसतो.
अभिचा चेहरा फारच सुजलेला
अभिचा चेहरा फारच सुजलेला वाटतो का हल्ली ? >> हो. तो दिवस-रात्र जागून पेशंटला भूलीत ठेवायचे काम करतो ना!
त्या दिवशी तो लवकर घरी आला आणि त्यामुळे पेशंट लवकर भूलीतून बाहेर येऊन मेला.
आता यातून हा निर्दोष सुटला तरी आधी पण असेच काही होऊन त्याने मार खाल्ला होता. त्याची चूक नसली तरी त्याच्यावर दोन गंभीर आरोपांचा ठपका राहणारच. त्याची लाईन चूकली.
हो. तो दिवस-रात्र जागून
हो. तो दिवस-रात्र जागून पेशंटला भूलीत ठेवायचे काम करतो ना!

मंडळी , आजचा भाग नक्की पहा.
मंडळी , आजचा भाग नक्की पहा. संवादलेखिकेने टनभर माती खाल्ली आहे. एवढे अभिनेते, दिग्दर्शक इ. मंडळी सुद्धा फक्त आपलं काम बघतात, त्यामुळे त्यांनाही काही खटकलं नाही. काल प्रेझेंटेशन न दाखवल्याची कसर आज हॉस्पिटलमध्ये काय झालं ते नुसतं सांगून भरून काढली आहे.
तर अभिच्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस खूप सारे क्रिटिकल पेशंट्स आहेत. सगळे डॉक्टर रात्रंदिवस त्यांना अटेंड करत आहेत. ( खरं तर
अगदी आयसीयूत सुद्धा कोणी डॉक्टर राउंडशिवाय पेशंटला बघायला येत नाही. एक इन्टेन्सिव्हिस्ट तिथे सर्ववेळ हजर असतो. स्पेशलिस्ट डॉक्टर ऑन कॉल तयार असतात.
अॅनास्थेशिस्ट तर ऑपरेशन असेल तेव्हाच हॉस्पिटलमध्ये येतो. ऑपरेशन हॉइपर्यंत थांबतो. त्याआधी आणि ऑपरेशन झाल्यावर तो पेशंटला पाहायला जात नाही.)
पण ही भारतीय मालिका आहे. इथे अॅनास्थेशिस्टच पेशंटचं सगळं काही बघतो (मागे अभिचं प्रमोशन होऊन त्याच्या हाताखाली दोन तीन डॉक्टरसुद्धा आले होते). पण ऐन ऑपरेशनच्या वेळीच त्याच्या मुलीला बड्डे पार्टीला न्यायचं असतं. तो पेशंटला बेशुद्ध करतो. ऑपरेशन सुरू होतं. सर्जन त्याला म्हणतात, तू जा आता घरी. आम्ही बघू.
अभि घरी येतो आणि पेशंट शुद्धीवर. हे अभिला कळवलं जातं. तो धावत पळत हॉस्पिटलात जातो तोवर पेशंट गेलेला असतो.
आणि बाकीचे डॉक्टर या सगळ्यासाठी त्याला जबाबदार धरतात.
हे बरोबरच आहे. त्याचं काम नसताना तो हॉस्पिटलमध्ये बसून जागरणं करतो आणि त्याचं जे काम आहे ते अर्धवट करून घरी येतो .
एकदा म्हणतो एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मग लगेच म्हणतो दोन मुलींचं छत्रं हरवलं.
एकदा म्हणतो एका मुलीचं आयुष्य
एकदा म्हणतो एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मग लगेच म्हणतो दोन मुलींचं छत्रं हरवलं. >> होय मी पण ते नोटीस केलं पण नंतर त्या दोन मुलींच्या आईलाच तो मुलगी म्हणतोय अशी माझी स्वतःची समजून घातली मी.
आता यातून हा निर्दोष सुटला
आता यातून हा निर्दोष सुटला तरी आधी पण असेच काही होऊन त्याने मार खाल्ला होता. त्याची चूक नसली तरी त्याच्यावर दोन गंभीर आरोपांचा ठपका राहणारच. त्याची लाईन चूकली. >>>>>>>>> हो ना. हे दुसर्यान्दा झालय अभिकडून. कोणी डॉक्टर केलय ह्याला? मेण्टली अनस्टेबल आहे हा.
मनी मोहोर...
नंतर त्या दोन मुलींच्या आईलाच तो मुलगी म्हणतोय अशी माझी स्वतःची समजून घातली मी. ..
किती समजूतदार प्रेक्षक लाभले आहेत मालिकेला....
सगळी नुसती येड्याची जत्रा, बर
सगळी नुसती येड्याची जत्रा, बर!! अनघा प्रोफेशनल काउन्सेलर आहे ना?? पण नाही खुट्ट वाजल की याना आईताई हवी असते... अभ्या लेका तुला डॉक्टर कुणी केल रे ?? काहिही झाल की पॅनिक होतो....फिल्ड मेजर चुकलय याच.
आईताई आशुरावाना डेट वर घेवुन गेल्या आणी मला काहितरी सान्गायचय म्हणुन अशा लाजत मुरडत होत्या की .... "कुणि तरी येणार येणार ग" .
हिचा अभिनय बरा असतो पण ठिकाण आणी वेळ नेहमीच चुकते राव!!
आशू जो अवार्ड घ्यायला तयार
आशू जो अवार्ड घ्यायला तयार म्हणून आला तो काय भयंकर सूट होता?! चमकीला व डार्क हिरव्या टोन मध्ये. एकदम हर ण टोळ दिसत होता. त्या खाली ब्रौन शूज!! दुबई रिटर्न म्हणतात हैद्रा बाद कडे तसा दिसत होता. बहीण पिवळ्या साडीत व गुलाबी बिलोज काय क्लासी लोक आहेत श्रीमंत.
तो नित्या कायम इथेच का पडीक अस्तो बरे
आरू ची साडी पण विचित्र पोपटी चॉकोलेटी काँबो. अन्याचा पोपटी सूट. एकंदरीत म्याटरिक्स सिनेमा सारखे सर्व हिरव्या टोन मध्ये चालले आहे. हिचे अभीला परत बाळा बाळा चालू झाले.
ऑपरेशन संपे परेन्त थांबणे बंधनकारक आहे अना स्थे टिस्ट ला बहुतेक. आणि ह्याला ह. पा. उशीर झाला तरी संजना लगेच लफडेच असेल असा डायलोग मारते. तू तुझे बघ ना बाई.
आरूला नणंद बाई झाप झाप झापते. अवार्ड फंक्षनला का आली नाही म्हणून. पहिल्या लग्नात नणंदव दीर बरे होते आरू चे इथे वेडगळ लाडुबाई आहे. का बरे गेली नसेल? हाताशी कार ड्रायवर होता. उशीरा का होईना पण उपस्थित राहू शकली असती. इकडे बाळ नाहीतरी झोपलेच होते.
जाणकी चा पप्पा.
अमा मस्त, हे सिरीयलवाल्यांचं
अमा मस्त, हे सिरीयलवाल्यांचं चाळिशीतल्या बाप्याला बाळा बाळा म्हणण अगदी डोक्यात जातं माझ्या. आज अरु पण अभिला बाळा बाळा करत होती ते ऐकवत नव्हतं अगदी
अभी चा डॉ मित्र आणलेला...तो
अभी चा डॉ मित्र आणलेला...तो किती छप्री आणलेला...!! रोजंदारी वर आणतात एक्स्ट्रा कलाकार.
त्या शेजारच्या आजींचा नातू तरी बरं दिसतो...
Pages