साहेबांचा अध्यक्ष पदाचा राजिनामा!

Submitted by यक्ष on 2 May, 2023 - 08:07

साहेबांचा अध्यक्षपदाचा राजिनामा....!
तशी अनपेक्षित अन वादळी बातमी. नव्या पर्वाला सुरुवात?
भाकरी फिरवून झाली की फिरवणे सुरु झाली?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वय झाले आहे .
आता राजकारणातून निवृत्त झले पाहिजे .
अगदी योग्य विचार आहे .
पण ही ती वेळ नव्हती.
आताच राजीनामा का दिला?.
तिन्ही पक्षांनी एकत्र येवून bjp ल हरवावे अशी जनतेला आशा होती.
पवार साहेबांच्या राजीनाम्या मुळे विरोधी पक्षांची एकी धोक्यात तर येईल च .
पण अचानक निर्णय घेतल्या मुळे राष्ट्रवादी पक्ष पण विघुरला जाईल.

आता खरेच मला संजय राऊत पण घटकायला लागले आहेत.
पाटोळे वर तोंड सुख.
काँग्रेस वर तोंड सुख.
अजित पवार ना पण काही तरी बोलले होते.
मित्र आहेत ते पक्ष त्यांस आठवण राहत नाही

आता खरेच मला संजय राऊत पण घटकायला लागले आहेत.
पाटोळे वर तोंड सुख.
काँग्रेस वर तोंड सुख.
अजित पवार ना पण काही तरी बोलले होते.
मित्र आहेत ते पक्ष त्यांस आठवण राहत नाही
>>>>>>>
हे आम्ही पूर्वीच सांगितले होते , तुम्हीच सेनेच्या लै प्रेमात पडले होते .
राऊत ने सेना बुडवली आणि तुम्ही शिंदे भाजप ला दोष देत बसले .

ह्याची सर्वात मोठी भीती शिंदे ना असणार.
राष्ट्रवादी फुटली तर त्यांच्या कडे असणारे दिग्गज नेते दुसऱ्या पक्षात जातील आणि सत्ताधारी म्हणून bjp kadech त्यांचा जास्त झुकाव असेल.

सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष करण्यासाठी साहेबांनी रचलेली हि खेळी वाटते. अजित पवार राष्ट्रीय पातळीवर इतके प्रभावी राहतील असे वाटत नाही पण महाराष्ट्रासाठी ते योग्य उमेदवार आहेत.

खरं तर लोकनियुक्त पदासाठी (पक्षाध्यक्ष त्यात येत नाही) ६०-६२ वर्षे हि वयोमर्यादा असायला हवी पण आमचे कोण ऐकतो.

ही वेळ का निवडली हा मोठा प्रश्न आहे.
२०२४ ला निवडणुका आहेत.
BJP विरोधी पक्षात असे अस्थिर वातावरण योग्य नाही.
हे पवार साहेबाना नक्कीच माहीत असेल.
धुरंधर आहेत ते राजकारण मधील.
तरी त्यांनी हीच वेळ का निवडली असावी राजीनामा देण्यासाठी

एक फॉरवर्डेड विनोद .
>>>>>>

*आठवतंय का?*

वीरू पाण्याच्या टाकीवर चढलाय…
खाली सगळं गाव गोळा झालंय…
बसंतीशी शादी झाली नाही तर जीव देईन म्हणतोय, आणि गावाचं टेन्शन वाढलंय…
आख्ख गाव आग्रह करतं,
शेवटी मावशी लग्नाला परवानगी देते......
वीरू खाली उतरतो आणि गावाला उगीचच हायसं वाटतं!

पलीकडून जय म्हणतो,

*“साला नौटंकी, घडी घडी drama करता है !”*

मावशी अवाक!

*आठवले म्हणून सांगितले...*

कुठल्याही राजकीय घडामोडींशी संबंध लावू नये.....
Happy

राष्ट्रवादीत एकही नेता अध्यक्षपद घ्यायला तयार नाही. इथे कुणा दुय्यम नेतृत्वांस जबाबदारी घ्यायची नाहीये. पुढे राष्ट्रीय पक्ष कसा होणार?

जात पात धर्म न पाहता उमेदवार निवडून देण्याची परंपरा असलेल्या या पुरोगामी ( ?) महाराष्ट्रात वैयक्तिक फायद्या तोट्यासाठी एकमेकांची तोंडे काळी करण्याचे काम म वी आ मधील घटक पक्षांनी सुरू केले आहे .
त्यात सर्वात पुढे हगिज पेपर चा कुत्रकार आहे . हा बाबा दिसेल त्याला चावत सुटतो !
हा इतक्या दिवस भाजप नेत्यांना / समर्थकांना चावत होता त्यावेळी खांग्रेसी ना गुदगुल्या होत होत्या पण आता त्याने म वी आ चे लचके तोडायला सुरुवात केली आहे .
त्यामुळे म वी आ मधील पक्षांना निवडून निवडून समर्थन देणाऱ्यांची भयानक गोची झालेली दिसतेय Happy

विरोधकांना धमकावण्याचा आणि त्यांच्यामधे दहशत निर्माण करण्याच्या कुटिल हेतूने शरद पवार यांचे नाव कुठल्यातरी बँक घोटाळ्यांत आहे आणि लवकरच त्यांच्या नावाचे समन्स ED काढणार आहे अशा बातम्या पसरल्या होत्या.

शरद पवारांनी थेट EDचे बॅलार्ड इस्टेट कार्यालय गाठायचा बेत जाहिर केला (दुसर्‍याच दिवशी जाणार होते, १४:००). ED ला काही हवे असेल तर विचारायला...

ED ने तातडीने जाहिर केले, पवारांनी कार्यालयात येण्याची अवशक्ता नाही, त्यांच्या नावाने कुठलेही समन्स निघालेले नाही.

थकलेले दिसतात, विश्रांती घ्यावी असे त्यांनाही वाटत असेल तर कार्यकर्त्यांनी जास्त ताणू नये.

तब्येत अजिबात साथ देत नसताना ईतके प्रचंड गडबडीचे वेळापत्रक कसे सांभाळत असतील पवार साहेब.. खरच त्यांच्याकडे बघून अस वाटत की थांबा आता ,विसावा घ्या..

पक्षाच्या काळजी पेक्षा मुलीच्या भवितव्याची चिंता पडली असावी , म्हणून विश्रांती घेत नसावेत !
संध्या छाया भिवाविती मला का काय ते अवस्थेत पोहोचले आहेत , पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर (?) ते या अवस्थेत देखील पक्ष चालवत आहेत.

घ्या! जय जय अमित शहा.
आमच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर ह्यांचे पती जयप्रकाश ठाकूर भाजपच्या कुठल्यातरी उपाध्यक्ष पदी पोचले. त्यांचा मुलगा नगरसेवक आहे. घराणेशाही च्या विरोधात उभे राहून काम केल्याचे बक्षीस असावे

Bjp समर्थक लोकांचे एक तत्व मात्र पटते.
पक्ष ही एक सार्वजनिक संघटना आहे.त्या संघटनेचा विकास तेव्हाच होईल जेव्हा पक्ष संघटना म्हणून काम करेल.
एकच कुटुंबाची मालकी हक्क त्या वर चालणार नाही.
भले तुम्ही पक्ष स्थापन केला असेल तरी.
संघटने मधील गुणवान लोकांना अधिकार मिळत गेले तर च पक्ष प्रगत होईल.
काँग्रेस गांधी घराणे.
शिवसेना ठाकरे घराणे.
TMC Mamta बॅनर्जी घराणे.
Sp Mulayam sing घराणे.
राष्ट्रवादी पवार घराणे.
ही सूत्र च विनाशाची कारणे आहेत.
Bjp ची अशी घराणे शही नाही हे सत्य आहे.

लै लवकर समजले !
आता बाकीच्या भाजप विरोधी आयडी ना पण समजाऊन सांगा Happy

वाट पाहून पाहून दमलेल्या एका दादाची कहाणी
कोमेजून निजलेली एक सुप्री राणी,
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही परी आज नाही
राजीनाम्याचा तमाशा माझी संतापाने लाहीलाही
सांगायाची आहे माझ्या लाडक्या ताईला
दमलेल्या दादाची ही कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)
आट-पाट नगरात निवडणुका होती भारी
पाच पाच वर्षापाठी नव्या सत्तेची तयारी
प्रत्येकच वेळी काका हमखास बोले
पंतप्रधान व्हायचे स्वप्न यंदा विरूनच गेले
जमलेच नाही कधी जमाखर्च राष्ट्रिय कीर्तीचे
साडे-तीन जिल्ह्यांचे माझे राजकारण जातीचे
पुढच्या वेळी मी होणार नेता संपूर्ण देशाचा
देईन तेव्हा दादा तुला सातबारा हा पक्षाचा
मुख्यमंत्री महाराष्ट्राचा करीन मी तुला
सांगायाची आहे माझ्या लाडक्या ताईला
दमलेल्या दादाची ही कहाणी तुला
उपमुख्यमंत्री पदासाठी केल्या लाख लटपटी
किती घेतल्या शपथा भल्या पहाटे पहाटे
किती केली काकासेवा सदा राहून पाठी पाठी
तरी सदा दुय्यम राहिलो, वाट पहात भाकरी फिरण्याची
सत्तेसाठी कधी धरीले वाघोबाचे पाय
कधी केला ‘देवा’चा धावा परी चाले ना उपाय
कधी होईन मी पक्षाध्यक्ष, बस नाद हा खुळा
करे कोणी नाटक, भरुनी राजीनाम्याच्या चुळा
सांगायाची आहे माझ्या लाडक्या ताईला
दमलेल्या दादाची ही कहाणी तुला
दिस-मास-वर्षे गेली खाल मानेने निघून
एक-एक दिवा आशेचा गेला हळूच विझून
अशावेळी काय सांगू काय काय वाटे
सांडले आयुष्य हातातून, मनी वैफल्य ते दाटे
किती केल्या तडजोडी, किती घोटाळे भीषण
शेवटी हाती लागे काय तर उपमुख्यमंत्री पदाची बोळवण
हाती येता येता सर्व सदा उरलो मी दुय्यम
काका सांगे तेच सत्य, माझ्या नशिबी सदा संयम
खोट्या खोट्या राजीनाम्याचा खोटा खोटा हा सोहळा
झाले अजून एक नाटक, माझ्या हाती फक्त खुळखुळा
सांगायाची आहे माझ्या लाडक्या ताईला
वाट पाहुनी दमलेल्या दादाची ही कहाणी तुला

मी लिहीलेली नाही, मेल मध्ये आली कारण माझे कायप्पा बंदए.

नक्कीच !
आणि म वी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री पदासाठी लायक आणि प्रशासनावर वचक ठेवू शकणारा माणूस म्हणजे फक्त अजित पवारच होते .
पण उठाला बळेच गुढग्याला बाशिंग बांधून तयार केले झाझु कुत्रकार ने आणि स्वतःचा व उठाचा देखील मुखभंग करून घेतला .....

शेवटी पुत्रीप्रेम जिंकले , पक्षप्रेम हारले !
अजून एका भाजप विरोधी पक्षाची वाट लागायला सुरुवात होणार असं दिसतंय .
काकानी पोरीला आणि एका गुजराथी ला अध्यक्ष बनवून टाकले आणि अजितराव उरले फक्त याला झाप आणि त्याला झाप करायला.
येथे कोणाला दादाची अध्यक्ष पदी नेमणूक होईल अशी खात्री होती का ?

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा एक वेगळा पैलू विठ्ठलराव गाडगीळ यांनी सांगितला होता. अविश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत मुल्ला रशीदने वसंतदादांना पाठिंबा दिला होता आणि आपले भाषण संपल्यावर मात्र राज्यपालांकडे जात सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र त्यांना दिले होते. मुल्ला रशीदचे विश्वासघाताचे आणि संधीसाधूपणाचे किळसवाणे प्रयोग तेव्हापासून सुरू झाले होते.

१९९९च्या मेमध्ये आफ्रिकेविरूद्धचा क्रिकेट सामना सुरू होणार होता. त्यामुळे बैठकीतील विषय लवकरात लवकर उरकून काँग्रेसचे पदाधिकारी सामना पाहण्यास आतुर होते. मात्र पी ए संगमा यांनी वेगळा सूर आळवला. सोनियांना उद्देशून ते म्हणाले की त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या आईवडलांबद्दल आम्हाला फारच थोडी माहिती आहे. ९८ कोटी भारतीय जेव्हा विचारतील की तुम्हाला एकही भारतीय पंतप्रधानपदासाठी का मिळाला नाही, तेव्हा आपल्याकडे काही उत्तर नाही. पक्षाने याची नोंद घेणे गरजेचे आहे. मुल्ला रशीद म्हणाला की तुम्ही पक्षाला एक ठेवण्याची फार मोठी सेवा बजावली असली तरी तुमच्या परदेशी मुळावरून भाजपने जे रान उठवले आहे, त्याला काँग्रेस समाधानकारक उत्तर देऊ शकलेली नाही. मुल्ला रशीदने आणलेले हे सोंग निरर्थक अशामुळे होते की वाजपेयी सरकार पाडण्यासाठी इतर पक्षांमधील कोणाकोणाला लक्ष्य करायचे यासाठीची यादी बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुखपद त्याच्याकडे होते आणि हे सरकार पाडून सोनियांना पंतप्रधान करायचे हाच त्यामागचा डाव होता हे त्याला पक्के माहित होते.

सोनियाविरोधात बंड करणारा तारिक अन्वर हा तसा सोनियाविरोधी नसला तरी तो सीताराम केसरी यांचा चेला होता. केसरी यांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे तो अस्वस्थ होता. तो अलीकडे काँग्रेसमध्ये परत गेला.

मुल्ला रशीदचे सोनियांविरूद्धचे बंड ढोंगी अशासाठी होते की सोनियाचे विदेशी मूळ ही काही लपून राहिलेली बाब नव्हती. तेव्हा भारताचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्षपद या विदेशी मुळाच्या सोनियांकडे जाणे हेच लाजीरवाणे होते. त्याविरूद्ध भूमिका घेणारा कणा असलेला एकही काँग्रेसी नव्हता. मुल्ला रशीदला कणा असण्याचा प्रश्नच नव्हता. अशा सोनियांनी काँग्रेस सांभाळली, पक्ष एकत्र ठेवला असे म्हणणारा मुल्ला रशीद इतकी वर्षे लाचारीच करत नव्हता का?

तर या त्रयीने अशी आश्चर्यकारक भूमिका घेतल्यावर क्रिकेट सामना पाहण्याचे काँग्रेस समितीच्या सदस्यांचे मनसुबे धुळीला मिळाले. आर के धवन चिडले व म्हणाले की तुम्ही भाजप-संघाचा अजेंडा चालवत आहात. धक्का बसलेल्या सोनिया उठून निघून गेल्या. लाचार काँग्रेसी त्यांच्यामागे धावले. अर्जुन सिंग हा लाचार तर पायात चप्पल नाहीत हे विसरून धावला. या लाचारानेच वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी सोनियांना पंतप्रधानपदासाठी घोड्यावर बसवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

या त्रयीने सोनियांना उद्देशून एक पत्र दिले. सोनियांनी ते वाचण्याची तसदीही घेतली नाही. अर्जुन सिंग यांनी त्या पत्राला उत्तर देणारे पत्र प्रसिद्ध केले. त्यात या तिघांना 'मीर जाफर' असे संबोधले गेले.

कोणाला वाटेल की अर्जुन सिंग हा लाचार मुल्ला रशीदच्या पंतप्रधानपदाच्या स्वप्नासमोरचा प्रमुख अडसर असला, तरी प्रणव मुखर्जी, करूणाकरन, माधवराव शिंदे वा अन्य कोणत्याच प्रमुख काँग्रेसी नेत्याचा पाठिंबा नसतानाही मुल्ला रशीदने सोनियांविरूद्ध बंड का केले? कारण म्हटले तसे सोनिया विदेशी मुळाच्या आहेत यात नवे काही नव्हते. त्यामुळे यात निस्पृहतेचा अंशही नव्हता. मुळात मुल्ला रशीद व निस्पृहता हे विरूद्धार्थी शब्द झाले. तर काँग्रेसला पूर्ण बहुमताची संधी नाही हे कळल्यामुळे आघाडीचे सरकार बनल्यास अन्य पक्षांमधून पाठिंबा मिळवून पंतप्रधानपदासाठी वर्णी लावून घ्यायची, असा मुल्ला रशीदचा डाव यामागे होता. ती संधी नंतर अनेकदा आली, पण मुल्ला रशीद नेहमीच भावी राहिला. आज तर तो सर्वात (केवळ वयाने) ज्येष्ठ 'भावी' आहे. काँग्रेसमध्येच पुरेसा काय, कोणाचाच अजिबात पाठिंबा नाही अशा अवस्थेत मुल्ला रशीदने देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणे हा फार मोठा विनोद होता. एक भारतीय म्हणून तसे स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकालाच असला तरी त्यातून भारताचे काही हित साधले जाणार होते का? चंद्रशेखर, गुजराल, देवेगौडा या पंतप्रधानपदाची लॉटरी लागलेल्यांकडून देशाचे काही भले झाले होते का? मुल्ला रशीदकडे देशासाठीची अशी कोणती दृष्टी होती? उलट १९९३मध्ये वोरा समितीने दिलेल्या अहवालात काही काँग्रेस नेत्यांसह मुल्ला रशीदचे माफियाशी संबंध असल्याचा स्पष्ट उल्लेख होता. देशावर कलंक असलेला हा मुल्ला रशीद देशाचा पंतप्रधान होऊ पहात होता, त्यामागचे कारण काय असेल? हा दाऊदचा की दाऊद याचा, असा प्रश्न पडावा इतका गंभीर प्रकार असताना हा देशाचा पंतप्रधान झाला असता तर देशाचे काय झाले असते याचा विचार करून अंगावर काटा येतो.
अशा मुल्ला रशीदला पक्षातून हाकलल्यावर त्याने स्वत:ची वेगळी चूल मांडली. दाऊदच्या माणसाने स्व:त:च्या टोळीला 'राष्ट्रवादी' हे नाव घ्यावे हा किळसवाणा प्रकारही घडला. याचा कोडगेपणा असा की ज्या कारणाने याची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली, त्याच काँग्रेसबरोबर आणि त्यातही त्याच सोनियांबरोबर जाण्यात त्याला यत्किंचितही शरम वाटली नाही. अर्थात शरम व मुल्ला रशीद यांचाही काहीच संबंध नाही.

देशाचे नशीव बलवत्तर की १९९९च्या निवडणुकीत भाजपयुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे मुल्ला रशीदचे पंतप्रधानपदी बसण्याचे स्वप्न भंगले. दिल्लीतले सोडा, राज्यातही काँग्रेसच्या पुढे जाऊ शकला नाही. त्याला ५८, तर काँग्रेसला ७६ जागा मिळाल्या.

मुल्ला रशीदच्या टोळीची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली. आता ३४ वर्षे झाली. त्याने केलेल्या देशघातकीपणा व समाजघातकीपणापलीकडे त्याच्या टोळीने या काळात राज्याचे लचके तोडले, जनतेसाठीच्या निधीची वाटमारी केली.

देशाला व राज्याला काय मिळाले याचा हिशोब लावण्याचा प्रयत्नच करायचा नाही. राज्याच्या नशिबी काळाकुट्ट अंधार आला. हा प्रश्न म्हणून विचारायचा की हा पंतप्रधानपदी बसला असता तर याने देशाचे आणखी मातेरे केले असते. याचे 'भावी' असणे अशी धोक्याची चाहूल देणारे आहे.

आधार: न्यूज१८च्या पोर्टलवरील रशीद किडवाई यांचा १८ ऑक्टोबर २०१८ रोजीचा लेख.

Pages