भेटणे न व्हावे

Submitted by निखिल मोडक on 8 May, 2023 - 03:01

भेटणे न व्हावे बोलणे न व्हावे
तुटावेत हे एकदाच धागे

किती आडवळणे घ्यावीत आता
नको मीलना नको धाऊ वेगे

उगा तार सप्तकातूनी होय गाणे
तयाने कुठे का मैफिल रंगे

क्षिती लोकलज्जे पुढे प्रिती काये?
तिचा जीव जाण्यापरी संपवू गे

कुणा काय वाटे नको व्यर्थ चिंता
'सुटलो आता' हा उरे शब्द मागे

© निखिल मोडक

Group content visibility: 
Use group defaults

कुणा काय वाटे नको व्यर्थ चिंता
'सुटलो आता' हा उरे शब्द मागे >>पटलेच!
फक्त मिलना पाशी पाउल अडखळले. एकदम जमून मीलन झाले तर?

मला काय म्हणायचे आहे कि मिलनातला "मि" दीर्घ मीलनात जास्त मजा आहे.>>++ 1 सहमत केशवकूल.
कविता छान झालीय.