चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ठीक.

मराठी आणि दक्षिण भारतीय सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत. तर विदेशी सिनेमा आणि हिंदी सिनेमा यांच्यासाठीही वेगवेगळे धागे चालतील की.
दोघांना एकाच धाग्यात कशाला गुंतवा?

अरे हे काय साहित्य संमेलन आहे का! Proud दलित, विद्रोही, कोकणी आणि भारतीय आणि वैश्विक..
आणि हे धागे सेमाय वहाते करता आले तरी चालतील. एक पानाच्या लिमिट ऐवजी ५ किंवा १० पानांचं लिमिट ठेवा की सारखे नवे धागे पण काढायला नको. २००० प्रतिसादातुन हुडकणे गवताच्या गंजीपेक्षा कठिण असावे आणि कोणी करतही नसावे.

फारएण्ड, पायस, मी_अनु, अस्मिता यांनी पाहिलेले खास चित्रपट असा वेगळा धागा मात्र चालेल.

Lol

भोजपुरी सिनेमाचा वेगळा धागा नाही म्हणून अजूनही देवरा बडा सतावेला, तोहरे कारण गई भयसियां पानी में, सैंया के साथ मडईयां में' असे अनेक दर्जेदार सिनेमे बघायचे राहिले आहेत. धागा काढला की बिंजवा भोजपुरी Proud
------
धन्यवाद मानवदादा Happy

नेटफ्लिकवर Incident in a Ghostland अचानक दिसला. एप्रिल २९ ला शेवटचा दिवस आहे म्हणुन पाहिला. हॉरर थ्रिलर आहे. खतरनाक आहे. मधे एक ट्विस्ट येतो त्याने मला तर अंगावर काटा आला. आवाज फार ठणाणा आहे त्यामुळे जरा हळु ठेवा पाहिलात तर.

Fool राणी आला प्राईमवर. सुबोधचा विग पाहून त्याला झुल्फिकार भावे म्हणायची हुक्की आली. प्रियदर्शिनी दिसायला सुंदर पण अभिनयात भयाण आहे. कोळीवाड्यातली मुलगी म्हणून जे बेअरिंग घेतले आहे ते पाहता हास्यजत्रातून ती बाहेर पडलेली नाही. तिथेही फारसे दिवे लावता आलेले नाहीत.

विक्रम गोखले हे सुबोध भावेचे वडील असतात. त्यांचे नाव फोन मधे कोर्ट मार्शल म्हणून सेव्ह केलेले असते ते मजेशीर वाटले. जेव्हां देवानंदने मिसेस अंबानींना घेऊन याच थीम वर मनपसंद बनवला होता तेव्हां त्याची तुलना भक्ती बर्वेंच्या ती फुलराणी नाटकाशी झाली होती. आत्ताचा फुलराणी पाहिला तर मनपसंद जास्त आवडेल. पाहिल्याचे जावईबापू अनिलभाईंना कळवा. खूष झाले तर हिर्‍याचा नेकलेस, अंगठी, सोन्याचे धोतर किंवा पैठणी पाठवतील.

तू झुठी मै मक्कार पहिला. टाइमपास आहे. Storyline थोडी खुळी आहे, पण चालवून घ्या, जसं एव्हढे प्रेमात पण फोनवर एकमेकांचा आवाज नाही ओळखत. शेवटी लग्न मोडायचं कारण तर 'मै चाहती की तुम चाहो की मुझे चाहो' वगैरे चाहाचाहाटात काही कळलं नाही. मग विमानतळ ड्रामा वगैरे, तेव्हाचा banter मला आवडला. पण घरचे म्हणतात वेगळा रहा, पण शेवटी सगळे एकत्र दाखवलेत, काहीतरी स्कीप केलं मी.

कोळीवाड्यातली मुलगी म्हणून जे बेअरिंग घेतले आहे ते पाहता हास्यजत्रातून ती बाहेर पडलेली नाही. >>> हो मलाही तसेच वाटले. २०-३० वर्षांपूर्वी तरूण पिढी वगैरे दाखवताना थोडीफार ओव्हरअ‍ॅक्टिंग दाखवत तसे वाटले. ती झगामगाची इण्ट्रो फारच ओव्हर द टॉप आहे.

झुल्फिकार भावे >>> लोल. आता दोन्ही हेअर स्टाइल चेक केल्या पाहिजेत.

पिक्चर मला समहाऊ बोअर झाला नाही. मी तर थिएटरमधे पाहिला. विक्रम गोखलेचे कॅरेक्टर चांगले घेतले आहे. सुभाचेही काम चांगले आहे. पण स्क्रिप्ट मधे फार दम नाही. मधेच "ती फुलराणी" च्या वाटेवर जाउन अगदी शिरवाडकर्/बोरकर वगैरे येतात. त्याचा त्या सौंदर्यस्पर्धेशी काय संबंध आहे ते कळत नाही. एनीवे तेथील बाकी मुलींना त्याचा गंधही नसतो. मग हिलाच का प्रमाण मराठी शिकायला हवे? प्रमाण मराठी तेथील कोणत्याच मुलीला येत नसावे Happy

दुसरे म्हणजे मराठी कॅरेक्टर एस्टॅब्लिश करताना काहीतरी ग्रॅण्डपणा दाखवायला जातात पण त्या कॅरेक्टरच्या नंतरच्या सीन मधे तो कन्सिस्टंट राहात नाही किंवा तो धागा मधेच सोडून दिल्यासारखा वाटतो. विक्रम गोखलेच्या पहिल्या सीन मधे दोनच आइस क्यूब्ज बद्दल संवाद आहे. काहीतरी काटेकोरपणा वगैरे दाखवायचा असेल. पण पुढे तसे काहीच नाही. सुभा सुद्धा एकदम कोणीतरी भारी आहे वगैरेने सुरूवात होते. पण पुढे तो भारीपणा फार दिसत नाही. सौंदर्यस्पर्धेत फक्त यांचेच लोक बसले होते असे वाटले प्रेक्षकांत Happy

तू झुठी मै मक्कार पहिला. टाइमपास आहे >>> मी पहिली १० मि. पाहिली. तो सिक्वेन्स मजेदार वाटला. पुढे पाहायचा आहे.

तू झुठी मै मक्कार पहिला. टाइमपास आहे
>>>>
धन्यवाद ट्युलिप.. घरच्यांना आवडला नव्हता. त्यामुळे मी ही बघणार नव्हतो. ट्रेलरवरूनही काहीतरी जुनी बाटली आणि जुनीच दारू टाईप्स असणार असे वाटलेले. पण आपली पोस्ट वाचून मी मगाशी पाहिला आणि फार आवडला. छान टाईमपास आहे आणि ईमोशन ड्रामा सुद्धा डोळ्यातून पाणी काढतो. माझ्या तरी किमान चार वेळा आले.

..
पण घरचे म्हणतात वेगळा रहा, पण शेवटी सगळे एकत्र दाखवलेत, काहीतरी स्कीप केलं मी.
>>>>>>
घरचे तिला एअरपोर्टवर प्रपोज करतात तेव्हा तिचे मतपरीवर्तन होते असे दाखवलेय साधारण. जे योग्यच वाटले. घरचे ईतके ओपन माईंडेड दाखवून सुद्धा जर एकत्र कुटुंब पद्धत फेल दाखवली तर त्यात काही अर्थ नाही.

शेहजादा पाहिला.कथा लेखकाने घरी बसून 80ज आणि 90ज चे 4-5 पिक्चर्स आरामात बघून त्याची भेळ बनवून कथा लिहिल्या प्रमाणे वाटलं(बावरची आणि हिरो नंबर 1 ची मुख्य आठवण आली.इन आर आय मुलगा चक्रम या अर्थाने परदेस, आ अब लौट चले ची आठवण आली.) मध्ये मध्ये परेश रावल आणि आर्यन च्या एकंदर कोपरखळ्या बघून वेलकम सिरीज ची आठवण आली.
कार्तिक आर्यन एरवी पाहिला की त्याला कोणा मेल अटेंडन्ट कडून स्वच्छ खसखसून आंघोळ घालवून, दाढी करवून, केस कापवून नीट थोडे तेलाचे 10 थेंब लावून भांग पाडवूनच समोर आणावा असं वाटतं.पण इथे त्याचा अभिनय आणि वावर चक्क आवडला.एकदा बघायला टाईमपास आहे पिक्चर.

अरे वाह.. मला आवडतो कार्तिक आर्यन.कालच्या झूठी मक्कारमध्येही तो पाहुणा कलाकार होता.. शहजादा बघणेबल असेल तर आजची सोय झाली Happy

धन्यवाद फारेण्ड. पूर्ण पाहिलेला नव्हता. आता बघेन.

भाईजान बद्दल ना धागा, ना चार ओळी. इतने हल्के मे मत लो भाई को !
कसलीही जाहीरात नसताना, अजिबात अभिनय न करता सर्वात जास्त ओपनिंग घेण्याची सुरूवात करणारा स्टार आहे तो.

पाहिला शेहजादा.
सुचवल्याबद्दल धन्यवाद.
कार्तिक आर्यनने निराश नाही केले.
क्रिती सेनॉनही फार आवडते. पण उत्त्तरार्धात फार कमी दिसली हे वाईट झाले.

बारा तासांच्या अंतरात बॉलीवूडचे दोन टिपिकल फिल्मी चित्रपट पाहिले. दोन्ही जमून आलेले. दोन्ही आवडले. विकेंड सुरू होताच वसूल झाल्यासारखे वाटतेय. आजही एक पिक्चर बघायचा टाईम आहे. हाच मूड कायम राहायला कुठचा बघता येईल हा विचार करतोय.

भाईजान बद्दल ना धागा, ना चार ओळी
>>>
किसी का भाई किसी की जान का?
आला का तो पिक्चर?
पठाणने जो धुरळा उडवलाय आसमंतात तो खाली बसेपर्यंत आता कुठ्ल्या ब्लॉकबस्टर बॉलीवूड मूवीची हवा होणे अवघड आहे.

अनु, ऋन्मेष तुम्ही त्यातील गाणी सुद्धा न ढकलता पाहिली असतील तर तुमच्या चिकाटीला सलाम !

ते शहजादा गाणं फारच पकाउ होतं.मी गाणी आल्यावर स्वयंपाकघरात जात होते त्यामुळे आठवतच नाहीत.
ती कोमा नर्स कंगना सारखी दिसते असं उगीचच वाटत होतं.

मी गाणी आल्यावर स्वयंपाकघरात जात होते >> हे कसं जमवायचं याबद्दल एखादा मार्गदर्शनपर धागा तो बनता है.

मी गाणी आल्यावर स्वयंपाकघरात जात होते >> हे कसं जमवायचं याबद्दल एखादा मार्गदर्शनपर धागा तो बनता>>+१
संध्याकाळी ७.४५ ते ९ च्या दरम्यान जेव्हा मालिका बघायचे तेव्हा त्या बघताना भाज्या निवडून व्हायच्या आणि मधे जाहिरात लागली कि स्वयंपाकघरात जाऊन फोडण्या देऊन व्हायच्या. पटकन स्वयंपाक होतो Happy

शहजादाची गाणी पकाव होती. ती सगळीच ढकलली.
झूठी मक्कारची दोनेक चांगली होती ती पाहिली.

त्यातल्या दुखी गाण्यातील अरिजितच्या आवाजातले खालील शब्द कोणाची तरी आठवण येत असल्याने अजून छळताहेत ..
__,,__

प्यार झूठा था जताया ही क्यूँ
*ऐसे जाना था तो आया ही क्यूँ*

ऐ सितमगर तू जरा और
सितम करदे आ..
आजा बेवजासा ये रिश्ता
खतम करदे आ..

ओ बेदरदेया यार बेदरदेया
ओ बेदरदेया यार बेदरदेया
Sad

Pages