चमचमीत मटण

Submitted by मनःस्विनी on 14 December, 2009 - 13:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२ पाँड बकर्‍याचे मटणाची मध्यम आकाराची फोडं करून(शोल्डर मागायचा व थोडासा लेग मागायचा),

ओले वाटणः
१ मध्यम कांदा कसाही चिरलेला,
१ अक्खी गड्डा लसूणाच्या पाकळ्या सोललेल्या,
३ चमचे आल्याचे तुकडे,
हे किंचीत तेल घेवून छान परतून ब्रॉउन झाले की एकदम बारीक वाटायचे.

खडा मसाला:
४ काळमिरी दाणे(दोनच घ्या कारण नंतर फोडणीत पण येणार बाकीचे दोन),
केसर दोन चिमटी(सगळ्यात शेवटी टाकून गॅस बंद करायचा),
२ दालचीने छोटीच काड्या,(दोनच घ्या कारण नंतर फोडणीत पण येणार बाकीचा एक),
साध्या वेलची दाणे,
१ छोटा चमचे बडीशेप,
१ छोटा चमचा जीरे,
१ छोटा चमचा धणे,
वरील सर्व भाजून बारीक वाटून घ्यायचे. ताजा वाटलेला मसाला एकदम खमंग लागतो. ज्यास्त वेळ नाही लागत वाटले तरी.
त्यात कश्मीरी मिरची पूड मिक्स करायची व तयार ठेवायची.

फोडणी:
१ एकदम लहान चमचा तेल मिश्र तूप्(हवेच तर तूप, तसेही तेल कमी घ्या कारण मटणाचे तेल सुटते नंतर)
१ कांदा लांब पातळ कापलेला,
वरचा खडा मसाला(अर्धाच घ्यायचा),
२ -३ पाने तेजपत्ता,
१ मसाला वेलची,

शोभेला:(हे मात्र मटण शिजत आले की टाकायचे),
आले पातळ लांब काप किसलेले,
१ मूठ धूवून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ बुचका पुदीना बारीक चिरलेला(वास छान येतो ह्याने),
२ मोठे चमचे लिंबू रस,

क्रमवार पाककृती: 

mutton1.jpg

------------------------------------------------------------------------------

मी राईस कूकर ज्याचे भांडे नॉन्स्टीक आहे ते वापरते, तेल कमी लागते. तसेच बघावे लागत नाही.
आधी मटणाला हळद लावून झाली की वाटलेला खडा मसाला लावून मुरवायचे १ तास.

कृती:
१) त्या राईस कूकरमध्ये वरील फोडणीचे सामान टाकायचे त्याच क्रमाने. म्हणजे कांदा परतला की कोरडा मसाला असे.जरासा खमंग वास आला की आता मटण मस्त परतायचे. पाणी अजिबात टाकायचे नाही. मग झाकण ठेवायचे.
२)मग वाटलेले वाटण टाकायचे. राईस कूकरची आच 'कूकींग' वर सेट करायची.
३)१५ एक मिनीटाने मग पुन्हा परतून किंचीत १ मध्यम आकाराचा कप उकळलेले पाणी टाकून ढवळून बंद करायचे. राईस कूकरमधून दिसते जर पाणी कमी होवून आटलेच असेल तर पुन्हा सेटींग मग 'वार्म' वर ठेवावे पण शेवटी शेवटी पाणी टाकून बेचव होइल. मग आधीच सुरुवातीला कपात वाटल्यास पाणी घालावे ज्यास्त. पुन्हा सेटींग 'कूकींग' वर ठेवावे.
४)आत सव्वा तास तरी शांत शिजू द्यायचे. वाटलेच तर मध्ये चेक करावे.
५)शिजत आले वाटले(खमंग वास सुटतो.) की वरचे शोभेचे पदार्थ टाकून वार्म वर सेट करायचे वा आणखी २० मिनीटे ठेवायचे. जवळ जवळ दिड तासात मस्त मटण तयार.

वाढणी/प्रमाण: 
चार लोकांना पुरते
अधिक टिपा: 

१) बरोबर अफगाणी ब्रेड मस्त लागतो.
२)मी तिखट कमी खाते तेव्हा तुम्हाला ज्यास्त तिखट हवेच असेल तर काळमिरी,रोजचे लाल तिखट वगैरे वाढवू शकता. पण खरे तर हे नुसते फ्लेवरफुल बरे वाटते. नाहीतर उगाच ज्यास्त काळमिरी, लाल मसाला टाकून जाळ होतो.
३) रोजचे दही, टोमॅटो का खोबरे नसल्याने बरे वाटते मला.
३)ह्याच पद्ध्तीने चिकन मस्त लागते.
४)अफगाणी लोक तर अश्या मटणा चिकन बरोबर दही खातात.
५) हा खडा मसाला , तेल व लिंबू रस मटणाला लावून वूड ग्रील तरी झकास लागते. चिकनला सुद्धा तोच मसाला मस्त लागतो.

माहितीचा स्रोत: 
हि खरे तर अशीच पद्ध्तीने आई बनवायची मग एका कश्मीरी मैत्रीणीकडून केसर व बडीशेप टाकायला लागली. छान लागते चव.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी वाचुन वाटतेय तरी चांगले, पण जवळजवळ दिड तास शिजणारा पदार्थ फक्त १ मध्यम कप पाण्यावर शिजवायचा तोही राईस कुकरमध्ये??!!! खाली लागणार नाही का गं?? (माझा पॅनासोनिक आहे)

>खाली लागणार नाही का गं??
जे काही खाली लागलेलं (उरलेलं) असेल तेच खावं असं म्हणायचं असेल या रेसिपीत

राईस कूकरचे सेटईंग वर आहे. मी टेम्प अ‍ॅडजस्ट करते. जसे वरती लिहिलेय की जर पाणी खूपच कमी असेल तर १ कपाएवाजी वाढवावे. तुमच्या कूकरच्या सेटींग वर आहे. शेवटी २० मिनीटे "फक्त" वार्म वर ठेवायचे आहे. तो धरून दिड तास. तेव्हा १ तासात होणारा आहे खरे तर.

ओक्के मॅडम.. माझ्या कुकरवर टेम्पसाठी सेटींग बिटींग काही नाही. जस्ट कुकींग आणि वॉर्म दोनच सेटीग आहेत. करुन पाहाते,. मधुन मधुन ढवळुन बघेन लागते का ते....

तु इतकं मस्त लिहिलंयस ना की ते वाचतावाचताच माझ्या तोंडाला पाणी सुटले. मनातल्या मनात मटण चॉप्स खाऊनही झाले (वजनही वाढले असेल अर्ध्या किलोने Happy )

>तो धरून दिड तास. तेव्हा १ तासात होणारा आहे खरे तर
चुटुकभर मटण गट्टायला एव्हडी ऊर्जा वाया? निषेध!!!
शिवाय बोकडाचा बळी गेला तो वेगळाच

मनःस्विनी,
तुमच्या रेसेपीने मटण केले. मस्त झाले होते. या छान रेसेपीबद्दल धन्यवाद.
मी तुम्ही दिलेल्या पद्धतीने हर्ब मासा पण करुन पाहीला छान होतो तो सुद्धा.
अशाच छान छान रेसेपीज देत रहा Happy

काल ह्या पध्द्तीने चिकन केले होते.. राईस कुकर ऐवजी नेहेमी सारखेच बाहेर पॅन मध्ये शिजवले.
खुप मस्त झाले. एकदम फ्लेवरफुल्ल!!

मनःस्विनी खुप खुप धन्यवाद!

धन्स मनःस्विनी , बरेच दिवसानंतर मायबोलीवर आल्याने प्रतिसाद देण्यास ऊशीर झाला. मी दोनवेळा या पद्धतीने मटण केले, फारच छान झाले होते.

मी ह्या पद्धतीने चिकन केले , मस्त लागले . उरलेला रस्सा मी त्यावर लिंबू पिळून खाल्ला . पावाबरोबर तर खल्लास लागतो . अल्टिमेट रेसिपी आहे , मनू . थँक्स . Happy

धन्यवाद संपदा. तो आफगाणी ब्रेड(वरचा फोटोतला) मिळाला तर बघ. एकदम खतरनाक लागतो तो ब्रेड अश्या रस्याबरोबर.

मीही ह्या पद्धतीने चिकन बनवले गेल्या रविवारी. खरेतर मटणच बनवायचे होते पण घरच्यांना मटण आवडत नाही म्हणुन चिकन केले.. आता मटण आणुनही बनवणार...

मनु, कसे झाले ते सांगायला नकोच. तुझी रेसिपी म्हणजे मस्तच होणार...

मी हि रेसीपी वईत लिवली होती... नाव न्हवतं लिवलं पण.
अचानक गेल्या इतवारी आठवण झाली..
करून पाहिली पण जळ्ळं नावच आठवेना कोणाला थांकू म्हणायचे तर..
मटण मटण करत शोधली तवा मिळाली....

बेस्ट हाय.

त.टी: आमी श्रावण वगैरे बघत नाय. बकरं स्वस्त मिळत होतं , घेतलं. तसेही वर्षातून कधीतरी खातो.

Wow