फिटनेस अ‍ॅप कोणते घ्यावे ?

Submitted by रघू आचार्य on 9 January, 2023 - 20:14

मधूमेहाच्या नियंत्रणासाठी एक अ‍ॅप वापरतो. स्वस्तात ग्लुकोमीटर मिळाला त्यांचं डिफॉल्ट अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा वापर घरी घेतलेले रेकॉर्ड डिजीटल स्वरूपात साठवायला आणि डॉक्टरला दाखवायला होऊ शकतो. आधीचे ग्लुकोमीटर वापरल्याने रीडिंग अचूक मिळतात पण हा फायदा मिळत नाही. आताच्या मीटर मधे आणि लॅब रिपोर्ट्स मधे थोडासा फरक असतो. म्हणजे १२० च्या जागी १२४ इतका.

या अ‍ॅप ला गुगल फिट, फिटबिट, पोलर आणि अन्य काही अ‍ॅप फिटनेस अ‍ॅप जोडले जाऊ शकतात. (याशिवाय माझे मागचे रेडमी बॅण्डचे अ‍ॅप , झेप की झॅप लाईफ, सुद्धा सिंक्रोनाईज होते पण फोन हरवल्याने बॅण्डचा डिस्प्ले बंद पडला आहे. रेडमीच्या बर्याच बॅण्डचा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्याचा उपयोग नाही). गुगल फिट मधून जर लॉग आउट केलं नाही तर ड्रायव्हिंग ची मूव्हमेंट सुद्धा ते विचित्र रित्या स्टेप काऊंटिंग मधे अ‍ॅड करते. अ‍ॅप पेक्षा फेरीतल्या एकूण स्टेप्स मोजणे आणि नंतर फेर्या व लागणारा वेळ मोजणे हे जास्त सोयीचे असते असा अनुभव आहे. पण हे रेकॉर्ड डिजिटल नसते.

फिटबिट अनेक स्मार्ट वॉचेस, बॅण्डला जोडता येऊ शकते. पण या प्रॉडक्ट्सचे स्वत:चे अ‍ॅप असतेच.

या गरजा लक्षात घेऊन चांगले फिटनेस अ‍ॅप सुचवा.
हार्ड अ‍ॅण्ड फास्ट रूल काहीच नाही (हे शुद्ध मराठीत आहे). त्यामुळे याच्याशिवाय अन्य चांगले अ‍ॅप सुद्धा सांगू शकता. पण कमेण्टमधे तसे आवर्जून लिहावे ही नम्र विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिटनेस ॲप मुळे नुकसान च जास्त होते.
बीपी घरीच मोजणे मग त्याचा निष्कर्ष स्वतःच काढणे.
आणि मग स्ट्रेस.
शुगर स्वतःच मोजणे आणि गूगल बाबा जे सांगेल ते सत्य मानून टेंशन घेणे.
मग परत स्ट्रेस वाढवणे.
असे प्रकार घडतात.

मेल फिट्नेस & फिमेल फिटनेस ह्या नावाची फ्री अ‍ॅप्स आहेत वेगवेगळी. गेली ३ वर्ष त्यात दिलेल्या अवयव वाईज किंवा फूल बॉडी अशा व्यायाम करीत आहे. वजन, फीटनेस आटोक्यात आहे बर्यापैकी.
शिल्पा शेट्टीचे १ अ‍ॅप आहे, त्यात योगा, कार्डीओ आणि इतर व्यायाम आहेत, बरेच से फ्री आहेत. काही पेड आहेत..फी पण फार नाही.
नावः सिंपल सोलफुल.

बरं. रोज मोजले पाहिजे असे नाही. पण ते यंत्र महिन्याची गोळाबेरीज देणार म्हणजे रोज मोजणारच. हा मुद्दा बाजूला टाकतो आणि विषयाकडे वळून -
एक यूट्यूबवर व्हिडिओत पाहिले. दंडावर एक काळा चौकोन चिकटवून ठेवलेला. त्यातला अंगाकडचा सेन्सर सर्व मोजत असतो. त्यावरच्या आरफीड/क्यूआर कोडला मोबाइलने स्कॅन केले की डेटा मोबाइलमध्ये ट्रान्स्फर होतो.

बीपी घरीच मोजणे मग त्याचा निष्कर्ष स्वतःच काढणे.
आणि मग स्ट्रेस.
>>>>

हे कर्रेक्ट आहे. मोजायला हरकत नाही. निष्कर्श काढणे एक्स्पर्टचे काम.

फ्री ॲप सवय लावण्यासाठी...
किंवा त्या वर add पण खूप येतात
नवीन फुचर साठी subscribe करावे लागते .
शेवटी हा उद्योग आहे

स्टेप मोजण्याची काही गरज नाहीं
.
दम लागला की थांबा.
किती कॅलरीज वापरले ह्याची माहिती हे फक्त बकवास आहे.
शरीराचे विविध कार्य चालू राहण्यासाठी किती कॅलरीज वापरल्या जातात.
ह्याचे मोजमाप करणारे एक पण यंत्र किंवा तंत्र आज पण उपलब्ध नाही
फक्त त्या विषयावर चर्चा होवूच दिली जात नाही.

तो विषय कोणीच काढत नाही.

फ्री ॲप सवय लावण्यासाठी...
किंवा त्या वर add पण खूप येतात
नवीन फुचर साठी subscribe करावे लागते .
शेवटी हा उद्योग आहे

स्टेप मोजण्याची काही गरज नाहीं
.
दम लागला की थांबा.
किती कॅलरीज वापरले ह्याची माहिती हे फक्त बकवास आहे.
शरीराचे विविध कार्य चालू राहण्यासाठी किती कॅलरीज वापरल्या जातात.
ह्याचे मोजमाप करणारे एक पण यंत्र किंवा तंत्र आज पण उपलब्ध नाही
फक्त त्या विषयावर चर्चा होवूच दिली जात नाही.

तो विषय कोणीच काढत नाही.

साहेब काढा की तुम्ही तो विषय, आता काढाच बघु खरंच एक वेगळा धागा आणि लिहा सविस्तर. आम्ही सारखं म्हणायचं तुम्ही लिहा धागा काढुन आणि तुम्ही मात्र दुर्लक्ष करत रहायचं त्याकडे?

ह्या वर चर्चा करा. पळ काढणे हा मार्ग नाही.एक धागा आहे ना.
आपल्या आचार्य गुरुजींचा आहे.
सर्व बाबी वर चर्चा झाली पाहिजे.
Negetive,positive दोन्ही बाजू चर्चेत आल्या पाहिजेत.

हा जी ची सवय मोडली पाहिजे

किती कॅलरीज वापरले ह्याची माहिती हे फक्त बकवास आहे >> जबरदस्त कॉन्फिडन्स. यासाठी एटाझापा!!!

नवीन फुचर साठी subscribe करावे लागते . >> सुबसक्रीब सोडा फुचरची भानगड सुद्धा इथल्या कित्येकांना ठाऊक नसेल ( मी धरून) तरीही वाद घालण्याचा नटुरे आहे. अशांचं फुटुरे काय असणारै ?

तुमचे मराठी कच्चे आहे गुरुजी .
तुम्ही जे शब्द लीहले आहेत
ते मराठी भाषेत नाहीत.
उगाच नवीन शब्द add करू नका

ते भाषा पंडित असणाऱ्या अतिशय हुशार लोकांचे काम आहे.
कशाला त्या भानगडीत पडत aahat

किंवा त्या वर add पण खूप येतात>>> हो येतात, युट्युब वर पण येतात. सगळं फुकट कसं मिळेल?

नवीन फुचर साठी subscribe करावे लागते .>>> मी दिलेल्या अ‍ॅप्स ला नाहि लागत. ३ वर्ष वापरत आहे.
रघू आचार्य माझ्या पोस्टचा अनुल्लेख करता आणि सरांना उत्तर देता. अनफेयर! Wink

आशू 29 एकाध्या ॲप चे उदाहरण देवू शकता का.

की नवीन सुविधा हव्या असतील तर ते ॲप सबस्क्राईब करा वे लागत नाही.
.सर्वांना फायदा होईल

त्यांना लोक त्रास देतात तरीही ते ज्या आत्मविश्वासाने मतं मांडतात त्याचं कौतुक केलंय फक्त.
माहिती सर्वांनाच उपयुक्त असल्याने नंतर लसावि काढण्यात येणार होता.

मला फिटबिट ऍप आवडले.हार्ट बिट मोजण्याची सेन्सेटीव्हीटी खूप चांगली आहे.आता मी एक बक्षीस मिळालेलं घड्याळ वापरते(फिटबीट जुनं झालं डिस्प्ले गेला.)यात बाकी गोष्टी चांगल्या मोजल्या जातात, हार्ट बिट एव्हरेस्ट चढलं तरी 70च दाखवतो.
चालणारे धावणारे खूप जण स्ट्रावा ऍप वापरतात.
कार ने चढलेला चढ अमुक मजले म्हणून मोजणे हे फिटबीट पण करते. ते डिलीट करते नंतर.
ही सर्व ऍप व्यायाम वेळेतला किती वेळ कार्डिओ किती फॅट बर्न हे परसेन्ट सांगतात तेही उपयोगी वाटते.
ऍप्पल फोन वापरत असल्यास ऍपल वॉच मध्ये खूप चांगली मोजणी आहे.शिवाय फॉल डिटेक्शन(आपण पडल्यास इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ना फोन जातात.पडल्यास शुद्धीवर असल्यास हे फोन जाणे प्रश्नावर नो क्लिक करून थांबवता येते.हार्ट पेशंट साठी उपयोगी.)
बाकी हे सर्व वापरूनही नीट व्यायाम आणि इतर मॉनिटरिंग आपल्या मनावर आहे.

वॉचमध्ये gyroscope sensor असला तर बसून फक्त हाताचे व्यायाम केले तरी कॅलरी बर्नीग दाखवेल.

6.7 km per/hour माझे वॉकिंग स्पीड पेसर दाखवते.
मला तो फोटो अपलोड करता येत नाही.
पण हा वेग माझ्या चालण्याचा नक्कीच नाही.
..हे मला माहीत आहे.
कधी 7 km /hours पण वेग दाखवते .
ते साफ चुकीचे आहे

माझी पण एक भर:.
आपला फिटनेस बॅंड घेऊन मुलं त्याने कॅच कॅच खेळली तरी ते कॅलरी बर्निंग दाखवेल.

Kenneth Anderson मदूमलाईच्या जंगलातला शिकारी आणि शिकार कथा लेखकाने लिहिले आहे की तो रात्री वाघाच्या शोधात टॉर्च घेऊन रानात वीस किमी चालून यायचा.
म्हणजे आम्ही दिवसाढवळ्या ताशी सहा सात किलोमीटर वेग राखायला नको का?

त्या डॅटा आणि ट्रॅकिंगचे स्क्रीनशॉट काढून स्टेटसला लावण्यापलीकडे वापरणाऱ्याकडून त्या डॅटाचे खरेखुरे ॲनालिसीस होते का?

Pages