फिटनेस अ‍ॅप कोणते घ्यावे ?

Submitted by रघू आचार्य on 9 January, 2023 - 20:14

मधूमेहाच्या नियंत्रणासाठी एक अ‍ॅप वापरतो. स्वस्तात ग्लुकोमीटर मिळाला त्यांचं डिफॉल्ट अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा वापर घरी घेतलेले रेकॉर्ड डिजीटल स्वरूपात साठवायला आणि डॉक्टरला दाखवायला होऊ शकतो. आधीचे ग्लुकोमीटर वापरल्याने रीडिंग अचूक मिळतात पण हा फायदा मिळत नाही. आताच्या मीटर मधे आणि लॅब रिपोर्ट्स मधे थोडासा फरक असतो. म्हणजे १२० च्या जागी १२४ इतका.

या अ‍ॅप ला गुगल फिट, फिटबिट, पोलर आणि अन्य काही अ‍ॅप फिटनेस अ‍ॅप जोडले जाऊ शकतात. (याशिवाय माझे मागचे रेडमी बॅण्डचे अ‍ॅप , झेप की झॅप लाईफ, सुद्धा सिंक्रोनाईज होते पण फोन हरवल्याने बॅण्डचा डिस्प्ले बंद पडला आहे. रेडमीच्या बर्याच बॅण्डचा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्याचा उपयोग नाही). गुगल फिट मधून जर लॉग आउट केलं नाही तर ड्रायव्हिंग ची मूव्हमेंट सुद्धा ते विचित्र रित्या स्टेप काऊंटिंग मधे अ‍ॅड करते. अ‍ॅप पेक्षा फेरीतल्या एकूण स्टेप्स मोजणे आणि नंतर फेर्या व लागणारा वेळ मोजणे हे जास्त सोयीचे असते असा अनुभव आहे. पण हे रेकॉर्ड डिजिटल नसते.

फिटबिट अनेक स्मार्ट वॉचेस, बॅण्डला जोडता येऊ शकते. पण या प्रॉडक्ट्सचे स्वत:चे अ‍ॅप असतेच.

या गरजा लक्षात घेऊन चांगले फिटनेस अ‍ॅप सुचवा.
हार्ड अ‍ॅण्ड फास्ट रूल काहीच नाही (हे शुद्ध मराठीत आहे). त्यामुळे याच्याशिवाय अन्य चांगले अ‍ॅप सुद्धा सांगू शकता. पण कमेण्टमधे तसे आवर्जून लिहावे ही नम्र विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही दिवसाढवळ्या ताशी सहा सात किलोमीटर वेग राखायला नको का?>>>>

दिवसाढवळ्या वाघ नई दिसणार, सकाळच्या वेळी गेलात तर ससे दिसतील फक्त

१. मेल फिट्नेस & फिमेल फिटनेस - आशु २९
२. सिंपल सोलफुल. - आशु २९
३. फिटबिट ऍप - मी अनु
४. ऍपल वॉच - मी अनु
५. स्ट्रावा - मी अनु

आतापर्यंत या अ‍ॅपची माहिती / अनुभव वरीलप्रमाणे आलेला आहे.

Glucose मीटर, heart beat मोजणारे ॲप जर फिटनेस ॲप ह्या श्रेणी मध्ये येत असतील तर.
Oxymeter वर अन्याय का?
त्याला पण फिटनेस ॲप हा दर्जा मिळालाच पाहिजे .
आग्रही मागणी आहे

^^^ निव्वळ अद्वितीय अशी थक्क करणारी मागणी आहे ही. या धाग्यावर कुणी या मीटर्सना फिटनेस अ‍ॅप म्हटलेय का ?
क्युटनेसच्या बाबतीत हे सर त्या सरांना गोल गोल फिरवून भिरकावून देणार यात शंकाच नाही.

Pages