सध्या काय मिस करताय?

Submitted by रघू आचार्य on 12 December, 2022 - 03:26

सध्या तुम्ही काय मिस करता?

उदा.
मायबोलीवर

साजिराच्या चित्रपटविषयक पोस्टी,
नीधप यांचे चित्रपटाचे रसग्रहण कसे करायचे याबाबत चिमटे काढत दिलेले प्रतिसाद
मामीचे हजरजबाबी विनोद
स्त्री विरुद्ध पुरुष धाग्यावर बोचकाऱ्यांनी जखमी होऊनही पुन्हा पुन्हा येणारे पुरूष

माबोबाह्य इवलेसे जग
हजारो क्रश्सची आता आठवण होत नाही. तरीही मिस करतो
मावसभावाच्या थापा, त्याचे घडी पडणारे हसरे डोळे, हसतमुख चेहरा
जिवाभावाचा मित्र
बालपणीची भाड्याने राहिलेली घरे आणि हरवलेले सवंगडी
री-रन ला येणारे सिनेमे
लहान असताना आया बाया मुलांना पकडून चेहऱ्यावर थापायच्या तो सुवासिक स्नो. स्नो पावडर आणि तेल चापडून चोपडून मुलांना बाहेर पाठवलं तरच समाधान पावणाऱ्या घरातील बाया.

बहोत कुछ बाकी है.
जल्दी करो

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेंडोलिन हे वाद्य मिस करतो. माझ्याकडे होते. शिकत होतो पण कुणीतरी पळवले ते.
आता तर चित्रपटसंगीतात सुद्धा ऐकू येत नाही.

माझ्या हयात नसलेल्या धाकट्या भावाला खूप जास्त मिस करते
भाऊ असताना आणि आम्हा दोघी बहिणींची लग्न होण्याआधी आम्ही तिघा भावंडांनी एकत्रित घालवलेला प्रत्येक क्षण मिस करते , ते आयुष्यातले सगळ्यात सुखाचे दिवस होते
आता ते क्षण पुन्हा कधीच येणार नाहीत

मोबाईल च्या आगमनापूर्वी नातेवाईकास पत्र पाठवणे, आलेल्या पत्राचे सामुहिक वाचन.. त्यावर आजीने काढलेल्या शुद्धलेखनाच्या चुका..
मैत्रिणींसोबत मनसोक्त गप्पा.
महिन्याच्या सुरुवातीला बाबांनी आणलेलं चांदोबा.. आणि ते आणणारे बाबा..

आरती, अगदी अगदी..
मुलांना वाढताना पाहाणं, त्यांच्या खोड्या, सदा खरचटलेली फुटलेली सबँडेज ढोपरं, घरातल्या होम ग्राऊंडवर खेळलेलं क्रिकेट, त्याच्या अजूनही टिकून राहिलेल्या खुणा, दुधाचे सांडलेले किंवा फुटलेले ग्लास,...खूप हुरहूर लावणारं सगळं. एम्प्टी नेस्ट मध्ये हे सगळंच मिस होतंय...

गोवा

कुडकुडणार्या थंडीत , बिल्डींगमधल्या सवंगड्यांसोबत गच्चीवर केलेल्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्या .

हे मिस करतो.
तसेच सिल्व्हर ज्युबिली , गोल्ड्न ज्युबिली सुद्धा.
398080376_823315603134058_8661937955246852190_n.jpg

Pages