सध्या काय मिस करताय?

Submitted by रघू आचार्य on 12 December, 2022 - 03:26

सध्या तुम्ही काय मिस करता?

उदा.
मायबोलीवर

साजिराच्या चित्रपटविषयक पोस्टी,
नीधप यांचे चित्रपटाचे रसग्रहण कसे करायचे याबाबत चिमटे काढत दिलेले प्रतिसाद
मामीचे हजरजबाबी विनोद
स्त्री विरुद्ध पुरुष धाग्यावर बोचकाऱ्यांनी जखमी होऊनही पुन्हा पुन्हा येणारे पुरूष

माबोबाह्य इवलेसे जग
हजारो क्रश्सची आता आठवण होत नाही. तरीही मिस करतो
मावसभावाच्या थापा, त्याचे घडी पडणारे हसरे डोळे, हसतमुख चेहरा
जिवाभावाचा मित्र
बालपणीची भाड्याने राहिलेली घरे आणि हरवलेले सवंगडी
री-रन ला येणारे सिनेमे
लहान असताना आया बाया मुलांना पकडून चेहऱ्यावर थापायच्या तो सुवासिक स्नो. स्नो पावडर आणि तेल चापडून चोपडून मुलांना बाहेर पाठवलं तरच समाधान पावणाऱ्या घरातील बाया.

बहोत कुछ बाकी है.
जल्दी करो

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उन्हाळ्यात बाळगोपाळ चुलत, मावस/मामे भावंडंसोबत गच्चीवर झोपणे
मैत्रिणींसोबत स्लीप ओव्हर, मुव्ही नाईट्स,बिर्याणी बनवणे वगैरे..

आंबे मनसोक्त आंबे आणि आईसक्रीम्स, कुलफ्या खाणे!

जुनी माबो आठवण म्हणजे आम्ही कोल्हापुरी हा वाहता धागा. सृष्टी या आयडी चे प्रत्येकाची हजेरी घेणे. आणि गमतीजमती. बेफिकीर यांच्या कथा अधाशा सारख्या वाचलेल्या. दाद यांचं लेखन , बागकाम, घरी मेथी बिथी लागवड हे धागे.

वाड्यातलं राहणं फार मिस करते. मागच्या अंगणात चुलीवर पहाटे तापवलेलं पाणी, पाणी तापवत बसताना तपेल्याखाली सिझन ला आठळ्या, इतर वेळी वांगी, रताळी भाजणे. नारळाच्या झावळ्या पडल्या की त्यापासून आबांचं बघून बघून खराटे बनवणे. झाडांवर चढून फणस, काजू काढणे. संध्याकाळी रानोमाळ हिंडून करवंद, जांभळ गोळा करणे. घरात फणस आणलेलं आईला आवडायचं नाही. त्याची उस्तवर करायला लागते म्हणून. मग आधी फणस आणून अंगणातल्या झाडात लपवायचे आणि आई बाहेर कुठं गेली की ते घरात लपवायचे. मग पिकल्याचा वास सुटला की शाळेतून येईपर्यंत फणस प्रकट झालेला असायचा. आता एवढा पिकलेला फणस टाकून कसा द्यायचा मग तेल सूरी घेऊन सगळे गरे काढायचा कार्यक्रम तासभर चालायचा. (आता 50 रु ला सहा सात गरे मिळतात Uhoh ) आंब्यांची तर गणती च नाही. वजन, शुगर हे शब्द ही खिजगणतीत नसायचे. लोखंडी कॉट असायची पूर्वी त्या खाली कायम अढी घातलेली असायची. केव्हाही या, पोरं टोर घेऊन या, आंबे घ्या ,धुवून खावा.
सुट्टीत कऱ्हाडला कृष्णेच्या घाटावर जायचं. कधी प्रीतिसंगमावर जायचं . टप्पे मारत पाण्यात दगडं भिरकवायची. शँख शिंपले गोळा करायचे. ती तर इस्टेट च असायची. पोहणारी भावंड पोहायची. आमच्या सारखी नदीत कडेला फतकल मारून डुंबायची. रात्री साडे सात ला सगळ्या मुलांनी (वय वर्षे 2 ते 15 ) रामरक्षा, अथर्वशीर्ष सारखे श्लोक कोरस मध्ये म्हणायचे. सगळी भावंड जमलेली असायची. मग आधी मुलांची पंगत करून रात्रीचं जेवण. ते झालं की पत्र्यावर गाद्या घालायच्या . एकच ठिकाणी पडवीवर पत्रा घातलेला होता.तिथं जिना /शिडी असलं काही नव्हतं. दुसऱ्या मजल्यावरच्या मधल्या खोलीच्या अर्ध्या भिंतीवरून चढून यायला लागायचं. त्यामुळं मुलं आणि बारीक/चपळ जनता च यायची. मग भुताखेतांच्या गोष्टी करत चांदण्याखाली झोपायचं.
उन्हाळ्यातली वाळवणी. घरातल्या दोघी तिघी गॅसवरून वाफाळती मोठी पितळी पातेली काढायच्या , आमची पोरांची लुडबुड म्हणजे प्लास्टिक कागद पसरणे , दगडं ठेवणे, जिन्नस अर्धवट वाळला की चट्टामtta करणे. आता टेरेस मोठ्ठी झालीत पण एवढी मोठ्या प्रमाणावर वाळवणेच होत नाहीत.

कॉलेजमध्ये गेल्यावर लेक्चर्स बंक करून आजूबाजूचे धबधबे, समुद्रावर भटकायला जाणे हे आता शक्यच नाही. कुछ कुछ होता है 3 ते 6 चा शो बघणे आणि दुसरा ग्रुप सहा ला थिएटरवर आल्यावर आमच्याबरोबर पण बघायचंच म्हणून परत 6 ते 9 बघणे. आता असा आग्रह होणे नाही आणि आपणच बघायचा म्हणलं तर डोकं दुखेल ते वेगळं Lol
गफ्रे बोफ्रे जोड्या जुळवताना आद्य कर्तव्य असल्यासारखी तत्परतेने मदत करणे. त्यासाठी त्यांच्या पालकांपुढे खोटं बोलावं लागलं तर ते पुण्यकर्म समजणे.
आणि ही असं बरच काही....

लॉकडाऊन मिस करतोय फार..
गोल्डन डेज ऑफ माय लाईफ..
एवढे नवनवीन प्रकार आणि धमाल केली त्या दिवसात की त्या तुलनेत आताचे आयुष्य रुटीन वाटू लागलेय..

मायबोलीवरचेही सांगायचे झाल्यास बॅचलर ऋन्मेष म्हणून वावरताना प्रत्येक लेख प्रत्येक प्रतिसाद लिहिताना जी आभासी गर्लफ्रेंड नेहमी डोळ्यासमोर यायची तिला मिस करतो फार...

आरामात बिछान्यात पडून , भिंतीला पाय लावून पुस्तकं वाचत लोळणं.
सकाळी सकाळी आईच्या हातची गर्रम गरम चपाती - चहात बुडवून खाताना होणार्या गप्पा . आजीच्या हातचा तोंडली भात ,
रविवारी सकाळी आई ओरडत असतानाही , मी आणि बहिण लोळत पडून टीव्हीवर रंगोली बघणं आणि बाबा उठायला लागले की त्यानाही जबरदस्तीने 'झोपा ओ , रविवार आहे " म्हणून आम्ही टीव्ही बघायला लावणं
माहेरी , गणपतीच्या ५ दिवसात बर्याचदा सकाळ संध्याकाळ आरतीला होणारी प्रचंड गर्दी , बिल्डींगमधले , शेजारी पाजारी , ओळखीचे , नातेवाईक , घरातले सगळ्यानी गजबजून जाणार छोटसं १ बीएचके च घर . दोन्ही वेळेला आगंतुक जेवायला येणार्या पाहुण्यांची लगबग.
हल्ली माहेरी दूपारच्या आरतीला आम्ही ४ डोकी असतो , जेवायलाही बाहेरची २ जणही आली तरी आई-बाबांना बरं वाटतं .
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे पाच वाजता कुडकुडत केलेली आंघोळ आणि मग पहिला फटाका कोण वाजवणार म्हणून आमच्या आणी शेजारच्या बिल्डींगमधल्या मुलांची चढाओढ .
सार्वजनिक गणेशोत्सवात केलेले नाच , नाटक , आणि श्लोक पाठांतर .
आणि बरच काही .

जुनी माबो आठवण म्हणजे आम्ही कोल्हापुरी हा वाहता धागा. सृष्टी या आयडी चे प्रत्येकाची हजेरी घेणे. >>> सो स्वीट ऑफ यु, थँक्स. सृष्टीला कळवते, ती हल्ली येत नाही. ती माझ्यासारख्या लेटमार्क वाल्या विद्यार्थीनीसाठी मेल किंवा विपुत आधीच्या गप्पा पाठवायची.

मी एकंदरीत बालपण, लग्नाआधीचे दिवस मिस करते, लिहिते सवडीने.

सर्वांनी लिहिलेलं आवडलं.

कॉलेजचे शेवटचे वर्ष आणि मित्रमैत्रिणी. वो टाइमच धमाल था. हॉस्टेल च्या टेरेसवर बसून चांदण्या बघत खिदळत सार्वजनिक मॅगी खाण्याचा कार्यक्रम मस्त असायचा. Time flies.
इथे माबोवर कोकणी फकाणे/गजाली नावाचा धागा होता. तो पण छान होता.

मी दृश्यावरून गाणे ओळखा मध्ये काहीही वेडेबागडे(अमक्याची सख्खी बायको, तमक्याच्या बायकोच्या नवऱ्याच्या भाच्याचा जावई वगैरे) क्लु देऊन लोकांच्या डोक्याला वात आणणे आणि तिथली कोडी सोडवणे मिस करतेय.

@वर्णिता
>> रानोमाळ हिंडून करवंद, जांभळ गोळा करणे. घरात फणस आणलेलं आईला आवडायचं नाही. त्याची उस्तवर करायला लागते म्हणून. मग आधी फणस आणून अंगणातल्या झाडात लपवायचे आणि आई बाहेर कुठं गेली की ते घरात लपवायचे. मग पिकल्याचा वास सुटला की शाळेतून येईपर्यंत फणस प्रकट झालेला असायचा. आता एवढा पिकलेला फणस टाकून कसा द्यायचा मग तेल सूरी घेऊन सगळे गरे काढायचा कार्यक्रम तासभर चालायचा. (आता 50 रु ला सहा सात गरे मिळतात Uhoh ) आंब्यांची तर गणती च नाही. वजन, शुगर हे शब्द ही खिजगणतीत नसायचे. लोखंडी कॉट असायची पूर्वी त्या खाली कायम अढी घातलेली असायची. केव्हाही या, पोरं टोर घेऊन या, आंबे घ्या ,धुवून खावा.
सुट्टीत कऱ्हाडला कृष्णेच्या घाटावर जायचं. कधी प्रीतिसंगमावर जायचं . टप्पे मारत पाण्यात दगडं भिरकवायची.

त्या त्या प्रसंगाचे वर्णन इतक्या छोट्या छोट्या तपशीलासहित वाचताना अक्षरशः ते पुन्हा जगतोय असे वाटले Happy उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्या, आजोळी जमलेली भावंडं, लपाछपी शिवाशिवीचे खेळ, दंगा, आरडाओरडा, चांदोबा, किशोर, चंपक, आंब्यांची रास, जांभूळ करवंदं, दिवाळीचा अभ्यास, मामाची स्कुटर, ग्राउंडवर संध्याकाळी खेळलेले खेळ, दिवसभर कुठून कुठून उंडारून आल्यावर संध्याकाळी अंगाला सुटणारी खाज आणि मग हातपाय स्वच्छ धुवून संध्याकाळी देवासमोर केलेल्या प्रार्थना आणि सगळ्यात शेवटी "शम्भो", पिवळाधमक प्रकाश देणारे बल्ब, रात्री बेरात्री जाग आली तर अगदी छोट्या दिव्याच्या प्रकाशात भयाण वाटणारा रात्रीचा सन्नाटा...... !
खूप खूप काही सोडून आलो आपण Happy

खरे सांगायचे तर नोकर दारी च्या routine Life च खूप वैताग आला आहे.
Office,boss, नियम, अगदी नको वाटतात.
स्वच्छंदी आयुष्य मिस करतं आहे.
पैसा,संसार,प्रतिष्ठा कधी कधी नको वाटतात..त्याची किंमत खूप मोठी असते

खरे सांगायचे तर नोकर दारी च्या routine Life च खूप वैताग आला आहे.
Office,boss, नियम, अगदी नको वाटतात.
स्वच्छंदी आयुष्य मिस करतं आहे.
पैसा,संसार,प्रतिष्ठा कधी कधी नको वाटतात..त्याची किंमत खूप मोठी असते

मस्त लिहीलंय सर्वांनी.
कोल्हापूर, आंबे सगळंच आवडले.

९० च्या दशकातली मेलडी मिस होतेय. उदीत नारायण, अलका जी, जतीन ललित, सोनू, अभिजित.... केके !

मुले जन्माला आल्यापासून ती मोठी होईपर्यंत त्यांच्याबरोबर केलेल्या धमाल गोष्टी, लहानपणी त्यांना वाचून दाखवलेली पुस्तके, वेगवेगळे अनुभव त्यांना मिळावे म्हणून केलेली धडपड, त्यांना आवडते म्हणून खाल्लेल्या अरबट चरबट गोष्टी हे सगळे आता एमटी नेस्टर झाल्यामुळे प्रचंड मिस करतेय. रोज एखादी तरी त्यांच्यबरोबरची आठवण आठवून थोडे तरी वैषम्य वाटते की किती लवकर ते सोनेरी दिवस संपले. असं नाही की प्रेम दोन्हीबाजूनी कमी झालेय पण त्यांचे जग आता विस्तारले आहे. आणि त्यांनी घरट्यातून झेप घेतली आहे.

दिवाळी अंक वाचत चकली-चिवड्याचे बोकाणे भरण्याचं माहेरसुख प्रचंड मिस करते व आई आता हयात नसल्याने, त्याबद्दल काही करता येणेही शक्य नाही. मुलगी वेगळी रहात असल्याने, तिला ते सुख देणेही शक्य नाही.
एकंदर इन लिंबो!!

दक्षिण मुंबईतल्या चाळीतील बालपण मिस करतो.
दर महिन्याला एखादी रात्र तरी हमखास घरात त्या आठवणींची चर्चा रंगते..

मला भारत आणि कॅनडा दोन्ही होम वाटायचे. कधीकधी अगदी 'वन्स ईन अ ब्लू मून' मिस करते. आता भटक्यासारखं वाटतं. इतकी घरं/देश बदलले की ते 'आपलं घर' फिलींग हरवलं. मला नॉस्टॅल्जिया परवडत नाही. स्वभावातही नाही, नाही तर काही खरं नव्हतं. मी जिप्सी आहे !! नेहमी स्वतःचे १००% देते, नाही टिकलं तर 'यथा काष्ठं च काष्ठं च' म्हणून पुढे निघून जाते.

अहो, पण तुम्ही पॉईंट मिस केला ना राव!

>> नीधप यांचे चित्रपटाचे रसग्रहण कसे करायचे याबाबत चिमटे काढत दिलेले प्रतिसाद
काय पण तुम्ही लोक, सगळा धागा ज्यासाठी काढला तेच मिस करून कसे चालेल? Rofl

ह्यावेळेस आयडी सभ्य घेतला बाकी ! मला बरेच दिवस शंका येत होती हा तुमचाच अवतार आहे.
पण मला काय म्हणायचय काकू, तुम्हाला इतका वेळ मिळतो कसा? कपड्यांचे जाउद्या पण तो दगडं गळ्यात (दुसर्‍यांच्या) घालायचा उद्योग चालू केला होता ना, तो पण खोक्यात गेला का? Lol
आता तुम्ही कितीही जहरीलं उत्तर दिलं ना, तरी आम्ही थयथयाट करणार नाही, बर्का.
तुम्हाला एक कामधंदा नाही, पण आम्हाला पोटापाण्याचा उद्योग असतोय बाबो! Lol

उन्हाळ्याच्या सुट्टीत लायब्ररी मधुन पुस्तके आणून लोळत वाचणे, कट्ट्यावरच्या गप्पा, स्कूटी घेऊन भटकणे, ट्रेक्स, राजगडावरुन बघितलेला रात्रीचा आकाशाचा नजारा..नविन नविन प्रेमात पडल्यावर पोटात होणार्‍या गुदगुल्या...I miss those magical moments!

वर्णिता, अतुल मस्तच लिहीलंय. सर्वांचेच प्रतिसाद मस्त आहेत.
अस्मिता, आचार्य रजनीश यांचे फिरस्त्याबद्दलचे प्रवचन आहे. एकतारी घेऊन स्वतःच्या आनंदात फिरत राहणारा, कुठेही न गुंतणारा. ऐकले / वाचलेय का ?

मार्मिक ताई,आयडीला जागा कि जरा. नीधप ताईंचे प्रतिसाद मलाही चावून गेलेत. पण त्यातून नंतर शिकलोच. बर्‍याचदा उताणाही पडलो पण त्यातनं शिकता आलं. नी ताईंना त्या वेळी मी ही (माझ्या दृष्टीने चावरी) उत्तरे दिली होती, पण त्यांचे मुद्दे सावकाश पटल्यावर मी चूक होतो हे माझ्याशी कबूल केले. सार्वजनिक रित्याही कबूल करायला काही लाज वाटणार नाही. तुमचेही ओरिजिनल आयडीचे लिखाण जर नाही पटले तर कदाचित चुकीची उत्तरे देईन, पण मागाहून पटल्यास असेच कौतुक करायलाही मागेपुढे पाहणार नाही. माझा हा अवतार म्हणा हवा तर, कारण ओरिजिनल आयडी आता शिल्लक नाही. त्यामुळे हाच ओरिजिनल आहे. विश्वास ठेवा अगर नका ठेवू फरक पडणार नाही.

इतर आयड्यांमधेही साजिरा, मामींसह काहींची नावे आहेत. त्यांचाही मी ड्युआयडी असू शकतो. कदाचित हे जॉईंट ऑपरेशन असू शकेल. तुम्ही पोलीस खात्याला नीट चौकशीचे आदेश द्यावेत.

अर्थात तुमचं आणि त्यांचं जोरदार वाजलं असेल त्यामुळे कुणी त्यांची तारीफ केल्याने द्वेषाने अंध होऊन अशी काही शक्यता असू शकते हेच मान्य नसेल तर अशी स्पष्टीकरणे देणे, ड्युआयडीला उत्तर देणे हे सारे व्यर्थच !!! मात्र काही भाबडे जीव विश्वास ठेवतात म्हणून प्रपंच. तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे. या आरोप करा. धागा पळत राहील. Lol

बराच विचार करून उत्तर दिलय. Happy आणि कांगावा, थयथयाट... काही नाही. डायरेक्ट आरती? वाह, क्या बात है!
बरं पण हे कसं जमतं बुवा? म्हणजे आरती (तीही स्वतःसमोरच) पण आपणच ओवाळायची, टाळ्या पण आपणच वाजवायच्या आणि घंटा पण आपणच बडवायची. सॉल्लीड मल्टीटास्कींग आहे हां! Lol
दुसरी दोन नावे फोडणीला टाकली, की आपण डोळे मिटून दुध प्यायला मोकळे...असं आपलं मांजरीला वाटतं हो. Happy
बाकी तुमचं चालू द्या.
पुन्हा नविन आयडी घेऊन याल तेंव्हा भेटूच. Happy

मामाच्या गावी लहानपणी जायचो त्या वेळच्या आठवणी तिकडे जाऊन काढल्यावर त्या समवयस्कांना अगदी नकोसं झालं. "काय किती जुनं जुनं काढतोस" म्हणजे त्यांना आता मानसिकरित्याही बाहेर पडायचंय तर आपण उगाचच काय ते रम्य दिवस आठवणी काढलेल्या आवडल्या नाहीत.
थोडक्यात इथे सांगणे ठीक पण तिथे आपला पप्पू होतोय. ज्यात आपण रमत होतो त्या आठवणीही त्यांना नकोत.

माणूस नेहमी गतकाळ मिस करतो.
पण वर्तमान काळात काय मिस करतो ह्याचे उत्तर धागा कर्त्याला अपेक्षित असावे.

म्हणजे प्रवास पकडुन 14 तास घरा बाहेर राहणारे नोकरी वाले .
आणि ते सर्व 14 तास दुसऱ्याच्या मर्जी नीच वागावे लागते .
Office मध्ये बॉस आणि प्रवासात रेल्वे ,बस,टॅक्सी , ह्यांच्या मर्जी नीच.
पण मी सोडून कोणी ही खरे उत्तर दिले नाही.
"स्वच्छंदी जीवन मिस करत आहे"
स्वतःच्या मर्जी नी जगायला मिळत नाही.

Pages